01 November 2020

News Flash

दि. १३ ते १९ फेब्रुवारी २०१५

मेष जी कामे विनाकारण अडकून पडलेली होती ती पूर्ण करण्याचा तुमचा इरादा असेल. व्यापार-उद्योगात मोठय़ा व्यक्तींची मदत तुम्हाला प्रत्यक्ष/ अप्रत्यक्ष आनंद देऊन जाईल.

| February 13, 2015 01:11 am

01vijayमेष जी कामे विनाकारण अडकून पडलेली होती ती पूर्ण करण्याचा तुमचा इरादा असेल. व्यापार-उद्योगात मोठय़ा व्यक्तींची मदत तुम्हाला प्रत्यक्ष/ अप्रत्यक्ष आनंद देऊन जाईल. नोकरीमध्ये ज्या कामातून तुमचा फायदा आहे असे काम नजरेच्या टप्प्यात येईल. परंतु हे काम बरेच कष्टदायक ठरेल. नवीन नोकरीच्या प्रयत्नात असणाऱ्यांनी जे काम मिळेल ते ताबडतोब स्वीकारावे. घरामध्ये मौजमजा आणि कर्तव्य यांचा समन्वय साधण्यात तुम्ही सफल व्हाल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाव्यतिरिक्त बाकी कोणत्याही कामात लक्ष घालू नये.

वृषभ तुमच्या व्यक्तिमत्त्वाला आणि कर्तृत्वाला झळाळी देणारे ग्रहमान आहे. जे तुमचे आवडीचे काम किंवा क्षेत्र आहे त्यामध्ये उत्तम कामगिरी करून स्वत:चे वेगळेपण सिद्ध करण्याचा तुमचा उद्देश असेल. व्यापार-उद्योगात आíथक कमाई वाढत राहील. मोठी गुंतवणूक करण्याचा विचार कराल. नोकरीमध्ये वरिष्ठांनी तुमच्या कामाची दखल घेतल्यामुळे तुम्ही फुगून जाल. नवीन नोकरीच्या कामात यश मिळेल. घरामध्ये सर्व स्तरांवर तुम्हाला मागणी असल्यामुळे तुम्ही थोडासा रुबाब दाखवाल. विद्यार्थ्यांना चांगले ग्रहमान आहे.

मिथुन बराच चढ चढून आल्यानंतर थोडासा सपाट रस्ता दिसल्यावर मनाला जसा आराम मिळतो तशी तुमची परिस्थिती असेल. व्यवसाय उद्योगामध्ये पूर्वी केलेल्या चांगल्या कामामुळे किंवा सदिच्छेमुळे नवीन काम मिळू शकेल. कारखानदारांना देशातून किंवा परदेशातून चांगला प्रतिसाद मिळेल. नोकरीमध्ये तुमची अडचण वरिष्ठांसमोर तुम्ही ठेवलीत तर त्यांच्याकडून थोडेफार मार्गदर्शन लाभेल. बेकार व्यक्तींना काम मिळण्याची शक्यता निर्माण होईल. विवाहोत्सुकांना मनपसंत जीवनसाथी मिळेल.

कर्क हातातोंडाशी आलेली काही कामे जर विनाकारण अडकून राहीली असतील तर त्याला आता वेग मिळेल. ज्या व्यक्तींना भेटण्याची तीव्र इच्छा होती, पण काही कारणाने अशा गाठीभेटी लांबल्या होत्या त्यांना आता मुहूर्त लाभेल. व्यवसाय-उद्योगात ज्या योजना तुमच्या मनात घोळत होत्या त्यांना वेग मिळेल. नोकरीमध्ये एखाद्या कंटाळवाण्या कामातून सुटका होईल. प्रकृतीच्या जुन्या तक्रारींकडे लक्ष द्या. घरामधल्या व्यक्तींच्या विशेषत: मुलांच्या गरजा भागवण्यासाठी थोडासा वेळ आणि पसे राखून ठेवा.

सिंह ग्रहांची साथ बुचकळ्यात टाकणारी आहे. पण रवीची साथ असल्यामुळे तुम्ही कोणत्याही गोष्टीला न घाबरता वेळ निभावून न्याल. व्यापार-उद्योगात तुमचा दृष्टिकोन थोडासा सावध ठेवा. मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी त्याचे भविष्यामध्ये नेमके काय परिणाम होतील याचा अंदाज निष्णात व्यक्तीकडून घ्या. ज्यांचा जोडधंदा आहे त्यांना त्याचा काही प्रमाणात उपयोग होईल. नोकरीमध्ये वरिष्ठ काही नवीन कामे तुमच्या गळ्यात मारतील. घरामध्ये डागडुजी, पाहुणचार आणि इतर कारणामुळे खर्च होण्याचे संकेत मिळतील.

कन्या सध्याचे ग्रहमान संमिश्र आहे. ज्या कामामध्ये विनाकारण अडथळे आले होते त्यात वेग आणण्यासाठी तुम्हाला धक्का-स्टार्ट या तंत्राचा वापर करणे भाग पडेल. व्यवसाय-उद्योगात प्राप्तीचे प्रमाण थोडेसे कमी होत आहे असे पाहून तुम्हाला जाहिरात किंवा इतर माध्यमांचा वापर करावासा वाटेल. नोकरीमध्ये एखाद्या कामामध्ये काही तांत्रिक किंवा इतर अडथळे दूर होऊ शकतील. घरामध्ये एखादी गोष्ट सुरुवातीला तुम्ही शांतपणे समजावून सांगाल, पण ती न समजल्यामुळे तुम्हाला राग येईल.

