01dattaदत्तात्रेय उपनिषदाची सुरुवात दत्तात्रेय हा विष्णूचा अवतार आहे, असे सांगून होते, तर शेवट ‘ॐ नम: शिवाय:’ या शिवाच्या प्रार्थनेने होते. नाथपंथीय दत्तात्रेयाला शिवाचा अवतार मानतात.

मध्ययुगीन काळातील हरिहर भक्तीचा हा पंथ आहे. विष्णू आणि शिव या दोन देवतांचा व वैष्णव आणि शैव पंथांचा समन्वय करण्याचे काम या पंथाने केले. भक्ती आणि योग यांचाही समन्वय या पंथाने केला.

ram navami, shobha yatra, akola, vishwa hindu parishad, ram navami in akola, ram navami shobha yatra, ram navami vishwa hindu parishad, marathi news, ram navami news, akola news,
अकोला : रामनवमीनिमित्त राजराजेश्वरनगरी भगवामय; शोभायात्रेची ३८ वर्षांची परंपरा
Ambabai Devis darshan will be restored from Tuesday conservation process of the idol is complete
अंबाबाईचे मंगळवारपासून दर्शन होणार पूर्ववत; मूर्तीची संवर्धन प्रक्रिया पूर्ण
hanuman jayanti 2024 date time shubh muhurat puja mantra and signification
Hanuman Jayanti 2024: २३ की २४ एप्रिल, यंदा हनुमान जयंती कधी आहे? जाणून घ्या योग्य तिथी, पूजेचा मुहूर्त, मंत्र आणि महत्त्व
Rajyog Lakshmi Narayan Rajyoga
मे महिन्यात निर्माण होईल लक्ष्मी नारायण राजयोग! या तीन राशींचा सुरु होईल सुवर्णकाळ, मिळेल बक्कळ पैसा

हा पंथ भारतभर कधीच पसरला नाही. तो नर्मदेच्या दक्षिणेला असलेल्या महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र आणि गुजरात या राज्यांतच प्रामुख्याने आहे, पण वैदिक धर्म, तंत्र, योग आणि भक्ती यांचा समन्वय असलेल्या या संप्रदायाला मध्ययुगीन धर्मसंकल्पनांच्या विकासप्रक्रियेत किंवा उत्क्रांतप्रक्रियेत महत्त्वाचे स्थान आहे.

वैदिक दत्तात्रेय

दत्तात्रेय हा आद्य देवतांपैकी एक आहे. त्याचा उल्लेख वेदात आहे. रामायण-महाभारत या दोन महाकाव्यांतपण त्याचा उल्लेख आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रीकरण करून दत्तात्रेयाचे दैवत झाले असल्याचे समजले जाते. त्रिमूर्ती कल्पनेचे ते आद्य प्रतीक आहे. दत्तात्रेय हा विष्णूचा सहावा (कदाचित चौथा किंवा सातवा) अवतार समजला जातो. दत्तात्रेय उपनिषदाची सुरुवात दत्तात्रेय हा विष्णूचा अवतार आहे, असे सांगून होते, तर शेवट ‘ॐ नम: शिवाय:’ या शिवाच्या प्रार्थनेने होते. नाथपंथीय दत्तात्रेयाला शिवाचा अवतार मानतात.

दत्तात्रेय हा अत्री ऋषी आणि अनसूया यांचा पुत्र असून, त्यांनी आदिनाथांकडून दीक्षा घेतल्याचे नाथपंथ सांगतो, तर भागवत पुराणात त्याला २४ गुरू असल्याचे सांगितले आहे. त्यांच्या शिष्यांत सहस्रार्जुन कार्तवीर्य, भगवान परशुराम, यदु, आलार्क, आयु आणि प्रल्हाद असल्याची नोंद भागवत पुराणात आहे, तर परंपरेप्रमाणे नवनाथ सार या धुंडिसुत मालू या कवीने लिहिलेल्या ग्रंथात दत्तात्रेयाने मत्स्येंद्रनाथांना व इतर नाथांना दीक्षा दिल्याचे सांगितले आहे. श्रीगुरू दत्तात्रेय आणि भगवान शंकर यांच्या कृपाप्रसादाने व प्रेरणेने मच्छिंद्रापासून नाथ संप्रदायाचा प्रारंभ झाला. ऋषभदेव हा विष्णूचा कृष्णासमान अंश होता (? जैनांचे ऋषभदेव) त्याच्या शंभर पुत्रांपैकी नऊ जण हे वैराग्यसंपन्न, तेजस्वी, ज्ञानी व परमहंस स्थितीला पोहोचलेले होते. या आर्षभांची (ऋषभपुत्रांची) नावे कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, आविहरेत्र, द्रुमिल, चमक व करभाजन अशी होती. कलियुगात भगवान श्रीकृष्णाच्या आज्ञेने त्यांनी पुन्हा अवतार घेतले. या वेळी ते अनुक्रमे मच्छिंद्र, गोरख, जालंदर, कानीफ, चर्पटी, वटसिद्ध नागनाथ, भर्तरी, रेवण व गहिनी असे नवनाथ झाले. वैष्णव नवनारायणाचे रूपांतर शैव नवनाथात झाले.

