01 November 2020

News Flash

दि. १७ ते २३ एप्रिल २०१५

मेष - नशिबाची जेवढी साथ मिळेल त्यावर समाधान माना, पण प्रयत्नांवर जास्त विश्वास ठेवा. व्यापार-उद्योगात कल्पकता आणि कृतिशीलता यांचा चांगला समन्वय झाल्यामुळे रेंगाळलेल्या कामांमध्ये गती...

| April 17, 2015 01:04 am

01vijayमेष नशिबाची जेवढी साथ मिळेल त्यावर समाधान माना, पण प्रयत्नांवर जास्त विश्वास ठेवा. व्यापार-उद्योगात कल्पकता आणि कृतिशीलता यांचा चांगला समन्वय झाल्यामुळे रेंगाळलेल्या कामांमध्ये गती येईल. पूर्वी केलेल्या कामांचे पसे हातात पडतील. जोडधंदा असणाऱ्यांना नवीन काम मिळेल. नोकरीमध्ये कठीण काम केवळ जबरदस्त इच्छाशक्तीच्या जोरावर तुम्ही पूर्ण करून दाखवाल. घरामध्ये छोटेखानी कार्यक्रम ठरेल. प्रत्येक जण स्वत:चे वेगळे बेत ठरवतील. वातावरण आनंदी असेल.

वृषभ परिस्थिती कशीही असो तुम्ही एखाद्या अनामिक कारणामुळे उत्साही दिसाल. व्यापार-उद्योगात गिऱ्हाईकांना आकर्षति करण्याकरिता प्रसिद्धी आणि जनसंपर्काचे नवीन तंत्र वापराल. त्याकरिता कदाचित बरेच पसे खर्च होतील. नोकरीमध्ये काम भरपूर असल्यामुळे तुम्हाला विश्रांती मिळणार नाही, तरीपण जो क्षण मिळेल त्याचा तुम्ही पुरेपूर आनंद घ्याल. घरामध्ये रंगरंगोटी, नवीन वस्तूंची खरेदी आणि सहलीचे बेत ठरण्याची शक्यता आहे. नातेवाईक, आप्तेष्ट एखाद्या निमित्ताने अचानक हजेरी लावतील.

मिथुन थोडेसे पसे तुमच्या हातात असले की तुमच्या मनाचे वारू उधळायला वेळ लागत नाही. व्यापार-उद्योगात एखादी भव्यदिव्य कल्पना तुमचे लक्ष आकर्षति करेल. भागीदारी किंवा मत्रिकराराचे प्रस्ताव तुमच्या पुढे येतील. त्याचा विचार करण्यापूर्वी त्यातल्या जमाखर्चाचे गणित आणि संभाव्य धोके याचा अनुभवी व्यक्तीकडून अंदाज घ्या. चालू नोकरीत आíथकदृष्टय़ा फायदेशीर संधीकरिता तुमची निवड होईल. घरामध्ये एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आप्तेष्ट आणि मित्रमंडळींचा मेळावा तुम्ही आयोजित कराल.

कर्क तुम्ही ज्या कामात लक्ष घालता ते काम निगुतीने पार पाडता. या गुणाचा या आठवडय़ात तुम्हाला स्वत:ला आणि सभोवतालच्या व्यक्तींना चांगला उपयोग होईल. व्यापार-उद्योगात इतरांपेक्षा आपण वेगळे कसे आहोत हे दाखवण्याची संधी मिळेल. बाजारपेठेतील एखाद्या सन्माननीय कमिटीवर तुमची नेमणूक होईल. नोकरीमध्ये चांगल्या प्रोजेक्टकरिता तुमची निवड करतील. त्या निमित्ताने जादा सवलती मिळतील. घरामध्ये तुमच्या शब्दाला मान मिळेल. देशात किंवा परदेशात प्रवासाला जाण्याचे बेत ठरतील.

सिंह एक गोष्ट मिळवायला गेली की दुसरीकडे कुठे तरी कमतरता सहन करावी लागते असा अनुभव येईल. व्यवसाय-उद्योगात एखाद्या स्वप्नमयी कल्पनेची अंमलबजावणी करावीशी वाटेल. मात्र त्याकरिता पैसे किती आणि केव्हा खर्च करायचे याचा सल्ला निष्णात व्यक्तीकडून घ्या. नोकरीमध्ये कामाचा ताणतणाव बराच राहील. परंतु त्यासाठी आवश्यक सवलती मिळाल्यामुळे तुमची फारशी तक्रार नसेल. ज्यांना बदली हवी आहे, त्यांनी हळूहळू प्रयत्न सुरू करावे. घरामध्ये सगळ्यांना खूश करणारा छान कार्यक्रम ठरेल.

कन्या अनेक नवीन आणि चांगल्या गोष्टी तुम्हाला कराव्याशा वाटतील, पण त्याची सुरुवात कुठून आणि कशी करायची या बाबतीत गोंधळ उडेल. व्यापार-उद्योगात एका हाताने पसे कमवायचे आणि दुसऱ्या हाताने गमवायचे असा अनुभव येईल. जोडधंदा आहे त्यांना थोडेफार काम केल्याने आवश्यक गरजा भागवता येतील. नोकरीमध्ये काम करतो त्याच्याच मागे काम लागते या अनुभवामुळे हातचे राखून काम कराल. घरामध्ये एक खर्च हा विषय वगळला, तर सर्व काही चांगले असेल. जुन्या आजारांकडे लक्ष ठेवा.

