मळवाट ही ‘पळवाट’च नसते का? ‘त्या’ रस्त्याने सगळेच जातात. फार सोपे असते ते. प्रवाहाच्या विरोधात जाण्यात वेगळी चमक, धमक दिसते. नर्सिगच्या एका कॉलेजात एकच ‘मेल नर्स’ दिसायचा. मात्र मजेत असायचा. इतक्या पोरींबरोबर असताना त्याचे थोडे अधिक लाडही होत असतील. मुंबईला महिलांच्या ‘अय्या’ कॉलेजात मी स्वत: दीर्घकाळ नोकरी केली. मित्र म्हणायचे, ‘‘काय म्हणतंय तुझं गोकुळ.’’ स्त्रीकडे ‘व्यक्ती’ म्हणून पाहण्याची दृष्टी असेल, तर मित्र काय आणि सहकारी मैत्रीण काय, कितीसा फरक पडतो?
‘डान्सर’ म्हणजे तो ‘नाच्या’च असणार अशी विकृत नजर कशासाठी? मर्दही नाचतात की! शिवाय मर्दपणा म्हणजे काय? देशाची लोकसंख्या वाढवणे? शुक्रजंतूंच्या नळकांडय़ा वापरणे? एखादा दुबळा जीव भेटला तर(च) आठ-दहा जणांनी मिळून त्याला धोपटणे, बिनविषारी साप ठेचणे? तोंडात शिव्याच शिव्या असणे? लंपटपणा करत उन्हात रिकामटेकडे भटकणे? व्यसनावर व्यसने करणे? पुरुषार्थाच्या तुमच्या कल्पनाच किती पोकळ आणि व्यक्तिमत्त्व पोखरणाऱ्या आहेत बघा! यापेक्षा वेगळे जीवन सौम्य-सभ्यपणे जगणारे, अजिबात ओंगळ नसलेले पुरुषही बायकांना आवडतात हे तुम्हाला कुणी सांगितलेलं दिसत नाही. क्रिकेटची क्रेझ असताना ती ‘नशा’ टाळून मल्लखांबाला महत्त्व देणारा तेजस्वी कुमार वयाने लहान असूनही मला ‘आदरणीय’ वाटतो. इंग्रजी, अर्थशास्त्र, मानसशास्त्र अशा विषयांना (च) जॉब मिळतो अशी शैक्षणिक अंधश्रद्धा जेव्हा फार होती, अशा काळात ‘संस्कृत’ हा विषय एकटय़ाने झेपवून पदवीधर झालेला माझा तेव्हाचा प्रिय क्लासमेट रामकृष्ण मालाडकर मोठा अधिकारी झालाच की!
धाडस, धैर्य हे उपजतच असते की? तसेच असावे. ‘माझ्या गावात मी ‘अंधश्रद्धा निर्मूलना’ची शाखा सुरू करणारच! फार गरज आहे त्याची! म्हणणारा नवजवान कौतुकाला पात्र ठरायला हवा.
‘लिव्ह इन’चे साहस, आंतरजातीय विवाह, एखाद्या मुलीला अनैतिक व्यवसायातून बाहेर काढून तिच्याशी चक्क लग्न, एक मूल असताना गरीब बाळाचे कल्याण करण्यासाठी दुसरे दत्तक घेणे किंवा या प्रदूषित व्यवस्थेत मूल होऊच न देणे.. हे असे धाडस करणारे लोक खरे ग्रेट! त्यांना सलाम!

‘वाचक लेखक’ या सदरासाठी लेख पाठवताना मेल अथवा पाकिटावर ‘वाचक लेखक सदरासाठी’ असे स्पष्टपणे नमूद करावे. आमचा पत्ता: लोकप्रभा, प्लॉट नं. ईएल-१३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई-४००७१० फॅक्स : २७६३३००८ Email – response.lokprabha@expressindia.com

Netanyahu
अग्रलेख: मिरवण्याच्या मर्यादा!
navi mumbai police open gym marathi news
नवी मुंबई: सीबीडी पोलीस ठाण्यात ओपन जिमसह छोटेखानी कोर्ट, कामाच्या तणावात काही क्षण विरंगुळ्यासोबत व्यायामही 
Death of two brothers
पाण्याच्या टाकीत पडून दोन भावांचा मृत्यू: दाम्पत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना लगेचच झोपडीवरही कारवाई, न्यायालयाने घेतली दखल
will Andheri Subway under water this year too work of widening of Mogra drain will be done next year
‘अंधेरी सबवे’ यंदाही पाण्याखाली? मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचे काम पुढच्या वर्षीच