हिंदी सिनेमातील आज आपल्याला माहीत असलेल्या गायक-गायिकांची नावं मोजकी असली तरी आजवरच्या गायक-गायिकांच्या नावांची यादी करायची म्हटलं तर कुणाचीही दमछाक होईल अशी परिस्थिती आहे.

परवा मित्रमंडळीत गप्पांच्या ओघात एक बंगाली मित्र म्हणाला की, आमच्या बंगाली सिनेगीतांत सुमारे ६५ गायक-गायिकांनी गाणी म्हटली आहेत. हे ऐकल्यावर केरळी नायर मागे थोडाच राहतो! तो म्हणाला, आमच्या मल्याळम् भाषेत सर्वात जास्त गायक-गायिकांनी गाणी म्हटली आहेत. मी कट्टर हिंदी सिनेगीत प्रेमी. त्यामुळे मला हा हल्ला सहन झाला नाही. मी म्हटले हिंदीत तर ही संख्या शतकापलीकडे गेली आहे. हे विधान मी केले खरे, पण त्यामुळेच सिद्ध करायची जबाबदारीही आली.
खरं तर या मुद्दय़ावर वाद व्हायची काही गरजच नाही. कारण कॉमन सेन्स वापरला तर एक गोष्ट कुणालाही पटण्यासारखी आहे. ती म्हणजे एखाद्या बिगरहिंदी भाषेत कितीसे इतर गायक गातील? मी माझा ध्वनिफिती-चित्रफितींचा संग्रह उघडून घरच्या कार्याला जसे जुंपून घेतात त्या जिद्दीने कामाला लागलो. संग्रह चाळताना एका गोष्टीचे अप्रूप वाटले ती म्हणजे सराईत गायकांच्याशिवायसुद्धा इथे कितीतरी शास्त्रीय संगीत गाणाऱ्यांनी, नटनटय़ांनी, गीतकारांनी, संगीतकारांनी, ऑर्केस्ट्रातील वादकांनी, निर्मात्यांनी, विनोदी नटांनी, क्रिकेटर्सनी आपला सूर आजमावला आहे. थोडय़ा फार फरकांने ते सफलसुद्धा झाले आहेत.
सर्वसामान्य माणसाला माहिती असणारी नेहमीच्या गायकांची नावं म्हणजे लताजी, रफी, तलत, मुकेश, महेंद्र कपूर, किशोर कुमार, मन्ना डे, हेमन्त कुमार, नूरजहान, सुमन कल्याणपूर, सहगल, पंकज मलिक, आशाजी, ( १९८० पर्यंतचे कलाकार धरले तर). फारच मेंदूला त्रास दिलात तर संध्या मुखर्जी, सुबीर सेन, द्विजेन मुखर्जी, येसुदास, आरती मुखर्जी, एस. पी. बालासुब्रह्मण्यम, सुरेश वाडकर, कविता कृष्णमूर्ती, शमशाद बेगम, सुरैया ही नावे पुढे येतील.
या गायकांशिवाय इतरही अनेक गायक-गायिका आहेत. १९३०- १९५० या कालखंडात अशा लोकांची संख्या जास्त आहे, कदाचित सुरुवातीच्या काळात प्लेबॅक सिंगरची पद्धत रूढ नव्हती हे एक प्रमुख कारण असावे. खाली दिलेल्या कलाकारांनी अनेक उत्तमोत्तम गाणी म्हटली आहेत, पण जागेअभावी त्या काळी गाजलेल्या गाण्यांचाच समावेश केला आहे.
‘मुश्कील कुशान है नाम तेरा तो मुश्कील में काम आना’ ही अकबर खान पेशावरवाले यांच्या खडय़ा आवाजातली प्रार्थना अजून तशीच्या तशी आठवते.
