bhavi-vishes-1येत्या ३१ डिसेंबर २०१४ च्या रात्री जेव्हा अकरा वाजून ५९ मिनिटं आणि ५९ सेकंद ही वेळ पुढच्या वेळेचा उंबरठा ओलांडेल तेव्हा कॅलेंडर बदलून तिथे २०१४ हे वर्ष इतिहासजमा झालेलं असेल. २०१५ या नवीन वर्षांच्या सुरुवातीच्या वेळेची स्थिती काहीशी अशा प्रकारे असेल.
लग्नातील राहू  बुधाच्या कन्येमध्ये आहे, शनी त्याचा शत्रू असलेल्या मंगळाच्या वृश्चिक राशीत आहे, सूर्य त्याचा मित्र बुध राशीसह गुरूच्या धनू राशीत आहे, मंगळ शुक्रसोबत त्याचा शत्रू असलेल्या शनीच्या मकरेत आहे, केतू गुरूच्या मीन राशीत आहे, चंद्र मंगळाच्या मेष राशीत आहे आणि गुरू त्याचा मित्र असलेल्या चंद्राच्या कर्क राशीत आहे.                                            
bhavi-vishes-2या संवत्सराचं नाव ‘प्लवंग आहे. चंद्र २० मार्च २०१५ पर्यंत त्याचा राजा आणि मंत्री आहे. त्यानंतर विक्रम संवत २०७१ संपेल आणि संवत २०७२ मध्ये ‘कीलक’ हे नवीन संवत्सर सुरू होईल. या संवत्सराचा राजा शनी आणि मंत्री शनीचा शत्रू मंगळ असेल. सध्या सुरू असलेल्या आणि २० मार्च २०१५ ला संपणाऱ्या संवत्सरामध्ये सात ग्रह नऊ मंत्रालयांची जबाबदारी सांभाळतायत. ज्या वर्षी चंद्र राजा आणि मंत्री आहे त्या वर्षी बागायती शेतीची प्रगती होईल. राजा देशाच्या प्रगतीसाठी जीवतोड प्रयत्न करतो; पण जनतेला राजाबद्दल फारसा विश्वास वाटत नाही. या काळात दूध उत्पादनात वाढ होते. कृषीउत्पादनावर दुष्परिणाम होतो. काही अनपेक्षित घटनांसह संसर्गजन्य रोग आणि गुन्हेगारीत वाढ होईल. जगात मोठय़ा मंदीची शक्यता आहे. वेगवेगळ्या देशांवरच्या सीमेवर तणाव वाढेल.
शनिवार, २१ मार्च २०१५ पासून विक्रम संवत २०७२ म्हणजे नवसंवत्सर ‘कीलक’ सुरू होत आहे. त्याचा राजा सूर्यपुत्र शनी आणि मंत्री मंगळ असेल. शनी दक्षिण-पश्चिम दिशेचा अधिपती आहे. त्यांची क्रूर नजर पश्चिम दिशेकडे असेल. मंगळाच्या वृश्चिक राशीत शनीचे भ्रमण हे मोठय़ा तणावांची शक्यता सूचित करत आहे. मंगळाच्या शनीचे हे वर्ष नकारात्मक घटना-घडामोडींसाठी लक्षात ठेवलें जाईल. या वर्षांत गुंतागुंत, तणाव आणि नुकसान याचे नवे दाखले मिळतील. शनीची पश्चिमेकडे असलेली वक्रदृष्टी पश्चिमेकडील देशांमध्ये अस्वस्थता निर्माण करणारी असेल. ९ नोव्हेंबर २०१४ ला गुरू रात्री एक वाजून ४४ मिनिटांनी वक्री झाला आहे. तो उत्तर-पूर्व भागाचा तर शुक्र दक्षिण-पूर्व भागाचा अधिपती आहे. वक्री गुरू महात्मा, गुरू, स्वामी, बाबा अशा प्रकारच्या सर्व लोकांसाठी धोक्याची घंटा वाजवत आहे, कारण लोकांचा विश्वास कमी झाल्यामुळे धार्मिक गुरूंसाठी येणारे वर्ष तणावपूर्ण असेल.
