01 November 2020

News Flash

दि. ६ ते १२ मार्च २०१५

मेष तुमच्या मनामध्ये आशा-निराशेचा लपंडाव चालू असेल. मधूनच तुम्ही खूप उत्साही दिसाल आणि काही क्षणांनंतर कशातच अर्थ नाही असे तुम्हाला वाटू लागेल. व्यापार-उद्योगात हातचे सोडून

| March 6, 2015 01:15 am

01vijayमेष तुमच्या मनामध्ये आशा-निराशेचा लपंडाव चालू असेल. मधूनच तुम्ही खूप उत्साही दिसाल आणि काही क्षणांनंतर कशातच अर्थ नाही असे तुम्हाला वाटू लागेल. व्यापार-उद्योगात हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे लागू नका. आíथक व्यवहारामध्ये भावनेपेक्षा व्यवहाराला जास्त महत्त्व द्या. नोकरीमध्ये वरिष्ठ आणि सहकारी फारसे मार्गदर्शन न देता फक्त बघ्याची भूमिका घेतील. पण तुम्ही जागृत राहिलात तर त्यांना टिकेची संधी मिळणार नाही. सांसारिक जीवनातील वाद-विवाद टाळण्यासाठी कोणावरही टीका करू नका. 

वृषभ ग्रहमान तुमच्यातील ईष्र्या आणि इच्छाआकांक्षा वाढविणारे आहे. परंतु कोणत्याही कामामध्ये स्वत:ला झोकून देण्यापूर्वी त्यातील धोक्यांचा विचार करून ठेवा. व्यापार-उद्योगात पसे मिळविण्याची अनेक प्रलोभने निर्माण होतील. छोटी कामे करत असण्यापेक्षा एकच मोठा हात मारावा असा मोह अनावर होईल. नोकरीमध्ये वरिष्ठ एखादी अवघड जबाबदारी तुमच्यावर सोपवतील. त्याच्या बदल्यात मिळणाऱ्या सवलतींचा तुम्ही गरफायदा उठवाल. विद्यार्थ्यांनी सहकाऱ्यांकडून मिळणाऱ्या टिप्स लक्षात घ्याव्यात.

मिथुन या आठवडय़ात ‘अति घाई संकटात जाई’ ही गोष्ट विसरू नका. व्यापार-उद्योगात एखादे नवीन काम स्वीकारण्यापूर्वी त्यातील फायदा-तोटय़ाचे गणित कागदावर नीट मांडून पहा. कारखानदारांनी बदलत्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करावा. नोकरदार व्यक्तींना वरिष्ठ एखादे वेगळेच काम सांगतील. त्यामुळे त्यांचा गोंधळ उडेल. सध्याच्या नोकरीत घाईने बदल करू नका. घरामध्ये तुम्ही काढलेली एखादी नवीन टूम इतरांनी मान्य केलीच पाहिजे असा आग्रह धराल. विद्यार्थ्यांनी अति आत्मविश्वास बाळगू नये.

कर्क सहसा कोणताही निर्णय तुम्ही घाईने घेत नाही. सभोवतालच्या व्यक्तींना काय वाटेल याचा तुम्ही आधी विचार करता. व्यापार-उद्योगात एखादी गोष्ट घडेल याची वाट न बघत बसता जे तुम्हाला योग्य वाटते ते करण्यावर तुमचा जोर असेल. पशाची आवक थोडीशी सुधारेल. नोकरीमध्ये कामाचा झपाटा उत्तम राहील. मिळालेल्या अधिकाराचा गरवापर करू नका. स्वत:ची प्रकृती आणि विशेषत: जुन्या आजारांकडे लक्ष द्या. विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या वेळी अभ्यासामध्ये कोणतेही प्रयोग करू नये.

सिंह नेहमी कोणतेही काम करताना राजमार्गाचा तुम्ही अवलंब करता, पण या आठवडय़ात त्यातून यश न मिळाल्यामुळे वेडावाकडा मार्ग स्वीकारावासा वाटेल. व्यवसाय-उद्योगात ज्यांच्यावर तुम्ही अवलंबून आहात त्यांनी आयत्यावेळेला त्यांचा शब्द फिरवल्यामुळे तुम्हाला थांबणे भाग पडेल. अशा वेळी अर्धवट ठेवलेली कामे पूर्ण करणे चांगले. नोकरीमध्ये कोणताही निर्णय तडकाफडकी घेऊ नका. घरामध्ये सर्वजण तुमचे ऐकून घेतील, पण त्यानुसार वागतीलच याची खात्री नाही. विद्यार्थ्यांनी कोणताही धोका पत्करू नये.

कन्या माणसांची निवड करण्याबाबतीत तुम्ही खूप चोखंदळ असता या आठवडय़ात बरेच प्रयत्न करूनही एखादे काम पूर्ण न झाल्यामुळे चुकीच्या व्यक्तींशी संगत करून आपले ध्येय साध्य करण्याचा तुम्हाला मोह होईल. व्यवसाय उद्योगात आíथक आवक एकंदरीत समाधानकारक राहील. खर्च वाढविण्यापूर्वी ‘अंथरूण पाहून पाय पसरा’ हे लक्षात ठेवा. नोकरीच्या ठिकाणी एखादे काम आपल्याला जमत नाही या गोष्टीची तुम्हाला चीड येईल. घरामध्ये बजेटबाहेर जाऊन पसे खर्च होतील. विद्यार्थ्यांनी स्वत:च्या पद्धतीने अभ्यास करावा.

