24 October 2019

News Flash

१२ ते १८ डिसेंबर २०१४

मेष ग्रहस्थिती तुमच्यातील जिद्द आणि महत्त्वाकांक्षा वाढवायला उपयोगी पडेल. ज्या कामामध्ये पूर्वी बरीच धडपड करून पदरी निराशा आली होती त्यामध्ये आता आशेचा किरण दिसू लागेल.

| December 12, 2014 01:03 am

01vijayमेष ग्रहस्थिती तुमच्यातील जिद्द आणि महत्त्वाकांक्षा वाढवायला उपयोगी पडेल. ज्या कामामध्ये पूर्वी बरीच धडपड करून पदरी निराशा आली होती त्यामध्ये आता आशेचा किरण दिसू लागेल. व्यापार-उद्योगामध्ये नवीन वर्षांत नवीन कार्यपद्धतीचा श्रीगणेशा करण्याचा तुमचा इरादा असेल. त्याला अनुसरून योग्य व्यक्तींशी गाठीभेटी होतील. नोकरीमध्ये बदली किंवा वेगळ्या पद्धतीचे काम हाताळावे लागण्याची नांदी होईल. सांसारिक जीवनात एक चांगले तर एक वाईट असा अनुभव येईल.

वृषभ ग्रहमान तुम्हाला मोहात टाकणारे आहे. त्यामुळे तुम्ही ठरविलेले बेत सभोवतालच्या व्यक्ती किंवा तुम्ही स्वत:च रद्द कराल. व्यवसाय- धंद्यामध्ये स्पर्धक एखादी वेगळी खेळी खेळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही थोडेसे बिचकून जाल आणि चुकीचा निर्णय घ्यायला प्रवृत्त व्हाल. हाथी चले अपनी चाल या नीतीचा वापर करा म्हणजे त्रास होणार नाही. नोकरीच्या ठिकाणी ऐकावे जनाचे करावे मनाचे हा कानमंत्र उपयोगी ठरेल. तुमचे लक्ष फक्त कर्तव्यावर केंद्रित करा. घरातील व्यक्ती तुमच्याकडून बऱ्याच अपेक्षा ठेवतील.

मिथुन विविधता या गोष्टीविषयी तुम्हाला जबरदस्त आकर्षण असते. नेहमीच्या वातावरणातून बाहेर पडून आपल्या आवडी-निवडी जतन करण्यावर तुमचा भर राहील. व्यापार-उद्योगात एखाद्या प्रदर्शनामध्ये सहभागी होऊन मालाची विक्री आणि फायद्याचे प्रमाण वाढवण्याचे प्रयत्न कराल. परदेश व्यवहाराला गती येईल. नोकरीमध्ये नवीन प्रोजेक्टकरता तुमची निवड होण्याचे संकेत मिळतील. बेकार व्यक्तींना तात्पुरते काम मिळेल. घरामध्ये आप्तेष्ट आणि नातेवाईक यांच्याशी जपून वागा नाहीतर त्यांचा गैरसमज होईल.

कर्क ग्रहमान तुमच्या कामसू स्वभावाला जरी पूरक असले तरी त्याचे लगेच फळ मिळणार नाही. त्याचप्रमाणे बऱ्याच वेळेला तुमची स्थिती एकला चलो रे अशी असणार आहे. व्यापार-उद्योगात जोपर्यंत नवीन कार्यपद्धतीमध्ये तुम्ही स्थिर होत नाही तोपर्यंत कोणतेही काम बंद करू नका. नोकरीमध्ये आवडते सहकारी किंवा मित्र यांचे काम करावे लागेल. घरामध्ये सर्वकाही चांगले असेल, परंतु नेहमीच्या व्यक्ती अवतीभवती नसल्यामुळे एकाकीपणाची जाणीव होईल. लांबच्या प्रवासाचे बेत आखाल.

सिंह सप्ताहाचे ग्रहमान कोडय़ात टाकणारे आहे. ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवाल त्यांच्याबाबतीत भरवशाच्या म्हशीला टोणगा असा अनुभव येईल. याउलट ज्यांच्याकडून काही अपेक्षा नव्हती त्यांच्याकडून सहकार्य मिळेल. व्यापार-उद्योगामध्ये पैशाची गरज आणि बाजारातील चढ-उतार यामुळे जुन्या पद्धतींना पूर्णविराम देऊन त्याऐवजी नवीन पद्धतीचे काम करावेसे वाटेल. नोकरीमध्ये संस्थेच्या गरजेपोटी तुमच्यावर वेगळे काम सोपवले जाईल. घरामध्ये प्रिय व्यक्तींशी किरकोळ खटके उडतील.

कन्या दीर्घकाळ ज्या व्यक्तींबरोबर तुमचा संपर्क होता अशा व्यक्ती काही कारणाने तुमच्यापासून दूर जातील. व्यापार-उद्योगात नवीन वर्षांच्या संकल्पानिमित्ताने तुमचे कार्यक्षेत्र आणि सभोवतालचे वर्तुळ दोन्ही बदलण्याची शक्यता आहे. नोकरीत स्वत: काम न करता हाताखालच्या व्यक्तींकडून जास्तीत जास्त काम करवून घ्याल. नवीन नोकरीच्या कामामध्ये विलंब होईल. घरामधील व्यक्तींच्या कल्पना तुम्हाला पटतील. त्यामुळे खिशावर ताण येईल. पूर्वी बुकिंग केलेल्या जागेचा ताबा मिळेल.

