कालिदासाच्या ‘मेघदूत’ या अजरामर काव्याने रसिकमनांना पिढय़ान्पिढय़ा भुरळ घातली आहे. ‘लोकप्रभा’च्या वाचकाने केलेला ‘मेघदुता’च्या भावानुवादाचा हा उत्तरार्ध-

विद्युत्वंता रसिक रमणी रंगचित्रे नि चाप
संगीताला गभिर घुमसी ये मृदंगाचि थाप
अंगीं पाणी मणिमय भुई अंबरीं सौध उंच
उत्तुंगी तूं नगरभवने सारखे रे असेच १

the new york times book review
बुकमार्क : ग्रंथ परिचयाच्या विश्वात..
Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?
out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
Ramzan 2024
रमजान: जगातील विविध धर्मीय उपवासाच्या परंपरा नक्की काय सांगतात?

हातीं खेळे कमळ कुरळ्या कुरळ्या कुंतलीं कुंदमाळा
लोध्रीपुष्पे रज पसरती आननीं ये उजाळा
कानांमध्ये मृदु शिरिष अन् वेणिमध्ये कुरांटी
नारीभांगी ऋतुसुम जिथे ये कदंबींच भेटीं २

भुंगे गुंजारविं मदभरे नित्यपुष्पीं तरूंत
पक्षीमाला नलिनिं कमळे नित्यही मेखलेत
केकाकंठी मयुर भवनीं नित्य शोभीं पिसारे
नित्यज्योत्स्ना तम जिथ नसे रम्य रात्री अशा रे ३

आनंदाचे जल नयनिं हे कारणे नाहिं अन्य
शम्यप्रेमें मदनशरतापाविना नाहिं अन्य
नाहीं व्याधी कलहविरहावांचुनी कांहिं अन्य
आम्हां यक्षां वय जिथ नसे यौवनाच्या विनान्य ४

जेथे यक्षां सुषमललना सोबतीला महालीं
तारापुंजे सुमनिंच जणूं शुभ्र बिंबून आली
इच्छावृक्षीं मधुरतिरसां सेवण्याच्या प्रसंगीं
नादब्रह््मीं गभिर घुमसी सौधिं टाळी मृदंगीं ५

गंगौघाच्या हिमसम जळां प्राशुनी येति वारे
मंदाराचे तरुवर तटीं सावलीला निवारे
स्वर्णी वाळूमधिं लपवुनी जेथ रत्ने मुठींनीं
कन्या खेळांमधिं हुडकती मोहिती देव त्यांनी ६

ओढे प्रेमी कुशल निरिचे रेशमी वस्त्र सैल
लाजे वेडी रमणि जिथ ती होउनी ओठिं लाल
रत्नज्योती झणिं विझविण्यां मूठ फेके गुलाल
पोचूनीयां विफल परि ती होतसे धूर्त चाल ७

नेती वारे तुजसम ढगां सातमाळ्यावरून
भिंतीचित्रे नवजलकणें मेघ नेती पुसून
कार्योत्साही बरसति भयें शंकुनी होति दीन
जाळीमार्गे खिडकिमधुनी जाति धूम्रासमान ८

जेथे नारी प्रियकर मिठी सोडतां शय्यिं क्लांत
अध्र्या रात्री सुरतथकवा कायिंगात्रांत शांत
नाहीं आतां तव अडथळा लोंबुनी झालरीत
थेंबें थेंबें किरणिं शशिच्या पाझरी चंद्रकांत ९

अक्षय्यी ते धनिक गणिकारूपिं त्या अप्सरांच्या
वार्तालापी स्वरिं मधुरशा गायनीं किन्नरांच्या
वित्तेशाच्या प्रतिदिनिं जिथे वर्णनीं गुंग होती
भोगायाला नगरपरिघीं बागिं वैभ्राजिं जाती १०

मंदाराची गळति सुमने कुंतलीं हेलकावीं
कानांतूनी कनककमळे हालुनी ओघळावी
मुक्तामाला स्तनपरिसरीं सूत्र जाई सुटून
प्रात:काळीं तिथुनि रमणी मार्गि गेल्याचि खूण ११

वित्तेशाचा प्रिय जिथ सखा देव साक्षात् वसंत
भीतीपोटीं मदन न धरी भृंगचापां करांत
भ्रूभंगांनीं नयनशरिचे सार्थ नारीकटाक्ष
प्रेमार्ताना करिति ललना विभ्रमीं थेट लक्ष्य १२