इस्लाम प्रभावामुळे समाज सुन्न झाला होता. या नवीन संकटाला प्रतिक्रिया कशी द्यावी, हे त्याला समजत नव्हते. त्या पाश्र्वभूमीवर नृसिंह सरस्वती यांचे कार्य पाहिले पाहिजे.

भागवतात नवनारायणाची कल्पना आहे. नारायणाचा अंश असलेले व नारायणाप्रमाणे कार्य करणारे म्हणून त्यांना नवनारायण म्हणतात.

तांत्रिक दत्तात्रेय

वेद-पुराणानंतर मध्ययुगीन काळात तंत्रानेही हे दैवत स्वीकारल्याचे दिसते. दत्तात्रेय हा औदुंबर वृक्षाखाली यज्ञकुंडासमोर गळ्यात रुद्राक्षमाळा, अंगावर भस्माचे पट्टे, समोर चार कुत्री, दाढी वाढलेल्या नग्न अवस्थेत ध्यानस्थ बसलेला दिसतो. त्याचे चार कुत्री हे वेद मानले जातात. रुद्राक्ष, अंगावर भस्म यांवरून तो तंत्रातील स्मशानात राहणाऱ्या शिवाचे ध्यान करत असल्याचे दिसते. त्याची जटाजूट आणि नग्न अवस्था ही त्याने जगाशी संबंध तोडल्याचे द्योतक आहे. त्याच्या समोरील अग्निकुंड हे तंत्रातील अग्नीचे महत्त्व अधोरेखित करणारे आहे. त्याच्याबरोबर असलेली गाय हे संप्रदायावरील वैदिक परिणाम दर्शविते. एकंदर हे चित्र समाजात निषिद्ध मानलेल्या कृती करणाऱ्या तंत्रातील योग्याचे आहे.

तंत्रात दत्तात्रेयांना गुरूचा गुरू मानले आहे. सातव्या शतकात लिहिल्या गेलेल्या मरकडेय पुराणात सतराव्या-अठराव्या अध्यायात तांत्रिक दत्ताची आपली गाठ पडते. त्यातील दोन गोष्टी तंत्राचा प्रभाव लक्षात येण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत.

१. एका सरोवराकाठी आपल्या शिष्यांची नजर चुकवून आणि सर्व बंध तोडून सरोवराच्या तळाशी मुनी दत्तात्रेय जातात. त्यांचे शिष्य काठावर त्यांची वाट पाहात बसतात. मुनी वर येतात, तेव्हा ते मद्यधुंद अवस्थेत एका सुंदर स्त्रीसमवेत वीणा वाजवत असलेले दिसतात. शिष्यांना आश्चर्य वाटत नाही. कारण तंत्रातील बंधनाच्या पलीकडे गेलेल्या तांत्रिकांची त्यांना माहिती असते.

२. सहस्रार्जुन कार्तवीर्य अर्जुनाला त्याचे गुरू गर्ग दत्तात्रेयाची उपासना करण्यास सांगतात आणि दत्तात्रेयाची महती सांगतात. देव-दानवांच्या भांडणात देव पराभवाच्या छायेत येतात आणि ते ब्रह्मदेवाकडे मार्गदर्शनासाठी जातात. ब्रह्मदेव त्यांना दत्तात्रेयांकडे पाठवतात. देव दत्तात्रेयाकडे येतात, तर दत्तात्रेय मद्यधुंद अवस्थेत स्त्रीसमवेत गाणे ऐकत असताना दिसतात. असे हे दैवत शत्रूचा कसा बरे नाश करू शकेल, असे देवांना वाटले आणि त्यांनी हा प्रश्न ब्रह्मदेवाला विचारला. तेव्हा ब्रह्मदेवांनी ही स्त्री लक्ष्मी आहे आणि दत्तात्रेय आपल्या नेत्रकटाक्षाने शत्रूचा नि:पात करतील, असे सांगितले आणि पुढे झालेही तसेच.

