00gajananगेल्या काही वर्षांमध्ये बदललेलं जीवनमान, वाढलेली सुबत्ता, स्पर्धेमुळे वाढता ताणतणाव, बैठी जीवनशैली या सगळ्यामुळे स्थूलचा, मधुमेह, हृदयविकार यांना आमंत्रण दिले जात आहे.

लठ्ठपणा आणि वाढलेले वजन हे दोनही घटक हृदयविकाराला आमंत्रण देतात. लठ्ठपणा म्हणजे वाढलेले चरबीचे प्रमाण. ते त्वचेच्या जाडीवरून ठरवले जाते. त्वचेची जाडी एक सेंमीपेक्षा जास्त असेल तर ती व्यक्ती स्थूलतेकडे झुकली आहे असे समजावे आणि ही जाडी एक इंचापेक्षा जास्त असेल तर ती व्यक्ती लठ्ठ आहे असे समजावे.
वय आणि उंचीच्या प्रमाणात वजन नसेल तर ते वाढलेले आहे असे मानतात. वैद्यकीय दृष्टय़ा जर बॉडी मास इन्डेक्स जास्त असेल तर वजन वाढले असे मानले जाते.
बीएमआय= वजन (किलोमध्ये)/ उंची (मीटरमध्ये) असे मोजले जाते. बीएमआय २० ते २५च्या दरम्यान असेल तर नॉर्मल समजावे. २५ पेक्षा जास्त असेल तर स्थूल समजावे ४० पेक्षा जास्त असेल तर त्याला तीव्र स्थूलपणा समजावे.

Chaturgrahi Yog in meen rashi
Chaturgrahi Yog : १०० वर्षानंतर चतुर्ग्रही योग; ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा, होऊ शकतो मोठा धनलाभ
china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..
Rahu Shukra Yuti in meen rashi
विपरीत राजयोगामुळे दहा दिवसांमध्ये ‘या’ तीन राशींचे बदलणार नशीब , मिळणार गडगंज पैसा

