12 November 2019

News Flash

करा नित्य उजळणी

इंग्रजी भाषेमध्ये काही शब्द सहज वापरले जातात. त्यांचा अर्थ समजून घेऊया कवितेच्या माध्यमातून..

| December 26, 2014 01:01 am

इंग्रजी भाषेमध्ये काही शब्द सहज वापरले जातात. त्यांचा अर्थ समजून घेऊया कवितेच्या माध्यमातून..
    कन्टेम्प्ररि जे एका काळी वसती
    समकालीन त्यांना मराठीमध्ये म्हणती।
    कन्टेम्प्ररि नेहरू अन् गांधीजी
    तुकयाचा होता समकालीन शिवाजी ॥१॥

    बालपणीचा खेळामधला
    ‘आलामंतर, कोलामंतर’।
    इंग्रजीतला आहे जालीम
    अ‍ॅब्रकडॅब्र जादूमंतर ॥२॥
    
    सामना चालला भारत-पाकी अटीतटीचा
    मी अनुभवला टीव्हीवरूनी थरार त्याचा ।
    मी न खेळलो अथवा मी ना मॅच जिंकली
    विजयाचा आनंद घेतला व्हिकेअरियसली॥३॥
    सर्व ठिकाणी सदा उपस्थित कोण?
    सर्वसामान्य माणूस, अर्थात कॉमन मॅन।
    सामान्य असे, जे सहज दिसे सर्वत्र
    युबिक्विटस संज्ञेस असे ते पात्र॥४॥

    स्पेलिंगपुढे कंसात दिले उच्चार
    उपयोगही दिधले वाक्यातून साधार ।
    कर्तव्य तुम्हा हे करा नित्य उजळणी
    शब्दांना बसवा, घट्ट आपुल्या स्मरणी॥५॥

contemporary – belonging to the same time.
उदा. The Chief Minister and I were contemporaries at college.

abracadabra – a word that people say when they do a magic trick, in order to make it successful.
उदा.. The magician waved his magic wand, cried ‘Abracadabra’ and pulled a rabbit out of his hat.

vicarious – experienced by watching or reading about, rather than by doing it yourself.
उदा. There is a certain vicarious pleasure in reading books about travel.

ubiquitous – seeming to be everywhere or in several places at the same time; very common.
उदा. The ubiquitous mobile phones is a sign of modern society.
(समाप्त)

First Published on December 26, 2014 1:01 am

Web Title: informative article about english language