27 September 2020

News Flash

१४ ते २० नोव्हेंबर २०१४

मेष : अष्टमस्थानातील ग्रहांचे आधिक्य वाढत असल्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाते की काय, असे वाटू लागेल. क्वचितप्रसंगी तुमची स्थिती ‘कळतं पण वळत’ नाही अशी होणार आहे.

| November 14, 2014 01:10 am

01vijayमेष अष्टमस्थानातील ग्रहांचे आधिक्य वाढत असल्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाते की काय, असे वाटू लागेल. क्वचितप्रसंगी तुमची स्थिती ‘कळतं पण वळत’ नाही अशी होणार आहे. अशा वेळी तुम्हाला धीराने काम करावे लागेल. व्यापार-उद्योगात सगळ्यांशी सलोख्याचे संबंध ठेवा. वेळप्रसंगी नको त्या व्यक्तींची मनधरणी करावी लागेल. अनाठायी कारणांकरिता पसे खर्च करावे लागतील. नोकरीमध्ये तुम्ही तुमच्या कामात कसूर करू नका. घरामध्ये तुमच्या चुकांचा पाढा इतरांनी गिरवल्यामुळे तुम्हाला वाईट वाटेल.

वृषभ ग्रहयोग तुमचे मनोधर्य वाढविणारे आहे. ज्या प्रश्नांनी तुमचे डोके चक्रावून टाकले होते त्यातून सुटका होण्याची चिन्हे दिसू लागतील. अर्थात हे सर्व घडायला अजूनही काही कालावधी लागेल. तोपर्यंत धीर धरा. व्यापार-उद्योगात अत्यावश्यक देणी देऊन टाका म्हणजे कोणाचा गरसमज होणार नाही. नोकरीमध्ये तुमचे कर्तव्य करण्यामध्ये थोडीशीसुद्धा चूक होऊ देऊ नका. घरामध्ये कधी धाकाने, तर कधी प्रेमाने छोटय़ा-मोठय़ा प्रसंगाला तोंड द्यावे लागेल. तरुणांचा तणाव कमी होईल. त्यांना काही प्रमाणात उसंत मिळेल.

मिथुन महत्त्वाचे ग्रह षष्ठस्थानात असल्यामुळे तुम्हाला सावधतेने वाटचाल करायची आहे. अशा वेळी एखादा धाडसी निर्णय घेण्याचा मोह कटाक्षाने टाळा. व्यवसाय-उद्योगामध्ये नवीन भागीदारी किंवा मत्रिकराराचे प्रस्ताव पुढे येतील. त्यातील फायद्याबरोबर संभाव्य धोक्यांचा नीट विचार करा. नोकरीमध्ये वरिष्ठ त्यांच्या गरजेनुसार तुमच्या कामाच्या स्वरूपात बदल करण्याची शक्यता आहे. नवीन नोकरीच्या प्रयत्नात चिकाटी सोडू नका. घरामध्ये मोठय़ा व्यक्ती आणि तरुण यांच्यातील विचारांची तफावत जाणवेल.

कर्क ज्या कामामध्ये तुम्ही लक्ष घालता त्यात स्वत:च्या कष्टाची पर्वा न करता ठरविलेले उद्दिष्ट पूर्ण करता. या स्वभावामुळे तुम्ही बरीच मजल मारू शकाल. व्यवसाय-उद्योगात जी कामे पूर्वी तुम्ही तुमच्या आळसामुळे लांबवली होती ती कामे हाती घ्याल. परदेशातील व्यक्तींना मायदेशी फेरफटका करावासा वाटेल. नोकरीमध्ये वरिष्ठ इतर कामे तुमच्यावर सोपवून बिनधास्त होतील. घरामधील व्यक्तींशी काही कारणाने गरसमज झाला असेल तर त्यात समेट घडून येईल. तरुणांना वैवाहिक जीवनात पदार्पण करावेसे वाटेल.

सिंह तुमच्या दृष्टीने जी अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची कामे आहेत ती शक्यतो सप्ताहाच्या सुरुवातीला हातात घेऊन मध्यापर्यंत संपवून टाका. व्यवसाय-उद्योगासंबंधी महत्त्वाच्या किंवा मोठय़ा व्यक्तींच्या संपर्कात राहा. नोकरीमध्ये तुमच्या कामाला आवश्यक अशी मागणी असेल तर ती वरिष्ठांपुढे मांडा. एखादे काम पूर्ण करण्याकरिता छोटा प्रवास घडेल. घरामध्ये शुभ समारंभ ठरल्यामुळे प्रत्येक सदस्याचे विचार त्या दिशेनेच चालू राहतील. लांबच्या प्रवासाचे बेत ठरतील. कलाकार व खेळाडूंना मागणी राहील.

कन्या हे ग्रहमान तुम्हाला स्फूर्तिदायक आहे. तुमच्या हातून अनवधानाने काही चुका झालेल्या असतील तर त्या दुरुस्त करण्यात तुमचा वेळ जाईल. व्यापार-उद्योगात काही तरी नावीन्यपूर्ण करावेसे वाटेल. भांडवलाची वाढ करण्याकरिता योग्य व्यक्तींशी किंवा आíथक संस्थांशी संपर्क साधा. नोकरीमध्ये चांगल्या प्रोजेक्टकरिता तुमची निवड होईल. त्याकरिता परदेशात जाता येईल. घरामध्ये लांबची भावंडे किंवा नातेवाईक यांच्याशी भेटीचा योग येईल. तरुण मंडळी विवाहबंधनात अडकतील.