सरदार अख्तर (स्व. मेहबूब खानच्या पत्नी) ज्यांनी १९३०-१९४०च्या दशकात तिलस्मी तलवार, गाफील मुसाफिर, हेतल पद्मिनी, औरत वगैरे सिनेमात कामे केली. त्यांचे हे एक सोलो ‘सावर वाला वही रे सावर जियरा ले जाये’ फिल्म पुकारमधील त्या काळी नृत्याबद्दल गाजले होते.
मिस मीराचे ‘मतवाली कोयलिया बोले’ हे १९३८ मधील ‘भाभी’मधले तिच्या इतर गाण्याप्रमाणे प्रसिद्ध झाले नाही. जोहराबाई अम्बालावालीचे नाव घेतले की रतनची गाणी आठवतील पण मी १९४० तील अफसाना (अनरीलिज्ड) ‘दिल की दुनिया पे अंधेरा छा गया’ ऐकण्याचा सल्ला देईन. लीला मेहता यांचे ‘तुम न हुये पास’ हे अपराध- १९४० चे गाणे जरूर ऐका. ‘खेल’ म्हटले की सज्जाद हुसेनचा, देव-मधुबाला ही जोडी असलेला सिनेमा डोळ्यासमोर येणार, पण इथे हा १९४० च्या अप्रकाशित ‘खेल’चा संदर्भ आहे. यातील एक एच. शाहिन व शमशाद बेगमचे ‘यह दिल भी जानता है’ गाणे ऐका. खुर्शीद म्हटले की सर्वाना तानसेन सिनेमातली गाणी आठवतात. पण आज की मर्जी -१९३९ तील ‘ आज मेरे घर मेहमान आये’ ऐका.
बी. एस. ठाकूर यांनी गायलेले ‘झूम झूम के आज ज़िन्दगी’ हे ‘शांति’ फिल्ममधले, तर फम्कम्ीर मुहम्मद यांचे ‘तू शमा बने मैं परवाना’ हे ‘कलाकार’ फिल्ममधील, ‘सुंदर सपना बन के आयी’ हे १९४६ मधले नीनाने गायलेले ‘पृथ्वीराज संयुक्ता’मधले गीत जरूर ऐका. ‘अभी जाओ बदरिया से लाओ’ हे अनिमा घोष व द्विजेन चौधरी यांचे बाप- १९४६ मधले डय़ुएट तर आता मिळत नाही. जी. एम. दुरानीचे नाव आले की डोळ्यांसमोर कितीतरी हिट गाणी येतात, पण ‘हमें अब तो जीना गंवारा नहीं है’ व ‘अपनी महफिम्ल में एक बार ज़्ारा आने दे’ हे ‘खेल’मधले किंवा उस पार-१९४४ चे एक अजून दुर्मीळ गीत म्हणजे ‘पंछी भूला कल’ मिळवण्याचा प्रयत्न करा. बीनापानी मुखर्जीची गाणी ऐकल्यावर ही गायिका फक्त उडती गाणी म्हणते असा समज झाला होता. पण ‘नाकाम हुए इश्कम् में हम’ ही ‘राज़्ा’ फिल्ममधली गम्ज़्ाल ऐकून मत परिवर्तन झाले.
नर्गिसची पहिली फिल्म तलाश-ए-हकम् जरी असली तरी मोठी झाल्यावर तिची जी पहिली फिल्म ‘तकम्दीर’ १९४३ मध्ये आली, त्यात तिने मोतीलालबरोबर काम केले होते. त्यातील एक गीत जे मोतीलाल व शमशाद बेगमने गायलेले व जे एम. एन. अन्सारी व नर्गिसवर चित्रित केले गेलेले, आठवतंय का कुणाला? ‘घनघोर घटाएं छायीं’ हे गाणे प्रथम ऐकले तेव्हा ऐकता ऐकता पूर्ण व्यवस्थित लिहून काढू शकलो. पूर्वीची गाणी उर्दूमिश्रित हिंदीत असल्यामुळे गाणे पूर्ण लिहून काढण्यासाठी चार-पाच वेळा तरी ऐकावे लागायचे. आता तर सी. डी. मिळतात, नेटवर उपलब्ध असतात. त्या वेळी ज्याच्याकडे गाण्याच्या रेकॉर्ड असायच्या त्याची सारखी मिनतवारी करावी लागे. तुमच्यापैकी ज्यांनी हे गाणे ऐकले असेल त्यांना ठाऊक असेलच की या गाण्यातील प्रत्येक ओळ ही कमीतकमी दोन वेळा तरी रिपीट केली गेली आहे.