लाल रंगाच्या वस्तूंच्या व्यापारासाठी लाभदायक वर्ष ठरण्याची शक्यता आहे. किडे आणि उंदरांमुळे पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. धान्याची भाववाढ होऊ शकते. गहू, ज्वारी, हरभरा या पिकांच्या बाबतीत नुकसानीची शक्यता आहे. तांदूळ, गहू, ज्वारी, जिरे, हिंग, तीळ आणि हळद यांच्यासह पारा आणि शिसे यांमध्ये नफा होण्याची शक्यता आहे. सोने-चांदी यांच्या किमतीत किंचित वाढ होईल, पण त्यानंतर सोने आणि चांदीच्या भावात मोठय़ा प्रमाणात घट होण्याची शक्यता दिसत आहे. जगाची मोठय़ा मंदीच्या दिशेने वाटचाल सुरू होत आहे. बाजारपेठेत पैशांची कमतरता स्पष्टपणे दिसू लागेल. जागांची भाववाढ होणार नाही. जागांच्या किमती  आश्चर्यकारकरीत्या उतरतील. बिल्डर लोक कायद्याच्या कचाटय़ात सापडतील. बांधकामांच्या प्रकल्पांचा वेग लक्षणीयरीत्या मंदावेल. बरेच प्रोजेक्ट्स वृश्चिक राशीच्या शनीमध्ये पूर्ण होणे अशक्य आहे. लक्झरी वस्तूंच्या व्यापारामध्ये वाढ होईल. शेअर बाजार थोडय़ा घसरणीनंतर पुन्हा वर जाईल. टेक्सटाइल्स, एंटरटेंमेंट, लक्झरी उत्पादने, साखर, हॉटेल, दागिने, प्लास्टिक या क्षेत्रांमधले शेअर्स तेजीमध्ये असतील. स्टील, सिमेंट या क्षेत्रांतले शेअर्स घसरणीनंतर वेगाने वर जातील. स्थावर मालमत्ता आणि बँकिंग या क्षेत्रांमध्ये मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. या वर्षी चार मोठय़ा भूकंप किंवा सुनामीची शक्यता आहे. यामुळे पश्चिमेकडील मोठय़ा शहरांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होऊ शकते. कन्या राशीचा राहू पश्चिमेकडील राष्ट्राध्यक्षांना त्रासदायक ठरेल. विविध देशांमधील नेतृत्वावरचा  विश्वास कमी होत जाईल. विविध देशांमध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे. अनोख्या संकटाकडे जगाची वाटचाल सुरू आहे. चैत्र पौर्णिमेनंतर तोडफोड, आंदोलन आणि जाळपोळ यांच्या शक्यता दिसत आहेत. रक्तपाताच्या मोठय़ा घटना घडण्याच्या शक्यता आहेत. लोकांचा एकमेकांमधील विश्वास कमी होत जाईल. छोटी-मोठी भांडणं हाणामारीपर्यंत जातील. पैशांच्या व्यवहारामुळे संबंध बिघडतील. मूल्यांचा ऱ्हास होईल.
या वर्षीपासून बडय़ा बजेट सिनेमांची पुन्हा एकदा रेलचेल बघायला मिळेल. अनेक सुपरहिट सिनेमे या वर्षी बघायला मिळतील. सिनेसृष्टीच्या यशासाठी येणारे वर्ष उत्तम आहे, पण शूटिंगदरम्यान दुर्घटना आणि आगीमुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. कोण्या एका कलाकाराबाबत अपघातासारखी नकारात्मक घटना घडण्याचा योग निर्माण होत आहे. या वर्षी सिनेसृष्टीला एखाद्या प्रसिद्ध दिग्गज कलाकाराच्या निधनाचं दु:ख सहन करावं लागेल. या वर्षीच्या सुरुवातीलाच एखाद्या सिनेमाला त्याच्या यशाचा आनंद उपभोगता येईल. काही कलाकारांमध्ये मतभेद, वाद आणि शत्रुत्वाची भावना निर्माण होईल. कास्टिंग काऊच प्रकाराचे अनेक नवे आरोप समोर येऊ शकतात. एखादा निर्माता, दिग्दर्शक किंवा कलाकार यांच्यातील ‘तू तू मैं मैं’ प्रेक्षकांसमोर येईल.     

वक्री गुरुचे परिणाम..