असे अनैतिक आणि समाजनिषिद्ध व्यवहार करणाऱ्या देवतेबद्दल सांगण्याचा उद्देश उघडच तंत्राचे समर्थन करण्याचा आहे. वामाचार हा फक्त दिव्य साधकांसाठी असतो. दिव्य साधक हा जीवनमुक्त असतो. तो चांगले-वाईट, भले-बुरे, ज्ञान-अज्ञान इत्यादी द्वैतांच्या पलीकडे गेलेला असतो. जे कर्म पशू किंवा वीर साधकांकरता बाधक होऊ शकते, ते दिव्य साधकाकरता बाधक ठरत नाही, हेच दाखवावयाचा उद्देश त्यात असावा.

हा तांत्रिक दत्तपंथ सातव्या-आठव्या शतकातला असावा. यातील दत्तात्रेय हा वेदात असलेल्या दत्तात्रेयाप्रमाणे मिथॉलॉजिकल नसावा. तो ऐतिहासिक असण्याची शक्यता आहेत. त्याच्यासंबंधी आपण पुढे पाहणारच आहोत.

तंत्रात दत्ताला अत्रीचा पुत्र न मानता अत्री गात्रोतील व्यक्ती मानलेले आहे. पुराणातील अर्जुन कार्तवीर्य, परशुराम यांच्याशी मिथकांच्या साहाय्याने जोड घालण्यात आली आहे. ‘त्रिपुरारहस्य’ नावाने एक गं्रथ दत्तात्रेयांशी संबंधित आहे. ‘दत्तसंहिता’ किंवा ‘दक्षिणामूर्ती संहिते’चा हा भाग असावा आणि हा दत्तात्रेयांनी लिहिला असावा. परशुरामाने त्रिपुरारहस्य नावाने त्याचे संक्षिप्त रूप केले असावे. दत्तात्रेयाने परशुरामाला निरनिराळ्या कथांद्वारे अद्वैत तत्त्वज्ञान सांगितले आहे. मंत्र, यंत्र इत्यादींची माहिती त्यात आहे. ‘त्रिपुरापद्धती’ हा आणखी एक ग्रंथ दत्तात्रेयांच्या नावाने आहे.

तंत्रातील दत्त हा एकमुखी दत्त आहे. दत्ताची मंदिरे आजही भुताखेतादीपासून त्रस्त झालेल्यांसाठी व आजारापासून मुक्त होण्यासाठी वापरली जातात. उदा. गाणगापूर. हा तंत्राचाच परिणाम दिसतो.

योगिक दत्तात्रेय

यानंतर दत्तपंथातील उत्क्रांतीचा टप्पा हा योगी दत्तात्रेयाचा. गोरखनाथांनी अकराव्या शतकात आपला संप्रदाय स्थापन केला आणि त्यात अवधूत हे नाव जीवनमुक्त पुरुषाला दिले. अवधूत ही दत्तपंथातील शब्दावली गोरखपंथाने उचललेली दिसते. दत्तात्रेय या गुरूचा गुरू मानून दत्तात्रेयाला महायोगी ठरविलेले आहे. ‘अवधूत गीता’ हा गोरखनाथ पंथाचा महत्त्वाचा ग्रंथ दत्तात्रेयाशी संबंधित आहे. जीवनमुक्त स्थितीचे- अवधूत स्थितीचे- सविस्तर विवेचन त्यात आहे. हा दत्तात्रेयाच्या शिष्यांपैकी कोणी लिहिला असावा.

नाथपंथातून भक्तिपंथात दत्त या देवतेचा प्रवेश बाराव्या शतकात झालेला दिसतो. महानुभवाच्या पंचकृष्णात दत्तात्रेयाचा समावेश आहे. मूळ विष्णूचे रूप असलेला दत्तात्रेय नाथपंथात शिव झाला; पण त्यानंतर मात्र तो हरि-हर स्वरूपात भक्तिपंथात आल्याचे दिसते. बाराव्या-तेराव्या शतकात निर्माण झालेले पंथ हे हरिहर समन्वयाचे दिसतात. नाथपंथातील गहिनीनाथांनी कृष्णभक्तीची दीक्षा निवृत्तिनाथ-ज्ञानदेव यांनी दिली.

