15 August 2020

News Flash

दि. १० ते १६ एप्रिल २०१५

मेष - तुमची मानसिक आणि शारीरिक उमेद वाढल्यामुळे तुम्हाला भरपूर काम करावेसे वाटेल. व्यवसायधंद्यामध्ये नव्याने सुरू केलेल्या एखाद्या कामाला प्रतिसाद वाढल्यामुळे तुम्हाला हायसे वाटेल.

| April 10, 2015 01:11 am

मेष तुमची मानसिक आणि शारीरिक उमेद वाढल्यामुळे तुम्हाला भरपूर काम करावेसे वाटेल. व्यवसायधंद्यामध्ये नव्याने सुरू केलेल्या एखाद्या कामाला प्रतिसाद वाढल्यामुळे तुम्हाला हायसे वाटेल. पशाची आवक वाढत राहिल्यामुळे लांबवलेली काही देणी तुम्हाला देता येतील. नोकरीमध्ये ज्या कामाला वरिष्ठांनी कमी लेखलेले होते त्यांचे महत्त्व हळूहळू वाढल्यामुळे तुमच्या गरजांना प्राधान्य दिले जाईल. नवीन नोकरीच्या प्रयत्नांत असणाऱ्यांना यशाची आशा दिसू लागेल. प्रिय व्यक्तीच्या अनुपस्थितीची जाणीव होईल. 

वृषभ बरीच कामे करायची अशी तुमची इच्छा असेल. परंतु त्या मानाने हातामध्ये वेळ कमी असल्यामुळे तुम्हाला घडय़ाळाशी शर्यत करीत काम करावे लागेल. शिवाय आवश्यक त्या व्यक्तींची साथ न मिळाल्याने एकटे पडल्यासारखे वाटेल. व्यापार-उद्योगातील महत्त्वाची कामे आठवडय़ाच्या सुरुवातीलाच हाताळा. नंतर त्यात विलंब होईल. नोकरीमध्ये वरिष्ठांच्या सूचना गोंधळात टाकणाऱ्या असतील. त्याचे निराकरण झाल्याशिवाय कामाला सुरुवात करू नका. घरामध्ये सर्वजण मौजमजेचा आनंद घेतील.

मिथुन काहीतरी मिळविण्याकरिता काहीतरी गमवावे लागते, याची तुम्हाला आठवण येईल. व्यापार आणि नोकरीमधल्या प्रगतीकरिता तुम्ही सज्ज असाल. परंतु घरामधल्या घडामोडींमुळे काही प्रमाणात त्यावर बंधने येतील. व्यापारी वर्गाने नवीन योजना जरूर कराव्या. नोकरीमध्ये तुमच्या हातून जास्त चांगले काम होण्यासाठी वरिष्ठ आíथक आणि इतर सवलती द्यायला तयार होतील. घरामध्ये तुमच्या आवडीचा कार्यक्रम ठरवण्याचा मनोदय असेल, पण त्याला इतरांकडून लगेच संमती मिळणार नाही.

कर्क तुमची स्थिती ‘अनंत हस्ते कमलाकराने..’ अशी होणार आहे. बरेच दिवस इच्छा, आकांक्षा तुम्ही मनात दाबून ठेवल्या होत्या त्यांना वाव मिळाल्यामुळे तुम्हाला आता कोणीही अडवू शकणार नाही. व्यापार-उद्योगातील तुमचे इरादे बुलंद असतील. नवीन आíथक वर्षांकरिता जे बेत आखून ठेवले होते त्याची कार्यवाही करावीशी वाटेल. नोकरीच्या ठिकणी वरिष्ठांनी एखादी मागणी पूर्ण करण्याचे आाश्वासन पूर्वी दिले असेल तर त्याची त्यांना आठवण करून द्यायला हरकत नाही. लांबलेला कार्यक्रम सर्वानुमते निश्चित होईल.

सिंह एखाद्या महत्त्वाच्या कामात ‘भरवशाच्या म्हशीला टोणगा’ असा अनुभव आल्यामुळे तुम्हाला पर्यायी मार्ग स्वीकारणे भाग पडेल. व्यवसाय-उद्योगात नवीन आíथक वर्षांकरिता काही बेत आखून ठेवले असतील तर त्यावर लक्ष केंद्रित कराल. मात्र त्यातील यशाची भिस्त आíथक स्थितीवर अवलंबून असल्यामुळे पशाच्या कामाला प्राधान्य द्यावे लागेल. नोकरीमध्ये वरिष्ठ नवीन कामासंबंधी सूतोवाच करतील. घरामध्ये नातेवाईक, मित्रमंडळी यांच्या आगमनाविषयी खबरबात कळेल.

कन्या तुमच्या राशीमध्ये बौद्धिक ताकद खूप आहे. परंतु त्या मानाने शारीरिक बळ कमी असल्याने कोणतेही काम निवडताना ते काम आपल्याला सहन होईल की नाही याचा आधी विचार करता. व्यापार-उद्योगात नवीन आíथक वर्षांकरिता ठरविलेले बेत काही कारणांनी लांबले असतील तर ते थोडय़ाफार फरकाने अमलात आणाल. नोकरीमध्ये वरिष्ठ एखाद्या गरहजर सहकार्याचे काम तुमच्यावर सोपवून देतील. त्यामुळे कामाचा कंटाळा येईल. घरामध्ये प्रत्येक सदस्य आपल्या कामात दंग राहिल.

