25 May 2020

News Flash

दि. २४ ते ३० जुलै २०१५

मेष सागरामध्ये जशी भरती आणि ओहोटी येत असते तसे तुमचे मूड आशा आणि निराशेच्या िहदोळ्यावर या दरम्यान हेलकावे घेत राहतील. त्याचा तुमच्या दैनंदिन कार्यक्षमतेवर बराच

| July 24, 2015 01:04 am

01vijayमेष सागरामध्ये जशी भरती आणि ओहोटी येत असते तसे तुमचे मूड आशा आणि निराशेच्या िहदोळ्यावर या दरम्यान हेलकावे घेत राहतील. त्याचा तुमच्या दैनंदिन कार्यक्षमतेवर बराच परिणाम झालेला दिसेल. व्यापार-उद्योगात छोटी छोटी कामे करण्यापेक्षा एक मोठा हात मारावा असे तुम्हाला वाटत राहील. पण ते धोक्याचे ठरेल. नोकरदार व्यक्ती कामाच्या बदलाकरिता प्रयत्नशील राहतील. घरामध्ये जी गोष्ट इतरांना प्रेमाने आणि आपुलकीने समजेल ती धाकाने समजणार नाही किंवा आवडणार नाही.

वृषभ एखादी गोष्ट मनाप्रमाणे घडल्यामुळे तुम्ही खूप आनंदी व्हाल; तर त्यामध्ये जरा मागेपुढे झाले तर लगेच नाराज व्हाल. या स्वभावाचा घरातील व्यक्तींना थोडा त्रास होईल. व्यापार-उद्योगात नवीन योजना कार्यान्वित करण्यापूर्वी जमाखर्चाचे गणित कागदावर नीट मांडून पाहा. नोकरीमध्ये संस्थेकडून जास्तीत जास्त सवलती आणि फायदे घेण्याकडे तुमचा कल राहील. नवीन नोकरीच्या कामात थोडी शिथिलता येईल. घरामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या गरजा तातडीच्या आणि महत्त्वाच्या असल्यामुळे त्याकरता तजवीज करून ठेवाल.

मिथुन दिसते तसे नसते याची तुम्हाला आठवण येईल. परंतु तुम्ही तुमचा हेका सोडणार नाही. व्यापार-उद्योगात एखाद्या कामाचे नियोजन करण्यापूर्वी ते काम संपवण्याची तुम्हाला घाई असेल. त्यातून धोका संभवतो. ज्यांच्याशी तुम्ही व्यवहार करणार आहात त्यांचा अंतस्थ हेतू नीट जाणून घ्या. नोकरीमध्ये आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत हे भासवण्याकरिता एखादा सनसनाटी निर्णय घ्यावासा वाटेल, पण नंतर तो त्रासदायक ठरेल. घरामध्ये एखाद्या निमित्ताने सर्वजण तुमची अंतस्थ हेतू ठेवून खुशामत करतील.

कर्क तुमच्या इच्छा-आकांक्षा वाढवणारा हा कालावधी असेल. पण त्या पूर्ण करायला गेल्यावर सावलीला पकडण्याचा प्रकार होईल. व्यापारउद्योगात तुमची गरज खूप मोठी असल्यामुळे मिळणारे पसे तुम्हाला अपुरेच वाटतील. नोकरीमध्ये वरिष्ठ चांगल्या कामाकरिता तुमची निवड करतील, पण त्याला आवश्यक असणाऱ्या सवलतींना विलंब लागण्याची शक्यता आहे. नवीन नोकरीच्या कामात ताबडतोब हालचाल करा. घरामध्ये ‘पसा’ हा एक प्रश्न सोडला तर बाकी वातावरण आनंदी व उत्साही असेल.

सिंह ज्या गोष्टीमध्ये तुम्ही सहजगत्या यश मिळेल असे गृहीत धरलेले होते, त्यामध्ये थोडाफार विलंब होण्याची शक्यता निर्माण होईल. व्यापार-उद्योगात तुमचे भविष्यातील बेत जरी मोठे असले तरी त्याकरिता फार मोठा धोका पत्करू नका. नोकरीमध्ये संस्थेकडून मिळणाऱ्या सुखसोयींचा योग्य वेळी आणि योग्य कारणाकरिता उपयोग कराल. त्याचा उपमर्द झाल्यास वरिष्ठांना ते खपणार नाही. घरामध्ये एखाद्या सहज आणि सोपे वाटणाऱ्या निर्णयात गोंधळ झाल्यामुळे तो निर्णय लांबणीवर पडेल.

कन्या हातात पडणारे पसे विलंबाने मिळाल्यामुळे तुमच्या काटकसरी स्वभावाची जणू काही परीक्षाच घेणार आहे. व्यापारउद्योगात भावनेपेक्षा व्यवहार जास्त महत्त्वाचा असतो हे विसरू नका. नाही तर चांगले काम करूनही फायदा मिळणार नाही. नोकरीमध्ये वरिष्ठांनी एखादी सवलत देण्याविषयी आश्वासन दिले असेल तर ते पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे. चालू नोकरीमध्ये वरिष्ठ तुमच्याकडून बऱ्याच अपेक्षा ठेवतील. घरामध्ये हातातोंडाशी आलेला एखादा निर्णय लांबवण्याची शक्यता आहे.

