मी विचार करू लागलो की, त्याला पुन्हा भेटल्यानंतर तो मला कसा वाटणार आहे,- पूर्वीसारखाच आनंदी, विनोदी आणि गमतीदार की खेडेगावात इतकी वर्षे राहिल्यामुळे बनलेला एक बुद्धिहीन ठोंब्या?

माझा मित्र सायमन रादेव्हिन याला मी जवळजवळ पंधरा वर्षांनी भेटणार होतो. एकेकाळी तो माझा जिगरी दोस्त होता. आम्ही एकमेकांशी अगदी मोकळय़ा मनाने यथेच्छ गप्पा करीत असू आणि आपली सर्व खाजगी गुपितेसुद्धा खुशाल सांगत असू. आमची अगदी जोडी होती, नेहमी एकत्र भटकायचो, विचार तसेच करायचो, आमच्या पुस्तकांच्या व इतर आवडीनिवडी पण त्याच होत्या. नुसत्या नजरभेटीने आम्हाला एकमेकांचे अंतरंग ओळखू यायचे.
एके दिवशी अचानक बातमी आली की त्याचे लग्न जमले. आणि तेसुद्धा नवरा शोधण्यासाठी पॅरिसला आलेल्या एका गांवढळ मुलीशी. ती एक बावळट, दिसण्यात अत्यंत साधारण आणि किरकिरा आवाज असलेली मुलगी होती. सायमन इतका हुशार आणि देखणा नवरा तिने कसा पकडला हे खुद्द ब्रह्मदेवालासुद्धा सांगता आले नसते. खरे म्हणजे त्याला हुशार, साधी, शांत व घरेलू वधू मिळायला हवी होती. लग्नाच्या वेळी त्याला कल्पना नसणार की त्या मुलीशी त्याच्यासारख्या रसरशीत युवकाने लग्न केल्यास त्याचे जीवन लवकरच कंटाळवाणे होणार आहे! मी विचार करू लागलो की, त्याला पुन्हा भेटल्यानंतर तो मला कसा वाटणार आहे,- पूर्वीसारखाच आनंदी, विनोदी आणि गमतीदार की खेडेगावात इतकी वर्षे राहिल्यामुळे बनलेला एक बुद्धिहीन ठोंब्या? कारण पंधरा वर्षांत माणूस खूप बदलू शकतो.
माझी गाडी एका छोटय़ा स्टेशनवर थांबली आणि मी तेथे उतरलो. तोच एक ढेरपोटय़ा माणूस लगबगीने माझ्याजवळ येऊन उद्गारला, ‘‘जॉर्ज.’’ आणि त्याने मला मिठी मारली. त्याला आलिंगन देत मी उत्स्फूर्तपणे उत्तर केले, ‘किती वाळला आहेस रे तूं?’ खरे म्हणजे त्या क्षणी मी त्याला ओळखलेले नव्हते. त्यावर तो हसून म्हणाला, ‘माझ्याबद्दल तू कल्पना तरी काय केली होतीस? मजेत जगणे, चांगलेचुंगले खाणे आणि सुखद रात्री! हाच दैनंदिन कार्यक्रम असल्यास माणसाचे दुसरे काय होणार?’ मी त्याच्याकडे निरखून पाहू लागलो. त्याच्या चेहऱ्यावर ओळखीची काही लक्षणे दिसतात का हे मी बघू लागलो, पण ती काही केल्या मला दिसेनात. मी स्वत:शी म्हणालो, चेहरा हे माणसाच्या मनाचे प्रतिबिंब असेल तर त्याच्या डोक्यात पूर्वीचे विचार, जे मी सहज ओळखू शकत होतो, ते आता येत नसले पाहिजेत. त्याच्या डोळय़ात सुखाचे व मैत्रीचे तेज होते हे नक्की, पण जिच्यामुळे माणसाच्या बुद्धीचा अंदाज येतो ती पूर्वीच्या हुशारीची झलक त्याच्यात नव्हती. ‘ही माझी मुले’ तो एकदम मला म्हणाला. त्यांच्यामध्ये एक चौदा वर्षांची मुलगी होती व शाळेच्या गणवेषातील तेरा वर्षांचा एक मुलगा होता. दोघेही जरा कचरतच माझ्यापुढे आली. दबलेल्या स्वरात मी त्याला म्हणालो, ‘ही मुले तुझी आहेत का रे?’ ‘हो’’ तो हसत म्हणाला. ‘तुला किती मुले आहेत?’ मी विचारले. ‘पाच. उरलेली तिघे घरी आहेत.’ त्याने हे उत्तर अभिमानाने व स्वत:वर खूश असल्यासारखे दिले. त्यावर मला त्याची दया आली आणि माझ्यात त्याच्या त्या प्रजननाच्या कामगिरीमुळे त्याच्याबद्दल थोडी तुच्छतेची भावना निर्माण झाली.
