विकी,
तुझा मेल मी वाचला आणि मग मला वाटलं की तिथे मेलमध्ये मार्क अनरीडचा ऑप्शन असतो ना तसं आपल्या मनात पण असायला पाहिजे होतं.
ब्बोअ्अर आहेस रे तू किती..
स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस काय आणि काय काय..
संज्ञाप्रवाह म्हणे.
तुला काहीतरी नवीन कन्सेप्ट समजते आणि मग ती तुला कशाला तरी अ‍ॅड करून दाखवायची असते.
पण म्हणून काहीही? काय तर म्हणे तू एक म्हणतोस आणि अ‍ॅम नॉट अंडरस्टॅण्डिंग दॅट अ‍ॅण्ड सेईंग समथिंग अनादर.
पण मग हा स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस कसा झाला?
हा तर डिफरन्सेस ऑफ ओपिनियन.
म्हणजे फ्रॉम माय साइड तो असा की तुला काहीतरी म्हणायचं असतं तेव्हा मला त्याबद्दल काहीच म्हणायचं नसतं आणि मला काहीतरी म्हणायचं असतं तेव्हा तुला त्याबद्दल काहीच न म्हणता दुसरंच काहीतरी म्हणायचं असतं.
म्हणजे आपण मेल लिहितो ते फक्त आपल्याला काय काय म्हणायचं आहे ते म्हणण्यासाठी!
समजलं?
आणि यासाठी मी तुला बोअर नाही म्हणाले.
ते काय सारखं फॅसिझम, फॅसिझम लावलं आहेस तू अलीकडच्या मेलमधून.
ते काय म्हणतात ना तुम्ही जशा कलरचा गॉगल घालता तसंच दिसतं. तसं झालंय तुझं.
तू असा एक गॉगल घातलेला आहेस. इझम्सचा.
म्हणजे काय म्हणतात भरभक्कम मराठीत.. हां.. विचारसरणी!
तो गॉगल घालून यू आर लुकिंग टूवर्डस् द वर्ल्ड.
बट यू नो विकी, पप्पांना मी तुझ्या मेलने कशी बोअर झाले ते सांगितलं तर ही सेड की हे इझम्स वगैरे सेव्हन्टीजमध्ये ओके होतं.
एटीजनंतर सोशल कंडिशन्स स्टार्टेड चेंजिंग. नाईन्टीजनंतर फ्री इकॉनॉमी आली आणि पीपल स्टार्टेड चेंजिंग.
त्यांनी मला विचारलं की तुला कुठला इझम प्रॉपर वाटतो, तर आय सेड की नन!
आय फील लाइक सगळ्याच इझम्समध्ये समथिंग इज गुड आणि समथिंग इज बॅड.
नन ऑफ इट आय फील लाइक आय बिलाँग.
इट्स राइट की फॅसिझमला कुणीच प्रेज करणार नाही, पण म्हणून सारखं तेच?
पप्पा म्हणाले की या अँगलनेच हा मुलगा सारखं जगाकडे बघायला लागला तर तो आजच्या जमान्यात लौकर आऊटडेटेड होईल.
तुझा फॅसिझमचा रेफरन्स आय नो.
बट विकी माणसं बदलतात. जग बदलतं आणि आपण सेम राहिलो तर काय होईल?
यु नो मला तरी इतर कशापेक्षाही ह्य़ुमॅनेटेरियन असणं हेच जास्त इम्पॉर्टन्ट वाटतं.
अ‍ॅण्ड हाऊ वन शूड काऊन्ट वन्स ह्य़ुमॅनिटी?
इट्स कन्फ्युझिंग.
यु नो माझी ग्रॅनी, म्हणजे पप्पांची मम्मी.. शी वॉज फ्रॉम ओल्ड डेज.
कुणीही घरी आलं की शी वॉन्ट्स टू नो हीज कास्ट अ‍ॅन्ड ऑल दॅट.
पप्पा म्हणाले की इतकं अ‍ॅम्बरसिंग व्हायचं तिचं वागणं, पण त्यांनी तिचा दुसरा अँगलही सांगितला अ‍ॅन्ड आय वॉज कन्फ्युज्ड टु कम टु द कनक्लुजन.
पप्पा म्हणाले, ग्रॅनी रोज मॉर्निंग वॉकला जायची, संध्याकाळी खाली जायची. तर सोसायटीचा वॉचमन डे बिफोर आलाय आणि त्याला रिलिव्ह करायला कुणी आलं नाही हे तिच्या लक्षात यायचं. तो दिवसभर जेवला नसेल म्हणून डिस्टर्ब व्हायची.
सो शी युज टू कॉल हिम होम आणि त्याला ताट वाढून द्यायची. तिला त्याची जात-पात सगळं माहीत असायचं. त्याच्याकडून स्वच्छ धुतलेलं ताट परत आल्यावर परत ते धुवून घ्यायची, पण तो जीव उपाशी असेल म्हणून कळवळायची.
पप्पा म्हणाले, आज मी कास्टीझम मानत नाही, कुणाला कमी लेखत नाही, पण आपल्या बिल्डिंगची रखवाली करणारा उपाशी असेल म्हणून कळवळत नाही. त्याला पगार मिळतो, तो बघून घेईल अस म्हणतो.
मग इथे कुणाच्या फिलिंग्ज राईट आणि कुणाच्या राँग?
आय जस्ट वॉन्ट टू से की तू फक्त ब्लॅक आणि व्हाईट शेडमध्ये बघतोस, पण माय डियर फ्रेंड देअर इज ग्रे एरिया ऑलसो..
आता तो दर वेळी दर ठिकाणी कसा असेल ते कसं सांगता येईल?
त्यामुळे सारखं फॅसिझम.. फॅसिझम करत बसू नको.
डॅनियल बेलचं एन्ड ऑफ आयडॉलॉजी वाच असा पप्पांचा निरोप आहे. वाचलं असशीलच तू.. नसेल तर वाच!
विकी माझा दुसरा पॉइन्ट स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेसचा आहे.
यु नो, समटाईम्स पीपल यूज टू स्टे इन सेम प्लेस व्हेअर देअर फोरफादर्स यूज टू स्टे. त्यांचं गाव, प्रोफेशन, घर काही बदलायचं नाही, सेम असायचं पिढय़ान्पिढय़ा. तेव्हा मनातला स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस वॉज नोटिसेबली अंडरलायनिंग. पण आता सगळेच किती फ्रॅग्मेन्टेड लाईफ जगतात रे. आजचा जॉब उद्या नाही, उद्याचं गाव परवा नाही, घरसुद्धा कमॉडिटी झालंय आजकाल. म्हणजे आता आपली थॉट प्रोसेसच नाही तर आपलं जगणंच स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस झालंय असं मला वाटतं.
तुझं काय मत आहे?
किमी