15 August 2020

News Flash

२८ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०१४

मेष एखाद्या प्रश्नामध्ये जेव्हा उत्तर मिळत नाही त्या वेळी तुम्ही जिद्द न सोडता काहीतरी मार्ग काढताच. आताही तुम्हाला तुमचा पवित्रा असाच ठेवणे भाग पडेल.

| November 28, 2014 01:10 am

01vijayमेष एखाद्या प्रश्नामध्ये जेव्हा उत्तर मिळत नाही त्या वेळी तुम्ही जिद्द न सोडता काहीतरी मार्ग काढताच. आताही तुम्हाला तुमचा पवित्रा असाच ठेवणे भाग पडेल. परिस्थितीमध्ये सुधारणा होण्याची खात्री वाटू लागेल. व्यापार उद्योगामध्ये नवीन हितसंबंध जोडून वेगळ्या पद्धतीचे काम करावेसे वाटेल. उत्पन्न वाढावे याकरता विशेष प्रयत्न कराल. नोकरीमध्ये वरिष्ठ कामाचे ओझे कमी करणार नाहीत. पण तुम्हाला कोणीतरी मदतनीस देतील. घरामध्ये एखाद्या लांबलेल्या प्रश्नावर पडदा पडेल. तरुणांचे विवाह जमतील.

वृषभ ग्रहमान संमिश्र आहे. व्यापार उद्योगात अनेक महत्त्वाचे बेत तुमच्या मनात असतील. ते कृतीत आणण्यापूर्वी स्पर्धकांच्या तयारीचा आणि तुमच्या आíथक कुवतीचा विचार करा. तुमच्या क्षेत्रातील होणाऱ्या तांत्रिक आणि इतर बदलांविषयी माहिती मिळवा. नोकरीमध्ये तुमच्याकडे असलेल्या प्रावीण्याचा उपयोग झाल्यामुळे तुमचा भाव वधारेल. वरिष्ठांच्या पुढे पुढे करून एखादी मागणी तुम्ही मान्य करून घ्याल. घरामध्ये एखाद्या निमित्ताने पाहुण्यांची वर्दळ राहील. कलाकार आणि खेळाडूंना प्रसिद्धी मिळेल.

मिथुन प्राप्त परिस्थितीमध्ये स्वत:ला आनंदी आणि समाधानी कसे ठेवायचे हे तुम्हाला माहीत असते. कारण आवडत्या व्यासंगामध्ये तुम्ही चार क्षण घालवू शकता. याचा तुम्हाला आता उपयोग होणार आहे. व्यापार उद्योगामध्ये हातातील पशाचा काटकसरीने वापर करा. कारण पशाची आवक तुमच्या अपेक्षेपेक्षा कमी असणार आहे. शिवाय जाहिरात जनसंपर्क वगरे गोष्टी करण्याकरिता तुम्हाला पसे राखून ठेवावे लागतील. नोकरीमध्ये कामाचा कंटाळा आल्यामुळे तुम्ही प्रत्यक्ष काम कमी करून त्याचा दिखावा जास्त कराल.

कर्क आपण करीत असलेल्या कामात आपले वेगळेपण दिसून आले पाहिजे त्याकरता तुम्ही बरीच मेहनत घ्याल. परंतु तुमच्या अपेक्षेपेक्षा त्याला कमी प्रतिसाद मिळेल. व्यापार उद्योगामध्ये स्वत:ची मर्यादा सोडून भलतेच धाडस करण्याचा मोह अनावर होईल. नोकरीमध्ये अतिउत्साहाच्या भरामध्ये जी जबाबदारी तुम्ही स्वीकारली होती ती तुम्हाला बोजड होत आहे असे लक्षात येईल. नोकरीमध्ये बदल करू इच्छिणाऱ्यांनी त्यातील अटींचा नीट अभ्यास करावा. घरामध्ये सर्वानुमते एखादा छान कार्यक्रम ठरेल.

सिंह एखादे महत्त्वाचे काम करायचे असे आपल्या मनामध्ये बरेच दिवस घोळत असते. त्याला जोपर्यंत योग्य मुहूर्त लाभत नाही तोपर्यंत असे विचार मनातच राहतात. तुमची मनोकामना पूर्ण झाल्यामुळे तुम्ही खूश असाल आणि प्रिय व्यक्तींना आग्रहाने त्यात सामील करून घ्याल. व्यापार उद्योगामध्ये नेहमीच्या कामाव्यतिरिक्त नवीन वर्षांकरता काही बेत करायचे असतील तर त्याचा पाठपुरावा कराल. नवीन संधी दृष्टिक्षेपात येईल. नोकरीमध्ये व्यक्तिस्वातंत्र्य लाभल्यामुळे जे काम कराल त्याचा तणाव जाणवणार नाही.

कन्या आपल्या कामामध्ये आणि कर्तव्यामध्ये तुम्ही इतके दंग असता की तुम्हाला इतर गोष्टींची आठवणही येत नाही. तुमचा मूड हलकाफुलका असेल. महत्त्वाची कामे शक्यतो लवकर उरका. कामाच्या वेळी काम करायचे आणि इतर वेळेला जीवनाचा आस्वाद घ्यायचा असे तुम्ही ठरवाल. व्यापार उद्योगाच्या कामानिमित्त वेगळ्या वातावरणामध्ये रमाल. तेथे जी माहिती मिळेल ती धंद्याला उपयोगी पडेल. कारखानदार परदेशात धावती भेट देतील. नोकरीमध्ये तुमच्या कामाला आणि कौशल्याला भरपूर वाव मिळेल.