मला घरी नेण्यासाठी त्याने एक घोडागाडी आणली होती. गाडी हाकायला तोच बसला होता. आम्ही सर्वजण तिच्यात चढून बसलो व गाडी निघाली. त्या खेडय़ातल्या रस्त्यावर वाहतूक म्हणजे दोन चार कुत्री आणि काही कामकरी बाया एवढीच दिसली. दोन्ही बाजूला मधूनमधून छोटी टपरीसारखी दुकाने दिसली. गाडी तेथून जाताच दुकानदार सायमनला सलाम करायचे आणि त्यांचे अभिवादन परतफेड करताना सायमन त्यांची नावे मला सांगायचा. सगळा गाव आपल्याला ओळखतो अशी छाप माझ्यावर मारण्यासाठी हे त्याने बहुतेक केले असावे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीस उभे राहण्याचा त्याचा उद्देश आहे की काय असा विचार माझ्या मनाला चाटून गेला. लवकरच गाव मागे पडला आणि आम्ही बागेसारख्या वाटणाऱ्या एका आवारात शिरलो. आतमधल्या किल्लेवजा वाटणाऱ्या एका घरासमोर गाडी थांबली.

98 year old man's reunion with younger brother
सुरकुतलेल्या चेहऱ्यावर उमटलं गोंडस हसू! ९८व्या वर्षी धाकट्या भावाला पुन्हा भेटले आजोबा, पाहा सुंदर Photo
father beaten
वसई : मुलीचे अपहरण केल्यानंतर पित्याला बेदम मारहाण, नया नगर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा
A layer of Water Hyacinth due to pollution in the river saved the life of a young woman who committed suicide
तरुणीने आत्महत्या केली, पण जलपर्णीने वाचवले; ग्रामस्थांनी वेळेत मदत केल्याने तरुणी सुखरूप
A minor girl commits suicide due to not being able to bear the pain of menstruation Mumbai
मुंबई: मासिक पाळीचा त्रास सहन न झाल्याने अल्पवयीन मुलीची आत्महत्या

सायमन हात चोळीत म्हणाला, ‘‘हं! आता तू गंमत पाहशील.’’ मुलांच्या लक्षात आले की, आजोबांचा खादाड स्वभाव पाहुण्यांना आता दिसणार, म्हणून ते सर्वजण हसू लागली.

‘‘ही माझी गुहा’’ सायमन म्हणाला. मी त्याचे अभिनंदन करेन अशी त्याचे अपेक्षा असावी. मी त्याची निराशा केली नाही. ‘वा! काय सुंदर घर आहे!’ मी उद्गारलो.
आमच्या स्वागताला एक स्त्री पोर्चच्या पायऱ्यावर आली. पाहुण्याच्या स्वागतासाठी तिने केशभूषा व वेशभूषा केली होती आणि स्वागतपर शब्दांची उजळणी करून ती पुढे झाली हे माझ्या लक्षात आले. पंधरा वर्षांपूर्वी लग्नात पाहिलेल्या त्या गबाळय़ा मुलीचे रूपांतर आता एका जाडजूड निरस महिलेत झाले होते. साधारण गृहिणीत असलेले आवश्यक गुण म्हणजे चटपटीतपणा व अगत्य असे काहीच तिच्यात दिसत नव्हते. एक निर्बुद्ध, लठ्ठ व मोठय़ा पिलावळीला जन्म देणारी स्त्री अशी प्रतिमा तिच्याबद्दल माझी झाली. तिने माझे स्वागत केले व तिच्याबरोबर मला हॉलमध्ये नेले. तेथे ती उरलेली तीन मुले लाईनबंद अशी माझ्या स्वागतासाठी उभी होती. जणू काही मला लष्करी मानवंदना घ्यायची होती.
