हाय विक्की,
after so many days am writting to u… 
मला हे लिहायला किती मज्जा येतेय की as ujjwal I have forgotten u. 
आणि आज एकदम आठवण झाली आणि तुला mail  लिहायला घेतला.
यातल्या नेमक्या कुठल्या वाक्यामुळे तुला आनंद होईल that I kno
मी तुला हा mail का लिहितेय माहितीये.
सध्या am a free bird… मी काहीच करत नाहीये सध्या. नुसती भटकतेय. time pass  करतेय.
मी एक अ‍ॅडमिशन घेतेय.. कसली ते मी तुला ती मिळेपर्यंत सांगणार नाही..
पण त्यामुळे ना smthing has to b happen, bt nt happening असा एक period असतो ना, तसं चाललंय माझं.

in best words incubation periodX. I have heard that हा period is the most imp period. suttle level ला grooming करत असतो आपण या काळात आपलंच. 

तुला कधी आलाय असा अनुभव?
anather thing to share is  मी सध्या four wheeler  शिकते आहे. आता तू या वाक्यावरून तुझे tipycal jokes करण्याआधी जरा थांब. मी four wheeler शिकते आहे, हा share करायचा point नाहीये. ते शिकताना what I feel like is to b noted.
अरे this learning was so dificult for me… पहिले दोन-तीन दिवस वाईटच होते.. पण नंतर थोडं थोडं यायला लागलं आणि I was so happy… म्हणजे मला four wheeler येत नव्हती तोपर्यंत मला वाटत होतं की जगातली सगळ्यात अवघड गोष्ट तीच आहे. so many people can do it and I cant…  म्हणजे I am d most dump person in d world…  आणि आता I can drive… still I am learning bt nw I can njoy fun in it…तर मला असं वाटतंय की, जगातल्या सगळ्याती esiest गोष्ट आहे ही..
पण learning smthing is very very interesting ना..
एखादी गोष्ट आपण first time करणं..
विकी मला त्याच्यावरून काय वाटलं माहितीये.. four wheeler  पहिल्यांदा चालवली तर त्याचा मला एवढा आनंद झाला..
first four wheeler ज्याने बनवली असेल आणि चालवली असेल त्याला किती आनंद झाला असेल ना..
हा point  मी पप्पांशी शेअर करत होते तर ते म्हणाले की, माणसाने बनवलेलं पहिलं instrument म्हणजे wheel..!
एखादी वस्तू  round shape मध्ये असेल, तिला टोकं नसतील तर ती घरंगळत जाईल this was human beings first innovation. I heard this thing and started thinking… superb  ना? त्या एका innovation  वर आजची सगळी automobile industry उभी राहिली रे.. म्हणजे हा चाकाचं innovation  करणारा किती talented असणार ना? 

after that so many things occered in my mind… 
आज आपल्या life मध्ये जे आहे ते सगळं allready  कुणीतरी शोधलेलं आहे. म्हणजे मोठेमोठे शोध तर सोडूनच दे पण लहान लहान innovations… म्हणजे आज जी आपल्याला लहानलहान वाटतात ती.. आपण आज  skyscappers मध्ये राहतो.. पण विकी ज्याला पहिल्यांदा जिन्याचा शोध लागला असेल तो.. त्याला त्या क्षणी किती आनंद झाला असेल.. आणि तो किती jenuine  आनंद.. गुहेत राहण्याऐवजी घर बांधणं हे सुचलं असेल, माणसाने घर बांधलं असेल तो स्वत:च्या घरात राहिला असेल..तो आनंद! u kno…  
मग मला पप्पांनी आणखी मोठी यादी सांगितली.. he said सगळ्यात main was heat… आगीचा शोध, it maid revolution… मग आम्ही यादीच करत बसलो. आपल्या defenceसाठी vepon  बनवायचं समजलं तेव्हा.. धान्य उगवणं, ते पिकवणं, धान्यावर process  करणं समजलं असेल तेव्हा.. ते बारीक करायला जाती वापरायचे पूर्वी. त्या जात्याचा शोध लागला असेल तेव्हा.. आपण दही खातो, पण दुधापासून दही बनवता येतं, हे ज्या वेळी समजलं असेल तेव्हा.. आणि ते कसं समजलं असेल ना? आणि कुणाला? कपडय़ांचा शोध लागला असेल तेव्हा.. किंवा for that matter  आपल्या आयुर्वेदात तर सगळीच औषधं झाडपाल्याची आहेत. मग कुठला झाडपाला कुठल्या आजारावर उपयोगी आहे, कशाने काय बरं होतं, हे कसं शोधलं असेल ना.. आणि त्यासाठी किती trial n error  केली गेली असेल.. बापरे..
आणि सगळ्यात मेन म्हणजे language… cant imagine…
विकी ही सगळी innovations  किती important  आहेत ना आणि ती  hook or crook सापडली असतील तेव्हा नेमकं काय फील झालं असेल रे त्यावेळच्या माणसाला..
त्याला किती आनंद झाला असेल ते Ican imagine!
म्हणून मला काय वाटतं माहितीये.. हसशील तू आय नो.. पण मला वाटतं की ते ते innovation सापडलं ना, त्या वेळी मीपण तिथे असायला पाहिजे होते.. तो jenuine आनंद share करायला u kno..!
किमी