तूळ तुमचे घर आणि नोकरी-व्यवसाय या दोन आघाडय़ांवर तुम्हाला महत्त्वाची कामे हाताळावी लागतील. व्यापार-उद्योगात कामाचा पसारा हळूहळू वाढण्याची चिन्हे दिसू लागतील. ती आटोक्यात आणण्यासाठी आळस न करता ‘कल करे सो आज, आज करे सो अब’ असे धोरण ठेवा. नोकरीमध्ये आपल्या कामाला आणि आपल्याला महत्त्व कसे येईल याचा तुम्ही विचार कराल. घरामध्ये न टाळता येणाऱ्या जबाबदाऱ्या तुमचे लक्ष वेधवतील. विद्यार्थ्यांनी अभ्यासामध्ये आळस करून चालणार नाही.

वृश्चिक एखाद्या कामामध्ये तुमचा काहीही दोष नसताना विनाकारण विलंब झाला असेल तर त्याला आता हळूहळू गती यायला सुरुवात होईल. व्यवसाय-उद्योगात तुमच्या कार्यपद्धतीमध्ये बदल केल्यामुळे गिऱ्हाईकांकडून चांगला प्रतिसाद मिळायला सुरुवात होईल. नोकरीमध्ये ज्या चांगल्या संधीची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता ती संधी दृष्टिक्षेपात येईल. घरामध्ये सर्व आघाडय़ांवर इतर सदस्य तुमच्याकडून कामाची अपेक्षा ठेवतील. तुमच्या खऱ्या हितचिंतकांकडून मदत मिळेल.

धनू सहसा तुम्ही घरगुती कामात जास्त लक्ष देत नाही. पण आता मात्र त्यामध्ये आळस करून चालणार नाही. व्यापार-उद्योगात पशाची आवक गरजेपुरती वाढेल. परंतु एखाद्या विशिष्ट कामाकरिता तुम्हाला ज्यादा भांडवलाची गरज असेल. नोकरीच्या ठिकाणी सर्व कामे एकटय़ाने न करता योग्य व्यक्तीची योग्य कामाकरिता निवड करा. महत्त्वाची जबाबदारी स्वत: हाताळा. घरामध्ये मुलांच्या प्रगतीकडे लक्ष द्यावे लागेल. एखादे मंगलकार्य ठरण्याची नांदी होईल. त्यांनी घाईने काम करू नये. विद्यार्थ्यांनी एकाग्रतेवर भर द्यावा.

मकर ग्रहमान तुमच्या कष्टाळू स्वभावाला पूरक आहे. नशिबावर तुम्ही जास्त विश्वास न ठेवता प्रयत्नांवर भर ठेवता. या गुणाचा तुम्हाला आता निश्चित उपयोग होईल. व्यापार-उद्योगात एकेकाळी ज्या कामात बरेच अडथळे आले होते ते काम आता मार्गी लागण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ एखादे आव्हानात्मक काम तुमच्यावर सोपवतील. विशेष सवलतींकरिता तुमची निवड होईल. घरामध्ये प्रत्येक गोष्ट तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे घडवून आणाल आणि त्याचा टेंभा मिरवाल.

कुंभ सर्व ग्रहस्थिती तुम्हाला अनुकूल असल्यामुळे तुमचे इरादे आता बुलंद असतील. गेल्या चार-पाच महिन्यांपासून जे काम करायचे असे तुम्ही ठरविले होते त्याला आता मूर्त स्वरूप मिळाल्यामुळे तुमच्या हालचालींना एक प्रकारची गती येईल. नोकरीमध्ये तुमच्या कामात गेल्या एक-दीड महिन्यात काही फेरफार झाले असतील तर आता त्यातून तुम्हाला फायदा मिळेल. नोकरीमध्ये बदल करू इच्छिणाऱ्यांना चांगली संधी दृष्टिक्षेपात येईल. घरामध्ये इतरांनी तुमच्या शब्दाला मान दिल्याने तुमचा अहं सुखावला जाईल.

मीन तुम्ही आता प्रत्येक बाबतीत उत्साही आणि आशावादी बनाल. उद्योगात कामाचा ओघ वाढत राहिल्यामुळे तुम्ही खूश असाल. ज्या गिऱ्हाईकांना तुम्ही पूर्वी आश्वासन दिलेले असेल त्यात हयगय होऊ देऊ नका. नोकरीच्या ठिकाणी गेल्या दीड महिन्यात एखादे जादा काम केले असेल तर वरिष्ठ त्याच्या बदल्यात एखादी विशेष सवलत द्यायला तयार होतील. घरामध्ये एखाद्या सदस्याच्या बाबतीत काही प्रश्न निर्माण झाले असतील तर त्यामध्ये चांगलेच संकेत मिळतील.
विजय केळकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 13, 2015 1:11 am

Web Title: horoscope 32
Next Stories
1 दि. ६ ते १२ फेब्रुवारी २०१५
2 दि. ३० जानेवारी ते ५ फेब्रुवारी २०१५
3 दि. ९ ते १५ जानेवारी २०१५
Just Now!
X