आजचं कुणी भेटलं की चार पावसाळे जास्त पाहिलेल्यांचं सुरू होतं.. आमच्या वेळी असं होतं.. आजच्या धावत्या जगात घडय़ाळाच्या काटय़ाशी स्पर्धा करत जगणाऱ्या तरुण पिढीला हे वाक्य ऐकून नेमकं काय वाटतं..?

एखाद्या लग्न समारंभात किंवा वाढदिवसाला न चुकता येणारा प्रसंग म्हणजे लांबचे नातेवाईक अनेक दिवसांनी भेटणं. मग हमखास येणारं वाक्य म्हणजे, ‘अय्या किती मोठा झाला हा. एवढासा बघितला होता’ आणि हाताने उंची दाखवायची.. तीही ठरलेली असते. हा प्रसंग सर्वावर येतो. आपण साहजिकच त्या नातेवाईकांना वर्षांनी किंवा एखाद्या वेळी भेटल्याने त्यांच्या समोरच ‘हे कोण’ असंही नाही विचारू शकत. मग आपण त्यांची ओळख लक्षात न घेता बोलू लागतो.. किंवा इंटरव्ह्य़ू देऊ लागतो. मग शाळा कॉलेजची विचारपूस, ‘कितवीत शिकतो? कोणत्या शाखेला?’ मग काय ही ‘स्पर्धा’ आहे ना? आणि चालू होतं ‘आमच्या वेळी बाबा असं नव्हतं’ मग यावर आपण चेहऱ्यावर खेद दाखवून ‘हो’ अशी मान हलवतो.
‘कॉलेज कुठे आहे?’ पुढचा प्रश्न मग पार्ले, विरार किंवा पालघर अशी जागा सांगितली की ‘अय्या मग ट्रेनमध्ये चढायला / उतरायला मिळतं का?’ आपण हो म्हणायच्या आत ‘आमच्या वेळी बाबा इतकी गर्दी नसायची हं,’ म्हणून हे जणू आम्हीच गर्दीला जबाबदार आहोत हे मानून पुन्हा चेहऱ्यावर खेद दाखवून ‘हो..हो..’ म्हणण्याशिवाय पर्याय नसतो.
कॉलेज नामांकित असलं तर किंवा तेच नातेवाईक किंवा त्यांची मुले त्या कॉलेजमधून पदवीधर झाले असतील तर हमखास येणारा प्रश्न म्हणजे ‘वडा (किंवा तत्सम पदार्थ) मिळतो का अजूनही? खाल्लाय का?’ आपण काही म्हणायच्या आत ‘आमच्या वेळेला अमुक आण्याला मिळायचा. काय सुंदर असायचा..’
मुलगा त्या कॉलेजचा पदवीधर असल्यास ‘ आमचा हा/ही मुद्दाम डबा नाही न्यायची वडय़ासाठी किंवा आम्हालाही घरी आणायचा/ची.’
वर खोटी-खोटी हास्यमुद्रा काढून परत ‘अच्छा.. अरेवा..’ वगैरे म्हणून संवाद थांबवण्याचा प्रयत्न केला तर ‘तू लहानपणी जरा गोलू होतास.. आत्ता जरा बारीक झालास.. का असं? खायला वेळच मिळत नाही ना? हल्लीचं जीवनच धकाधकीचं झालंय..’ आपण हो/नाही म्हणायच्या आत त्यांनी काढलेला निष्कर्ष.
‘आधी आम्ही काय खेळ खेळायचो पण ‘यांच्या बाबा नशिबी नाही हं. विटी-दांडू असो लगोरी, लपाछुपी, डब्बा ऐसपैस.. पण ‘यांना वेळ नाही, त्याहूनही मैदान नाही, मातीत खेळणं खूप दुर्मीळ ..’ इतक्यात कांगावा म्हणून फोन आलाय असं नाटक करून फोन कानाला लावून पळवाट काढणार तोच ‘बस रे जरा’ म्हणून मांडीवर थाप पडते आणि बसावं लागतं. कांगावा म्हणून काढलेला फोन महाग पडतो. ‘अय्या काय फोन आहे .. काय काय आहे त्यात?’ हा मोठय़ांचा ठरलेला आणि थोडा भावनात्मक उद्गार काढल्यावर त्यांना फोन काय काय करू शकतो हे सांगितल्यावर त्यांचा एक फोटो काढला तर त्यावरही त्यांना बोलायचं असतं ते म्हणजे, ‘आमच्या वेळी मंगल समारंभात आणि पासपोर्टसाठीच फोटो काढले जायचे आमचे. आता बाबा काय.. क्षणोक्षणी फोटो काढले जातात.. आणि काय ते बुक फेस का काय ते?’
‘फेसबुक.’
