एक शून्य शून्य ते सीआयडी, क्राईम पेट्रोल अशा गुन्हेकथांचे नाट्यरुपांतरण असणाºया खंडीभर मालिका गेल्या वीस पंचवीस वर्षात टिव्हीवर पाहायला मिळत असताना; एका खुनाच्या शोधावरील चित्रपटात वेगळं काय पाहायला मिळणार असं नक्कीच कोणाही प्रेक्षकाला वाटू शकतं. तर दुसरीकडे आज सर्वाधिक लोकप्रिय असणाºया सोशल मिडीयामुळे तर अशी रहस्यं दुसºया क्षणाला जगाला कळण्याची सोय झालेली आहे. अशा वेळी ‘लाल इश्क’चं साक्षीला असलेलं गुपित पाहून नेमकं काय मिळणार असं तुम्हाला नक्कीच वाटू शकतं. ते वाटणं दूर करण्याचा आटापिटा सिनेमाकत्र्यांनी पुरेपूर केला आहे, पण तो एका मर्यादेपर्यंतच. एकदा का ही मर्यादा संपली की उरतो तो केवळ एक पारंपरिक फॉम्र्युलाप्रधान चित्रपट.
मग त्यात रोमान्स येतो, कधी कधी तो हॉट देखील असतो, नैतिकता येते, अनैतिकतादेखील येते, मित्रप्रेम, लोभ, मोहाचे प्रसंग येतात, छान छान गाणी येतात, तपासकर्त्या पोलिसांचा स्पेशल अ‍ॅटीट्यूडदेखील असतो, एखादं विनोदी पात्र असतं, एखादं खवट पात्र पण असतं. असं सारं काही मिश्रण करुन तुमच्यापुढे ठेवलेलं मनोरंजनाच ताट म्हणजे लाल इश्क.
मग या चित्रपटाचं नाविन्य काय, तर ते आहे त्याच्या हाताळणीत. अर्थात तेदेखील मर्यादीतच. एखादा खुन झाला आहे, हेच केवळ रहस्य नसते, तर कोणाचा खुन झालाय हेदेखील रहस्य असू शकते. आणि चित्रपट मध्यंतरापर्यंत आला तरी ते कळू न देणं हे दिग्दर्शनाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. कारण अशा प्रसंगी प्रत्यक्ष घटनास्थळी तुम्हाला अगदी मर्यादीत पात्रांमध्येच खेळावे लागते. फ्लॅशबॅकमध्ये तुम्ही बरचं काही दाखवू शकत असला तरी खुनी व्यक्ती कोण हे रहस्य अबाधित ठेवावं लागते. लाल इश्कमध्ये हे सांभाळलं गेल्याचं कौशल्य अधोरेखित करायला हरकत नाही.
बाकी तांत्रिक शुद्धता वगैरे पातळीवर तर हल्ली सारेच चित्रपट छान छान असतात. पण लाल इश्ककडे पाहताना विशेष करुन यातील कॅमेºयाच्या हालचाली जाणीवपूर्वक केलेल्या आहेत, आणि त्या प्रभावीदेखील झाल्या आहेत. रहस्याची तीव्रता वाढवण्यासाठी अशा प्रसंगांचा नक्कीच चांगला उपयोग झाला आहे. त्याला एडिटींगची चांगली जोड मिळाली आहे, पण प्रसंगांची पुनरावृत्ती न करता नाट्यमयता अजून वाढवता आली असती. शेवटच्या प्रसंगात, फ्लॅशबॅक आणि प्रत्यक्षातील दोन तीन घटना असा एक कोलाज करायचा प्रयत्न झाला आहे, पण तोदेखील मर्यादीतच यशस्वी होतो.
बाकी कथानक आणि इतर जुळवाजुळव काही खास नाही. सारा भर प्रेमाचा तडका कसा वारंवार चरचरेल यावरच आहे. तपासकत्र्या पोलिस अधिकाºयांच्या तोंडी असलेली अगदी मोजकी वाक्य सोडली तर उरलेले सारे संवाद हे सपाटीकरणाच्याच वाटेने जाणारे आहेत. चित्रपटात गाणं हवंच, त्यातही असं इश्क बिश्क नाव असेल तर ते हॉटदेखील हवं ही आपली अगतिकता येथे पुन्हा एकदा अधोरेखित होते.