‘झ्यां, सोफी आणि गोंत्रान’ सायमनने मोठय़ा खुशीने त्यांची माझ्याशी ओळख करून दिली. दिवाणखाण्याच्या बाजूला दरवाजा उघडला गेला. मी आत गेलो. पाहतो तो एका आरामखुर्चीत कोणीतरी थरथरणारी व्यक्ती बसलेली आहे. अर्धागामुळे ती उठू शकत नाही हे माझ्या लक्षात आले. तोच रादेव्हिन पुढे झाल्या व मला म्हणाल्या,
‘हे माझे आजेसासरे. त्यांचे वय ८७ आहे.’ आणि मग त्या आजोबांच्या कानात जवळजवळ ओरडल्याच, ‘आबा, हे सायमनचे मित्र आलेत.’ म्हाताऱ्याने माझ्या स्वागतपर काही शब्द उच्चारण्याचा प्रयत्न केला असावा, पण मला ‘वा, वा, वा’ हे शब्दच ऐकू आले.
‘आपल्याला भेटून मला खूप आनंद होतोय,’ जवळच्या खुर्चीत बसत मी म्हणालो. इतक्यात सायमन तेथे आला आणि हसून म्हणाला,
‘‘अच्छा! म्हणजे तुझी आबांशी ओळख झाली आहे. हा म्हातारा म्हणजे एक रत्न आहे. मुलांचे तर ते खेळणे आहे. तो खादाड तर इतका आहे की प्रत्येक जेवणानंतर त्याला अजीर्ण होईल की काय अशी आम्हाला भीती वाटते. त्याच्या मनासारखे त्याला खाऊ दिले तर तो किती खाईल सांगता येत नाही. पण मी जास्त कशाला बोलू? तू आता पाहशीलच. गोडावर तर त्यांची विशेष वासना! अशी गमतीदार व्यक्ती तू पाहिली नसशील पण आता लवकरच पाहशील.’’
सायमनने नंतर वरच्या मजल्यावरची माझी खोली मला दाखवली. जिन्यावर गडबड कसली चालली आहे म्हणून मागे वळून पाहतो, तो सायमनची सर्व पिलावळ त्याच्या मागोमाग आली होती, अर्थात माझ्या स्वागतासाठी. माझ्या खोलीच्या खिडकीतून बाहेर पाहतो तो अथांग दर्यासारखी गव्हाची सपाट शेतजमीन दिसत होती. कुठे एक झाड नाही की टेकाड नाही. सायमनच्या निरस जीवनाचे प्रतीक जणू! काही वेळाने खाली घंटा वाजली, ती जेवणासाठी होती. म्हणून मी खाली भोजनकक्षात गेलो. रादेव्हिन मला माझ्या आसनापर्यंत घेऊन गेल्या. एका नोकराने आजोबांना त्यांच्या चाकाच्या खुर्चीतून त्यांना त्यांच्या स्थानावर नेले. बसल्या बसल्याच आजोबांची नजर टेबलावरील सर्व पदार्थावर भिरभिरू लागली. आणि विस्फारलेल्या डोळय़ांनी ते एकामागून एक वस्तू विशेषत: गोडाचे पदार्थ न्याहाळायला लागले.
सायमन हात चोळीत म्हणाला, ‘‘हं! आता तू गंमत पाहशील.’’ मुलांच्या लक्षात आले की, आजोबांचा खादाड स्वभाव पाहुण्यांना आता दिसणार, म्हणून ते सर्वजण हसू लागली. त्यांच्या आईने खांदे उडवून नुसतेच स्मित केले. आपल्या हातांची तुतारी करीत तिच्यातून सायमन ओरडला, ‘आज तांदळाची खीर आहे.’ त्याबरोबर सुरकुतलेल्या चेहऱ्याच्या म्हाताऱ्याच्या तोंडावर एकदम तेज आले आणि अंग थरथरत असता ‘हे समजले आहे’ असे दर्शवून त्याने आपला आनंद व्यक्त केला. जेवणास सुरुवात झाली.