तूळ नेहमीच्या व्यक्ती सहवासात असतात तेव्हा त्याचे महत्त्व वाटत नाही. त्या लांब गेल्या की त्यांची उणीव भासत रहाते. याचा अनुभव येईल. व्यवसाय-उद्योगामध्ये ज्या कामातून फारसा फायदा होत नाही ते काम बंद करून त्याऐवजी वेगळ्या पद्धतीचे काम करावेसे वाटेल. नोकरीमध्ये नेहमीच्या कामाचा कंटाळा येईल. त्यापेक्षा वेगळे काम असेल तर एखाद्या व्यक्तीच्या वागण्या-बोलण्यामुळे तुम्ही प्रभावित व्हाल. घरामध्ये सर्व काही ठीक असून तुम्हाला एकप्रकारची पोकळी जाणवेल.

वृश्चिक एखाद्या व्यक्तीकडून मदतीची तुम्ही अपेक्षा ठेवाल. पण त्याकरता तुम्ही अडून न राहता काहीतरी पर्याय शोधाल. शेवटी तुम्ही तुमचे उद्दिष्ट साध्य कराल. सभोवतालच्या व्यक्तींना याचे कौतुक वाटेल. व्यापार-उद्योगात नवीन वर्षांकरिता नवीन संकल्प तुम्ही कराल. नोकरीमध्ये बराच काळ तुमच्याबरोबर काम करणाऱ्या सहकाऱ्याशी ताटातूट होईल. जादा काम करून जादा भत्ते तुम्ही मिळवू शकाल. शुभ समारंभाच्या निमित्ताने तुम्हाला लांबच्या नातेवाइकांना भेटण्याचा योग येईल. त्यांच्याबरोबर मौजमजा कराल.

धनू ग्रहमान व परिस्थिती कशीही असो, तरीपण आनंदी राहण्याचा तुमचा स्वभावच आहे. त्याचा तुम्हाला फायदा होईल. व्यवसाय-उद्योगातील प्रगतीच्या दृष्टीने तुमच्या मनातील अनेक चांगल्या कल्पनांना गेले काही आठवडे वावच मिळत नव्हता. हे सर्व बेत तुम्ही नवीन वर्षांकरता राखून ठेवाल. त्यासाठी आवश्यक त्या साधन-सामुग्रीची तरतूद कराल. नोकरीमध्ये किचकट काम पूर्ण झाल्यामुळे तुम्ही थोडा आराम कराल. संस्थेकडून मिळणाऱ्या सुविधांचा फायदा घ्याल. नेहमीच्या सहवासातील व्यक्तीची अनुपस्थिती जाणवेल.

मकर ज्या गोष्टी आज घडत आहेत त्यापेक्षा भविष्यकाळाकडे तुमचे जास्त लक्ष असते. त्यानुसार तुम्ही नवीन वर्षांकरता काय वेगळे करावे अशा विचारात असाल. व्यवसाय-उद्योगात मोठे बदल करावेसे वाटतील. कारखानदारांना नवीन तंत्रज्ञान खरेदी करण्याकरता गुंतवणूक आणि परदेशप्रवास करावासा वाटेल. ज्यांना नवीन नोकरी हवी असेल त्यांनी त्या दृष्टीने प्रयत्न करावेत. नेहमीच्या व्यक्तीपासून लांब गेल्याने घरामधील वातावरण सुनेसुने वाटेल. तरुण मंडळींना प्रेमात रुसवेफुगवे सहन करावे लागतील.

कुंभ सर्व ग्रहमान तुमच्यामध्ये नवचैतन्य निर्माण करणारे आहेत. जे आपल्याजवळ आहे त्यापेक्षा अधिक आणि चांगले कसे मिळेल याचा तुम्हाला ध्यास लागला असेल. त्याचाच एक भाग म्हणून नवीन हितसंबंध जोडून जुने संबंध संपुष्टात आणावेसे वाटतील. व्यापार-उद्योगात नवीन वर्षांकरता नवे बेत आखावेसे वाटतील. नोकरीमध्ये स्वत:चे कौशल्य आणि प्रावीण्य सिद्ध करण्याकरता एखादे आव्हान स्वीकारावेसे वाटेल. संस्थेतर्फे वेगळ्या प्रशिक्षणाकरता निवड होईल. तरुणांना एकाकीपणाची भावना मधूनच अस्वस्थ करेल.

मीन अनेक गोष्टी तुम्हाला एकाच वेळी कराव्याशा वाटतात. तुमच्यातील रसिकता आणि नेतृत्व सभोवतालच्या व्यक्तींना दिसून येईल. अवघड काम हातात घेऊन ते फत्ते करून दाखवाल. व्यवसाय-उद्योगात लांबलेली सरकारी आणि कोर्टाची कामे मध्यस्थांच्या मदतीने मार्गी लावू शकाल. नोकरीमध्ये प्रत्येक कामातून तुमचे वेगळेपण दाखविण्याचा तुमचा प्रयत्न असेल. तुमच्या खास आवडीच्या क्षेत्रात चांगले काम केल्याबद्दल मानसन्मान मिळण्याची शक्यता आहे.

First Published on December 12, 2014 1:03 am

Web Title: horoscope 10