मेष परिस्थिती किंचित आटोक्यात आली असे वाटून तुम्ही सुस्कारा टाकता तोच एखादी नवीन समस्या तुमच्यापुढे येऊन उभे राहण्याची शक्यता आहे. ती सोडवण्यासाठी ‘शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ’ या नीतीनेच वागावे लागेल. व्यापार-उद्योगात नवीन बेत आखण्यापूर्वी स्पर्धकांच्या हालचालींचा अंदाज घ्या. कारखानदारांना कामगारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. नोकरीमध्ये एखाद्या निर्णयामध्ये वरिष्ठांकडून ताबडतोब होकार मिळणार नाही. थोडा संयम ठेवा. घरामध्ये सर्वाना आनंद देणारा कार्यक्रम ठरेल.

वृषभ एखादी नवीन समस्या तुमचे लक्ष वेधेल. व्यापार-उद्योगात एकंदरीत चित्र प्रगतिकारक राहील. एखादे काम कायद्याविरुद्ध जाऊन केले असेल तर त्यातून त्रास संभवतो. नोकरीमध्ये अवघड काम तुम्ही युक्ती लढवून हातावेगळे कराल. वरिष्ठ नवीन जबाबदारी तुमच्यावर सोपवतील. घरामध्ये वयोवृद्ध व्यक्तीच्या समस्यांकडे लक्ष पुरवावे लागेल. नातेवाईक, मित्रमंडळी किंवा कामगारांशी शक्यतो उधार-उसनवार करू नका. प्रवासाला जाण्यापूर्वी संबंधित कागदपत्रे आणि साधनसामग्री याची नीट तजवीज करा.

मिथुन हे ग्रहमान तुम्हाला कोडय़ात टाकणारे आहे. तुमच्या आवडीच्या कार्यक्षेत्रामध्ये किंवा करिअरमध्ये काहीतरी भव्यदिव्य करण्याची तुमची इच्छा असेल. व्यवसाय-उद्योगामध्ये नेहमीच्या कामात तुमचा वेग चांगला असेल, परंतु पूर्वी केलेल्या कामाचे पसे वसूल करताना गिऱ्हाईकांशी वादविवाद होण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये सहकार्याची असूया प्रकर्षांने जाणवेल. कारण तुम्हाला विशेष सवलती बहाल केल्या जातील. उधार-उसनवारी करू नका. तरुणांनी मित्रांशी जपून वागावे.

कर्क परिस्थिती थोडीशी आटोक्यात आली म्हणून तुम्ही नि:श्वास टाकता तोच एखादा नवीन प्रश्न उपस्थित होईल. वादविवादाच्या भोवऱ्यामध्ये स्वत:ला अडकवून घेऊ नये. व्यापारामध्ये सरकारी कामे आणि कोर्ट व्यवहार यांना काही कारणांनी डोके वर काढण्याची संधी मिळेल. नेहमीच्या कामात कामगारांकडे लक्ष द्या. नोकरीमध्ये सत्तेपुढे शहाणपण नाही याची आठवण ठेवून वरिष्ठांच्या आज्ञेचे काटेकोरपणे पालन करा. घरामध्ये वयोवृद्ध व्यक्तीच्या प्रकृतीची चिंता वाटेल. तरुणांचे मोठय़ांशी जमणार नाही.

सिंह तुमच्या मनात अनेक चांगल्या कल्पना आणि बेत असतील. त्या कृतीत उतरवण्याची तुम्हाला प्रचंड घाई असेल, परंतु ज्यांच्यावर तुम्ही अवलंबून आहात त्याचीच अडचण असल्यामुळे हे बेत लांबण्याची शक्यता आहे. व्यवसाय-उद्योगातील सरकारी कामे आणि तांत्रिक अडथळे सोडविण्याकरिता वेळ आणि पसे हातात राखून ठेवाल. नोकरीमध्ये दैनंदिन कामावर समाधानी राहा. घरामध्ये मोठय़ा व्यक्तींचे बोलणे आणि सल्ला बरोबर असूनही इतरांना पटणार नाही. लांबच्या प्रवासाचे बेत ठरविताना उत्तम नियोजन करा.

कन्या एकीकडे ग्रहमान सुधारल्यामुळे तुमच्यामध्ये आशेचा अंकुर फुटेल, परंतु प्रकृती आणि तांत्रिक कारणामुळे तुम्ही थोडेसे गोंधळात पडाल. त्याला घाबरून न जाता तुमचे मनोधर्य टिकवून ठेवा. व्यापार-उद्योगात दैनंदिन कामामध्ये सुधारणा दिसू लागल्यामुळे तुम्ही उत्तेजित व्हाल. पण एखाद्या जुन्या प्रकरणातून त्रास संभवतो. नोकरीमध्ये वरिष्ठांचे बोलणे आणि सूचना शांतपणे ऐकून मगच कामाला सुरुवात करा. घरामध्ये बरेच बेत ठरतील, पण त्यातल्या यशाची मदार पशावर अवलंबून असेल. घरगुती खर्च वाढतील.