‘आता मजा पाहा हं.’ सायमन हळूच बोलला. आजोबांना खूप आवडत नव्हते असे दिसले, कारण नोकर त्यांचे सूप त्यांना चमच्याने भरवीत असता ते ते थुंकू लागले. त्यामुळे टेबल खराब होऊ लागले. काही शिंतोडे मुलांच्यापर्यंतही आले. त्यामुळे त्यांना गंमत वाटली आणि त्यांचा बाबा म्हणाला, ‘पाहा कसा मजेदार आहे आमचा म्हातारा!’ अशा रीतीने जेवणाचा सर्व वेळ म्हाताऱ्यामध्ये गेला. तो सतत निरनिराळय़ा प्लेटस निरखून पाहत असे आणि थरथरत्या हातांनी त्या ओढण्याचा प्रयत्न करीत असे. तर बाकीची मंडळी त्या प्लेट्स त्याच्या हाती न लागतील इतक्या त्याच्याजवळ आणीत व त्या घेण्याच्या त्याच्या प्रयत्नांना हसत. नंतर त्यांनी एक लहानसा घास त्याच्या प्लेट्समध्ये टाकला, तेव्हा पदार्थ आणखी मिळावा या उद्देशाने त्याने तो अधाशासारखा बकाबक खाऊन फस्त केला. खीर आल्याबरोबर तर म्हाताऱ्याने कमाल केली. त्याने खुर्चीवरून उठण्याचा प्रयत्न चालवला. त्यावेळी धाकटे कारटे गोंत्रान आजोबांना म्हणाले, ‘‘खूप झालं हं! आजोबा, तुम्ही आत्तापर्यंत भरपूर खाल्ले आहे. आता तुम्हाला जास्त मिळणार नाही.’’ तेव्हा म्हातारा अक्षरश: रडू लागला आणि थरथरा कापू लागला. शेवटी मुलांनी त्यांना थोडीशी खीर दिली. पुडिंग खाताना त्यांनी त्याचा मोठा तुकडा गिळताच जे मजेदार आवाज केले, त्यांनी सर्वाना मोठी मोठी मौज वाटली. ते पुडिंग जास्त मिळावे म्हणून म्हातारा दोन्ही पाय जमिनीवर आपटू लागला.
मला हा प्रकार अगदी पाहवेना. त्यावेळी ग्रीक पुराणातल्या तहानेल्या टँटेलसच्या कथेची मला आठवण झाली. त्याला पाण्यात उभा केला होता आणि तहानेने पाणी प्यायला जेव्हा तो वाकायचा, तेव्हा पाणी आणखी खाली जायचे व त्याला पाणी पिणे अशक्य व्हायचे. शेवटी मी म्हणालो, ‘द्या ना त्यांना थोडे पुडिंग.’ पण सायमन लगेच उत्तरला, ‘नको रे बाबा! त्यांनी जास्त खाल्ले तर या वयात त्यांना काहीतरी होईल’ त्यावर मी गप्प झालो, आणि विचार करू लागलो. ‘वा! किती म्हाताऱ्याबद्दल यांना काळजी! केवढे दुसऱ्यावरचे प्रेम! आणि काय यांचे तर्कशास्त्र! आणि सुज्ञपणा त्यांच्या त्या वयात’ असे म्हणून त्या म्हाताऱ्याचा आनंद मिळविण्याचा जो एकमेव मार्ग होता तोच ते बंद करीत होते. कशासाठी तर त्यांच्या प्रकृतीसाठी! ती प्रकृती घेऊन त्या दीनवाण्या थरथरणाऱ्या स्थितीत तो काय करणार होता? ते त्यांची काळजी घेत होते असे त्यांचे म्हणणे! त्याचे आयुष्य! आता किती दिवस उरले होते? दहा? पन्नास? की शंभर? कशासाठी हा आटापिटा! का त्यांच्या अधाशीपणाची तथाकथित गंमत आणखी काही काळ टिकवण्यासाठी? त्याच्या जीवनात आता काहीही सुख उरलेले नव्हते. खाण्याचे एकमेव सुख त्यांच्यासाठी उरलेले होते. ते त्याला का नाही द्यायचे? म्हणजे त्याच्या जीवनाचा अंत थोडा तरी सुखमय होईल.
जेवणानंतर काही काळ सर्वाबरोबर पत्ते खेळण्यात घालवल्यानंतर मी माझ्या खोलीत झोपायला गेलो. संध्याकाळपासून मी त्या दु:खी वातावरणात बुडून गेलो होतो. झोप येईना. शेवटी मी खिडकीजवळ बसलो. दूरवर कोणा एका पक्ष्याचे गुंजन चालू होते. बहुतेक अंडय़ावर बसलेल्या आपल्या पक्षिणीला तो अंगाईगीत म्हणून दाखवीत असेल. त्यावेळी माझ्या मनात सायमन काय करीत असावा हा विचार आला. बहुतेक आपली पाच मुले व पत्नी यांच्याबरोबर घोरत पडलेला असावा.