News Flash

आवाहन : कलाजाणीव

गेल्या वर्षी ‘चित्र’ या सदरात आपण भारतीय चित्रेतिहासातील जुन्या पिढीतील कलावंतांची चित्रे पाहिली व त्यांची वैशिष्टय़ेही समजून घेतली.

| January 2, 2015 01:03 am

गेल्या वर्षी ‘चित्र’ या सदरात आपण भारतीय चित्रेतिहासातील जुन्या पिढीतील कलावंतांची चित्रे पाहिली व त्यांची वैशिष्टय़ेही समजून घेतली. २०१५ या नव्या वर्षांत आता आपण तरुण असलेल्या, समकालीन कलावंतांकडे वळतो आहोत. त्यांची चित्रं-शिल्पं, मांडणीशिल्प असे अनोखे प्रकार तुम्हाला इथे पाहता येतील. त्याचबरोबर छायाचित्रणात अनोखे प्रयोग करणाऱ्या नव्या पिढीतील छायाचित्रकारांनादेखील ‘कलाजाणीव’मध्ये विशेष स्थान असणार आहे. तरी तरुण समकालीन चित्रकार आणि छायाचित्रकारांनी आपल्या कलाकृती माहितीसह पाठवाव्या.

रेसिपी पाठवा
10उत्तमोत्तम आणि नवनवीन खाद्यपदार्थ खायला आणि करायला कुणाला आवडत नाही? किंबहुना खाणे आणि खिलवणे हा माणसाचा गुणधर्मच आहे. अगदी पुराणकाळापासून ते आजपर्यंत आपल्याकडे खाद्यसंस्कृतीचे वर्णन आढळते. आपणदेखील आपल्या आवडीनुसार वेगवेगळे प्रयोग करत असतो. म्हणूनच तुमची वेगळी डिश जगासोबत शेअर करण्याची एक अनोखी संधी ‘लोकप्रभा’ उपलब्ध करुन देत आहे. चला तर मग तुमची आगळीवेगळी रेसिपी आम्हाला पाठवून द्या.. सोबत रेसिपीचा फोटोही पाठवायला विसरू नका.

कथा
‘एक होती चिमणी आणि एक होता कावळा.. एकदा काय झालं..’ आपल्या आयुष्यात चिऊ-काऊचा घास खाताना गोष्ट येते ती अशी. आणि मग आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर ती आपली सोबत करत राहते. तुमच्याकडे आहे का अशी तुम्ही लिहिलेली नवीन कोरी गोष्ट? आमच्याकडे जरूर पाठवा.

ब्लॉगर्स कट्टा
‘दिसामाजी काहीतरी लिहावे’ या रामदासांच्या उक्तीचे तुम्ही समर्थक आहात? स्वत:चा ब्लॉग लिहिता? मग ‘लोकप्रभा’च्या ब्लॉगर्स कट्टय़ासाठी तुमचे लेखन पाठवा. विषयाची मर्यादा नाही.

ट्रेकर ब्लॉगर
सह्य़ाद्रीच्या डोंगररांगा, हिमालयातली पर्वतराजी, दऱ्याखोऱ्यांमधला भन्नाट वारा अंगावर घेत, निसर्गाचं आव्हान पेलायला तुम्हाला आवडतं? तुमच्या या अनुभवाला लिखाणाचं कोंदणही लाभलं आहे? मग तुम्हीच व्हा ‘लोकप्रभा’चे ट्रेकर ब्लॉगर. सोबत या ट्रेकिंगचे सुंदर फोटोही अवश्य पाठवावेत.

ट्रॅव्हलॉग
भटकंती करायला तुम्हाला आवडतं? देशात, राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी जायला, नवनवे अनुभव घ्यायला तुम्हाला आवडतं? मग तुमचे प्रवासाचे भन्नाट अनुभव ‘लोकप्रभा’बरोबरही शेअर करा.. भन्नाट भटकंती या सदरात. सोबत या भटकंतीचे सुंदर फोटोही अवश्य पाठवावेत.

z03नवनव्या दिशा, नवनवे विषय, नवनवे मार्ग तरुणाईला साद घालत असतात. तरुणांचं चैतन्यच जग बदलायला हातभार लावत असतं. आम्हाला प्रतीक्षा आहे अशा उत्स्फूर्त, उत्फुल्ल तरुणाईची. तरुणांच्या वेगवेगळ्या अ‍ॅक्टिव्हिटीज, तरुणांचं लिखाण या सगळ्याचं ‘लोकप्रभा’ स्वागत करत आहे..
अट एकच. तुम्ही तरुण असायला हवे.
लेख पाठवताना सोबत कॉलेजच्या आयकार्डची झेरॉक्स किंवा स्कॅन कॉपी सोबत जोडायला विसरू नका.

तुमचे लिखाण हजार ते बाराशे शब्दांपर्यंत असावे. ते अप्रकाशित असावे. ते सुवाच्य अक्षरात, पानाच्या एकाच बाजूवर, व्यवस्थित समास सोडून लिहिलेले असावे. टाइप केलेले असल्यास आमच्या ई मेलवर पीडीएफ तसंच डॉक फाइल या स्वरूपात स्वत:च्या फोटोसह पाठवावे.

आमचा पत्ता
संपादकीय विभाग पत्रव्यवहार :
लोकप्रभा, प्लॉट नं. ईएल-१३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया,
महापे, नवी मुंबई-४००७१०.
फॅक्स : २७६३३००८
ई-मेल : response.lokprabha@expressindia.com
lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2015 1:03 am

Web Title: lokprabha readers writers
Next Stories
1 वाचक प्रतिसाद :दत्तविशेषांक आवडला
2 कलाजाणीव
3 स्मार्ट ‘ती’-नवलाईला कोंदण जुन्याचे..
Just Now!
X