तूळ तुमच्या महत्त्वाकांक्षा वाढवायला तो अधिक उपयोगी पडेल. मात्र त्यामध्ये थोडासा जरी विलंब झाला तरी तुम्हाला तो सहन होणार नाही. व्यापार-उद्योगात नवीन संधीचा फायदा उठविण्यासाठी तुम्हाला धाडस करावेसे वाटेल. छोटी-मोठी कामे करण्यापेक्षा एकच मोठा हात मारावा, असा मोह तुम्हाला निर्माण होईल. नोकरीमध्ये जे काम तुम्ही करता त्याला महत्त्व आल्यामुळे संस्थेतर्फे तुमची बडदास्त ठेवली जाईल. तरुण मंडळी त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात चांगली कामगिरी करून दाखवतील.

वृश्चिक अवघड कामात लक्ष घालून त्यामध्ये सफलता प्राप्त करण्याकरिता तुम्ही सर्व दृष्टीने सिद्ध असाल, पण प्रत्यक्षात मात्र ‘दिसते तसे नसते’ असा अनुभव येईल. व्यापार-उद्योगाच्या क्षेत्रात उलाढाल आणि प्राप्तीचे प्रमाण वाढविण्याकरिता विशेष प्रयत्न घ्याल. एखादे नवीन काम मिळण्याची शक्यता निर्माण होईल. आíथक प्राप्ती वाढण्याची खात्री वाटेल. नोकरीमध्ये नवीन प्रोजेक्टकरिता तुमची निवड होईल. घरामध्ये तुमचे विचार आणि पूर्वी घेतलेले निर्णय बरोबर असल्याची इतरांकडून कबुली मिळेल.

धनू तुम्ही एका नवीन जोमाने आणि जोशाने कामाला लागाल. त्याचा तुम्हाला सर्व स्तरांवर उपयोग होईल. व्यापारउद्योगात ज्यांनी तुम्हाला पूर्वी एखाद्या कामात नकारघंटा ऐकायला लावली होती, त्यांच्याकडून थोडेसे सहकार्य मिळू लागेल. भागीदारी किंवा मत्री कराराचे नवीन प्रस्ताव तुमच्यापुढे येतील. नोकरीमध्ये बदली हवी असल्यास ताबडतोब हालचाल कराल. घरगुती कामात तुम्ही सक्रिय असाल. जोडीदार मदत न करू शकल्यामुळे तुमची चिडचिड होईल. ऋतुमानातील बदलामुळे प्रकृतीला त्रास संभवतो.

मकर ज्यांच्यावर तुम्ही अवलंबून आहात त्यांची म्हणावी तितकी साथ न मिळाल्याने तुमची गरसोय होईल. व्यापार-उद्योगात जे काम तुम्ही हातात घेतलेले आहे त्यामध्ये चांगले यश मिळविण्याकरिता प्रयत्नशील राहाल. नोकरीमध्ये तुमच्या कष्टाळू स्वभावाला गृहीत धरून वरिष्ठ एखादी जबाबदारी तुमच्यावर विनाकारणच सोपवतील. घरामध्ये नातेवाईक आणि आप्तेष्ट यांच्या वागण्या-बोलण्यामुळे जुना प्रश्न उकरून निघण्याची शक्यता आहे. तुम्ही शांत राहायचे ठरवाल.

कुंभ इच्छा आहे तिथे मार्ग आहे असे तुमच्या वागण्या-बोलण्यातून इतरांना दिसून येईल. व्यापारउद्योगात इतर वेळी तुम्ही शांत चित्ताने प्रत्येक निर्णय घेता. कधी कधी गरजेपेक्षा जास्त वेळही घालविता, पण आता मात्र जास्त कमाई करण्याच्या इच्छेने जास्त धाडस करावेसे वाटेल. नोकरीमध्ये संस्थेकडून तुम्हाला मिळालेल्या अधिकाराचा गरफायदा घेण्याचा मोह टाळावा. नाहीतर सहकाऱ्यांकडून विरोध होईल. घरामध्ये प्रिय व्यक्तीच्या एखाद्या समस्येमुळे थोडेसे चिंतेचे वातावरण असेल. मुलांच्या गरजांकडे लक्ष द्यावे.

मीन या आठवडय़ात जास्त विचार न करता तुम्ही रामभरोसे निर्णय घ्याल. त्यातील काही भाग बरोबर ठरेल. पण एखादा धोका उगीच पत्करल्यासारखा वाटेल. व्यापार उद्योगात बाजारपेठेत अर्धवट मिळालेल्या बातमीवर जास्त विश्वास न ठेवता सत्यता पडताळून पाहा. जोखमीचे व्यवहार इतरांवर न सोपवता शक्यतो स्वत:च हाताळा. नोकरीमध्ये वरिष्ठांच्या आज्ञेला मान द्या. घरामध्ये आवश्यक दुरुस्त्या, डागडुजी वगरे कारणांकरिता पसे खर्च होतील.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2015 1:04 am

Web Title: horoscope 39
Next Stories
1 दि. १७ ते २३ जुलै २०१५
2 दि. १० ते १६ जुलै २०१५
3 दि. ३ ते ९ जुलै २०१५
Just Now!
X