scorecardresearch

पावसाळा विशेष : ‘फ्रिकआऊट’ पाऊस!

पाऊस आला की, त्याच्याच बरोबर मुंबैकरांच्या मनात भोलानाथंच पावसाचं गाणं पिंगा घालू लागतं. खरंतर शाळा केव्हाच मागे सुटलेली असते. आता हा मुंबैकर कॉर्पोरेट ऑफिसात स्थिरावलेला असतो…

पावसाळा विशेष : ‘फ्रिकआऊट’ पाऊस!

मुंबई
पाऊस आला की, त्याच्याच बरोबर मुंबैकरांच्या मनात भोलानाथंच पावसाचं गाणं पिंगा घालू लागतं. खरंतर शाळा केव्हाच मागे सुटलेली असते. आता हा मुंबैकर कॉर्पोरेट ऑफिसात स्थिरावलेला असतो.. पण मनात ओळी फेर धरून असतात ‘ऑफिसभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय? सांग सांग भोलानाथ!’ एरवी मुंबैकर म्हणजे घडय़ाळाच्या काटय़ांबरोबर स्पर्धा करत लोकल गाडीबरोबरही धावणारा.. इथली कार्यसंस्कृतीच वेगळी! लोकल चुकली किंवा बेस्ट बसही चुकली की, मग पूर्वी मस्टरवर उशिरा होणारी सही आणि आता बायोमेट्रिक यंत्रावर उशिरा लागणारे बोट यामुळे त्याच्या काळजाचा ठोका क्षणभर चुकतो.. एरवी संपूर्ण वर्षभर हा मुंबैकर म्हणजे काळ, काम आणि वेगाचे गणित पक्के असलेला माणूस असतो. ताणतणावाची एक टांगती तलवार सतत डोक्यावर घेऊन फिरत असतो. तो वर्षभराचा ताण हलका करण्याचे काम मुंबैकरांसाठी हा पाऊस करतो! म्हणून मुंबैकरांना तो जवळचा दोस्त वाटतो.
‘शी.. नको, काय हा पाऊस?’ असे म्हणणारा मुंबैकर शोधूनही सापडणार नाही! किंबहुना पावसाची प्रतीक्षा तर त्याला उन्हाळ्यापासूनच असते! मुंबईचे वैशिष्टय़ म्हणजे इथे बहुतांश मुंबैकरांना पावसात भिजायला आवडतं. खरं तर भिजण्याची मस्तीच असते अंगात भिनलेली! दोन दिवस पावसाने संततधार धरलेली आहे आणि अजून किमान तीन दिवस तरी त्याचा मुक्काम असणार, याची पक्की खात्री असतानाही अनेक पाऊसवेडे मुंबैकर छत्री न घेताच घराबाहेर पडतात. त्यामुळे एरवी कोणत्याही शहरात पावसात छत्री हाती न घेता बाहेर पडणाऱ्या शहर किंवा गाववासीयांपेक्षा अशा मुंबैकरांची संख्या केव्हाही अधिकच असेल!
मुंबईची लोकल म्हणजे मुंबईचा प्राण किंवा मुख्य रक्तवाहिनी! ती थांबली की मग मुंबईचे सारे व्यवहार हळूहळू ठप्प होतात. त्यामुळे तुफान पावसात ट्रॅक पाण्याखाली गेल्याने तिची चाल मंदावली आणि ती काही तास तरी एकाच जागी थांबून राहिली की मग मुंबैकरांना ‘पाऊस खरंच आलाय मुक्कामाला’ असं वाटतं. दरवर्षी रेल्वेमार्गावरचे नाले कितीही पैसे खर्च करून स्वच्छ केले तरी एक- दोन दिवस तरी असे येतातच की, रेल्वेसेवा पूर्ण ठप्प झालेली असते! अशावेळेस मग मुंबैकर घरीच राहणे पसंत करतात. पण म्हणजे ते घरात बसून राहतात असे नाही. पुरुष तर शॉर्टस् घालून रस्त्यावर पाऊस एन्जॉय करण्यासाठी उतरतात. एरवी लोकल ट्रेनमध्ये आत बसायला जागा मिळणे म्हणजे नशीबच; पण पावसात आतमध्ये जागा असतानाही लोकलच्या फूटबोर्डवर उभे राहून भिजण्यात धन्यता मानतात, ते मुंबैकर!
