News Flash

नवे कोरे स्मार्टफोन…

स्मार्टफोन ही आता सर्वसाधारण गोष्ट झाली आहे. गेल्या दोन वर्षांत भारतीय बाजारपेठ ही जगातल्या सर्वात मोठय़ा बाजारपेठांपैकी एक समजली जाते. मुख्यत: भारतीय बाजारावर सध्या नजर

| February 27, 2015 01:08 am

स्मार्टफोन ही आता सर्वसाधारण गोष्ट झाली आहे. गेल्या दोन वर्षांत भारतीय बाजारपेठ ही जगातल्या सर्वात मोठय़ा बाजारपेठांपैकी एक समजली जाते. मुख्यत: भारतीय बाजारावर सध्या नजर टाकल्यास आपणास असे लक्षात येते की, स्मार्टफोन्स त्यांच्या किमतीनुसार मुख्यत: तीन प्रकारांत विभागले गेले आहेत, ज्यामध्ये ५ ते १२ हजारांपर्यंत, १२ ते २० हजारांपर्यंत दुसरा गट आणि २० हजार त्यापेक्षा अधिक किमतीचे फोन असा साधारण तिसरा गट. 

या साऱ्यांतही सध्या भारतात पहिल्या गटात सर्वाधिक फोन विकले जातात आणि हीच बाजारपेठ काबीज करण्यासाठी सगळ्या नवनवीन कंपन्या आता आपापले फोन्स ५-१२ हजार रेंजमध्ये भारतीय बाजारात आणताना दिसत आहेत. याच रेंजमध्ये कमीत कमी किमतीत अधिकाधिक फीचर्स उपलब्ध करून देत मायक्रोमॅक्स कंपनीने भारतात आणि संपूर्ण जगात आपले वर्चस्व वाढविले आहे.
सध्या भारताच्या एकूण स्मार्टफोन्सच्या बाजारपेठेपैकी ३० टक्के बाजारपेठ एकटय़ा मायक्रोमॅक्स कंपनीच्या ताब्यात आहे. याचा फटका सोनीसारख्या मोठय़ा कंपन्यांना चांगलाच बसला आहे आणि सोनी कंपनीने त्यांचे स्मार्टफोन्स बनविणे बंद करण्याचे ठरविले आहे. याच
५ ते १२ रेंजमध्ये नुकतेच तीन वेगवेगळ्या कंपन्यांनी आपापले नवीन फोन्स बाजारात आणले आहेत. ते म्हणजे इंटेक्स अक्वा स्टार एच डी, मायक्रोमॅक्स कॅनव्हास ू, जीओनी मॅरेथोन एम -थ्री. त्यांच्या फीचर्सबद्दल, विश्वासार्हतेबद्दल, त्यांच्या कमी किमतीतील अधिक फीचर्स सेवेबद्दल या लेखात आपण चर्चा करणार आहोत.
बॅटरी बॅक-अपचा प्रश्न सुटणार ?
बॅटरी हा सध्या सर्व स्मार्टफोन्ससाठी ऐरणीवरचा प्रश्न होऊन बसला आहे. दिवसभर थ्रीजी नेटवर्कमध्ये इतर अ‍ॅप्लिकेशन्स वापरलीत, तर मोबाइल दिवसातून किमान २-३ वेळेस चार्ज करावा लागतो. ज्या वेळी हे तिन्ही मोबाइल त्या त्या कंपन्यांतर्फे बाजारात दाखल झाले तेव्हा आमचा मोबाइल बॅटरीचा प्रश्न सोडवेल अशी आश्वासने देत होता. मुळात तसे बदल या फोन्सच्या बॅटरीमध्ये करण्यात आलेले आहेत. इंटेक्सच्या अक्वा स्टार एचडीमध्ये 1800 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी साधारण स्मार्टफोन्सच्या तुलनेत 1500 mAh पेक्षा नक्कीच जास्त आहे, परंतु मायक्रोमॅक्सने एक पाऊल पुढे टाकत 3000 mAh ची बॅटरी कॅनव्हास मध्ये पुरविली जिची क्षमता दुप्पट आहे. जिओमीने साऱ्यांवर मात करीत 5000 mAh  ची बॅटरी दिली आहे जिची क्षमता प्रचंड जास्त आहे. कंपनी जरी दोन दिवसांच्या बॅकअपचा दावा करीत असली तरी या फोन्समध्ये साधारण आपल्याला दिवसभर व्यवस्थित थ्रीजी नेटवर्क मध्ये पुरू शकेल इतकी क्षमता नक्की आहे. त्यामुळे सतत चार्जिग करण्याचा प्रश्न या मोबाइलद्वारे नक्की सुटू शकतो.