‘हा तेच ते.. त्यात काय फोटो टाकतात. आमच्या मुलाला/मुलीला कळतं बाबा.. आमच्या सुनेच्या नणंदेची सासू.. तिने सांगितलं त्यांच्या जावेने, जी अमेरिकेत असते, तिने ना तिला ते त्या बुकवरच पाहिलं भारतातून. काय फायदा? हं घरबसल्या जग बघता येतं हं त्यावर.. बाकी काय काय होतं मुलामुलींचं! आजकाल पेपरात येतंच.. हल्ली दहशतवादीपण ते इंटरनेट वापरतात.. तुझं आहे का फेसबुक?’ हो बोललो तर ओरडा आणि नाही म्हणालो तर बावळट ठरवणार. ‘इकडे आड तिकडे विहीर’ तरीही ‘हो आहे.’
‘तू बरा येतोस आई बाबांबरोबर समारंभाला, नाही तर हल्लीची मुलं नाही येत..’

why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
Virat Kohli's video goes viral
IPL 2024: गौतम गंभीरच्या गळाभेटीवर विराटने सोडले मौन; चाहत्यांना म्हणाला, ‘तुमचा मसाला संपला म्हणून तुम्ही…’, पाहा VIDEO
demonetisation decision taken by modi government in 2016 was illegal and wrong says justice bv nagarathna
‘निश्चलनीकरणाचे परिणाम उद्दिष्टांच्या विरोधात’, सामान्य माणसाला झालेल्या त्रासाने अस्वस्थ- न्या. नागरत्न
youth dies
मस्करी जीवावर बेतली; कम्प्रेसरच्या सहाय्याने मित्राच्या गुदद्वारात हवा भरली, तरूणाचा दुर्दैवी मृत्यू

हल्ली टीव्हीवर तर काय काय चालतं. लुंगी डान्स काय, चिकनी चमेली काय. तुला सांगतो आमच्या वेळी आम्ही फक्त बातम्या आणि चित्रहार सोडून काही पाहिलं नाही.

अशी ‘ही कोण .. नाव विसरलो बघ. हल्ली लक्षातच राहत नाही. असो. ती म्हणे, मुलं हल्ली आमच्या बरोबर येतच नाहीत.. आणि मित्रांबरोबार फिरला आणि सिनेमाला वगैरे जातात .. मी पाहिलेला पहिला सिनेमा ‘हाथी मेरे साथी.’ तेव्हा तिकिटाचे दर काय होते आणि आता काय आहेत. बरं हल्ली चित्रपटात काय दाखवतात.. काय ते कपडे घालतात.. अरे त्यापेक्षा घालूच नका म्हणावं!!! उरलं-सुरलंपण दाखवून मोकळे व्हा. आमच्या नातू/नातीला असलीच गाणी हल्ली आवडतात आणि टीव्हीवरही तेच चालू असतं. त्यात तुमचा काय दोष? नातवंडांचं शाळेत जायच्या आधी हेच चालतं.. हल्ली टीव्हीवर तर काय काय चालतं. लुंगी डान्स काय, चिकनी चमेली काय . त्यात ते काय काय दाखवतात .. तुला सांगतो आमच्या वेळी आम्ही फक्त बातम्या आणि चित्रहार सोडून काही पाहिलं नाही. तू असलं काही बघत नाहीस ना रे बाबा???’
‘नाही.’
पण सत्य ठाऊ क असतं. हल्ली सगळीच मुलं हे बघतात.. त्यात तुमचा दोष नाही.
मग शांतता, विषय काही नसतो.. सुटकेचा हाच क्षण, असं वाटत उठण्यासाठी आपण त्या पोझमध्ये येतो आणि तेवढय़ातच, ‘जातोस? तुला आम्हा म्हाताऱ्यांमध्ये काय करमणार? तुझंही बरोबर आहे. कधी तरी ये.. बरं वाटेल.’
या वेळी खरोखर म्हातारपणाची दया येते. आपोआप होकार कळवतो. ‘कसा येशील .. अमुक नंबरची बस पकड, अमुक स्टॉपला उतर हल्ली बसमध्ये गर्दी आणि रस्त्यावर ट्रॅफिक खूप असतो. त्यात तुम्हाला वेळ नाही. मी जेव्हा अमुक जागी कामाला होतो/होते.. मी १९७०-८०चं म्हणतोय हं तेव्हा दादर-वडाळा नरिमन पॉइंट असं अंतर पटकन पार व्हायचं. तुला सांगतो, आधी रस्ते पाण्याने धुवायचे. आता काय बाबा बोलायची सोय नाही.’
‘कंटाळलास?’
‘हो,’ म्हणून दुखावू शकत नाही आणि ‘नाही’ म्हणून आमच्या पिढीचे दोष ऐकू शकत नाही.. तरीही, ‘नाही हो मुळीच नाही.. कंटाळा काय त्यात.’