श्रीपाद वल्लभ, नृसिंह सरस्वती व गुरुपरंपरा

ज्ञानेश्वर-नामदेवांनंतर एकनाथांपर्यंत म्हणजे १३ व्या शतकाच्या उत्तरार्धापासून ते सोळाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत जवळजवळ २००-२५० वर्षे कोणीही मराठी संत झालेला दिसत नाही. नामदेवांचा मृत्यू इ.स. १३५० साली झाला. त्यानंतर एकनाथांपर्यंत म्हणजे इ.स. १५५० पर्यंत म्हणजे जवळजवळ दोन शतके महाराष्ट्रात नृसिंह सरस्वतींशिवाय एकही संत झाला नाही. इस्लाम प्रभावामुळे समाज सुन्न झाला होता. या नवीन संकटाला प्रतिक्रिया कशी द्यावी, हे त्याला समजत नव्हते. त्या पाश्र्वभूमीवर नृसिंह सरस्वती यांचे कार्य पाहिले पाहिजे. श्रीपाद वल्लभ व त्यांचे शिष्य नृसिंह सरस्वती या दोन महान व्यक्तींनी केलेले कार्य म्हणूनच अद्वितीय म्हणावे लागेल. नृसिंह सरस्वती हे इ. स. १३७८ साली जन्मले व त्यांचा मृत्यू इ.स. १४५८ साली झाला.

स्वधर्म आणि स्वसंस्कृती संकटग्रस्त असताना त्यांची जोपासना करण्याचे कार्य दत्त संप्रदायाने केले. दत्त संप्रदाय हा सगुणोपासक राहिला. एकमुखी दत्त आणि त्रिमुखी दत्त अशा दोन रूपांत त्याची पूजा केली जाते. श्रीपाद वल्लभ व नृसिंह सरस्वती या दोघांनी दत्तपंथाची पुनस्र्थापना केली असे म्हणावयास हरकत नाही. यांचा मार्ग नाथपंथाप्रमाणे योगप्रधान होता; पण वर्णाश्रमधर्म मानणारा होता. नाथ संप्रदायात जे जातिव्यवस्था न मानण्याचे धोरण होते, त्याच्या विपरीत कदाचित त्याची प्रतिक्रिया म्हणून असेल हा संप्रदाय अधिक कर्मठतेकडे वळला. स्त्रियांच्या बाबतीतही तो अनुदार राहिला. आचारधर्मावर व अनुष्ठानावर त्यांचा अतिरिक्त भर होता. कदाचित तत्कालीन मुसलमानांच्या प्रभावापासून आपल्या धर्माचे रक्षण करावे म्हणून अशी मूलतत्त्ववादी भूमिका त्यांनी घेतली असावी. हे दोघेही महापुरुष दत्ताचे अवतार समजले जातात आणि त्याच्यातूनच त्यांच्याविषयी भक्तिभावना बाळगणारा भक्तिमार्गी दत्त संप्रदाय सुरू झाला. सरस्वती गंगाधर नावाच्या त्यांच्या शिष्याने ‘गुरुचरित्र’ नावाचा ग्रंथ लिहिला. ‘सरस्वती गंगाधर विरचित गुरुचरित्र’ नावाचा हा ग्रंथ या पंथाचा प्रमाणग्रंथ ठरला म्हणूनच याला गुरुचरित्र परंपरा म्हणतात. त्यात त्यांच्या चरित्राशिवाय तत्कालीन राजकीय आणि सामाजिक परिस्थितीची माहिती मिळते. गाणगापूर आणि नरसोबाची वाडी ही क्षेत्रे दत्त संप्रदायाकरिता श्रद्धेची बनली. महाराष्ट्रात, कर्नाटकात आणि आंध्रात दत्त संप्रदायाचा प्रभाव वाढला व त्याच्या अनेक परंपरापण निर्माण झाल्या. त्यांच्या सविस्तर विवेचनात जाण्याचे कारण नाही. जिज्ञासूंनी डॉ. रा.चिं. ढेरे यांचे तत्संबंधातील लेखन पाहावे.

श्रीपाद वल्लभ व नृसिंह सरस्वती या दोघांनी दत्तपंथाची पुनस्र्थापना केली असे म्हणावयास हरकत नाही. यांचा मार्ग नाथपंथाप्रमाणे योगप्रधान होता; पण वर्णाश्रमधर्म मानणारा होता.