जाडेपणा बघण्याच्या तिसरा गुणांक आहे, तो पोटाचा घेर. आपल्या जीवन शैलीत झालेल्या बदलांमुळे, बदलेल्या आहारामुळे आणि व्यायामाच्या अभावामुळे पोटाचा घेर वाढतो. आपल्या पोटाचा घेर, कंबर आणि नितंब यावरून हा गुणांक ठरवला जातो, त्याला डब्ल्यूएचआर (Waist Hip Ratio ) म्हणतात. छातीच्या खालच्या बरगडय़ा आणि कमरेचे हाड याच्या मध्यभागी कंबरेचा (पोटाचा) घेर मोजायचा आणि नितंबाच्या सर्वात रुंद जागी नितंबाचा घेर मोजायचा, याचे गुणोत्तर ०.८५ किंवा त्यापेक्षा कमी असणे सुरक्षित मानले जाते. पुरुषांमध्ये पोटाचा घेर जास्त असतो. याला सफरचंदच्या आकाराचा लठ्ठपणा म्हणतात. (Apple Shaped Obesity)) तर स्त्रियांमध्ये नितंबाचा घेर जास्त असतो, त्याला पिअरच्या आकाराचा लठ्ठपणा म्हणतात. (Pear shaped obesity)
भारतीयांमध्ये ‘पोटाचा घेर वाढून उच्च रक्तदाब, इन्सुलिनला विरोध (Insulin Resistance), रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे, चरबीचे प्रमाण वाढणे आणि हृदयरोग होणे हे विकार होतात. याला सिंड्रोम एक्स असे म्हणतात. खरंतर जाडेपणा म्हणजेच खाण्यात उष्मांक जास्त आणि व्यायामाचा अभाव यामुळे तयार झालेली समस्या!
औद्योगिकीकरण आणि शहरीकरणामुळे मानवाच्या विचारसरणीत आमूलाग्र बदल झाला आहे. कामाच्या ठिकाणी, धंद्यामध्ये, घरामध्ये ताणतणाव, स्पर्धा यांचा हृदयावर विपरीत परिणाम होतो आणि हृदयविकार, रक्तदाबासारखे आजार होतात.
खरे म्हटले तर अपेक्षा आणि तुलना या तणावाच्या जननी आहेत. आपल्या अपेक्षा पूर्ण होत नाही किंवा इतरांच्या तुलनेत आपल्याकडे कमी आहे, ही भावना मनात रुजते तेव्हा तणाव आणि नैराश्य यांना आयतेच आमंत्रण मिळते.
आपला मेंदू आणि हृदय यांना जोडणारी जी चेतासंस्था असते तिला अनुकंपी चेता संस्था (सिम्पथेटिक नव्‍‌र्हस सिस्टम)असे म्हणतात. ताण निर्माण झाला की, या अनुकंपी चेतासंस्थाकडून मिळालेल्या संदेशामुळे हृदय अधिक वेगाने आणि अधिक जोराने स्पंदन करू लागते. हृदयाच्या धमन्या आकुंचन पाऊ लागतात. शरीरातील अ‍ॅड्रिनॅलीन (Adrenaline) नॉर-अ‍ॅड्रिनॅलिन (Nor-Adrenaline), कोर्टिसोन (Cortisone) आणि स्टिराइडसचे (Steroids) प्रमाण वाढते आणि त्याचे विपरीत परिणाम हृदयावर आणि रक्त वाहिन्यांवर होतो. रक्तदाब वाढतो. असा हा मानसिक तणाव जास्त काळ सुरू राहिला तर हृदयविकाराला आमंत्रित करतो.
मानसिक एकटेपणा-
वैद्यकशास्त्रात असे आढळून आले आहे की, जी माणसं एकाकी असतात, एकलकोंडी असतात, मनाने एकटी असतात, ज्यांची इतरांशी काही फारशी जवळीक नसते त्यांच्यात हृदय रोगाचे प्रमाण जास्त असते.
मानसिक एकटेपणामुळे मनावर सतत सौम्य ताण असतो. सततचा ताण हा दुसऱ्याशी जवळीक साधल्याने, संपर्क वाढवल्याने हलका होतो. मनानं निरोगी राहण्यासाठी माणसांमध्ये मिळून मिसळून राहणं, मैत्री करणे, जवळीक असणे या गोष्टी आवश्यक असतात. एका ऑपरेशन थिएटरच्या भिंतीवर लिहिलेले एक छान वाक्य वाचनात आले,
‘काट लेते वक्त अपना यारों के साथ..
तो नही काटना पडता दिल आज औजारों के साथ’
एकत्र राहणे, मिळून मिसळून राहणे हे केवळ मानसिकच नव्हे तर शारीरिक स्वास्थ्यासाठीही आवश्यक आहे, हे आता बऱ्याच संशोधनांमधून सिद्ध झाले आहे.
व्यक्तिमत्त्व आणि हृदयविकार
मनुष्याच्या स्वभावानुसार त्यांचे दोन ‘अ’ प्रकारचे व्यक्तिमत्व आणि ‘ब’ प्रकारचे व्यक्तिमत्व अशा दोन वर्गात वर्गीकरण करण्यात येते.
‘अ’ प्रकारचे व्यक्तिमत्त्व असलेल्या (Type A- Personality) व्यक्ती फार धडपडय़ा, अपेक्षा ठेवणाऱ्या असतात. त्यांना कमीतकमी अवधीत जास्तीतजास्त यश, संपत्ती आणि प्रसिद्धी मिळवण्याची असते. त्या नेहमी असमाधानी असतात. या व्यक्ती एकाच वेळी बऱ्याच गोष्टी करतात. त्यांना वेळ न घालवता तातडीने गोष्टी करायच्या असतात. या व्यक्ती आक्रमक असून त्यांचे बोलणं आणि विचार प्रक्रिया दोन्ही भरभर असतात. आपल्याच कामात मग्न व व्यग्र असतात. भोवतालच्या सुंदर गोष्टींमध्ये यांना रस नसतो. या विशिष्ट स्वभावामुळे त्यांच्या हृदयावर परिणाम होतो आणि अशा व्यक्तीमध्ये हृदयविकाराचे प्रमाण अधिक असते.
lp48या उलट ‘ब-व्यक्तिमत्त्वा’च्या (Type B- Personality) व्यक्ती शांत, घाईगर्दी न करता काम करणे, आपल्या पद्धतीने काम करणे, कामाचा आनंद उपभोगणे, आजूबाजूच्या वातावरणाचा आस्वाद घेणे, आनंद घेणे, मिळून-मिसळून राहणे, संबंध जोपासणे, छंद जोपासणे, छोटय़ा-छोटय़ा गोष्टीत या व्यक्ती आनंद उपभोगतात. या व्यक्तींमध्ये हृदयविकार, अती रक्तदाब आणि मधुमेहाचे प्रमाण कमी आढळते.
योग-मेडिटेशन ध्यान-धारणा याद्वारे आपल्या स्वभावामध्ये व्यक्तिमत्त्वामध्ये बदल घडवून आणता येतात. स्वत:च्या मर्यादेची आणि कार्यक्षमतेची जाणीव असणे महत्त्वाचे असते. त्यासाठी स्वत:चे अवलोकन करणे हा उत्तम उपाय आहे. समाधानी राहणे, लहानसहान गोष्टीतसुद्धा आनंद शोधणे, कर्म करत राहणे.. जे यश मिळेल त्यात खूश राहणे याचून शरीर आणि मन दोन्हीही निरोगी राहू शकते.

