23 September 2020

News Flash

भविष्य : २६ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०१४

मेष : कालाय तस्म नम: हेच खरे. बऱ्याच वेळा एखादे काम करण्याची आपल्याला इच्छा नसते परंतु सभोवतालच्या बदलत्या परिस्थितीमुळे आपल्यालाही आपला पवित्रा बदलावा लागतो.

| September 26, 2014 01:02 am

मेष कालाय तस्म नम: हेच खरे. बऱ्याच वेळा एखादे काम करण्याची आपल्याला इच्छा नसते परंतु सभोवतालच्या बदलत्या परिस्थितीमुळे आपल्यालाही आपला पवित्रा बदलावा लागतो. या आठवडय़ात याचा अनुभव येईल. व्यापार उद्योगामध्ये महत्त्वाचे करार सुरुवातीलाच करा. परंतु अतिसाहस मात्र कटाक्षाने टाळा. नोकरीमध्ये कामाचे ठरविलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याकरिता तुम्हाला रात्रीचा दिवस करावा लागेल. कामाच्या स्वरूपात काही बदल होण्याची शक्यता आहे. घरामध्ये दोन पिढय़ांतील विचारांची तफावत जाणवेल.

वृषभ खूप काही करायचे आहे, पण त्याची सुरुवात कुठून आणि कशी करायची यासंबंधी मनामध्ये थोडासा संदेह असेल. तुमच्या अवतीभवती असणाऱ्या व्यक्ती तुमच्याकडून बऱ्याच अपेक्षा ठेवतील. व्यवसाय-उद्योगात नेहमीपेक्षा काही तरी वेगळे करून बाजारातील आपली प्रतिमा सुधारण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. पशाची आवक चांगली असेल. नोकरीमध्ये वरिष्ठांच्या सूचना सतत बदलत राहिल्यामुळे तुमची धावपळ होईल. घरात एखादी चांगली घटना घडेल किंवा कळेल.

मिथुन कोणतेही बदल म्हटले की तुम्ही एकदम सतर्क आणि उत्साही बनता. त्याकरता ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सर्व करण्याची तुमची तयारी असेल. या आठवडय़ामध्ये तुमची रसिकता विशेष रूपाने जागरूक होईल. व्यवसाय-उद्योगामध्ये एखाद्या नवीन कार्यपद्धतीचा श्रीगणेशा होईल. त्याला प्रतिष्ठित व्यक्तीची हजेरी शोभा देईल. नोकरीमध्ये संस्थेची गरज आणि तुमची मागणी म्हणून नेहमीच्या कामामध्ये फेरफार केले जातील. घरातील वातावरण आनंदी आणि उत्साही असेल.

कर्क जे काम चालू असते त्या कामामध्ये वाढ कशी होईल याचा ध्यास तुम्हाला लागलेला असतो. अशा ध्यासापोटी या आठवडय़ामध्ये काही नवीन बेत तुमच्या मनात असतील. व्यापार उद्योगात गिऱ्हाईकांना आकर्षति करण्याकरिता चांगला उपक्रम सुरू कराल. प्राप्तीचे प्रमाण समाधानकारक राहील. नोकरीमध्ये तुमच्या कर्तव्यात तुम्ही तत्पर राहिल्यामुळे कामही चांगले होईल, आणि वरिष्ठही खूश होतील. घरामधील व्यक्तींशी थोडेसे फटकून वागाल पण तुमचा उद्देश चांगला असेल. प्रिय व्यक्तींचे हट्ट महाग पडतील.

सिंह नेहमीच्या कार्यपद्धतीचा तुम्हाला कंटाळा आल्यामुळे त्यात काही तरी बदल व्हावा असे तुम्हाला वाटेल. त्याकरता दैनंदिन कार्यक्रमामध्ये फेरफार कराल. थोडेसे धाडस करायलाही तयार व्हाल. व्यापार-उद्योगामध्ये गिऱ्हाईकांना आकर्षति करण्याकरिता स्पर्धकांपेक्षा वेगळ्या पद्धतीने काम कराल. पशाची आवक साधारण राहील. नोकरीमध्ये वरिष्ठांचा राग ओढवणार नाही याकडे लक्ष द्या. घरामध्ये मोठय़ा व्यक्तींचे मूड सांभाळणे कठीण होईल. नवीन जागेत स्थलांतराचा विचार मनात येईल.

कन्या प्रत्येक काम वेळेमध्ये आणि तुमच्या पद्धतीने केलेले तुम्हाला आवडते. या आठवडय़ामध्ये हे उद्दिष्ट साध्य करण्याकरिता तुम्हाला घडाळ्याच्या काटय़ानुसार काम करावे लागेल. तुमच्या दृष्टीने जी महत्त्वाची किंवा तातडीची कामे आहेत ती शक्यतो आठवडय़ाच्या सुरुवातीलाच करून टाका. व्यापार-उद्योगात इच्छा आहे तेथे मार्ग आहे हे तुम्ही तुमच्या कृतीने सिद्ध करून दाखवाल. नोकरीमध्ये संस्थेच्या गरजेनुसार कामाची पद्धत बदलून ठरविलेली कामे वेळेत पूर्ण कराल. घरामध्ये आनंदी आनंद असेल.