बाराव्या शतकात वर्णाश्रम मानणाऱ्या कर्मठांचा एक व अब्राह्मण लोकायतिक धर्माचा वर्णाश्रमधर्म न मानणारा असे दोन तट पडले. कर्नाटकात वडगलई आणि तेनगलई अशी त्यांची नावे पडली. पुढे दक्षिणेत मुस्लीम धर्माचा प्रसार झाल्यानंतर हिंदू धर्म संरक्षणासाठी दोघांनीही कंबर कसली. भक्तिमार्गी दत्तपंथातही दोन तट पडले असावेत. पहिला वर्णाश्रमधर्म, आचारधर्म न मानणारा हा महानुभाव पंथाकडे वळला, तर दुसरा कर्मठ वर्णाश्रमधर्म मानणारा, आचारधर्म पाळणारा आणि परंपरेचे पालन करणारा पंथ नृसिंह सरस्वती यांनी स्थापन केलेला दत्त पंथाच्या रूपाने स्थिरावला. स्त्रियांसंबंधातही या दोन्ही गटांची दृष्टी भिन्न होती.

इस्लाम आणि दत्तपंथ

तेराव्या शतकानंतर दक्षिणेत इस्लामने आपले पाय रोवले. समाजातील कनिष्ठ वर्गीयांना- नाथ सांप्रदायिकांना इस्लाम धर्म जवळचा वाटणे स्वाभाविक होते. त्यात राजाश्रयामुळे इस्लामचा प्रभाव वाढत होता. सुफी पंथाचाही प्रसार होत होता. त्यामुळे इस्लाम धर्म स्वीकारलेल्या कनिष्ठ वर्गातील काहींनी दत्तात्रये पंथाला इस्लामी रूप दिले. मलंग, पीर स्वरूपात त्याला पाहिले जाऊ लागले. मुस्लिमांत या देवतेचा निर्देश शहा फकीर म्हणून होतो. भक्तांसाठी दत्तप्रभू मलंग वेश धारण करतात, अशी धारणा होती. हा प्रभाव एकनाथांच्या काळापर्यंत दिसून येतो. चांद बोधले परंपरा आपल्याला माहीत आहेच. भूतखेतादीपासून सुटका करून घेण्यासाठी तांत्रिक दत्ताची ठाणी जशी विकसित झाली, तशीच मलंग-पीर यांचीही ठाणी विकसित झाली. शिवाय इस्लामशी तडजोड म्हणूनही सकलमत संप्रदाय नावाची माणिकप्रभू यांची समन्वयवादी परंपरा निर्माण झाली.

ऐतिहासिक दत्तात्रेय

तंत्रातील दत्तात्रेय ऐतिहासिक असण्याची शक्यता मी वर व्यक्त केली आहेच. खालील मिथकांकडे आणि ऐतिहासिक घटनांकडे आपण लक्ष दिल्यास त्यातून सलग इतिहास उलगडू शकेल.

१. अभिनवगुप्त (दहावे शतक- इ.स. ९६०-१०२०) हा अगस्त्य गोत्राचे अत्रिगुप्त आपले पूर्वज असल्याचे सांगतो. मध्य प्रदेश किंवा अंतर्वेदी (उत्तर प्रदेश) मधून कनौज राजाकडे राजाश्रयाकरिता तो आल्याचे लिहितो. आठव्या शतकाच्या मध्यात हे स्थलांतर झाले असावे.

२. अत्रिगुप्त व त्याची पत्नी अनसूया यांना दत्तात्रेय, दुर्वास आणि चंद्र अशी तीन मुले झाली, असे परंपरा मानते.

३. शिवाने श्रीकंठरूपाने दुर्वासाला आगमांचे पुनरुज्जीवन आणि प्रसार करण्यास सांगितले. त्याने द्वैत, अद्वैत आणि द्वैताद्वैत असे वर्गीकरण करून त्यांची पीठे स्थापन केली असे एक मिथक आहे.

४) गोरखनाथाने अकराव्या शतकात अनेक शैव, शाक्त, वैदिक, अवैदिक धर्मपंथांना एकत्र केले व नाथपंथाची स्थापना केली.

५) धुंडिसुत मालू याने लिहिलेला ‘नवनाथ सार’ हा प्रमाणग्रंथ नसला तरी परंपरा विवेचन करणारा ग्रंथ आहे. दत्तात्रेयाच्या व भगवान शिवाच्या प्रेरणेने मच्छिंद्रनाथांनी नाथपंथाची सुरुवात केल्याचे तो सांगतो. मच्छिंद्राला तसेच सर्व नाथांना दत्तात्रेयाने दीक्षा दिल्याचे सांगतो. यातून दत्तपंथ आणि नाथपंथ यांच्यातील जैविक संबंध लक्षात येतो.