वक्री झालेला गुरू २०१५ मध्ये विश्वास, आस्था यांच्यावर नकारात्मक परिणाम करेल अशी चिन्हं दिसत आहेत. ९ नोव्हेंबर रोजी रात्री १ वाजून ४४ मिनिटांच्या आधीपर्यंत गुरू कर्केत उच्चीचा होता. ही गुरूची एक श्रेष्ठ स्थिती मानली जाते. ही स्थिती सुख, शांती, आनंद आणि वैभवासाठी कारक मानली जाते. परमेश्वर असो, गुरू असो, की नेते यांच्यासाठी ही आस्था आणि विश्वास वाढवणारी मानली जाते; पण नोव्हेंबरच्या रात्री १ वाजून ४४ मिनिटांनी परिस्थिती बदलली आहे. गुरू चार महिन्यांसाठी वक्री झाला आहे. वक्री म्हणजे उलटा, विरुद्ध. वक्री झाल्यावर कुठलाही ग्रह आपल्या स्वभावाच्या विरु द्ध वागतो. गुरू एरवी विवेक, ज्ञान, विश्वास, आस्था यासाठी मानला जातो. या काळात ते या गोष्टींपासून बाजूला होण्याची शक्यता आहे. याचं सगळ्यात पहिलं दृश्य रूप दिसेल राजकारणात. तिथे निष्ठा बदलतील. लोक पक्ष बदलतील. वृद्धांना बाजूला बसवलं जाईल, कुणी तरी नवंच पुढे येईल.  कदाचित एखादं नेतृत्व विचारातही घेतलं गेलं नव्हतं ते प्रभावशाली म्हणून पुढे येईल.
वक्री झालेला गुरू, बाबा, महाराज, मठाधीश, स्वामी अशा स्वयंघोषित महापुरुषांसाठी धोक्याची घंटा वाजवणारा आहे.
८ एप्रिल २०१५ च्या रात्री १० वाजून ४४ मिनिटांपर्यंतचा काळ बऱ्याच उलाढालींना सामोरं जायला लावणारा आहे. या काळात काही नवे घोटाळे पुढे येतील. लोक हतप्रभ होतील. त्यांना मानसिक क्लेश होतील. नेतृत्व मग ते धार्मिक असो, शिक्षणाच्या क्षेत्रातलं असो, एखाद्या कंपनीचं असो, समाजाचं असो, देशाचं असो की राज्याचं असो. मंगळावर असलेली गुरूची वक्र दृष्टी नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरेल. एखाद्या प्रसिद्ध कलाकाराबद्दलची एखादी विचित्र बातमी लोकांना अस्वस्थ करणारी असेल. शिक्षणाच्या क्षेत्रातली एखादी घटना वादग्रस्त ठरेल. शिक्षणाच्या क्षेत्रातला एखादा मोठा भ्रष्टाचार या काळात उघड होण्याची शक्यता आहे. या काळात परीक्षेतल्या प्रश्नपत्रिकाही फुटण्याची शक्यता आहे. वक्री गुरूमुळे विवेक, नीती पायदळी तुडवली जाईल. नैतिकतेचा ऱ्हास होईल. व्यापारावर नकारात्मक परिणाम होईल. एकुणात वक्री गुरूमुळे ८ एप्रिल २०१५ पर्यंतचा काळ खडतर आहे.     संमिश्र फलांचा काळ
  bhavi-vishes-3  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म १७ सप्टेंबर १९५० चा आहे. त्यांची जन्मवेळ दुपारी १२. जन्मस्थळ गुजरातमधलं मेहसाणा इथलं वडनगर. हे तपशील बरोबर असतील तर त्यांची जन्मकुंडली पुढीलप्रमाणे असेल.
अनुराधा नक्षत्राच्या दुसऱ्या चरणात आणि मंगळाच्या वृश्चिकेत नरेंद्र मोदींचा जन्म झाला आहे. सध्या त्यांचा भाग्येश चंद्राच्या महादशेत गुरूची अंतर्दशा सुरू आहे. हा त्यांच्या आयुष्यातला सर्वोत्तम काळ आहे. २८ जानेवारी २०२१ पर्यंत चंद्राची ही महादशा आहे. २८ जानेवारी २०२१ नंतर त्यांचा लग्नेश मंगळाची महादशा सुरू होईल. ती सात वर्षे असेल; पण त्यांचा लग्नेश षष्टेशही असल्यामुळे त्यांच्यासमोर या काळात नवनवीन आव्हाने उभी राहतील; पण हे मात्र नक्की की भारतीय राजकारणात ‘नमो’ प्रभाव बराच काळपर्यंत राहील; पण मध्येमध्ये मोदींच्या प्रभावावर परिणाम करणारे नकारात्मक प्रसंग येत राहतील.