तूळ ही परिस्थिती म्हणजे तुमच्याकरिता एक मोठे कोडे आहे. तुमच्या बुद्धीला खऱ्या अर्थाने हे आव्हान आहे. विचारपूर्वक कामे केली तर त्याचा उपयोग होईल. व्यवसाय-उद्योगात सरकारी नियम आणि प्रतिष्ठित व्यक्तींचे तंत्र या गोष्टी सांभाळा. पूर्वीच्या कर्जाची परतफेड करा. नोकरीमध्ये वरिष्ठांचा गरसमज होईल अशी कोणतीही चूक होऊ देऊ नका. घरामध्ये ताणतणाव विसरण्यासाठी एखादी छोटी ट्रिप ठरवाल. कलाकार, खेळाडू आणि राजकारणी व्यक्तींनी त्यांच्या वर्तुळातील व्यक्तींशी बोलताना-वागताना जपून.

वृश्चिक ‘प्रयत्नांती परमेश्वर’ असे मानणारी तुमची रास आहे. एखाद्या गोष्टीमध्ये हार न मानता तुम्ही त्याचा पाठपुरावा करत राहाल. याचा तुम्हाला उपयोग होईल. तोपर्यंत भरपूर कष्ट करण्याची तयारी ठेवा. व्यापार-उद्योगामध्ये तुमचे भविष्यातील बेत स्पर्धकांना कळू देऊ नका. सरकारी नियम व कोर्ट व्यवहारामध्ये गाफील राहून चालणार नाही. नोकरीमध्ये तुमच्या कामात काटेकोर राहा. घरामध्ये तात्त्विक मुद्दय़ावरून जोडीदाराशी वादविवाद होतील, पण त्याचा शेवट गोड होईल. घरखर्चात काटकसर करता येणार नाही.

धनू व्यापार आणि नोकरीमध्ये तुम्ही एकदम सक्रिय असाल, परंतु कौटुंबिक प्रश्नांवर मात्र थोडीशी मर्यादा आल्यासारखी वाटेल. यातून मार्ग काढण्यासाठी तुम्हाला डोके शांत ठेवून विचार करायला पाहिजे. व्यापार-उद्योगात प्रतिस्पध्र्याच्या हालचालींमुळे सक्रिय बनाल. त्यांना शह देण्यासाठी काहीतरी वेगळे करावेसे वाटेल, पण ते करताना सरकारी नियमांचे उल्लंघन करू नका. नोकरीमध्ये वरिष्ठांच्या बदलत्या सूचना आणि मूड यामुळे तुमचा गोंधळ उडेल. तुम्ही शांत राहा. घरामधील सदस्यांच्या मागण्या महागडय़ा असतील.

मकर घरामधल्या एखाद्या व्यक्तीचा कळत-नकळत तुमच्याकडून अपमान झालेला असेल तर त्यातून राग-लोभाचे प्रसंग उद्भवतील. पण तुम्ही गोड बोलून व युक्तीने वेळ मारून न्याल. एखाद्या मोठय़ा व्यक्तीच्या स्वास्थ्याविषयी चिंता वाटेल. व्यापार-उद्योगामध्ये नवीन कामातील तांत्रिक व सरकारी अडचणी तुम्हाला सोडवाव्या लागतील. नोकरीमध्ये जरी कामाची गती वाढली तरी वरिष्ठांच्या अपेक्षा जास्त असल्यामुळे त्यांचे समाधान होणे कठीण आहे. घरामधल्या व्यक्तींच्या आग्रहामुळे काही खर्चीक बेत ठरवावे लागतील.

कुंभ ज्या चुका गेल्या एक-दीड महिन्यामध्ये झालेल्या होत्या त्याची जाणीव आता तुम्हाला प्रकर्षांने होईल. व्यापार-उद्योगात जी कामे तांत्रिक कारणाने ठप्प झालेली होती, त्यामध्ये एखादा महत्त्वाचा निर्णय घेणे भाग पडेल. आíथक स्तरावरील लागलेली उतरण कमी करण्याकरिता उत्पन्नाचे नवीन साधन शोधाल. नोकरीमध्ये सहकाऱ्यांच्या बाबतीमध्ये भरवशाच्या म्हशीला टोणगा असा अनुभव आल्यामुळे तुम्ही सावध व्हाल. घरामधल्या वयोवृद्ध व्यक्तीविषयी चिंता वाटेल. तरुणांनी अतिसाहस करू नये.

मीन कामही करायचे आणि जीवनाचा आनंदही घ्यायचा असा एकंदरीत तुमचा मूड असेल. व्यवसाय-उद्योगामध्ये कायदेशीर गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. तसेच तुमच्या क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींचे तंत्र सांभाळा. पशाची आवक सुधारल्यामुळे नवीन कल्पनांना चालना मिळेल. नोकरीमध्ये वरिष्ठ एखादी तात्पुरती सवलत देऊन तुमच्याकडून जास्त काम करून घेतील. ज्यांना कामाच्या स्वरूपात बदली हवी असेल तर त्यांनी प्रयत्न सुरू करावेत.