तूळ ग्रहस्थिती तुमच्या हौशी स्वभावाला खतपाणी घालणारी आहे. तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला चन पडणार नाही. त्याकरता कितीही वेळ आणि पसे गेले तरी तुम्हाला वाईट वाटणार नाही. व्यवसाय उद्योगामध्ये विक्री आणि फायदा वाढवण्यासाठी जाहिरातीचे आकर्षक तंत्र तुम्ही उपयोगात आणाल. नवीन तंत्रज्ञान मिळवण्यासाठी परदेशात फेरफटका कराल. नोकरीमध्ये तुमच्या आवडीचे काम मिळाल्याने तुम्ही खूश असाल. घरामध्ये एखाद्या गोष्टीवर सर्वाचे एकमत होईल.

वृश्चिक तुमचा ताणतणाव कमी करणारे ग्रहमान तुम्हाला लाभणार आहे. जी महत्त्वाची कामे असतील किंवा निर्णय घ्यायचे असतील त्यासाठी शुभस्य शीघ्रम् असा ग्रहांचा संदेश आहे. व्यवसाय धंद्यात पशाचे नवीन साधन मिळविण्याकरिता प्रयत्न करा. तुम्ही पूर्वी केलेले काम किंवा जुन्या ओळखी तुम्हाला उपयोगी पडतील. परदेश व्यवहार करताना त्यातील कायदेकानू समजून घ्या. नोकरीमध्ये वरिष्ठ एखादी मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन देतील. नोकरीतील बदलाकरिता ग्रहमान अनुकूल आहे.

धनू जरी तुमच्यापुढे समस्या असल्या तरी त्यातून मार्ग काढण्याचे बळ तुम्हाला प्राप्त होईल. व्यवसाय उद्योगामध्ये अगदीच हाताबाहेर गेलेल्या परिस्थितीला काही प्रमाणात नियंत्रणात आणता येईल. गरजेएवढे पसे मिळाल्यामुळे तुम्ही सुस्कारा टाकाल. व्यापार उद्योगातील व्यक्तींना नवीन अशील मिळण्याची शक्यता आहे. नोकरीमधील कामाचा ताणतणाव कमी झाल्याने एक प्रकारचा दिलासा लाभेल. वरिष्ठ तुमच्या मागण्यांकडे लक्ष पुरवतील. घरामधील एखाद्या सदस्याच्या मदतीने तुमचे व्यक्तिगत आणि इतर प्रश्न सुटतील.

मकर थोडी मौजमजा करण्याचा तुमचा मूड असेल. त्यामुळे कामाच्या वेळी काम आणि इतर वेळेला आराम करायचा असे तुम्ही ठरवाल. पण त्यामध्येही तुम्ही नियोजन कराल. त्यामुळे सभोवतालच्या व्यक्तींना तुमची थट्टा-मस्करी करण्याची संधी मिळेल. व्यापार उद्योगात नवीन कामे मिळाल्याने आणि पूर्वीची वसुली झाल्यामुळे पशाची चिंता नसेल. नोकरीमध्ये तुमच्या कर्तव्यात तुम्ही दक्ष असाल. त्याचबरोबर संस्थेकडून मिळणाऱ्या सुविधांचा भरपूर उपयोग करून घ्याल. काहितरी कारणाने नातेवाईकांशी गाठभेट होईल.

कुंभ तुमच्या संशोधक वृत्तीचा तुम्हाला चांगला फायदा होईल. व्यापार उद्योगात गिऱ्हाईकांना आकर्षति करण्याकरता नवीन कल्पना अमलात आणाल. उलाढाल वाढल्यामुळे हातामध्ये चार पसे शिल्लक राहतील. जुनी येणी वसूल होतील. नोकरीमध्ये जे काम इतरांना जमले नाही ते काम तुम्ही युक्ती लढवून पूर्ण करून दाखवाल. त्यामुळे वरिष्ठ खूश होतील. काही जणांची परदेशातील प्रोजेक्टकरिता निवड होईल. घरामध्ये एखाद्या सोहळ्याच्या निमित्ताने दूरच्या नातेवाईकांची गाठभेट होईल. तुमचा मूड चांगला असेल.

मीन ग्रहमान तुमच्यातील कल्पकता आणि कर्तृत्वाला भरपूर वाव देणारे आहे. त्यामुळे तुम्ही आता आनंदी आणि उत्साही दिसाल. व्यापार उद्योगामध्ये रेंगाळलेली प्रकरणे हातात घ्याल. योगायोगाने त्याला आवश्यक असणाऱ्या व्यक्तींकडून साथ मिळेल. तुमच्या कामासंबंधी व्यक्तींशी ओळख निघेल. नोकरीमध्ये एखाद्या चांगल्या प्रोजेक्टकरिता वरिष्ठ तुमचे नाव सुचवतील. त्याचा तुमच्या जीवनमानावर चांगला फरक पडेल. घरामध्ये मंगलकार्य ठरेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2014 1:10 am

Web Title: horoscope 4
टॅग Astrology,Horoscope
Next Stories
1 वार्षिक भविष्य : दिवाळी २०१४ ते दिवाळी २०१५
2 २१ ते २७ नोव्हेंबर २०१४
3 १४ ते २० नोव्हेंबर २०१४
Just Now!
X