‘तू बरा आहेस.. बाकी हल्लीची मुलं म्हणजे.. नक्की आई-बाबांचे संस्कार.. नाही तरी हल्लीचे आई-बाबा कामालाच सर्वस्व मानतात, मग मुलं वाऱ्यावर.. मग हल्ली काय काय होते हे पेपरात वाचतोच. आई-बाबा नजरेआड होताच गोंधळ सुरू. बेशिस्त झालीयेत ही मुलं. दिवसभर त्या टीव्ही, कॉम्प्युटरसमोर बसायचे आणि तिथेच खायचे प्यायचे.. काय बोलणार यांना. कानात काय ते घालून गाणी ऐकतात, बाहेरचं अरबट-चरबट खाणं काय, वाह्य़ातपणा काय, बोलाची सोय नाही. बरं, काही बोललं तर आम्हीच मूर्ख असतो.’ पुन्हा हास्यमुद्रा.
‘तू नाही ना बाहेरचं काही खात?’ खरं तर या प्रश्नाचं उत्तर त्यांनाही माहीत असतं.
‘नाही,’ या वेळी खोटं बोलून विषय संपवायचा तर त्यावर, ‘नाही? का? खायचं रे कधी तरी.. काय की आमच्या वेळी एवढे पदार्थ नव्हते.. तुम्हाला जगभरातलं खायला मिळतं. वयोमानानुसार आम्ही हे नाही खाऊ शकत.. तुम्ही खा.. वय आहे तुमचं!’
‘हो,’ ही मंडळी बऱ्याचदा असाच पोपट करतात.
मुख्य समारंभ राहूनच जातो. बिनपाण्याची धुलाई चालूच राहते.
‘चला मी येतो, येईन कधी तरी भेटायला,’ उठून पाया पडायला वाकतो तेवढय़ात, ‘वा’ बराच संस्कारी दिसतोय हं.. मोठ्ठा हो. विसरू नकोस आम्हाला,’ पाठीवरून हात फिरवून म्हणतात.
पण खरंच असे नातेवाईक अविस्मरणीय असतात. आता पुढे काय विसरणार यांना..
‘नाही तर हल्ली मुलं बाबांना, अरे बाबा किंवा डॅड, पॉप आणि आईला मॉम म्हणत फिरतात.. अरे जन्मदाते ना तुमचे.. कळतच नाही अरे बाबा म्हणून काय हाक मारता? तू काय हाक मारतोस?’
‘आई-बाबा.’
‘वा फारच गुणी आहेस. शर्ट सुंदर आहे रे तुझा, मगापासून विचारायचं होतं पण तू गप्पा मारण्यात दंग होतास.’
काय मी गप्पा मारत होतो? सीबीआयसमोर हो-नाही करणं आणि एका शब्दात उत्तरं द्या हा प्रकार चालू होता आणि म्हणे मी गप्पा मारत होतो.
‘हो, आवडला का तुम्हाला..’ हेच म्हणावं लागतं.
‘हो. नो डाऊ ट आवडला.. कोणाकडे शिवला? रेडीमेड आहे? इंडियन टेरिन. बरं. आमच्या वेळी अमुक कॉटन, तमुक चॉइस वगैरे नावाजलेले होते. मी दर दिवाळीला टेलर अॅण्ड सन्स या कंपनीचे कापड घायचो. एक मी शिवायचो आणि एक हिच्या भावाला भाऊ बीज. तेव्हा रेडीमेड फार कमी मिळायचे. म्हणजे फिट होतील असे कमी होते. मग शिवायला टाकायचो. तेव्हा तुझ्या सरू आजीच्या घराजवळ टेलर होता तिथे शिवायला टाकायचो आणि तुझ्या आजीकडे चहा प्यायला जायचो.
होकारार्थी मान डोलवत स्मितहास्य करून अच्छा म्हटलं कारण आता विषय संपत नव्हते.
‘निघू मी? बाकीच्यांनाही भेटायचंय..’
‘हो आम्ही कुठे अडवलंय?.. तूच गप्पा मारत बसलास आमच्याशी!!!’
काय? मी गप्पा मारत होतो? मी आमच्या वेळी काय होतं बोलत होतो? असं मनाशीच विचारलं..
‘बरं, ये हं कधी तरी आम्ही वाट बघू..’ आनंदी चेहरा करून म्हणाले.
‘बरं नाव काय म्हणालास?’
म्हणजे इतका वेळ तुम्ही अनोळख्यासारखं बोलत होता?
पण त्या नातेवाईकांना समजून घेण्यापेक्षा ‘म्हातारपण’ समजून घेतलं पाहिजे, पण तेवढंच त्यांनीही समजून घेतलं पाहिजे. कारण या वयात आपण अनुगछन्ती प्रवाह म्हणजे प्रवाहानुसार वाहतो आणि हे कालानुरूप वार्धक्यामुळे प्रवाहातून वाहणं थांबवतात. त्या वयात त्यांना बोलणं आवडतं म्हणून टीकास्त्र आणि ‘आमच्या वेळी अस्सं होतं’ यावर बोलणं टाळलं पाहिजे. बोलण्यात हा फरक न दाखवता इतर संवाद केला तर दोघांनाही बरं ठरेल. मग ते जनरेशन गॅप वगैरे प्रश्न येण्याचं कारण नाही.