तूळ ग्रहमान तुमच्या इच्छा-आकांक्षा वाढविणारे आहे. परंतु त्याकरिता बरेच प्रयत्न करावे लागतील. व्यापार-उद्योगात चालू असलेल्या कामाव्यतिरिक्त एखादे नवीन काम हातात घ्यावेसे वाटेल. त्यातील जमाखर्चाची आकडेमोड नीट करून बघा. थोडे पैसे अक्कलखाती खर्च होतील. नोकरीमध्ये वरिष्ठ मधाचे बोट दाखवून तुमच्याकडून बरेच काम करून घेतील. थोडेफार जादा अधिकार तुम्हाला प्रदान केले जातील. घरामध्ये प्रिय व्यक्तीचे हट्ट पूर्ण करावे लागतील. त्याकरिता थोडा वेळ व पसे राखून ठेवा. कुटुंबीयांसमवेत प्रवासाला जाण्याचे ठरवाल.

वृश्चिक प्रगतीचे एक दार बंद होते तेव्हा दुसरे आपोआप उघडते, या अनुभवामुळे आपला आशावाद वाढतो. व्यापार-उद्योगात एखादे किचकट आणि रेंगाळलेले काम हातात घ्याल. ते पूर्ण केल्याशिवाय तुमचा प्रगतीचा मार्ग खुला होणार नाही. गरज भागविण्याकरिता तात्पुरती पशाची सोय करावी लागेल. नोकरीमध्ये वरिष्ठ प्रत्येक कामात तुम्हाला गृहीत धरतील. घरात ‘ज्याचे करावे भले..’ असा अनुभव आल्याने तुम्ही तुमच्याच पद्धतीने वागायचे ठरवाल.

धनू बराच चढ चढल्यानंतर थोडासा उतार दिसल्यावर बरे वाटते तशी ग्रहस्थिती आहे. व्यापार-उद्योगात महत्त्वाच्या कामांना वेग येण्यासाठी योग्य व्यक्तीशी संपर्क साधू शकाल. एखादे तात्पुरते काम मिळाल्यामुळे आशावाद वाढू लागेल. पशाची आवक थोडीफार सुधारेल. नोकरीमध्ये वरिष्ठांची आणि संस्थेची गरज म्हणून एखादी वेगळी सवलत दिली जाईल. घरामध्ये आवडत्या व्यक्तीशी काही कारणाने संपर्क झाल्याशिवाय तुम्ही तुमचे मन मोकळे करू शकाल. लांबलेले शुभकार्य निश्चित होईल.

मकर तुम्ही घर आणि नोकरी-व्यवसाय या दोन्ही आघाडय़ा तितक्याच क्षमतेने सांभाळाल. व्यापार-उद्योगात जी कामे काही कारणाने लांबलेली होती ती मार्गी लागतील. नवीन आíथक वर्षांकरिता आखून ठेवलेले कार्यक्रम हातात घ्यायला मुहूर्त लागेल. नोकरीमध्ये तुमच्या कामातील अडचणींवर वरिष्ठांनी मार्गदर्शन सुचवल्यामुळे काम सोपे होईल. बदली हवी असल्यास प्रयत्न करा. घरामध्ये लहान-मोठय़ा व्यक्तींच्या गरजा भागविता भागविता तुम्ही तुमची हौसही काही प्रमाणात पूर्ण कराल.

कुंभ तुम्हाला हवी ती गोष्ट पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला चन पडणार नाही. व्यवसाय किंवा उद्योगात रेंगाळलेल्या कामाला चांगली गती येईल. सध्या चालू असलेल्या कामाव्यतिरिक्त एखादे जास्त फायदा मिळवून देणारे काम हातात घ्यावेसे वाटेल. नोकरीच्या ठिकाणी तुमचा आग्रही स्वभाव दिसून येईल. एखादे काम विशिष्ट पद्धतीने पार पाडण्यासाठी निगुतीने काम कराल. घरामध्ये एखादा कार्यक्रम ठरलेला असेल, तर त्याची पूर्वतयारी कराल. नवीन वाहन किंवा वास्तू खरेदीसंबंधी माहिती मिळवाल.

मीन ज्या कामात पूर्वी पटकन सफलता मिळाली नव्हती त्यात निश्चयाच्या जोरावर मुसंडी माराल. व्यापार-उद्योगात योग्य व्यक्तींकडून साथ मिळाल्याने भरपूर काम करू शकाल. विविध मार्गानी पशाचा ओघ चालू राहील. जोडधंदा आहे त्यांना कमाईची चांगली संधी उपलब्ध होईल. नोकरीमध्ये जादा काम करून जादा पसे मिळवण्याची सुविधा असेल तर त्याचा फायदा उठवाल. घरामध्ये जे मंगलकार्य ठरत नव्हते. त्यामध्ये आता काही तरी ठोस निर्णय होईल.
विजय केळकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2015 1:04 am

Web Title: horoscope 35
Next Stories
1 दि. १० ते १६ एप्रिल २०१५
2 दि. ३ ते ९ एप्रिल २०१५
3 दि. २७ मार्च ते २ एप्रिल २०१५
Just Now!
X