तूळ कामाच्या वेळी काम करायचे आणि इतर वेळी मौजमजा करायची असे तुम्ही ठरवाल. व्यवसाय-उद्योगात पशाची आवक वाढेल. गिऱ्हाईकांना त्यांच्या पसंतीनुसार काम करून दिल्याचा आनंद मिळेल. नोकरीमध्ये वरिष्ठांच्या मर्जीनुसार तुम्ही काम कराल. नवीन नोकरीचा प्रयत्न करीत असल्यास त्यामध्ये आशादायक गोष्टी घडतील. घरामध्ये सगळ्यांना आनंद देणारा एखादा कार्यक्रम ठरेल. त्यानिमित्ताने नातेवाईक, मित्रमंडळी यांचा सहवास मिळेल. जुने प्रश्न सामंजस्याने सोडवण्याचा प्रयत्न करा.

वृश्चिक ज्या कामात तुम्ही जातीने लक्ष घालाल त्यामध्ये चांगली प्रगती होईल; पण दुसऱ्यावर अवलंबून राहिलात तर फजिती व्हायला वेळ लागणार नाही. व्यवसाय-उद्योगात शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे तंत्र अमलात आणावे लागेल. कोणत्याही एका व्यक्तीवर किंवा संस्थेवर जास्त विसंबून राहू नका. नवीन नोकरीकरिता प्रयत्न करणाऱ्यांनी अतिचिकित्सा न करता योग्य ते निर्णय ताबडतोब घ्यावेत. चालू नोकरीत वरिष्ठांच्या सूचना तंतोतंत पाळा. घरामध्ये मोठय़ा व्यक्तीचा सल्ला तरुणांना उपयोगी पडेल.

धनू तुमच्या दृष्टीने जी अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची कामे आहेत त्यामध्ये आळस झाला, तर ती कामे विनाकारण लांबतील. व्यापार-उद्योगात ज्या गोष्टी तुमच्या प्रयत्नांनी साध्य होणार नाहीत त्या कदाचित सुयोग्य व्यक्तींच्या ओळखीमुळे किंवा मध्यस्थांमुळे पार पडतील. फक्त त्यावर पूर्णपणे विसंबून राहू नका. नोकरीमध्ये जे काम हाती घेतले आहे ते तडीस नेण्याचा निश्चय कराल. नाही तर त्याचे श्रेय सहकाऱ्यांना मिळेल. घरामध्ये वाढत्या खर्चामुळे आणि जबाबदाऱ्यांमुळे एक प्रकारचा मानसिक दबाव राहील.

मकर पशावर तुमचे विशेष प्रेम आहे. ते खिशात खुळखुळत असल्यामुळे तुमचा मूड चांगला असेल. व्यापार-उद्योगात पूर्वी केलेले काम आणि जुन्या ओळखी यामुळे तुम्हाला एखादी नवीन ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. ज्यांचा जोडधंदा आहे त्यांच्या मालाला बरीच मागणी राहील. नोकरीत जे काम कष्टदायक आणि इतरांना जमले नाही ते तुम्ही युक्ती लढवून सफल कराल. वरिष्ठ याचे कौतुक करतील. घरामध्ये शुभकार्य ठरण्याची शक्यता आहे. तरुणांना वैवाहिक जीवनात पदार्पण करावेसे वाटेल.

कुंभ तुमच्या कल्पकतेला कृतीची जोड दिली तर सोन्याहून पिवळे. व्यवसाय-उद्योगामध्ये कोणाशी हितसंबंध बिघडले असतील, तर त्यामध्ये समेट घडवण्याची तयारी ठेवा. ज्यांना परदेशात व्यवहार करायचे आहेत त्यांनी तेथील बाजारपेठेसंबंधी आणि स्पर्धकांविषयी माहिती मिळवावी. छोटय़ा व्यावसायिकांना अटीतटीच्या स्पध्रेतून नवीन ऑर्डर मिळू शकेल. नोकरीमध्ये पूर्वी काही चुका झाल्या असतील, तर त्या ताबडतोब दुरुस्त करा. ज्या सवलती संस्थेकडून मिळत आहेत त्याचा फायदा घ्या.

मीन अनेक वेळी आपल्या मनामध्ये अनेक चांगल्या कल्पना असतात; त्या कृतीत उतरवण्यासाठी योग्य संधी किंवा वाव मिळेल. व्यापार-उद्योगात काही चांगले संकेत मिळतील. ज्यांचा परदेशात व्यवहार आहे त्यांना एखादी ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये चांगले काम करून इतरांचा तुमच्याविषयी झालेला गरसमज तुम्ही दूर कराल. घरामध्ये सर्वानुमते लांबच्या प्रवासाचे नियोजन होईल. एखाद्या आवडत्या व्यक्तीला भेटण्याचा योग येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 14, 2014 1:10 am

Web Title: horoscope 7
टॅग Horoscope,Star Sign
Next Stories
1 ७ ते १३ नोव्हेंबर २०१४
2 ३१ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर २०१४
3 १० ते १६ ऑक्टोबर २०१४
Just Now!
X