तूळ तुम्ही एकदम आशावादी असाल तर मधूनच निराशेचे उद्गार तुमच्या तोंडून ऐकायला मिळतील. व्यापार-उद्योगात ज्या व्यक्तींना पसे द्यायचे कबूल केले आहेत, त्यांना ते वेळेत द्या. जोडधंद्यावर फार मोठे बेत करू नका. बेकार व्यक्तींना काम मिळविण्यासाठी त्यांच्या तत्त्वांशी तडजोड करावी लागेल. चालू असलेल्या नोकरीत वरिष्ठ तुमच्या प्रावीन्याचा फायदा करून घेतील. घरामध्ये जोडीदाराशी गरसमज झाले तरी ते जास्त ताणून धरू नका. त्याच्या/तिच्या प्रकृतीची काळजी घ्या. विद्यार्थ्यांना ग्रहमान चांगले आहे.

वृश्चिक ‘कालाय तस्म नम’ याची आठवण करून देणारे ग्रहमान आहे. ज्या व्यक्तींनी पूर्वी तुम्हाला सहकार्य देण्याचे मान्य केले होते. त्यांची वागणूक बदलल्यामुळे तुम्ही थोडेसे साशंक बनाल. नोकरीमध्ये वरिष्ठ गोंजारून चुचकारून तुमच्याकडून जादा काम करून घेतील. नवीन नोकरी असणाऱ्यांनी बिनचूक काम करणाऱ्यांवर लक्ष केंद्रित करावे. घरामध्ये मुलांच्या प्रगतीविषयी आणि बुजुर्गाच्या वागण्यामुळे थोडी चिंता निर्माण होईल. विद्यार्थ्यांनी त्यांच्या मित्रांवर अभ्यासाकरिता अवलंबून राहू नये.

धनू या आठवडय़ात एखादे काम सरळ आणि सोप्या मार्गाने करायचे ठरवाल. परंतु अपेक्षित फळ न मिळाल्यामुळे अखेर तुम्हाला वाकडी वाट करून पुढे जावे लागेल. व्यापार-उद्योगात कामाचा वेग वाढविण्याकरिता एखादी वेगळी कल्पना सुचेल. त्यातील धोके समजून घ्या. नोकरीमध्ये बदल हवा असेल तर त्यासाठी एखाद्या व्यक्तीचा वापर करावा लागेल. घरगुती कामात विचित्र अनुभव येईल. इतर सदस्य तुमचे विचार ऐकून न ऐकल्यासारखे करतील. विद्यार्थ्यांनी नशिबापेक्षा प्रयत्नांवर जास्त विश्वास ठेवावा.

मकर अनेक वेळेला असे होते की एखादे काम कोणत्या पद्धतीने करायचे, केव्हा करायचे याचे नियोजन करण्यामध्ये तुम्ही इतका वेळ घालवता की हातात आलेली संधी निसटून जाते. व्यवसाय-उद्योगात नवीन करार करण्यापूर्वी हातात असलेली कामे वेळेत संपवा. नोकरीमध्ये अतिविचाराने गतीने काम कराल. फक्त त्यात चूक करू नका. घरामधल्या व्यक्तींनी जरी तुम्हाला चांगला सल्ला दिला तरी त्याचा विचार न करता तुम्ही तुमच्या पद्धतीनेच काम कराल. विद्यार्थ्यांना अतिविचार करून उपयोग होणार नाही.

कुंभ तुमच्या कामामध्ये आता तुम्हाला अपेक्षेनुसार यश मिळाल्यामुळे तुम्ही थोडेसे चिथावून जाल. परंतु कळत-नकळत याच कारणामुळे सभोवतालच्या व्यक्तींचा अपमान होणार नाही याकडे लक्ष ठेवा. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांची मर्जी संपादन करण्याकरिता त्यांच्या पुढे पुढे कराल. त्यामुळे तुम्हाला जास्त कामही करावे लागेल. घरामध्ये तुमच्या विक्षिप्त वागण्यामुळे तुमच्याशी नेमके कसे वागावे याविषयी घरातील इतर सदस्यांना थोडेसे कोडे पडेल. विद्यार्थ्यांनी इतर गोष्टींचा विचार करू नये.

मीन द्विस्वभावी रास असे तुमचे वर्णन केले जाते. या आठवडय़ात मात्र जी गोष्ट तुम्हाला पाहिजे आहे, ती मिळवण्यासाठी तुम्ही धाडसाने पाऊल टाकाल. व्यापार उद्योगात ज्यांना तुमच्याकडून काही मिळवायचे आहे अशा व्यक्ती तुमच्याशी गोडीगुलाबीने राहून स्वार्थ शोधण्याचा प्रयत्न करतील. नोकरीमध्ये ज्यांनी तुम्हाला पूर्वी कमी लेखून त्रास देण्याचा प्रयत्न केला होता, त्यांच्या नाकावर टिच्चून तुम्ही चांगले काम करून दाखवाल. विद्यार्थ्यांनी नशिबावर जास्त अवलंबून राहू नये.
विजय केळकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 6, 2015 1:15 am

Web Title: horoscope 34
Next Stories
1 दि. २७ फेब्रुवारी ते ५ मार्च २०१५
2 दि. २० ते २६ फेब्रुवारी २०१५
3 दि. १३ ते १९ फेब्रुवारी २०१५
Just Now!
X