News Flash

जर आणि तर

एकाच शब्दाच्या वेगवेगळ्या अर्थच्छटा शोधण्यासाठी आम्ही शब्दार्थाच्या भेंडय़ा खेळायला सुरूवात केली आणि मराठी भाषेचा मोठा खजिनाच पद्मजासमोर खुला केला.

| September 19, 2014 01:12 am

एकाच शब्दाच्या वेगवेगळ्या अर्थच्छटा शोधण्यासाठी आम्ही शब्दार्थाच्या भेंडय़ा खेळायला सुरूवात केली आणि मराठी भाषेचा मोठा खजिनाच पद्मजासमोर खुला केला.

आज भेंडय़ा खेळण्याचा आमचा चौथा दिवस होता. आज शनिवार असल्याने खूप वेळ भेंडय़ा खेळायचे असे मुलांनी व पद्मजाने ठरविले होते. तसेच भेंडय़ा खेळता खेळता खादाडीचे पण बेत आधीच ठरले होते. सवयीप्रमाणे दोन टीम्स पाडून आम्ही सुरुवात केली.
पहिला शब्द आला माग. मी म्हटले माग काढणे म्हणजे शोध घेणे. त्यावर नूपुर म्हणाली, आम्हाला भूगोलाच्या पुस्तकामध्ये महाराष्ट्रातील लोकांचे परंपरागत व्यवसाय या धडय़ात यंत्रमाग व हातमाग हे शब्द आले आहेत. यंत्रमाग म्हणजे पॉवर लूम व हातमाग म्हणजे हॅण्डलूम (hand loom) असे तिनेच पद्मजाला लिहून दिले.
दुसरी चिठ्ठी आली त्यात शब्द निघाला धावा. त्यावर सौमित्र म्हणाला, धावा करणे म्हणजे क्रिकेटमध्ये रन बनविणे त्यावर स्नेहा आजी म्हणाली, धावा करणे म्हणजे परमेश्वराला मदतीसाठी बोलाविणे.
एवढय़ात टीव्हीवर बातमी झळकली की लायनीवर आकडा टाकायचा आणि त्यावरून वीज घ्यायची ही आपली खानदानी परंपरा असेच गावकरी समजत असल्याने वीज मंडळाला खूप तोटा होत आहे व हे जर भविष्यात थांबले नाही तर भारनियमन व वीज दरवाढ करण्याशिवाय गत्यंतर उरणार नाही. हे ऐकून मी पद्मजाला म्हणालो की आकडा म्हणजे हुक. यावर माझी सौ म्हणाली की मराठीमध्ये नंबरला पण आकडाच म्हणतात.
टीव्हीवर त्यानंतर दुसरी बातमी होती की, मद्यपान करून गाडी चालविण्याबद्दल असलेला दंड आता पाचपट होणार. हे ऐकून सौमित्र म्हणाला, ताई दंड या शब्दाचे पण दोन अर्थ होतात एक म्हणजे फाइन व दुसरा म्हणजे अप्पर आर्म.
पुढील बातमीमध्ये महागाईबद्दल अतिशयोक्ती करण्यात आली होती. महागाईमुळे गरिबांची अवस्था खायला कोंडा व निजेला धोंडा अशी झाली आहे असे एक विधान होते. माझ्या सासूबाई म्हणाल्या हो आता हे दिवसही दूर नाहीत. मी पद्मजाला म्हणालो कोंडा म्हणजे तांदळाची किंवा गव्हाची साले यावर नूपुर म्हणाली, कोंडय़ाचा दुसरा अर्थ होईल इंग्रजीमधील िंल्ल१ि४ऋऋ.
सौ म्हणाली, आता मी जरा उठते व सर्वाना खायला पुिडग घेऊन येते. त्यावर माझी आई म्हणाली सूनबाई जरा उठतच आहेस, तर टीव्ही बंद करून जरा रेडिओवर मराठी भावगीते लाव. सौ ने आम्हा सर्वाना पुिडग देत असतानाच एका बाजूस रेडियोदेखील चालू केला. इतक्यात रेडिओवर ‘परिकथेतील राजकुमारा स्वप्नी माझ्या येशील का’ हे सुरेख गाणे लागले. मी प्राजक्ताला म्हटले अगदी पद्मजाच्या मनातील भावना दर्शविणारे गीत आहे ना! त्यावर पद्मजा म्हणाली, काका अशी परिकथा वगरे काही नसते. मी म्हटले परिकथेवरून मला आठवले की परीचे पण दोन अर्थ होतात परी म्हणजे पंख असलेली सुंदर काल्पनिक स्त्री व परी म्हणजे परंतु किंवा इंग्रजीमधील बट.