वस्त्रे अंगी मदिरनयनीं दक्ष त्या पाठ देण्यां
पाने पुष्पे नवमृदुकळ्या भूषणे सर्व लेण्यां
पायीं रंगे सुबक अळिता चालतां वेधि लक्ष
नारीवृंदां जगिं नटविण्यासाठि ये कल्पवृक्ष १३

वित्तेशाचे घर जिथ असे त्यापुढे गेह माझे
देवेंद्राच्या धनुषिं दुरुनी तोरणें ध्यानिं ये जे
भार्ये माझ्या जवळच तिथे पुत्रवत् मानलेला
हातीं पुष्पे सहज मिळण्यां नम्र मंदार झाला १४

सोपानाला विहिरित चिरे पाचुचे शोभिवंती
उत्फुल्लूनी कनककमळे देठ वैदूर्यकांती
पाण्यामध्ये विहग वसती मानसाच्या नजीक
पाहूनीया तुज विसरती हंस यात्रा नि शोक १५

वापीकाठीं शिखर रचिले नीलवर्णी मण्यांनी
खेळायाला सुषमकदली भोवतालीं सुवर्णी
भार्येचे ते प्रिय तुज सख्या पाहुनी आठवे मी
विद्युत्रेखा जव चमकते व्याकुळी घाबरा मी १६

रक्ताशोकासम बकुळही कोवळ्या पालवीत
कोरांटीच्या वइत हलती माधवी मंडपांत
एकाला रे मजसम सखीवामपायाचि आस
डोहाळ्याला मुखिंचि मदिरा अन्य वांछी पिण्यास १७

वृक्षांमध्ये स्फटिकफलकीं पक्षिदांडी सुवर्णी
पाटीखाली मणि जडविले कोवळ्याबांसवर्णी
कांता माझी शिकवि मयुरां नाचण्यां पाळलेल्या
सायंकाळी धरुनि लयिं ती कंकणी ताल टाळ्या १८

हे मेघा तूं हृदयिं धरुनी चिन्हिं या ठेव ध्यान
दारापाशी सुबक बघसी शंखपद्मेहि छान
गेहीं येई मम अवकळा राहतो मी न तेथे
सूर्यास्तांतीं दिनिं विकसले पद्मही म्लान होते १९

झेपावूनी उतर तिथ तूं बालहत्तीप्रमाणे
क्रीडाशैलीं बसुन शिखरीं उक्त पूर्वीप्रमाणे
थोडय़ा थोडय़ा लुकलुकतशा काजव्यांच्या प्रकाशीं
विद्युल्लेखीं गृहिं चमकण्यां योग्य तूं आंत जाशी २०

कोव्ळी श्यामा उभटरदना तोंडले ओठिं लाल
मध्ये इव्ली बघत हरिणी बावरी नाभि खोल
ढुंगींभारे गति अळसली थोडि वक्षें लवे ती
ब्रह्माने जी प्रथम युवती निर्मिली हीच कां ती २१

जाणावे तूं मितवचनि ती जीव माझा दुजा की
मी येथे अन् सखि मम तिथे एकटी चक्रवाकी
उत्कंठेने बहुत दिन ती घालवीते विराणी
भासे जैसी व्यथितशिशिरीं पद्मिनी अन्य कोणी २२

खात्रीने ती रडुनि दमली कोरडे नेत्र होती
भासे किंचित् फिकट अधरीं उष्ण नि:श्वासिंची ती
केसांमध्ये वदन लपले हातिं ते टेकलेले
निस्तेजाच्या शशिचिच जणूं दीनता घेतलेले २३

दृष्टीं येई लवकर तुला देवपूजेत मग्न
काढी माझे कृशविरहिचे रूप चित्रांमधून
पृच्छा होई मधुरवचनीं पिंजरी सारिकेसी
येतो कां गे स्मरणिं रसिके लाडकी तूं तयासीं? २४

किंवा मित्रा मलिनवसना ठेउनी अंकिं वीणा
गाई गीते परिसुनि खुणा आळवी ती स्वरांना
ओल्या तारा नयनसलिलें टाकि कष्टें पुसून
आलापूनी स्वर गुणगुणे सारखी विस्मरून २५

किंवा ती नां विरहदिवसापासुनी वेळ शेषीं
पुष्पे ठेवी गणति करण्या मांडुनी उंबऱ्याशी
माझ्या भेटी मनिं ठरविल्या संगिं आस्वादिं जाय
प्राय: नारीं रमणविरहीं वेळ जाण्यां उपाय २६

कार्यव्यग्रां विरहिदिवसां होत ना त्रास कांहीं
रात्रीं दु:खी अति तव सखी रंजनां वाव नाही
संदेशाने सुखव तिजला सौधिं भेटून रात्रीं
साध्वीला तूं खिडकिमधुनी झोपली जी धरित्रीं २७

