22 September 2020

News Flash

१० ते १६ ऑक्टोबर २०१४

मेष - उपलब्ध असलेल्या सुखसोयींचा आणि वेळेचा कसा उपयोग करायचा हे लक्षात ठेवलेत तर तुम्हाला चांगले यश मिळू शकेल. व्यवसाय-धंद्यात काही नवीन संधी नजरेच्या टप्प्यात

| October 10, 2014 01:02 am

01vijayमेष उपलब्ध असलेल्या सुखसोयींचा आणि वेळेचा कसा उपयोग करायचा हे लक्षात ठेवलेत तर तुम्हाला चांगले यश मिळू शकेल. व्यवसाय-धंद्यात काही नवीन संधी नजरेच्या टप्प्यात येतील. त्यांचा जरूर फायदा उठवा. हातातील पैशाचा योग्य कारणाकरिताच वापर करा. नोकरीमध्ये ‘ऐकावे जनाचे करावे मनाचे’ हा कानमंत्र तुम्हाला कामी येईल. नवीन नोकरी स्वीकारताना त्यातील जबाबदारीचा अंदाज घ्या. चालू नोकरीत बराच धावपळीचा आठवडा जाईल. घरातील सगळ्यांचा आनंदी आणि उत्साही मूड असेल.

वृषभ तुमच्यातील जिद्द कायम ठेवण्यास ग्रहमान मदत करणारे आहे. ‘बचेंगे तो और भी लढेंगे’ असा तुमचा पवित्रा ठेवलात तर कोणत्याही परिस्थितीला तोंड देऊ शकाल. पण स्वत:ची मर्यादा सोडलीत तर परिस्थिती आटोक्याबाहेर जाईल. व्यापार-उद्योगामध्ये खूप पैसे मिळविण्यासाठी नवीन योजनेमध्ये सहभागी व्हावेसे वाटेल. सकृत्दर्शनी सर्व काही चांगले वाटेल, पण त्यातली खरी मेख वेगळीच असेल. ती जाणून घ्या. नोकरीमध्ये आळस केला तर वरिष्ठांना आवडणार नाही. प्रकृतीकडे लक्ष ठेवा.

मिथुन ग्रहमान तुमच्या इच्छा-आकांक्षेला काय करू आणि काय नको असे तुम्हाला होईल. व्यवसाय-उद्योगात तुमचा उत्साह अपूर्व असला तरी सर्व सोंगे आणता येतात पण पैशाचे सोंग आणता येत नाही, हे लक्षात ठेवा. हातामधील पैशाचा ठरविलेल्या कामाकरिताच उपयोग करा. नोकरीमध्ये वरिष्ठ तुमची खुशामत करतील आणि तुमच्याकडून जास्त कामाची अपेक्षा ठेवतील. घरामध्ये हौसेला मोल नसते हे तुमच्याकडे बघून समजेल. कोणाचीही नाराजी नको म्हणून सढळ हाताने पैसे खर्च कराल.

कर्क आळस करणे हा तुमचा स्वभाव नसल्यामुळे उसने अवसान आणून तुम्ही काम करीत राहाल. व्यापार-उद्योगात गिऱ्हाईकांची ये-जा काही कारणाने कमी होईल. त्याला चालना देण्यासाठी नव्या युक्तीचा वापर करावा लागेल. नोकरीमध्ये ज्या कामाचा तुम्ही आळस कराल त्याचीच वरिष्ठांना आठवण येईल. त्यामुळे नाइलाजाने असे काम तुम्हाला करावे लागेल. घरातील सदस्यांच्या तसेच मित्रमंडळी, नातेवाईक यांच्या तुमच्याकडून अपेक्षा वाढतील. त्या सर्वाना पुरे कसे पडायचे हा तुमच्यापुढे प्रश्न असेल.

सिंह तुम्हाला खूप काही तरी आणि चांगले करण्याची इच्छा असेल. परंतु त्याला योग्य व्यक्तींकडून मार्गदर्शन मिळणे अत्यावश्यक आहे. अशा वेळी तुमचे खरे हितचिंतक कोण याची कल्पना येईल. माणूस पैसे असले तरी संभ्रमात असतो आणि ते नसले तर चिंतेत असतो. व्यवसाय-उद्योगात कामाचा विस्तार वाढवण्याकरिता एखादी योजना तुमचे लक्ष आकर्षित करेल. नोकरीमध्ये तुमच्या कामाचा वेग चांगला राहील. नवीन नोकरीच्या कामाला गती येईल. घरामध्ये तुमचा आग्रही स्वभाव इतरांना आवडणार नाही.

कन्या पैसा ही एक अशी चीज आहे की जी माणसाला चांगले किंवा वाईट करायला प्रवृत्त करते. याचा अनुभव तुम्हाला येईल. व्यवसाय-उद्योगात गिऱ्हाईकांचा प्रतिसाद चांगला असल्यामुळे पैशाची आवक वाढेल, पण तेवढय़ाने तुमचे समाधान होणार नाही. आणि एखादा धोका तुम्हाला पत्करावासा वाटेल. नोकरीमध्ये सहकारी आणि वरिष्ठांशी गोड बोलून तुम्ही तुमचे एखादे काम करून घ्याल. नवीन जागा किंवा मोठी वस्तू खरेदी करण्यापूर्वी त्याविषयीची माहिती नीट मिळवा. घरामध्ये वेगवेगळे बेत ठरवाल.