पाऊस सुरू झाला की, मग तरुणाई लोटते ती, जगातील सर्वात मोठी ओपन गॅलरी असलेल्या मरिन ड्राइव्हवर! इकडे पाऊस अंगावर घेण्यासारखा आनंद जगात इतरत्र कुठेही नाही! कारण इथे तुम्ही पश्चिमेकडून येणारा फक्त पाऊसच नाही तर तुफान वारा आणि त्याच वाऱ्यासोबत प्रचंड वेगात येणाऱ्या लाटाही अंगावर घेत असता! प्रत्येक लाटेचा वेग एवढा जबरदस्त असतो की, चार- पाच माणसे त्यासोबत सहज वाहून जाऊ शकतात. प्रतिवर्षी किमान चार- पाच अशा घटना घडतातही. पण म्हणून मरिन ड्राइव्हवरची गर्दी काही कमी होत नाही, ती प्रतिवर्षी वाढतेच आहे! तुफान पावसाला सुरुवात झाली की, हा राणीचा रत्नहार तरुणाईच्या जत्रेने फुलून जातो. पूर्वी म्हणजे सुमारे दहा वर्षांंपूर्वींपर्यंत इथे लोटणाऱ्यांमध्ये तरुणाईच अधिक असायची पण आताशा इथे फेरफटका मारलात तर वयाचेही बंधन राहिलेले नाही, हे लक्षात येईल!
मुंबईला लाभलेला अप्रतिम नसíगक किनारा म्हणजे मुंबकरांची रेलचेलच. या श्रीमंतीचा ते पुरेपूर लाभ उठवतात. मग कधी जुहू तर कधी गोराई किंवा मग ते मढ आयलंड गाठतात. जुहू तर अगदी मुंबईतच. गोराई थोडंसं एका बाजूला म्हणजेच मुंबईच्या उत्तर टोकाला. हा सगळा किनारपट्टीचा प्रवास म्हणजे पावसातली एक वेगळी गंमतच असते. किनारपट्टीवर जाणाऱ्यांची संख्या खूप असते. त्यांना छातीभर पाण्यात असताना समुद्राच्या खाऱ्या गार वाऱ्यासह तुफान वेगात येणारा पाऊस अंगावर झेलायचा असतो. त्याची मजा खरंच काही और असते. आपापल्या परीने जवळची किनारपट्टी गाठून पाऊस एन्जॉय केला जातो. पण काही जण असतात अस्सल मुंबकर.. मग ते किनाऱ्याची पावसाळी यात्राच करतात. या यात्रेला उपनगरामध्ये सुरुवात होते ती अंधेरीच्या एका टोकाला असलेल्या वर्सोव्याला. ही यात्रा आहे वर्सोवा ते पाली. म्हणजे किनाऱ्याहून गाडी किंवा बाईक घेऊन सुरुवात करायची. बाईक असेल तर वर्सोवा जेट्टीवरून बोटीतून पलीकडे जाता येते. वर्सोव्याच्या पलीकडे नजरेस पडणारं मढ गाठायचं. मुंबईत बससेवा पुरविणारी बेस्ट इथे बोटसेवा चालवते. त्या फेरीमध्ये बसून पलीकडे जायचे. चार चाकी वाहन असेल तर मात्र मालाडहून यावे लागते. मढचा किल्ला हा असाच तुफान पाऊस अंगावर झेलण्याचे एक महत्त्वाचे ठिकाण. हे आगळे अशासाठी की, एरवी मुंबईत समुद्र पश्चिमेला असतो. तुम्ही त्याच दिशेने तोंड करून उभे असता तेव्हा पश्चिमेकडचा तो वेगात येणारा पाऊस तुम्हाला झोडून काढतो. पण या किल्ल्याची रचना आणि ठिकाण असे आहे की, तुम्ही किल्ल्यावर पूर्वेला तोंड करून उभे राहता तेव्हा समुद्र तुमच्या मागे असतो आणि मुंबई अगदी नजरेसमोर.. तुफान पाऊस असेल किंवा वातावरणात ढग बरेच असतील तर समोरचे काहीच दिसत नाही. पण एरवी संपूर्ण मुंबई नजरेच्या एका टप्प्यात पाहाता येते.. अगदी पार वरळीच्याही पलीकडपर्यंत. तुफान पावसात तुम्ही इथे असाल तर मग हा पाऊस तुम्हाला मागून- पुढून सगळीकडून झोडपत असतो.