बैठी जीवनशैली
आधुनिकीकरणामुळे माणसाचे शारीरिक कष्ट कमी झाले. गाडय़ांमुळे पायी चालण्याचा, लिफ्टमुळे चढण्याचा व्यायाम कमी झाला. टी.व्ही., कॉम्प्युटरमुळे ऑफिसमध्ये आणि घरीसुद्धा बैठी जीवनशैली वाढू लागली आहे. त्यामुळे स्थूलता, लठ्ठपणा वाढतो आहे. पूर्वी कुपोषण ही समस्या होती तर आता लठ्ठपणा ही जागतिक समस्या आहे. लठ्ठपणामुळे हृदयविकार, मधुमेह, अति रक्तदाबसारखे आजार बोकाळतात.

मधुमेह
मधुमेह असलेल्या व्यक्तीमध्ये हृदयविकार होण्याचे प्रमाण अधिक असून त्याची तीव्रतासुद्धा अधिक असते. मधुमेह असलेल्या व्यक्तींना हृदयविकाराचा आजार कमी वयात होतो आणि ते औषधोपचारालासुद्धा चांगल्या प्रकारे दाद देत नाही. त्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण योग्य ठेवणे हे आवश्यक आहे.

उत्तेजक पदार्थ
गांजा, चरस, ब्राऊन, शुगर, कोकेन, मॉर्किन, हेरॉइड इत्यादी ड्रग्जच्या आहारी नवीन पिढी जात आहे. शहरातील उच्च आणि उच्च-मध्यमवर्गीय तरुणांच्या हातात बऱ्यापैकी पैसा खेळू लागला आहे आणि पाश्चात्त्यीकरणामुळे, ताणतणावामुळे, टीव्ही तसंच सिनेमामुळे ही पिढी कळत नकळत अशा व्यसनांकडे वळू लागली आहे. हे हृदयविकाराच्या दृष्टीने अतिशय वाईट आहे. रक्तवाहिन्या आकुंचन पावणे, रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गुठळय़ा तयार होणे, रक्तवाहिन्याच्या किटणातून रक्तस्राव होऊन रक्तवाहिनी पूर्णत: बंद होऊन हार्ट अ‍ॅटॅक येऊ शकतो.

धोक्याचे इतर घटक :
वैद्यकीय क्षेत्रात धोक्याचे घटक म्हणून ओळखल्या गेलेल्या बाबींमुळे फक्त ५० टक्के रुग्णांच्या हृदयविकाराचं कारण कळू शकते. उरलेल्या सुमारे ५० टक्के रुग्णांना हृदयविकार का झाला असावा हे नक्की सांगता येत नाही. मागील दशकामध्ये बऱ्याच संशोधनामध्ये असे आढळून आले आहे की भारतीयांमध्ये हृदयविकार वाढीसाठी विशिष्ट घटक कारणीभूत आहेत. त्यात वाढलेल्या ट्रायग्लिसराइडस, लायपोप्रोटीन अ, अ‍ॅण्टिऑक्सिडंटची कमतरता, ‘फायब्रोजन’ची वाढलेली पातळी (रक्तातील फायब्रोजन चे प्रमाण वाढले तर रक्तात गुठळी होण्याचे प्रमाण वाढते.) यांचा समावेश आहे. काही संशोधनामधून स्पष्ट झाले आहे की शरीरात होणाऱ्या जंतू क्षयामुळे (Infections), वातावरणाच्या बदलांमुळे, प्रदूषणामुळे, पाण्याच्या कठीणपणामुळे (Hardness  of Water), सुद्धा हृदयविकार होण्याची शक्यता असते. जंतूचा प्रादुर्भाव होऊन रक्तवाहिन्यांच्या आतल्या अस्तराला सूज येते. त्यात ‘क्लॅमायडिया’ या विषाणूचा प्रादुर्भाव प्रामुख्याने आढळून येतो.
हृदयविकाराच्या कारणांमध्ये नवनवीन घटक आणि कारणांची यादी वाढतच आहे. त्यातली काही कारणे आपण टाळू शकतो, त्यांची तीव्रता कमी करू शकतो तर काही टाळू शकत नाही. आपण आपल्या माता-पित्याकडून मिळालेले ‘जनुक’ (Genes) बदलू शकत नाही, पण जास्त धोक्याचे घटक असतील तर ‘जनुकां’चा प्रभावही जास्त दिसून येतो हे लक्षात घेतले पाहिजे. बदललेल्या जीवनशैलीचा भारतीयांच्या जनुकांत झालेल्या बदलांचा परिणाम आपल्या जीवनमानात दिसतोच आहे. म्हणूनच हृदयविकार हा बदललेल्या जीवनशैलीचा आजार आहे.
डॉ. गजानन रत्नपारखी