वरील ऐतिहासिक घटनांचा व मिथकांचा विचार केला, तर खालील इतिहास आपल्या लक्षात येतो. अत्रिगुप्ताला दत्तात्रेय, दुर्वास व चंद्र अशी तीन मुले होती. ८ व्या शतकाच्या मध्यापासून ते नवव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत हा दत्तात्रेयाचा काळ असावा. सर्व कुटुंब आगमप्रणीत तंत्रमार्गी होते. त्यामुळे दुर्वासाने आगमांच्या वर्गीकरणाचे काम केले, तर दत्तात्रेयाने आपला संप्रदाय सुरू केला असावा. अर्थातच, तो तंत्रमार्गी असावा. त्याच्यानंतरही संप्रदाय चालला असावा. त्यांच्यावर काश्मिरी शैवपंथाचा व तंत्राचा परिणाम होता. अभिनवगुप्तही काश्मिरी शैवपंथी व तांत्रिक होते. दत्तात्रेयाचा वामाचारी पंथ गोरखनाथाच्या काळात नाथपंथात विलीन झाला असावा. त्याची ओळख कायम ठेवण्यासाठी नाथपंथाने शिवाला अघोर हे नाव व पंथाला अवधूतपंथ हे नाव दिले असावे.

एकूणच दत्त संप्रदाय हा समन्वयाचे द्योतक दिसतो. वैदिक आणि तांत्रिक याचा समन्वय, कर्म, योग व भक्ती या तिन्ही मार्गाचा समन्वय, यात दिसतो. तंत्राप्रमाणे व पुढे चालू राहिलेल्या गुरुपरंपरेला या पंथात अपरंपार महत्त्व आहे. हिंदू-मुस्लीम यांच्या समन्वयाची भूमिकाही काहींनी घेतली. शैव व वैष्णव या दोन्ही पंथांचा समन्वय दत्तपंथात दिसतो. संगीत प्रसाराचे मोठे कार्य या पंथाने केले आहे. गुरुपरंपरेचे महत्त्व या संप्रदायामुळेच नाथपंथात आणि त्यातून भक्तिपंथात आले आहे. अंधश्रद्धा आणि चमत्कार, भूतखेतांवर विश्वास, मंत्र-तंत्रावरचा विश्वास या गोष्टी तंत्राचा पंथावर असलेला प्रभाव दाखवतात.

परशुराम-रेणुका संप्रदायाचा दत्तात्रेय संप्रदायाशी संबंध जोडला जातो. जमदग्नी आणि रेणुकापुत्र परशुराम यांनी गुरू दत्तात्रेयांकडे दीक्षा घेतली होती, असे गोपीनाथ कवीराज त्रिपुरारहस्याचा हवाला देऊन सांगतात. या दोन्ही संप्रदायांचे तीर्थक्षेत्र माहूर आहे हे आपणास माहीत आहेच. तसेच ‘ज्ञानदीप बंध’ या ग्रंथाद्वारे मध्ययुगात दत्तात्रेय आणि गोरखनाथ दोघेही एकमेकांबद्दल आदर बाळगून होते, असेही ते सांगतात. दत्तात्रेय कोणी अमानवी मिथक न मानता ती एक ऐतिहासिक व्यक्ती असावी या म्हणण्याला पुष्टीच मिळते.

दसनामी नागांचे ६ मुख्य आखाडे हे शैवपंथाचे आखाडे असून ते सर्वात जुने समजले जातात. त्यातील जुना आखाडा म्हणून ओळखला जाणारा आखाडा हा भैरव आखाडा म्हणूनही ओळखला जातो. या आखाडय़ाची देवता पूर्वी भैरव असावी त्यावरूनच हे नाव पडले असावे. आज मात्र दत्तात्रेय ही या आखडय़ाची प्रमुख देवता आहे. या आखाडय़ाची सुरुवात इ.स. ११४६ ला झाली असावी असे मानले जात असले तरी ती त्या आधी कापालिकांपासून सुरू झाली असावी असे घुर्ये मानतात. (लोरेन्झन) यावरून असे वाटते की, कापालिकांपैकी दत्तात्रेय ही ऐतिहासिक व्यक्ती या आखाडय़ाची प्रमुख झाली असावी.

(‘मध्ययुगीन धर्मसंकल्पनांचा विकास : तंत्र, योग आणि भक्ती’ या पद्मगंधा प्रकाशनाच्या पुस्तकातील संपादीत अंश)