पावसाचा आनंद इथे लुटला की, मग पुन्हा किनाऱ्यावरचा पाऊस अनुभवायला मुंबकर सिद्ध होतो.. पण थोडे सावधच राहावे लागते कारण एरंगळ आणि मढ या दोन किनाऱ्यांची खोलगट बशीसारखी आहे. त्यामुळे जोरात येणाऱ्या लाटांबरोबर माणूस आतमध्ये समुद्रात खेचला जातो. दरवर्षी इथे समुद्रात खेचले जाऊन मृत्यू पावणाऱ्यांची संख्याही वाढते आहे. जवळच असलेल्या भारतीय नौदलाच्या ‘आयएनएस हमला’च्या प्रवेशद्वारावर तर मोठय़ा फलकांवरच येणाऱ्यांना सावधगिरीचा इशारा म्हणून मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या मोठय़ा अक्षरात लिहिली आहे. तरीही या किनाऱ्यावर गर्दी करणाऱ्या मुंबकरांची संख्या काही कमी झालेली नाही.
इथून सुमारे अध्र्या तासाच्या अंतरावर गोराई आहे. गोराईला हल्ली बरीच गर्दी होत असल्याने अनेक मुंबईकर पुढे मुंबईलाच भूभागाने जोडून असलेल्या भाईंदर-उत्तनच्या दिशेने जातात. इथपर्यंत येणाऱ्या मुंबकरांची संख्या तुलनेने कमीच आहे. आणि अगदी इथेही गर्दी आहे असे वाटले तर मग तसेच किनाऱ्याने पुढे जायाचे की, मग तुम्ही पाली या शेवटच्या गावात पोहोचता. इथे मात्र तुम्हाला भाईंदर खाडी लागते. तिथूनच मागे परतावे लागते. पाली हे कोळ्यांचे गाव. झावळ्यांनी शाकारलेल्या बंदिस्त होडय़ा इथे दिसतात आणि किनारा अनेकदा निर्मनुष्यच असतो. इथे समुद्र मात्र काहीसा खवळलेला असतो. जवळच खाडी त्यामुळे प्रवाह तसा वेगात असतो. वरच्या बाजूस गावात असलेल्या उंच टेकडीवर अलीकडेच एक उद्यान उभारलेले आहे. तिथे उभे राहून समुद्रावरचा खारा वारा आणि पाऊस अंगावर घेणे ही सर्वोच्च आनंदाची परिणतीच ठरावी.
असाच सर्वोच्च आनंद मिळतो तो कान्हेरीच्या डोंगरावर. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात असलेल्या कान्हेरीच्या लेणी म्हणजे मुंबईतील सर्वोच्च ठिकाणच. याशिवाय उंच असलेली ठिकाणे म्हणजे शीवचा किल्ला, शिवडीचा किल्ला. पण कान्हेरी या सर्वापेक्षा उच्च स्थानावर आहे. मुंबईतील सर्वोच्च ठिकाण म्हणजे टेबलटॉप तेही याच जंगलात आहे. तिथून मागच्या बाजूस भाईंदपर्यंतचा समुद्र आणि समोर तुभ्र्यापर्यंतचा परिसर नजरेच्या दोन टप्प्यांमध्ये पाहायला मिळतो. मात्र बोरिवलीहून निघालात तर सुमारे दोन तासांच्या तंगडतोडीनंतरच या पॉइंटपर्यंत पोहोचता येते. मध्ये काही ठिकाणी जंगली डासांचाही सामना करावा लागतो.. पण या तंगडतोडीचा आनंद केव्हाही अवर्णनीयच असतो. कान्हेरीतील एका लेण्याचे नावच आहे मुळी सागर पलोगन.. या लेणीजवळून समुद्र सुंदर दिसतो. पावसात इथे बसून समोरून येणारा पाऊस अनुभवणे हा सोहळा असतो. पाऊस येतो कसा तो इथून दिसतो. अंधारून आलेले आकाश.. एकएक करत गोळा झालेले पावसाचे काळे ढग आणि नंतर या ढगांनी पश्चिमी वाऱ्यासोबत आपल्या दिशेने झेपावत येणे हा साराच सोहळा असतो!