झोपे एका कुशिवर दुखी व्याकुळी क्षीणशी ती
प्राचीतीरीं झुरुन उरली कोर चंद्राचि कां ती?
माझ्या संगें व्यतित रजनी वाटते ती क्षणाची
उष्णाश्रूंनी विरहिं जळते भेट घ्यावी तियेची २८

जाळींतूनी किरण शशिचे गार येई सुधाच
पूर्वप्रेमें सरकुनि पुढे मागुती ये तशीच
दु:खी पाही सलिलिं जड ती झांकल्या पापण्यांनी
अभ्राच्छादी कमळ भुइचे ना फुलूनी मिटूनी २९

शुद्धस्नानें विखरुनि पुढे लोंबती गालिं केस
नि:श्वासाने हलति कुरळे राठ ते ओठिं त्रास
संभोगी ती रमत मजसी ते कसे स्वप्निं पाही
धारांमध्ये नयनजळिंच्या आस निद्रेचि राही २०

पुष्पे त्यागी विरहदिवसापासुनी बांधि केस
शापांतीं मी सरत दुख ते सज्ज सोडावयास
स्पर्शे गालीं सलुनि दुखते वाढलेल्या नखांनी
वेणी वक्री खरखरित ती सारतांना करांनी ३१

दु:खी भारी विरहिणि सखी भूषणे काढुनीया
शय्येकाठीं कशितरि निजे गात्रिं नाजूक काया
ढाळायाला परत तुजला अश्रु लावील ती रे
ओलाव्याच्या करुणहृदयी व्यक्ति साऱ्या अशा रे ३२

माझ्यासाठी तव सखिमनीं पूर्वीपासून प्रीती
भासे कैसी प्रथमविरहीं तर्क माझ्याच चित्तीं
भाग्याचा मी मज म्हणु नको हा असे बाष्कळीच
मी जे बोले खचितच झणीं सत्य होईल तेच ३३

झांकोळीती नयन कच रे काजळावांचुनी ते
मद्यत्यागें विसरत पुरी भ्रूलताविभ्रमांते
तूं शेजारीं नयन लवुनी घेई शंका मृगाक्षी
भासे नीरीं हलति कमळे कंपशोभेत तैशी ३४

गोऱ्या मांडय़ावर मन नखीं ओरखाडय़ांविना ती
मोती जाळी त्यजिलि नशिबें ओळखीची मला ती
माझ्या हाती उचित चुरण्या मीलनांती मिळेल
डावी मांडी हिमधवलसी केळिजैसी स्फुरेल ३५

मेघा तेव्हां बघसि जर ती झोपलेली निवांत
मागे राही प्रहरभर तूं गर्जना आवरीत
सायासांनी प्रणयिनिस त्या होई मी स्वप्निं प्राप्त
ना होवो ती गळि भुजलतेतून रे बंधमुक्त ३६

वाऱ्याने तूं उठव तिजला गारशा शिंप पाणी
जाईवेली नविन कलिका तीहि ताजीतवानी
विद्युत्गर्भी बघसि चकिता बैसुनीया गवाक्षीं
गर्जूनी तूं सुरू कर तुझे बोलणे रे तिच्याशीं ३७

हे सौभागी सुहृद तुझिया स्वामिचा नीरवाही
आलो आहे हृदयिं धरुनी जाण संदेश तूंही
गांवीं आले पथिक थकुनि वेणिमोक्षोत्सुकीं त्यां
जिव्हाळ्याने त्वरित परता आर्जवी मी पतीं त्यां ३८

सामोरी ये मरुततनयां मैथिलीच्याप्रमाणे
औत्सुक्याने प्रमुदितमनें पाहुनी आदराने
गांभिऱ्याने श्रविल तुजसी हे घना व्याकुळींना
भेटीपेक्षा सहृदकथनीं न्यूनता ती मुळीं ना ३९

हे दीर्घायू स्वहित जपसी माझिया2 सांगण्याने
भार्येला रे कथन कर की रामगिर्याश्रमीने
पंचप्राणें कुशल पुसिले दूरच्या साजणाने
आपद्ग्रस्तां प्रथम पुसणे कृत्य हे रे शहाणे ४०

आसूं डोळीं कृशतनुच तो दीर्घ निश्वासिं दूर
दैवें मार्गी अडकत असा तप्त भारी शरीर
उष्णश्वासीं सजल नयनीं तप्तदेहीं तुझ्या गे
काया त्याची मिसळून तशी जाइ नि:श्वासुनी गे ४१

