01 November 2020

News Flash

दि. १३ ते १९ मार्च २०१५

मेष एखाद्या निमित्ताने सभोवतालच्या व्यक्तींच्या बाबतीत तुम्हाला चेहरा आणि मुखवटा यातील भेद लक्षात येईल. व्यापारउद्योगात प्रतिस्पर्धी भूलभुलय्या निर्माण करण्याचा प्रयत्न करतील.

| March 13, 2015 01:06 am

01vijayमेष एखाद्या निमित्ताने सभोवतालच्या व्यक्तींच्या बाबतीत तुम्हाला चेहरा आणि मुखवटा यातील भेद लक्षात येईल. व्यापारउद्योगात प्रतिस्पर्धी भूलभुलय्या निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. पण तुम्ही तुमच्या मतांवर अढळ राहा. नोकरीमध्ये मौजमजेसाठी सर्वजण पुढे येतील. पण कामाच्या वेळी मात्र तुमची कोणी चौकशी करणार नाही. नवीन नोकरीच्या बाबतीत तुमचा दृष्टिकोन व्यावहारिक ठेवा. घरामध्ये प्रत्येकजण गोडवे गातील, पण तुमच्याकडे फारसे लक्ष देणार नाही. विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये आळस चालणार नाही. 

वृषभ तुम्हाला या आठवडय़ात शक्ती आणि युक्तीचा वापर करून स्वतचा मतलब साधणे अनिवार्य होईल. व्यापार-उद्योगात कामाला तोटा नाही. परंतु ते वेळेत पार पाडण्यासाठी युक्ती वापरावी लागेल. नोकरीमध्ये वरिष्ठ तुमच्यावरती बरीच भिस्त ठेवतील. परंतु त्यामुळे तुमचा कामाचा ताणतणाव प्रमाणाबाहेर वाढेल. घरामध्ये स्वतचे महत्त्व वाढविण्याकरिता इतरांचे लक्ष तुम्ही तुमच्याकडे आकर्षति कराल. अत्यावश्यक खर्च वाढल्यामुळे त्याचे नियोजन करावे लागेल. विद्यार्थ्यांना शॉर्टकट घेऊन चालणार नाही.

मिथुन ग्रहमान तुमच्या प्रगतीला पूरक आहे. त्याचा चांगला फायदा घ्या. व्यवसाय उद्योगात जे काम मिळवण्याकरता तुम्ही प्रयत्न करत होता ते काम तुम्हाला अचानक मिळण्याची शक्यता आहे. जादा भांडवलाची गरज भागेल. त्यामुळे तुमचा उत्साह द्विगुणित होईल. नोकरीमधे वरिष्ठ एखादी विशेष सवलत द्यायला तयार होतील. कामानिमित्त जादा अधिकार किंवा भत्ते दिले जातील. घरामध्ये तुमचे विचार आणि कल्पना पटवून देण्यात तुम्ही सफल व्हाल. नातेवाइकांशी मात्र जपून बोला. विद्यार्थ्यांनी इतरगोष्टीत लक्ष घालू नये.

कर्क ‘तोंड झाकलं तर पाय उघडे पडतात आणि पाय झाकले तर तोंड उघडे पडते’ असा तुम्हाला अनुभव येईल. व्यापारउद्योगात स्पर्धक- छुपे शत्रू दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील. पशाची आवक सुधारेल. नोकरीमध्ये वरिष्ठांच्या सूचना शांतपणे ऐकून मगच कामाला सुरुवात करा. तुमच्या चांगुलपणाचा गरफायदा घेऊ देऊ नका. घरामध्ये ज्या कामात अडथळे येत होते त्यामधे बऱ्याच प्रयत्नानंतर तोडगा शोधून काढता येईल. प्रकृतीच्या तक्रारी कमी होतील. विद्यार्थ्यांनी एकाग्रतेवर भर ठेवणे आवश्यक आहे.

सिंह अडचणी येतात तेव्हा त्या समुद्रातल्या लाटांप्रमाणे एका मागून एक येतात. या आठवडय़ात तुम्हाला अशा परिस्थितीला तोंड द्यावे लागेल. व्यवसायउद्योगात कामगारांचे प्रश्न आणि तांत्रिक अडथळे दूर करण्यात तुमची बरीच शक्ती आणि वेळ वाया जाईल. तुमचे हितचिंतक मदत करतील. नोकरीमध्ये एखादे वेगळे काम सोपवले गेल्यामुळे तुमची तारांबळ होईल. घरामध्ये प्रत्येकाची तोंडे वेगवेगळ्या दिशेला असल्यामुळे कोणाचाच कोणाला पायपोस राहणार नाही. विद्यार्थ्यांनी नशिबावर अवलंबून न राहणे चांगले.

कन्या कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी तुम्ही त्यासंबंधी विचारमंथन करता, पण कधी कधी त्याचा फारसा उपयोग होत नाही. व्यापारउद्योगात आपले अंदाज गृहीत न धरता बाजारातील चढउतारांचा अंदाज घ्या. कोणतीही नवीन गुंतवणूक घाईने करू नका. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला नेमून दिलेले काम तुम्ही चांगल्या पद्धतीने पार पाडाल, पण वरिष्ठ त्यांच्या सूचना बदलतील. घरामधे प्रत्येकजण आपल्याच पद्धतीने वागेल. कोणाचाच कोणाला पायपोस राहणार नाही. विद्यार्थ्यांनी शॉर्टकट घेऊ नये.