कलाकारांच्या बाबतीत बोलायचं तर स्वप्नील जोशी त्याची चौकट सहजासहजी मोडू शकेल ही अपेक्षा आता सोडून द्याायला हरकत नाही. त्याचा आता एक साचा तयार झाला आहे. अंजना सुखानी आणि स्नेहा चव्हाण या दोन्ही नव्या नायिका फार काही प्रभाव टाकणाºया नाहीत. त्यातल्या त्यात अंजना सुखानी अमराठी वाटत नाही हीच काय ती जमेची बाजू. जयवंत वाडकरांची नाट्य निर्मात्याची भूमिका मात्र दाद द्याावी अशी आहे.
तुम्हाला जर खुनासारख्या गुन्हयाचं, त्याच्या शोधकथेचं आकर्षण असेल तर उर्वरीत सारं मनोरंजन मटेरिअल बोनस म्हणून मिळतय असं समजून हे इश्क कम खुनाचं गुपित पाहू शकता. एकंदरीतच जगातील कोणत्याही सर्वसामान्य माणसांना असं आकर्षण असतचं. त्यामुळे असं का झालं, दिवसा इतके दिवे का लावले होते आणि ते घालवल्यावर इतका अंधार कसा काय झाला वगैरे प्रश्न विचारण्यात अर्थ नाही. काही तांत्रिक घटकांचा बोनस पकडून, चूपचाप डोकं बाजूला ठेऊन चित्रपट पाहणार असाल तर गुपित न फोडण्याचं फुकटचं नैतिक बंधन सांभाळावं लागेल.
थोडक्यात काय तर अनेक रहस्यपटांमध्ये आणखी एका चित्रपचटाची भर इतकचं म्हणावं लागेल. पण संजय लिला भन्साळींसारख्या भरपूर पैसे ओतून ते परत मिळवण्याची व्यावसायिकता असणा-या निर्मात्याच्या या चित्रपटाकडून मराठी चित्रपटसृष्टीला सध्या तरी काहीच हाती लागलेलं नाही हे वास्तव आहे की नेमकं गुपित काय आहे इतकाच प्रशद्ब्रा शेवटी शिल्लक राहतो.
——–
कथासूत्र : सुयश पटवर्धन हा एक प्रसिद्ध कलाकार एका नाटकाच्या तालिमीच्या निमित्ताने एका रिसॉर्टमध्ये जातो. तेथेच त्याला जान्हवी भेटते. स्वत:च लग्न ठरण्याच्या वाटेवर असताना आणि तिचे लग्न ठरलेलं असताना ते दोघे एकमेकाच्या प्रेमात पडतात. त्याचवेळी रिसॉर्टवर एक खून होतो. त्या खुनाचा नेमका काय आणि कसा उलगडा होतो, कोण कोणावर कुरघोडी करते आणि अखेरीस उलगडा होतो.

निर्माता – संजय लिला भन्साळी
सह-निर्माता – शबिना खान
दिग्दर्शन – स्वप्ना वाघमारे जोशी
पटकथा संवाद – शिरिष लाटकर
संकलन : जयंत जठार
वेशभूषा : शबिना खान, जिम्मि
संगीत : अमिताराज, निलेश मोहरीर
गीतकार : सचिन फाटक, अश्विानी शेंडे
गायक : स्वप्नील बांदोडकर, वैशाली सामंत
ध्वनीमुद्रण : अनिल निकम
कलाकार  : स्वप्नील जोशी, अंजना सुखानी, स्नेहा चव्हाण, जयवंत वाडकर, प्रिया बेर्डे, पियूष रानडे, यशश्री मसूरकर, मिलिंद गवळी, उदये नेने, कमलेश सावंत आणि समिधा गुरु.