१९४२ मध्ये रिलीज झालेला मेहबूब खान यांचा ‘रोटी’ अनेक कारणांसाठी आवडायचा. आता ज्याला ‘ऑफ बीट’ किंवा ‘हटके’ म्हणतात त्याची सुरुवात बहुधा ह्य सिनेमाने केली असावी. (या विधानात चूक झाली असल्यास जरूर निदर्शनास आणावी.)
चंद्रमोहनसारखे नैसर्गिक नट त्या काळी फारच कमी होते. बेगम अख्तर, सितारादेवी ज्या नृत्यात तर निपुण होत्याच, शिवाय त्या काळच्या अत्यंत बोल्ड अभिनेत्री. त्यांची शेख मुख्तारबरोबर जोडी होती. अश्रफ खान यांचीही या सिनेमात भूमिका होती. अनिल बिस्वास यांचे संगीत. बेगम अख्तरच्या चार गम्ज़्ाला होत्या. सिताराचे ‘मेघराज घर आये’ जरी गाजले तरी ‘सजना साँझ भई आन मिलो’ हे जास्त आवडायचे. शिवाय अनिल बिस्वास व अशरफ खान यांनी गायलेले ‘रहने लगा है दिल में अंधेरा’ फक्त एकदाच पडद्यावर दिसले. मॉर्निग शोमध्ये बरीच काटछाट झाल्यावर फक्त चार गाणीच दाखवत असत. ‘दुनिया तुम्हारी है तो हंसी रहेगी लबों पे’ हे खान मस्ताना व कांता कुमारीचे द्वंद्वगीत फारसे प्रसिद्ध झाले नाही.
जुन्या सिनेमांच्या दर्दी लोकांना भूदो अडवाणीबद्दल सांगण्याची गरज नाही. हा एक विनोदी नट, जो जागते रहो, श्री ४२० इत्यादी सिनेमांत बराच गाजला होता. त्यानेसुद्धा ‘कोई कब तक रहे अकेला’ हे एक चांगलेच गमतीदार गीत ज्योती व त्या काळचा गाजलेला नट प्रेम अदीब यांच्याबरोबर म्हटले होते.
१९४१ मधले गाजलेले ‘आयेंगे सजना आयेंगे मोरे द्वार’ हे ‘मिस रोज़्ा’चे माला फिल्ममधले गीत, ज्याला नौशाद यांचे संगीत दिग्दर्शन होते.
दक्षिण भारतात एके काळी सुप्रसिद्ध असलेली जीक्की व तलत महमूद यांचे १९५६ च्या गुल-ए- बाकावली या सिनेमातील ‘मेरा कहा है मेरा मन तो वो’ हे गाणे गोड चालीसाठी जितके प्रसिद्ध आहे तितकंच जीक्कीच्या गोड आवाजाबद्दलसुद्धा सिनेरसिकांच्या लक्षात राहते.
गप्पांच्या भरात किती गायक झाले ते मोजलेत का? शंभर ही संख्या तर केव्हाच पार झाली. पण अजून भूषण, बद्री, नीनू मजुमदार, कृष्ण गोयल, मीना मंगेशकर, उषा मंगेशकर, सुलोचना कदम, प्रेमलता, कृष्ण कल्ले, सुधा मल्होत्रा, कमल बारोट, सुरेन्द्र कोहली, कौमुदी मजुमदार, एस. बलबीर, खुर्शीद बावरा, रत्न गुप्ता, वत्सला कुमठेकर, मोहन्तारा, अहमद दिलावर, शीला, नादिरा, गुल रज़ा, अमर बॅनर्जी, प्रमोदिनी दीक्षित, नसीम अख्तर, उमराज़िया बेगम, बेला, रनों मुखेर्जी, ललिता देऊलकर, हुस्न बनू, कज्जन, बिब्बो, भानुमती, सुप्रिया सरकार, पारुल घोष, मीना कपूर, मीनल वाघ, मुबारक बेगम यांवर कोण लिहिणार?