पुिडग एवढे मस्त झाले होते की सर्व जण त्यावर ताव मारत होते व भेंडय़ांच्या कार्यक्रमात खंड पडला होता. मी पद्मजाला म्हटले, खंड पडणे म्हणजे व्यत्यय येणे. पण या खंड शब्दाचे अजून अनेक अर्थ होतात जसे की खंड म्हणजे ूल्ल३्रल्लील्ल३.. उदा. आपला आशिया खंड किंवा खंड म्हणजे खूप मोठे पुस्तक किंवा खूप मोठा काळ.. असाही अर्थ निघू शकतो. जसे की मुगल कालखंड व भारतातील पतंगबाजी यांचे फार अतूट नाते आहे, असे वाक्य तुझ्या वाचनात येऊ शकते किंवा रामायण, मेघदूत ही खंडकाव्य आहेत असेही तुझ्या वाचनात यापूर्वी आले असेल.
आता आमची गाडी परत खेळाकडे वळली होती. पुढची चिठ्ठी निघाली ज्यात शब्द होता जाम. नूपुरने सुरुवात करत जाम म्हणजे एक फळ असे सांगितले. तर सौमित्रने जाम बसणे म्हणजे घट्ट बसणे, अशी त्यात भर घातली. मी म्हटले जाम म्हणजे ब्रेडला लावतात तो एक गोड पदार्थ. पद्मजाने हे सर्व अर्थ डायरीमध्ये लिहून घेतले व पुढची चिठ्ठी काढली.
पुढचा शब्द निघाला पात्र. सासूबाई म्हणाल्या, आता मी सुरुवात करते. पात्र म्हणजे नाटकातील पात्र.. एखादी भूमिका. त्यावर मी म्हणालो पात्र हे नदीचेही असू शकते. प्राजक्ताने तिचे ज्ञान दाखविण्यासाठी पात्र म्हणजे इंग्रजीमधील एलिजिबल हा अर्थ सांगितला. त्यावर स्नेहा आजी म्हणाली की पात्र म्हणजे भांडे असाही होतो. जसे की फुलपात्रामधून आपण पाणी पितो.
त्यानंतर शब्द मिळाला पायरी. सौमित्र म्हणाला, पायरी म्हणजे आंब्याची एक प्रकारची जात. पण मला मात्र हापूसच आवडतो. मी म्हणालो माणसाने नेहमी आपली पायरी ओळखून वागावे. इथे पायरी म्हणजे योग्यता असा अर्थ होतो. त्यावर पद्मजा म्हणाली, पायरी म्हणजे जिन्याची स्टेप हा साधा अर्थ कोणालाच कसा सुचला नाही?
शेवटचे तीन शब्द चच्रेला घेऊन आजच्या पुरते थांबूया असे आम्ही सर्वानी ठरविले. त्याला कारणही तसेच होते, कारण पुढच्या खेळासाठी चिठ्ठय़ा बनविणे मला ऑफिसच्या व्यापामुळे शक्य झाले नव्हते.
पहिला शब्द आला जर. सौमित्र म्हणाला जर म्हणजे इंग्रजीमधील इफ. पद्मजा ताई जर हा शब्द कंडिशन दर्शवितो असे स्पष्टीकरणदेखील त्याने दिले.
माझी सौ म्हणाली, ‘‘पद्मजा, एखादी तरी भारीतील जरी काठाची साडी ही प्रत्येक स्त्रीच्या कपाटात आढळतेच. जर म्हणजे रेशीम किंवा सोन्याची बारीक तार वापरून केलेली कलाकुसर.’’
दुसरी चिठ्ठी साहजिकच होती ती जरच्या जुळ्या भावाची म्हणजे तरची. मी पद्मजाला म्हटले जर या शब्दाबरोबर तर आलाच पाहिजे नाही तर अर्थपूर्ण वाक्य होऊच शकत नाही. तर म्हणजे आपल्या विलायती भाषेतील देन. त्यावर कोकणात लहान बोटीलादेखील तरच म्हणतात असे सांगून नूपुरने पद्मजाच्या ज्ञानात भर टाकली.
तिसरा व शेवटचा शब्द होता वास. यावर पद्मजा म्हणाली, मला माहीत आहे वास म्हणजे स्मेल. मी म्हटले हो पण इतक्यात सौमित्रने अपडेट दिले की वासचा दुसरा अर्थ होतो निवास किंवा राहण्याचे ठिकाण. पद्मजाला मग सासुरवास म्हणजे काय असतो हे सांगत सौ ने जरा मजेमजेतच टेन्शन दिले. त्यावर आजची शिकवणी आनंदी नोटवर संपविण्यासाठी मी कोटी केली की सासू-सुनेचा सहवास एकमेकींना हवाहवासा वाटू लागला की सासुरवास आवडू लागतो व माहेरी परके वाटू लागते. तेव्हा पद्मजा वासबरोबर सह हा शब्द कधी विसरू नकोस.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 19, 2014 1:12 am

Web Title: marathi language 31
Next Stories
1 भूत आणि काळ
2 शब्द एक, अर्थ अनेक
3 शब्दार्थाच्या भेंडय़ा
Just Now!
X