पावसाचे हे भरून येणे अनुभवायचे असेल तर खरे तर पठारासारखी जागा हवी मोकळी. ती मुंबईत कुठून मिळणार. मग मुंबकर धाव घेतात ती सहार विमानतळ परिसरात. इथे तो अनुभव त्यांना घेता येतो. ‘नभ मेघांनी आक्रमिले’ या ओळी मुंबकरांना आठवतात त्या विमानतळावर.. पावसाच्या आगमनाची नजरबंदी झालेली असते तेव्हा!
अशा अनेक संधी आहेत की, त्या फक्त मुंबैकरांनाच मिळतात. मुंबई म्हणजे अनोख्या वास्तूंची नगरी. या अनोख्या वास्तूंमध्ये गेटवे जवळचे ताज हॉटेल किंवा महापालिकेची गोथिक शैलीतील इमारत आदींचा समावेश होतो. पावसाच्या साचलेल्या पाण्यात पडलेली या इमारतींची प्रतिबिंबेही तेवढीच मोहक असतात..
२००५ या साली मात्र याच पावसाने मुंबैकरांची झोप उडवली तो दिवस होता २६ जुलै. पाऊस कर्दनकाळही ठरू शकतो, हे त्या दिवशी मुंबैकरांना जाणवले. तेव्हापासून पावसाचा वेग वाढला की, क्षणभर मुंबैकरांच्या हृदयाचा ठोका चुकतो. आता तर गेल्या अनेक वर्षांत पाऊस वाढला की, मग कार्यालये आणि शाळा सोडून देण्यासही सुरुवात झाली आहे. सर्वाधिक उंची असणाऱ्या लाटांचे दिवस व अपेक्षित उंची असा तक्ताच प्रकाशित होतो. पण ती भीतीहंद देणारे हवेहवेसे वाटणारे असते. पावसाच्या सरींची तीव्रता वाढली की त्याच्या आयुष्यातील ताणतणावांची तीव्रता कमी होते. केवळााचा आनंद लुटणाऱ्यांची संख्या मुंबईत सर्वाधिक आहे. ही मंडळी मग आरे कॉलिनी, नॅशनल पार्क किंवा मग गेलाबाजार वांद्रे बॅण्डस्टॅण्ड अशा ठिकाणी पावसाची मजा लुटतात. शक्य असेल तर मग पवई किंवा विहार- तुळशी तलावाचा परिसर अशा ठिकाणी पावसाची मजा लुटतात. एकूण काय तर मुंबईकरांना पावसात केवळ भिजायला नाही आवडत तर वीर योद्धय़ासारखा पाऊस अंगावर झेलायला अधिक आवडतो. झेलणे मग तो मुंबचा ट्रॅफिक जॅम असो किंवा गर्दीमधले आयुष्य असो.. ते झेलायचे आणि झेलत असतानाच आनंदही लुटायचा हे मुंबकरांच्या रक्तातच भिनलेले आहे. एरवीचे झेलणे हे पर्याय नसलेले म्हणजे आयुष्यातील अनिवार्यता म्हणून येते. पण पाऊस झेलणे हे मुंबईकरांना फ्रीकआऊटचा आनयी ऊर्जा वर्षभर वापरतो तेव्हा पुन्हा त्याच्या मनात आनंदसरीच बरसत असतात!

मराठीतील सर्व कव्हर स्टोरी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-08-2014 at 01:26 IST

संबंधित बातम्या