आता तर अगदी आठवी-नववीमध्ये असलेल्या मुलांच्या हातातही मोबाइल फोन पाहायला मिळतो. कॉलेजमध्ये गेल्यानंतर केवळ मोबाइल असून भागत नाही तर तुमच्या हाती स्मार्टफोन असावा लागतो. पण मग महागातलाही परवडत नाही आणि बजेटमध्ये चांगली फीचर्स असलेला स्मार्टफोन दिसत नाही अशी आजवरची अवस्था होती. सॅमसंगचा डय़ुओस तब्बल ९ हजारांच्या आसपास होता. पण आता आणखी काही कंपन्यांनी बजेट स्मार्टफोन बाजारात आणले आहे. त्यात मॅक्स कंपनीने नवीन आघाडी घेतली आहे. कारण त्यांनी आणलेला हा फोन केवळ चार हजार रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
मॅक्स मोबाइलने एएक्स ४११ डय़ुओ हा अँड्रॉइड ४.२.२ जेलीबीन ऑपरेटिंग सिस्टम असलेला डय़ुअल सिम फोन बाजारपेठेत आणला आहे. यात
१.२ जीएचझेड डय़ुअल-कोअर प्रोसेसर मिडियाटेक एमटी ६५७२ई आहे. डब्ल्यूव्हीजीए (४८०७८००) आयपीएस स्क्रीन रिझोल्युशन आणि ४.० इंचाचा टचस्क्रीन आहे. या फोनमध्ये मुख्य कॅमेरा २.० मेगापिक्सेलचा असून ४ जीबी रोम, ५१२ एमबी रॅम आणि ३२ जीबीपर्यंत एक्स्पांडेबल मेमरी आहे. त्याशिवाय एएक्स ४११ डय़ुओ ब्लूटूथ, वायफाय, ए-जीपीएस इ. यंत्रणांनीही सज्ज आहे. एक्स४११ डय़ुओ पांढऱ्या आणि गडद करडय़ा रंगात उपलब्ध आहे.

मॅक्स एएक्स ४११ डय़ुओची आणखी काही महत्त्वाची वैशिष्टय़े
१) डय़ुअल सिम : जीएसएम+जीएसएम
२) एफएम रेडिओ : उपलब्ध आहे.
३) अ‍ॅक्सलोरोमीटर, ग्रॅव्हिटी सेन्सर : उपलब्ध आहे.
४) ए-जीपीएस : उपलब्ध आहे
५) इनबिल्ट अ‍ॅप : जीमेल, प्ले स्टोअर, जीटॉक, यूटय़ूब
६) बॅटरी : लिथिअम—आयन १२०० एमएएच
७) २जी नेटवर्क : जीएसएम / जीपीआरएस / एज ९०० / १८०० एमएचझेड
८) थ्री जी नेटवर्क : नाही.
९) आकार : १२४.८७६३७१०.२ मिमी.
१०) स्क्रीनचा प्रकार : कॅपॅसिटिव्ह टचस्क्रीन
११) स्क्रीनचा आकार : ४.० इंच (१०.१६ सेंमी),
१२) इतर सुविधा : सर्व प्रकारचे अ‍ॅलर्टस् , व्हायब्रेशन, एमपी3, डब्ल्यूएव्ही रिंगटोन, लाऊडस्पीकर
१३) कनेक्टिव्हिटी : जीपीआरएस – उपलब्ध आहे
एज – उपलब्ध आहे
वाय—फाय हॉटस्पॉट – उपलब्ध आहे
एनएफसी – नाही
यूएसबी – आहे
१४) इतर फीचर्स : सोशल नेटवर्किंग – एसएनएस इंटिग्रेशन—जीमेल, व्हॉट्सअप,
प्लेस्टोअर, जीटॉक, फेसबुक, यूटयमूब, स्काइप