तूळ ग्रहमान तुमच्या बुद्धीला आणि कृतिशीलतेला चालना देणारे आहे. त्यामुळे जी गोष्ट तुमच्या मनात येईल, ती पार पाडण्यासाठी तुमची घाई असेल. व्यापार-उद्योगात नवीन आíथक वर्षांकरिता जे बेत आखून ठेवलेले होते त्याची कार्यवाही करण्याचा निश्चय कराल. आíथक स्थिती थोडीफार सुधारल्यामुळे तुमचा कामाचा उत्साह बळावेल. नाकरीमध्ये वरिष्ठांनी कामाच्या स्वरूपामध्ये फेरफार करण्याचे संकेत दिलेले असतील तर त्याची अंमलबजावणी होईल. ज्यांना बदली हवी असेल त्यांनी प्रयत्न सुरू करावेत.

वृश्चिक अगदी साध्या आणि सोप्या वाटलेल्या कामामध्ये अडथळे दिसायला लागल्यामुळे तुम्ही थोडेसे कोडय़ात पडाल. व्यापार-उद्योगात नवीन आíथक वर्षांकरिता काही बेत तुम्ही आखून ठेवले असतील तर त्यामध्ये थाडेसे फेरफार करून ते अमलात आणू शकाल. मात्र योग्य व्यक्तींची साथ मिळविण्याकरिता त्यांची मिनतवारी करावी लागेल. नोकरीमध्ये वरिष्ठ एकामागून एक कामे तुमच्यावर सोपवत जातील. पण तुमच्या मदतीला कोणीच नसल्याने तुमची दमछाक होईल.

धनू आपण केलेले नियोजन जेव्हा आपल्याला उपयोगी पडत नाही. त्यावेळी आपला आपल्यालाच राग येतो. व्यापार-उद्योगातील गेल्या २-३ आठवडय़ांत निर्माण झालेला प्रश्न सुटण्याची लक्षणे दिसू लागतील. नवीन आíथक वर्षांकरिता काही संकल्प केला असेल तर त्या कामांवर लक्ष केंद्रित करा. नोकरीमध्ये एखादे जबाबदारीचे काम तुम्ही मार्गी लावाल. मात्र त्यामध्ये कोणाकडूनही मदत मिळण्याची अपेक्षा ठेवू नका. घरामध्ये एखाद्या प्रश्नामध्ये सभोवतालच्या व्यक्ती बघ्याची भूमिका घेतील.

मकर बरीच कामे तुम्हाला एकाच वेळी हाताळायची असेल. पण फारशी कोणाचीही मदत न मिळाल्याने स्वयंभू बनणे भाग पडेल. व्यवसाय-उद्योगात नावीन्यपूर्ण कल्पना तुमच्या मनात येतील. त्या जरी उत्तम असल्या तरी त्यासाठी वेगवेगळ्या व्यक्तींची मदत घ्यावी लागल्यामुळे कामात थोडा विलंब होईल. पशांची बाजू सुधारेल. नोकरीमध्ये एखाद्या अवघड कामात शक्कल लढवून तुम्ही गती आणू शकाल. पण नेहमीच्या कामात मात्र काही कारणाने विलंब होईल. वास्तू खरेदीसंबधी विचार मनात येतील.

कुंभ थोडासा आराम करावा किंवा शांतचित्ताने काम करावे असे तुम्हाला वाटेल, पण तो विचार क्षणभंगुर ठरेल. व्यवसायउद्योगात नवीन आíथक वर्षांकरिता जर काही योजना तुम्ही आखल्या असतील तर त्याची कार्यवाही करावीशी वाटेल. मात्र त्यामध्ये सुरुवातीला जे अडथळे येतील ते निपटून काढण्यात वेळ जाईल. नोकरीमध्ये तुमच्या कामातील तुमचा कल बघून वरिष्ठ एखादी चांगली कामगिरी तुमच्यावर सोपवतील. त्यानिमित्त आवश्यक असलेल्या सवलती दिल्या जातील. घरामध्ये एखादा चांगला कार्यक्रम ठरेल.

मीन ग्रहमान तुमच्या दृष्टीने धनदायक असल्यामुळे तुम्ही आता आनंदी व उत्साही दिसाल. व्यापार-उद्योगात नवीन आíथक वर्षांकरिता काही बेत यापूर्वीच केले असतील. त्याला आवश्यक असणारे भांडवल हितचिंतक आणि आíथक संस्थेकडून उपलब्ध होऊ शकेल. नोकरदार व्यक्तींना खास कामगिरीकरिता संस्थेतर्फे थोडय़ा अवधीकरिता नवीन योजनेत सहभागी करून घेतले जाईल. काहींना परदेशी व्यवहाराचे संकेत मिळतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2015 1:11 am

Web Title: horoscope 36
Next Stories
1 दि. ३ ते ९ एप्रिल २०१५
2 दि. २७ मार्च ते २ एप्रिल २०१५
3 दि. २० ते २६ मार्च २०१५
Just Now!
X