शब्दांनी जे समुख सखिच्या सांगण्यासारखे गे
इच्छा ठेवी कथन करण्यां कानिं स्पर्शून तो गे
आहे भर्ता परि न तिथ ये ऐकण्यां अन् पहायां
उत्कंठी मी तुज मम मुखें शब्द संदेश द्यायां ४२

वेलीजैसी तनु जणुं मृगी घाबरूनी पहाते
केसांनी कां शशिमुख मुळीं मोरपंखीच होते
पाही चित्तीं लहरिं नदिच्या भ्रूविलासांत मी गे
एका सुद्धां स्थळिं पण तुझ्यासारखे नाहिं ते गे ४३

गेरू रेखीं तुजसि लटक्या क्रोधिं पाषाणिं चित्रीं
साष्टांगांनी चरणिं पडण्यां कामना एकमात्री
अश्रूधारा सतत नयनीं दृष्टि हो नष्ट माझी
दैवां क्रूरां न सहन अशी हे तुझी भेट माझी ४४

कष्टाने तूं मिळसि मज मी लांबवी हात जेव्हां
स्वप्नीं वाटे नभिं तुज मिठी घालुनी घ्यावी तेव्हां
आसू नेत्रीं जव विन तिथे देवता पाहती गे
मोठे मोती पडति न तरूपर्णि नाहीं असे गे ४५

कोवळी पाने हळुं उकलती देवदारीं तरूंत
दुग्धस्रावें सुरभि भरुनी येति ते दक्षिणेत
घेतो वारे मिठिंत सखि मी येति ओले तिथून
येतांना ते जणुं तव तनूलाच येती शिवून ४६

कैसी व्हावी क्षणिंचि रजनी भासते दीर्घ आतां
कैसा जावा दिवस शमुनी भासतो तप्त आतां
या रीतीने मनिं कठिणशा कामना ज्या असाध्य
दु:खी चित्तां प्रखर विरहीं नाहिं कांहीं उपाय ४७

वाटे चित्तीं हुरुप मजसी सावरे मी स्वत:सीं
कल्याणी गे मनिं बळ धरी घाबरी कां ग होसी
दु:खी किंवा नित सुखि असा नाहिं कोणी जगांत
विश्वाचे हे अनवरत गे चक्र नेमीक्रमात ४८
मत्शापांतीं उठतिल हरी शेषशय्येवरून
बाकी चारी नयनिं मिटल्या मास दे घालवून
चित्तीं आल्या विरहसमयीं कामना ज्या मनांत
आनंदाने शरदरजनी घालवू चांगण्यांत ४९

कांते मागे गळिं बिलगली तूं मला एकदा गे
शय्यीं निद्रेमधुन उठली हुंदके देत तूं गे
गालीं किंचित् हंसुन वदली पृच्छतां कैक वेळा
पाही स्वप्नीं रमवित बरे तूं लबाडा दुजीला ५०

जाणावे गे कुशल मम ते खूण ती सांगतांच
ठेवी माझ्यावर भरवसा ना प्रवादीं मुळींच
नाशे मैत्री विरहि म्हणती कृष्णनेत्रे उगाच
वस्तू भोगांविण रुचिमधे माधुरी वाढतेच ५१

आश्वासूनी प्रथमविरहीं दु:खि माझ्या सखीला
नंदी जेथे शिखरिं खणतो सोड त्या पर्वताला
आणि वृत्तां कुशल मजसी खूणशब्दीं दिलेल्या
तारी प्राणां रवि उगवतां कुंदिं कोमेजलेल्या ५२

बंधुप्रेमें मम करसि नां नीरदा कार्यपूर्ती
चर्येमध्यें तरि तव नसे नाखुशी स्तब्धमूर्ती
नि:शब्दें तूं शमविसि जळें चातकांची तहान
सच्छीलींच्या प्रति विनविल्या प्रार्थना होति पूर्ण ५३

मेघा माझी अनुचित जरी याचना आग्रही रे
स्नेहीं कार्यी कणव मनिं वा साध माझे भले रे
तोयैश्वर्यी विहर जलदा देश जे जे मनांत
तूं अन् विद्युत् कधिं न विरही व्हाल या जीवनात! ५४

कानी जेव्हां जलदकथिला यक्ष संदेश जाई
शांतूनीया कणव हृदयीं संपुनी शाप नेई
(उत्तरमेघ समाप्त)
(उत्तर मेघ)
‘कालिदासानुरुपम्’ या वासुदेव कामत यांच्या चित्रमालिकेतील चित्र
अशोक दातार – response.lokprabha@expressindia.com