कॅमेरा फीचर्स –
आपण जर कॅमेरा प्रेमी असाल, सेल्फी काढणे हा आपला छंद असेल आणि आपण १०-१२ हजारांपर्यंत मोबाइल पाहात असाल, तर इंटेक्स आपल्या साऱ्या अपेक्षा याच किमतीत नक्की पूर्ण करू शकते. १३ मेगापिक्सेल्स आणि उत्तम अशा रेझोल्युशन फीचर्ससह येणारा या मोबाइलचा प्रायमरी कॅमेरा नक्कीच इतरांपेक्षा सरस आहे. सोबतच असणारा ५ मेगापिक्सेल क्षमतेचा सेकंडरी कॅमेरा आपल्या सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंग अनुभूतीला नक्कीच समाधान देऊ शकतो. शिवाय याच्यामध्ये ऑटो फोकस, जीओ टॅगिंग, टच फोकस, फेस डिटेक्शन, पॅनरोमा , कन्टिन्युअस शॉट, एचडीआरसारखे उत्तम फीचर्सही आपणास उपलब्ध होतात ज्यामुळे आपण उत्तम फोटो घेऊ शकता. या मोबाइलच्या कॅमेराची व्हिडीओ रेकॉर्डिग क्षमताही उत्तम आहे. एकूणच कॅमेराच्या बाबतीत इंटेक्सचा मोबाइल इतरांच्या तुलनेत उजवा ठरतो.

हार्डवेअर आणि डिस्प्ले-
हार्डवेअरबाबत बोलावयाचे झाले तर तिन्ही फोन्समध्ये सारखेच हार्डवेअर पाहावयास मिळतात म्हणजे उदा. रॅम, इंटर्नल मेमरी इत्यादी बाजूला दिलेल्या तक्त्यामधून आपण हे पाहू शकता. डिस्प्लेच्या बाबतीतही काही बाबी सारख्या आहेत, फक्त कॅनव्हास ू हा मायक्रोमॅक्स मोबाइल यात थोडा वरचढ ठरतो, कारण या मोबाइलमध्ये साधारण एलसीडी डिस्प्ले न देता अ‍ॅमोलेड (AMOLED) प्रकारातील डिस्प्ले उपलब्ध करून दिला आहे. एलसीडी आणि अ‍ॅमोलेड (AMOLED) मध्ये मुख्य फरक सांगावयाचा झाला तर एलईडी टीव्ही आणि एलसीडी टीव्ही यांत जो फरक असतो तसाच काहीसा प्रकार येथेदेखील पाहावयास मिळतो. एलसीडीच्या तुलनेत काळा रंग दाखवू शकण्याची क्षमता अ‍ॅमोलेड (AMOLED) प्रकारच्या डिस्प्लेमध्ये जरा चांगली असते आणि ज्या डिस्प्लेमध्ये काळा रंग पूर्ण काळा पाहू शकतो तो डिस्प्ले आपणास उत्तम क्वालिटीचे चित्र दाखवू शकतो आणि शिवाय यामुळे बॅटरी मोठय़ा प्रमाणावर वाचविता येते. परंतु अ‍ॅमोलेड (AMOLED) प्रकारातील डिस्प्ले कमी ब्राइटनेस देतात ज्यामुळे उन्हात बऱ्याचदा आपल्याला स्क्रीन फार स्पष्टपणे पाहता येऊ शकत नाही, याचे उत्तर सुपर अ‍ॅमोलेड (AMOLED) प्रकारच्या डिस्प्लेमध्ये आपणास मिळते ज्यामध्ये अ‍ॅमोलेड (AMOLED) मधील दोष दूर करण्यात आलेला दिसतो. असा हा अ‍ॅमोलेड (AMOLED) डिस्प्ले आणि गोरील्ला ग्लाससह येणारा मायक्रोमॅक्सचा कॅनव्हास वू डिस्प्लेच्या बाबतीत चांगला फोन ठरू शकतो.