तूळ तुमच्या राशीला सगळे काही जमते, पण पशाचे नियोजन म्हटले की तुमचे बेत कोलमडतात. पण या आठवडय़ात जे पसे खर्च होणार आहेत ते तुमच्या आवडीनिवडीनुसार असल्यामुळे तुमची त्याविषयी तक्रार नसेल. व्यवसाय-उद्योगात व्यापारीवर्ग विक्री व फायद्याचे प्रमाण वाढविण्याकरिता जाहिरातीचे नवीन तंत्र विकसित करतील. त्याला प्रतिसाद चांगला मिळेल. पण शक्यतो उधारी न वाढविणे चांगले. घरामधील सदस्यांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करताना अंथरूण पाहून पाय पसरा.

वृश्चिक इच्छा आहे तेथे मार्ग आहे हे तुम्ही न बोलता तुमच्या कृतीतून सिद्ध कराल. काही बाबतीत सभोवतालच्या व्यक्तीचा सल्ला न घेता जे तुम्हाला करायचे आहे तेच कराल. व्यापार-उद्योगामध्ये गिऱ्हाईकांना आकर्षति आणि खूश करण्याकरिता काही सवलती किंवा बक्षीस योजना जाहीर कराल. त्यामुळे विक्री आणि फायदा या दोन्हींचे प्रमाण वाढेल. जोडधंद्यातून चांगली कमाई होईल. नोकरीमध्ये मात्र अतिउत्साहाच्या भरामध्ये जादा जबाबदारी स्वीकारू नका. घरामध्ये प्रत्येक जण आपआपल्या पद्धतीने जीवनाचा आनंद घेतील.

धनू बदल ही गोष्ट प्रत्येक माणसाच्या जीवनात अटळ असते. आणि विशिष्ट ग्रहमान आले की माणसाची बुद्धी त्या दिशेने काम करू लागते. या आठवडय़ात या दोन्हींचा प्रत्यय तुम्हाला येईल. व्यापार-उद्योगात कामाच्या पद्धतीत थोडेफार बदल करून तुमच्या कामाच्या स्वरूपात सुटसुटीतपणा आणाल. नोकरीमध्ये वरिष्ठ अचानक तुमच्या बदलीविषयी किंवा कामातील स्वरूपातील बदलाविषयी सूतोवाच करतील. घरामध्ये इतरांच्या आग्रहावरून तुम्ही मनोरंजन आणि करमणूक यांमध्ये सहभागी व्हाल.

मकर काही तरी नवीन करावे असे विचार तुमच्या मनात कायमच तरळत असतात. व्यापार-उद्योगामध्ये ज्या कामातून तुम्हाला अपेक्षेनुसार फायदा मिळत नाही ते काम बंद करून त्याऐवजी दुसरे काम करावेसे वाटेल. दुकानदार गिऱ्हाइकांना आकर्षति करण्यासाठी काही योजना जाहीर करतील. नोकरीमध्ये मात्र संस्थेमध्ये घडणाऱ्या घडामोडींमुळे तुम्ही थोडेसे कोडय़ात पडाल. तुमचा पवित्रा सावध ठेवणे चांगले. घरातील सदस्यांचे प्रतिष्ठित वस्तू खरेदी करण्याचे स्वप्न असेल. तुम्ही मात्र विचारपूर्वक पसे खर्च कराल.

कुंभ ज्या गोष्टी तुम्ही मनाशी ठरविलेल्या होत्या त्या पूर्ण करण्याकरिता या आठवडय़ात विशेष धडपड कराल. व्यवसाय-उद्योगाच्या दृष्टीने सप्ताह चांगला आहे. जेवढी भांडवलाची सोय कराल तेवढी उलाढाल वाढेल. नोकरदार व्यक्तींना कामाचा तणाव वाढण्याची शक्यता आहे. जोडधंदा असणाऱ्यांना चांगले काम मिळेल. परंतु गिऱ्हाईकांच्या अपेक्षा जास्त असतील. तुमची स्वत:ची इच्छा अपूर्ण राहिली असेल तर ती पूर्ण करण्यामध्ये भूषण मानाल. मोठी खरेदी करा पण ऋण काढून सण साजरा करू नका.

मीन बराच काळ जे चांगले बेत तुम्ही मनाशी ठरवून त्याला वाव मिळाला नव्हता ते कार्यान्वित करण्याचा तुमचा मानस असेल. त्यासाठी सभोवतालच्या व्यक्तींना गोड बोलून आणि चुचकारून तुम्ही तयार कराल. व्यवसाय-उद्योगात छोटी कामे करण्यापेक्षा एखादा मोठा हात मारावा असे तुम्हाला प्रकर्षांने वाटेल. पण तो निर्णय चुकीचा ठरेल. त्यापेक्षा चालू असलेल्या कामातच काही तरी नावीन्यपूर्ण करून दाखवा. शक्यतो रोखीच्या व्यवहारांना प्राधान्य द्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2014 1:02 am

Web Title: horoscope 26
Next Stories
1 वाचक प्रतिसाद : माहितीपूर्ण गणेश विशेषांक
2 मंगल मंगळ हो!
3 ऑपरेशन सद्भावना!
Just Now!
X