विनायक परब – @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com
तिसरे महायुद्ध झालेच तर ते आण्विक असेल, असा इशारा अगदी दोनच दिवसांपूर्वी रशियाने दिला आणि त्यानंतर युक्रेनवर बेतलेल्या या प्रसंगामागच्या इतिहासाची चर्चा जगभरात सुरू झाली. जगातील आजवरचा सर्वात मोठा आण्विक अपघात झाला ते चेर्नोबिलही युक्रेनमध्येच होते. हा अपघात १९८६ साली झाला. त्याच्या भीषणतेनंतर जग अण्वस्त्रमुक्त करण्याच्या मोहिमेस एनपीटीस जोरदार बळ मिळाले. एका बाजूला हे सारे होत असताना पलीकडे सोव्हिएत रशियाची वाटचाल ही विघटनाच्या दिशेने सुरू झाली होती. १९८९ साली बर्लिनची िभत पाडून पूर्व आणि पश्चिम जर्मनी एकत्र आले. १९९० च्या सुमारास युक्रेनच्या स्वतंत्रतेचे वारे अधिक बलशाली ठरले आणि पुढच्याच वर्षी युक्रेन स्वतंत्र झाला. युक्रेनला युरोपातील त्यांच्या समावेशाची आस लागून राहिली होती आणि त्यांच्यासमोर पेच होता तो एनपीटी या अण्वस्त्रमुक्ततेच्या कराराचा. या करारावर स्वाक्षरी केली नाही तर युरोपातील समावेशाची अडचण होती, अण्वस्त्रांमुळे र्निबध आले असते. युक्रेनमध्ये त्या वेळेस अण्वस्त्रमुक्त होण्याचीही एक चळवळ सुरूच होती. अखेरीस युक्रेनने सारी शस्त्रास्त्रे रशियाच्या ताब्यात दिली आणि देश अण्वस्त्रमुक्त झाला. जे युक्रेनच्या बाबतीत तेच कमीअधिक फरकाने कझागस्तान आणि बेलारूसच्याही बाबतीत झाले. त्यांना अण्वस्त्रमुक्त जाहीर करण्याच्या करारावर रशियाप्रमाणेच अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि चीननेही सह्या केल्या. हा तोच कालखंड होता, ज्या वेळेस नि:शस्त्रीकरणाच्या त्या करारावर स्वाक्षरी करण्यासाठी भारतासारख्या देशावर प्रचंड दबाव जागतिक पातळीवर आणला जात होता. आणि त्यासाठी युक्रेनसारखा देश नि:शस्त्रीकरणासाठी कसा आदर्श घालून देणारा ठरला आहे, याची उदाहरणे दिली जात होती. मात्र भारत या दबावाला बळी पडला नाही. 

या कराराची दुसरी बाजू म्हणजे सह्या केलेल्या देशांनी या तिन्ही देशांना त्यांच्याविरुद्ध शस्त्र उचलले जाणार नाही आणि उचलले गेल्यास मदत करम्ण्याचे आश्वासन करारामध्ये दिलेले होते.  या कराराशिवाय बुडापेस्टमध्येही करार पार पडला, त्यात नाटोच्या दिशेने युक्रेन आदी देशांनी न जाण्याच्या संदर्भातील मुद्दय़ाचाही समावेश होता. मात्र प्रत्यक्षात घडले ते वेगळेच.

israel iran war history
Iran-Israel War: एकेकाळी मित्र असणारे दोन देश एकमेकांचे कट्टर शत्रू कसे झाले?
several injured in multiple stabbing-shooting incident
सिडनीतल्या मॉलमध्ये चाकू हल्ला, चार जणांचा मृत्यू, अनेक लोक जखमी; संशियाताला पोलिसांनी ठार केल्याचं वृत्त
Israel use of AI in war revealed in reports by Israeli and Palestinian journalists
इस्रायलकडून युद्धात ‘एआय’चा वापर? इस्रायली आणि पॅलेस्टिनी पत्रकारांच्या अहवालात खुलासा
taiwan earthquake
तैवानमध्ये भूकंपात बेपत्ता लोकांची शोधमोहीम अद्याप सुरू

२०१४ साली रशियाने क्रिमियाचा ताबा घेतला आणि जागतिक विरोध मोडून काढला. युक्रेनला करावयाच्या मदतीसाठी अमेरिकेनेच नव्हे तर नाटो देशांनी युक्रेन परिसरात आपल्या सैन्याचे अस्तित्व आलटून-पालटून राहील, हे पाहिले. परिणामी रशियाने त्यांच्या साम्राज्यवादी धोरणाला पुढे रेटण्यासाठी रशियाच्या सार्वभौमत्वाला आव्हान मिळाल्याचे निमित्त करून युक्रेनवर अखेरीस हल्ला चढवला. आता सुरक्षेची हमी देणाऱ्यांपैकी एक असलेल्या रशियाने हल्ला कसा काय चढवला हा मुद्दा चर्चेत आला त्या वेळेस रशियाने सांगितले की; ते आश्वासन होते, हमी नव्हती आणि आमच्याच सार्वभौमत्वास आव्हान मिळणार असेल तर आम्ही गप्प कसे बसणार.. मुळात इतिहास काय आणि कुणाचे चूक कुणाचे बरोबर हा आपला विषयच नाही. तर युक्रेनची अवस्था त्यांनी स्वत:च दात काढलेल्या किंवा विषग्रंथी काढलेल्या सापासारखी स्वत:हून करून घेणे हा आहे. विषग्रंथी असतात आणि स्वसंरक्षणासाठी साप फूत्कारतो तोपर्यंत कुणी त्याच्या जवळपासही फिरकत नाही. मात्र विषग्रंथी काढल्यानंतर लहान मुलेही त्याचा पाठलाग करून त्याला ठेचतात, अशी एक दंतकथा भारतात प्रचलित आहे. या दंतकथेतून आपण धडा घेणे हा मुद्दा अधोरेखित करण्यासाठीच हा प्रपंच.