lp58

कितपत विश्वासार्ह?
मायक्रोमॅक्स हा ब्रँड आता भारतात चांगलाच परिचित झाला आहे आणि या कंपनीने आपल्या ग्राहकांना उत्तम सुविधा पुरविल्या आहेत, त्यामुळे या कंपनीचा फोन खरेदी करणे वाईट नक्कीच ठरणार नाही. नवीन कंपनीचा फोन आणि त्यातही चायना कंपनीचा फोन घ्यायचा म्हटला तरी आपल्याकडे सर्वात आधी नाकं मुरडली जातात, परंतु सध्याची परिस्थिती पाहता या कंपन्यांबाबत अगदीच अविश्वास दाखविणे मला योग्य वाटत नाही, याचे मुख्य कारण म्हणजे स्मार्टफोन ही अशी गोष्ट आहे की, तो कोणत्याही कंपनीचा असला तरी तो उत्तम चालेलच याची खात्री असतेच असे नाही. मी अ‍ॅपल आयफोनबद्दलही लोकांच्या तक्रारी ऐकल्या आहेत, त्यात सर्व कंपन्यांप्रमाणे या कंपन्यादेखील आपल्याला एक वर्षांची वॉरंटी देत असतात. कंपनी डिफेक्ट हा महत्त्वाचा मुद्दा नक्की असतो, परंतु सध्याची आकडेवारी पाहता सॅमसंग आणि मायक्रोमॅक्ससारख्या कंपन्यांच्या १०० पैकी कंपनी डिफेक्टचे प्रमाण ९ ते १६ टक्के आहे. त्यामुळे अशा वेळी इंटेक्ससारख्या स्मार्टफोन बाजारात इतरांच्या तुलनेने नवख्या असणाऱ्या कंपन्यांवर भरवसा करणे फार जोखमीचे आहे असे वाटत नाही. जिओनीबद्दल बोलावयाचे झाले तर जिओनी ही चायनीज स्मार्टफोन बाजारपेठेत सध्याची सर्वात मोठी कंपनी आहे, इतकी की सॅमसंग, मायक्रोमॅक्स, आयफोनदेखील त्यासमोर कोठेच नाही. आकडेवारीत बोलावयाचे झाले तर सध्या चायनीज बाजारपेठेत ५० टक्क्यांपर्यंत वर्चस्व हे फक्त जिओमी या एकटय़ा कंपनीचे आहे. भारतात नवीन असली तरी लवकरच भारतीय बाजारपेठेवरही असेच वर्चस्व गाजवू अशी आशा कंपनीच्या भारतीय प्रमुखांनी व्यक्त केली आहे. फक्त ऑनलाइन शॉपिंग त्यामुळे आउटलेटवर होणारा खर्च वाचतो, तसेच जिओमीसारखे मोबाइल्स तर आपल्याला आधी बुक करावे लागतात, मगच ते तयार करून आपणास पोहोचवितात. यामुळे कंपनीचे खूप मोठय़ा प्रमाणावर पैसे वाचतात ज्यामुळे या फोन्सची किंमत कमी असते. आपण खरोखर मोबाइल खरेदी करणार असाल तर या नवीन कंपन्यांचे मॉडेल्स तपासावयास हरकत नाही.
प्रशांत जोशी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2015 1:08 am

Web Title: new smartphone
टॅग : Smartphone,Technology
Next Stories
1 महागडा, पण बहुपयोगी…
2 नव्या जुन्याचे मिश्रण…
3 टीव्ही घेताना…
Just Now!
X