शारदा (आवडो की न आवडो), श्यामा चित्तर, अमीरबाई कर्नाटकी, उषा तिमोथी, वाणी जयराम, सबिता चोधुरी, मीना पतकी, पुष्पा पागधरे, दिलराज कौर, मिनू पुरुषोत्तम, जयंत मुखर्जी (बीवी और मकान), जोगिन्दर, राम कमलानी (चालबाज) मधुबाला झवेरी यांना कधी न्याय मिळणार? ही यादी तर अजून अपुरीच आहे. हिऱ्याची अजून बरीच रत्ने आहेत.

Mahavikas Aghadi, Kapil Patil,
महाविकास आघाडीतील विसवंदामुळे भिवंडीत कपिल पाटील यांना कठीण पेपर सोपा?
व्यक्तिवेध : मीना चंदावरकर
family members
मनातलं कागदावर: साधू या सूरतालाशी लय!
lokmanas
लोकमानस: मौनामागचे रहस्य..

वर्गीकरण असे होऊ शकेल-
सिने कलाकार- राज कपूर, दिलीपकुमार, मधुबाला, मीना कुमारी, शबाना आझमी, नूतन, नलिनी जयवंत, रेखा, अमिताभ बच्चन, संजय दत्त, शोभना समर्थ, अशोक कुमार, लीला चिटणीस, दुर्गा खोटे, शांता आपटे, शांता हुबळीकर, प्रियांका चोप्रा, धनुष, सरदार अख्तर, हेमा मालिनी, विनोद मेहरा, मीनाक्षी, जोग, विष्णुपंत पागनीस, योगिता बाली
विनोदी कलाकार- सुंदर, मेहमूद, ओम प्रकाश, देवेन वर्मा, भुदो अडवाणी, अनुप कुमार, टून टून, असरानी, जॉनी व्हिस्की.
शास्त्रीय गायक- भीमसेन जोशी, पंडित जसराज, माणिक वर्मा, उस्ताद अमीर खान, पंडित डी. वी. पलुस्कर, फिरोज दस्तूर, एम. एस. सुबलक्ष्मी, रोशनआरा बेगम, परवीन सुलताना, वसंतराव देशपांडे, गुलाम मुस्तफा खान, किशोरी आमोणकर
ठुमरी गायक- शोभा गुर्टू, निर्मला देवी, लक्ष्मी शंकर, छाया गांगुली, भप्पी लाहिरी, आर. डी. बर्मन, एस. डी. बर्मन, सपन चक्रवर्ती, श्यामल मित्रा, चित्रगुप्त, रवी, मदन मोहन, एस.डी. बातीश, उषा खन्ना, सरदार मलिक.
प्रोडय़ुसर – पामेला चोप्रा
गजल गायक – मेहदी हसन, गुलाम अली, रुना लैला, जगजीत-चित्रा सिंह, अनुप जलोटा, तलत अझिझ, बेगम अख्तर, अमानत अली, फतेह अली, कमला झारिया, राजेंद्र मेहता, सिंह बंधू, भूपेंद्र .
गीतकार- आनंद बक्षी, प्रदीप, भरत व्यास.
कव्वाली- युसुफ आझाद, रशिदा खातून, शंकर शंभू, अज़्ाीज़्ा नाजां.
क्रिकेटर – ब्रेट ली,
इतर- विवियन लोबो, ठाकूर, प्रयाग राज.
गाण्यातले नुसते काही शब्द ज्यांनी उच्चारले- देव आनंद, सायरा बानू, वैजयंतीमाला.
रघुवीर नातू