मायक्रोमॅक्स कॅनव्हास डुडल थ्री
सध्या बाजारपेठेत चर्चा सुरू आहे ती मायक्रोमॅक्स कॅनव्हास डुडल थ्रीची. गेल्या महिन्याभरात भारतीय बाजारपेठेत दाखल झाल्यानंतर हा स्मार्टफोन प्रचंड वेगात लोकप्रिय झाला. तरुणाईने याला अधिक पसंती दिली. ६ इंचांचा स्क्रीन आणि त्यावर तरुणाईला आवडतील अशी फीचर्स हे त्याचे महत्त्वाचे वैशिष्टय़ आहे. कॅनव्हास डुडल थ्री खरेदी केल्यानंतर बिगफ्लिक्ससारख्या अ‍ॅप्सवरून तुम्हाला सुरुवातीच्या सहा महिन्यांमध्ये चित्रपट विनामूल्य डाऊनलोड करण्याची मुभा देण्यात आली आहे. तरुणाईसाठी हे खूप काही आहे.
डुडल थ्रीचे दुसरे महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे आता यात खऱ्या अर्थाने शब्दांशिवाय म्हणजेच चित्रसंवादही शक्य झाला आहे. यामध्ये असलेल्या एम डुडल या नव्या अ‍ॅपमुळे आता मेसेिजग खूप इंटरेस्टिंग झाले आहे. यात डुडल चॅट, अ‍ॅनिमेशन, स्क्रीबल स्मायलीज, फोटोंवर लिहिणे आदी बाबी सोप्या झाल्या असून त्या साऱ्याचा समावेश यामध्ये आहे. याच्या मॅग्नेटिक फ्लिप कव्हरमध्ये एक सेन्सरही आहे. त्यामुळे त्याच्या स्क्रीनचे धूळ आणि ओरखडे यापासून संरक्षण आपसूक होते, असा कंपनीचा दावा आहे.
या स्मार्टफोनला असलेला ६ इंची स्क्रीन एफडब्लूव्हीजीए डिस्प्ले असून तो ४.२.२ अँडॉइड जेलीबीन वर चालणारा आहे. यासाठी १.३ गिगाहर्टझ् क्षमतेचा डय़ूएल कोअर प्रोसेसर वापरण्यात आला आहे. या क्षमतेमुळे मल्टिटास्कींग करताना फोनच्या क्षमतेवर कोणताही वाईट परिणाम झाल्याचे दिसत नाही. एरवी काही फोनमध्ये मल्टिटास्किंग वाढले की, स्मार्टफोनचा वेग मंदावतो.
याची बॅटरी २५०० एमएएच क्षमतेची असून त्यामुळेच त्याचा सलग नऊ तास वापर करता येईल, असा कंपनीचा दावा आहे. मागच्या बाजूस ५ मेगापिक्सेल क्षमतेचा कॅमेरा फ्लॅशसह देण्यात आला असून समोरच्या बाजूस ०.३ मेगापिक्सेल क्षमतेचा कॅमेरा वापरण्यात आला आहे. याशिवाय ब्लूटूथ, वाय फाय आदी सोयीसुविधा आहेतच दिमतीला. सध्या तरुणाईमध्ये असलेले सोशल मीडियाचे वेड लक्षात घेऊन त्यातील लोकप्रिय प्लॅटफॉम्र्स या स्मार्टफोनमध्येही उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
पण फक्त तरुणाई किंवा कॉलेजिअन्स एवढेच कंपनीने ग्राहक म्हणून नजरेसमोर ठेवलेले नाहीत तर स्मार्टफोन हाती हवाहवासा वाटणारा प्रत्येक वयोगटातील माणूस आपला ग्राहक असेल असे कंपनीने गृहीत धरलेले दिसते. त्यामुळेच वर्ड, एक्सेल, पॉवरपॉइंटचे काम करणाऱ्या किंगसॉफ्ट ऑफिसची सोयही यात देण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही ऑफिसचे कामही या स्मार्टफोनवर करू शकता. शिवाय इंटरनेट ब्राऊझिंगसाठी ऑपेरा मिनी ब्राउझर देण्यात आली आहे. कंटाळा आलाच तर मार्बल, रोप कट, जेली जंपर यासारखे गेम्स आहेतच दिमतीला. प्री-लोडेड अ‍ॅप्समध्ये गेटइटचाही समावेश आहे. परिसरातील चांगली रेस्टॉरंटस् शोधण्यासाठी त्याचा वापर होऊ शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्मार्टफोनचा एवढा सगळा वापर करायचा तर त्यासाठी चांगली मेमरी क्षमताही असायला हवी. त्यासाठी एक्स्पान्डेबल मेमरी स्लॉट देण्यात आला असून ३२ जीबी क्षमतेच्या कार्डाचा वापर त्यात करता येऊ शकतो.
कदाचित वाटेल की, एवढे सारे आहे तर किंमत किती?
महाग असावा.. तर तसे नाही.
इतरांच्या मानाने हा स्मार्टफोन तुलनेने स्वस्तच आहे.
याची किंमत आहे रु. ८,५००/-.

१ी२स्र्ल्ल२ी.’‘स्र्१ुंँं@ी७स्र्१ी२२्रल्ल्िरं.ूे