तूळ एखादा महत्त्वाचा निर्णय घेण्याकरिता तुम्ही सज्ज असाल, पण आयत्या वेळेला त्यामधे काही कारणाने गोंधळ होईल. व्यापारउद्योगात स्पर्धकांच्या कामाची कॉपी करण्याचा प्रयत्न कराल. नोकरीमध्ये तुमच्याकडे काही अफलातून कल्पना असतील. अति उत्साहाच्या भरात तुम्ही त्या सहकाऱ्यांना सांगितल्या तर त्याचा फायदा तेच उठवतील. घरामधे तुमचे विचार चांगले असतील, पण इतरांना ते न पटल्यामुळे त्यांचा तुमच्याविषयी गरसमज निर्माण होईल. विद्यार्थ्यांनी त्यांचा अंदाजावर जास्त अवलंबून राहू नये.

वृश्चिक तुमच्या महत्त्वाकांक्षा आणि इच्छाआकांक्षा वाढविणारा हा आठवडा आहे. मरगळलेल्या कामांना चालना देण्यासाठी तुम्ही आता सक्रिय बनणार आहात. व्यापारउद्योगातील काही निर्णय झटपट घेण्याकडे तुमचा कल राहील. पण ‘अतिघाई संकटात नेई’ हे विसरू नका. नोकरीच्या ठिकाणी जबाबदारीचे काम तसंच काही विशेष सवलती बहाल केल्या जातील. घरामधे सगळ्यांची मोट बांधणे जड होईल. त्यामुळे तुम्ही फक्त महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्याल. विद्यार्थ्यांनी त्यांच्या शंकांचे निरसन करावे.

धनू व्यापारउद्योगात अडथळे असले तरी तुम्ही तुमचे उद्दिष्ट सोडणार नाही. मात्र स्वत:च्या अनुभवावर न विसंबता अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. ज्यांचा व्यवसाय आहे, त्यांना एखादे नवीन काम मिळण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये बरीच कामे एकावेळी हाताळावी लागल्यामुळे कोणत्या कामाला प्राधान्य द्यायचे याविषयी तुम्ही संभ्रमात राहाल. सहकाऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. घरामध्ये तुमच्या वागण्या-बोलण्यामुळे कोणाचेही गरसमज होणार नाहीत याची दक्षता घ्या. विद्यार्थ्यांनी मन देऊन अभ्यास करणे.

मकर प्रत्येक काम शांतचित्ताने करायचे असे तुम्ही ठरवाल. पण हा विचार क्षणभंगुर ठरेल. व्यवसायउद्योगात एकाच वेळी अनेक कामात लक्ष घातले तर एक ना धड भाराभर चिंध्या असा प्रकार होईल. त्यापेक्षा आíथक व्यवहार स्वत हाताळा आणि बाकी इतरांवर सोपवावा. नोकरीमध्ये वरिष्ठ बरीच कामे सांगतील, पण निश्चित मार्गदर्शन करणार नाहीत. घरातल्या व्यक्तींपुढे बढाया मारून जबाबदाऱ्या वाढवून घेऊ नका. मुलांच्या प्रगतीकडे लक्ष द्यावे लागेल. विद्यार्थ्यांनी मनाची एकाग्रता ठेवणे आवश्यक आहे.

कुंभ तुमच्या विशेष कौशल्याला आणि बुद्धिमत्तेला खतपाणी घालणारा हा आठवडा आहे. व्यापार-उद्योगात हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे लागण्याचा मोह अनावर होईल. तो टाळा. जे पसे मिळतील त्याच्यातून भविष्याकरिता बचत करून ठेवा. नोकरीमध्ये विशेष सवलतींकरिता वरिष्ठ तुमची निवड करतील. एखाद्या सहकाऱ्याशी छोटय़ा-मोठय़ा कारणावरून गरसमज होण्याची शक्यता आहे. घरामध्ये सगळ्यांचे तुम्ही ऐकून घ्याल पण अखेर तुमचा शब्द खरा करून दाखवाल. विद्यार्थ्यांनी ताण घेऊ नये.

मीन ग्रहमान लाभदायक आणि उत्साहवर्धक आहे. व्यापार उद्योगात सगळ्या डगरींवर हात ठेवावासा वाटेल. अशा वेळी आíथकदृष्टय़ा फायदेशीर कामांना महत्त्व द्या. नोकरीमध्ये महत्त्वाचे काम वरिष्ठ सोपवतील. सहकाऱ्यांचा चेहरा आणि मुखवटा यातील भेद तुमच्या लक्षात येईल. बेकारांना काम मिळेल. घरामध्ये तुमच्या परोपकारी स्वभावाचा सर्वजण फायदा उठवतील. पण श्रेय देणार नाहीत. उधार उसनवार करू नका. विद्यार्थ्यांनी स्मरणशक्तीवर जास्त ताण देऊ नये.
विजय केळकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 13, 2015 1:06 am

Web Title: horoscope 33
टॅग Astrology,Star Sign
Next Stories
1 दि. ६ ते १२ मार्च २०१५
2 दि. २७ फेब्रुवारी ते ५ मार्च २०१५
3 दि. २० ते २६ फेब्रुवारी २०१५
Just Now!
X