तूळ प्रत्येक गोष्ट मोजून मापून करण्याचा तुमचा स्वभाव आहे, पण तुम्ही तुमच्या इच्छेला आता मान द्याल. त्याकरिता जादा धोका पत्कराल. व्यापार-उद्योगात नावीन्यपूर्ण कल्पना कृतीत उतरवाल. ज्यांच्या बरोबर व्यवहार करीत असाल त्यांची विश्वासार्हता पडताळून पाहा. नोकरीत तुमच्यावर पूर्वी अन्याय झाला असेल तर त्याची भरपाई करावीशी वाटेल. मात्र वरिष्ठांच्या आज्ञा विसरू नका. घरामध्ये अनेक छान छान बेत होतील. पैशाचा आढावा घेतल्यानंतर त्याचे खरे स्वरूप तुमच्या लक्षात येईल.

वृश्चिक अनेक वेळा नवीन व्यक्तींशी हितसंबंध वाढवावे लागतात. अशा वेळी माणसांची निवड सावधतेने केली तर तुमचाच फायदा होईल. व्यापार-उद्योगातील कामकाज नेहमीपेक्षा जास्त फायदा मिळवून देईल. त्यामुळे तुमच्यामध्ये एक नवीन प्रकारचा उत्साह संचारेल. नोकरीमध्ये संस्थेतर्फे काही विशेष सवलती मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कामामध्ये तुम्ही तत्पर असल्याने वरिष्ठ खूश होतील. घरामध्ये सर्वाचा मूड मौजमस्तीचा असेल. लांबच्या नातेवाईकांची भेट होण्याकरिता खास कार्यक्रम ठरवाल.

धनू एखाद्या बाबतीत गैरसोय झाल्यामुळे काही कामे लांबवावी लागली असतील तर त्याला गती मिळेल. तुमचे हितचिंतक तुम्हाला मदत करतील. व्यापार-उद्योगात जादा खेळत्या भांडवलाची गरज असेल तर ती बँक किंवा आर्थिक संस्थेकडून भागविली जाईल. नोकरीमध्ये संस्थेतर्फे एखादी विशेष सवलत किंवा इतर स्वरूपात मदत दिली जाणार असेल तर त्याचा फायदा उठवा. घरामध्ये दीर्घकाळानंतर एखाद्या नातेवाईकाला भेटण्याचा योग येईल. खरेदी-करमणूक करण्याची तुमची इच्छा असेल. पण त्यावर थोडेसे बंधन ठेवावे.

मकर ग्रहमान बदलते तसा आपल्या आचारविचारांत फरक पडत जातो. याची जाणीव करून देणारे ग्रहमान आहे. गेल्या काही दिवसांत तुमच्या कामामध्ये जर काही त्रुटी निर्माण झाल्या असतील तर त्या भरून काढण्यात वेळ जाईल. व्यापार-उद्योगात तुमच्या उद्योगप्रिय स्वभावाला अनुसरून चांगले ग्रहमान असल्यामुळे तुम्ही भरपूर काम कराल. नोकरीमध्ये अतिउत्साहाच्या भरामध्ये वरिष्ठांना भलतेच आश्वासन देऊ नका. घरामध्ये स्वत:चा मोठेपणा दाखविण्यासाठी खास बेत आखाल किंवा इतरांना आमिष दाखवाल.

कुंभ ग्रहमान सुधारत आहे. ज्या अडचणींना तुम्हाला विनाकारण तोंड द्यावे लागले होते त्यातून बाहेर पडण्याचा आता तुम्ही प्रयत्न कराल. अर्थात जादूची कांडी फिरल्याप्रमाणे सर्व गोष्टी तातडीने घडणार नाहीत. त्याकरिता दम धरणे आवश्यक आहे. व्यवसाय-उद्योगात तुम्हाला कर्ज किंवा खेळते भांडवल वाढवून पाहिजे असेल तर त्याची तरतूद होईल. नोकरीमध्ये कामाचा वेग उत्तम राहील. घरामधील व्यक्तींच्या समाधानाकरिता वेगळी आश्वासने द्यावी लागतील. देशात किंवा परदेशात हवापालटासाठी जाण्याचे नियोजन कराल.

मीन सुयोग्य व्यक्तींशी संगत ठेवा. व्यवसाय-धंद्यात काम चांगले मिळेल. पण त्याकरिता बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करू नका. जे पैसे मिळतील त्याची फेरगुंतवणूक करा. नोकरीमध्ये सहकाऱ्यांच्या शब्दावर विश्वास न ठेवता खरी परिस्थिती जाणून घ्या. शक्यतो तुमचे मत व्यक्त करण्याची घाई करू नका. घरामध्ये प्रत्येक व्यक्ती मनाशी एखादे स्वप्न रंगवेल. त्यांचे ते स्वप्न साकार करण्यापूर्वी खिशाची चाचपणी करणे योग्य होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2014 1:02 am

Web Title: horoscope 2
Next Stories
1 १२ ते १८ सप्टेंबर २०१४
2 १५ ते २१ ऑगस्ट २०१४
3 १८ ते २४ जुलै २०१४
Just Now!
X