१८ जानेवारी २०१५ ला सुरू होणारी मंगळाची प्रत्येतर दशा मोदींच्या आरोग्य आणि मानसिक परिस्थितीवर थोडा परिणाम करणारी आहे. त्यामुळे विरोधकांमुळे निर्माण होणारा तणाव, शारीरिक पीडा, अजीर्ण अशा गोष्टींना त्यांना सामोरं जावं लागेल अशी शक्यता आहे; पण मोदी या सगळ्या परिस्थितीला ठामपणे सामोरे जातील.
bahvi-vishes-4२९ एप्रिल २०१५ रोजी त्यांच्या शनीची अंतर्दशा सुरू होत आहे. या अंतर्दशेमुळे त्यांच्या आयुष्यात काही कलाटणी देणारे प्रसंग निर्माण होण्याची शक्यता आहे. ग्रहांमधल्या या बदलांमुळे आईला त्रासदायक परिस्थिती निर्माण होणं, कोणत्याही कामांना विलंब होणं, शोक होणं, एखाद्या गोष्टीमुळे मानसिक त्रास होणं अशा परिस्थितीला सामोरं जावं लागू शकतं. ग्रहांमधल्या या बदलांचा आणखी एक परिणाम म्हणजे त्यांच्याकडून असं एखादं विधानही केलं जाऊ शकतं, ज्यामुळे विनाकारण वाद निर्माण होऊ शकतो. जनतेचं प्रेम, समर्थन याबरोबरच त्यांच्या प्रतिष्ठेलाही बाधा निर्माण होण्याची शक्यता दिसत आहे. त्यांनी केलेल्या काही गोष्टींवर कठोर टीका होईल तर त्यांनी केलेल्या काही गोष्टींमुळे ते दीर्घकाळपर्यंत लोकांच्या स्मरणात राहतील.     

मोठय़ा पदाची शक्यता
bhavi-vishes-5दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा जन्म हरियाणामधल्या हिसार इथं १६ ऑगस्ट १९६८ रोजी रात्री ११ वाजून ४६ मिनिटांनी झाला आहे. त्यांच्याबद्दलचे हे तपशील बरोबर असतील तर त्यांची जन्मकुंडली पुढीलप्रमाणे असेल.
१७ ऑगस्ट २००४ पासून केजरीवालांची लाभेश गुरूची महादशा सुरू आहे, पण गुरू त्यांच्या कुंडलीत लाभेशाबरोबरच अष्टमेशही आहे. त्यामुळे त्यांच्या बाबतीत खूपदा असं होतं की ते एखाद्या उच्चस्थानी पोहोचतील अशी शक्यता निर्माण होते आणि तिथे पोहोचता पोहोचता तिथे पोहोचायचे राहून जातात. केजरीवालांच्या बाबतीत असं सतत होत आलं आहे असं दिसतं. गुरूमध्ये शुक्राची आंतर्दशा आणि गुरूची प्रत्यंतरदशा असल्यामुळे त्यांना सत्ता मिळाली, पण शनीच्या प्रत्यंतर दशेमुळे ती सत्ता गेली आणि त्यांच्या प्रतिष्ठेलाही बाधा आली. २ जानेवारी २०१५ नंतर त्यांच्या अडचणींमध्ये वाढच होईल.
पण २८ फेब्रुवारी २०१५ पासून ग्रहांची ही परिस्थिती बदलेल आणि त्याबरोबरच अरविंद केजरीवालांचं नशीबही बदलत जाईल, असं त्यांचे ग्रह सांगत आहेत. २८ फेब्रुवारी २०१५ पासून त्यांच्या प्रतिष्ठेत तसंच राजकीय परिस्थितीत अचानक सकारात्मक बदल दिसायला लागेल. या ग्रहबदलांची त्यांना शुभ फळे मिळण्याचे संकेत दिसत आहेत. अचानक त्यांचं प्रभुत्व आणि bhavi-vishes-6प्रभाव चांगलाच वाढेल अशी शक्यता दिसत आहे; पण तरीही येणारं वर्ष त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता निर्माण करणारं आहे. १७ जुलै २०१५ पासून त्यांना आरोग्याच्या चिंता भेडसावतील आणि त्याचबरोबर त्यांना मानसिक क्लेशही सहन करावे लागणार आहेत अशी शक्यता दिसत आहेत. १३ ऑक्टोबर २०१५ पासून त्यांचा कोणाबरोबर तरी विवाद होण्याची शक्यता आहे.
१७ डिसेंबर २०१५ पासूनचा काळ केजरीवालांसाठी नवे मानसन्मान आणि प्रतिष्ठा देणारा आहे. या काळात त्यांची प्रतिष्ठा नवी उंची गाठेल अशी चिन्हं दिसत आहेत. २०१५- २०१६ या काळात केजरीवालांना एखादा मोठा सरकारी किंवा बिगरसरकारी सन्मान मिळण्याची शक्यता दिसत आहे.