आदित्य बिवलकर – response.lokprabha@expressindia.com
ऑनलाइन शॉपिंग आणि डिजिटल स्टोअर्सकडून स्वातंत्र्य दिनाच्या आसपास वेगवेगळ्या सेल्सची घोषणा केली जाते. ४० ते ५० टक्के डिस्काऊंट, मोठय़ा ऑफर्स, आकर्षक बक्षिसे अशी अनेक आकर्षणे यामध्ये असतात. मात्र प्रत्यक्षात अनेकदा या अशा ऑनलाइन सेलमधून ग्राहकांना फसवणुकीचे अनुभवसुद्धा येतात. त्यामुळे डिजिटल व्यासपीठावर होणारे हे भव्य सेल खरोखरच सेल आहेत की फेल असा प्रश्न निर्माण होतो. अशा सेलमध्ये योग्य वस्तू कशा निवडाव्यात आणि फसवणूक कशी टाळावी याचा आढावा.

बंपर ऑफर्स, मोठय़ा प्रमाणावर डिस्काऊंट्स, स्वस्त किमती यांसारख्या गोष्टींनी लोक ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरच्या सेलकडे आकर्षित होतात. मात्र या ऑनलाइन शॉपिंगच्या पसाऱ्यात घेतलेल्या वस्तू घरापर्यंत पोहोचल्याच नाहीत असा अनुभव कधी कधी ग्राहकांना येतो. कित्येकदा सेलमध्ये घेतलेल्या वस्तूंसाठी एक एक महिनासुद्धा वाट बघावी लागते. मोठय़ा प्रमाणावर होणारी विक्री आणि ऑफर्समुळे ग्राहकांनी केलेली भरपूर खरेदी यामुळे वितरण करताना अधिक वेळ जातो. चुकीच्या प्रॉडक्ट्सची डिलिव्हरी, आयत्या वेळी ऑर्डर्स रद्द होणे, शिपिंगला उशीर, कमी प्रतीचे प्रॉडक्ट्स असेही ग्राहकांचे अनुभव आहेत.

Looking For mid range Good smartphone with Best Long stellar battery life Check Out These Five Options
फक्त एकदाच चार्ज करा; बेस्ट बॅटरी लाईफ असणारे ‘हे’ पाच स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदी करा; संपूर्ण यादी पाहाच
Tesla Robotaxi launches on August 8
एलॉन मस्कने खेळला नवा गेम! टेस्लाच्या ‘या’ नव्या कारला आणतेय बाजारात, ऐकताच बाकी कंपन्यांना फुटला घाम
Robert Dennard
चिप-चरित्र : ‘मेमरी चिप’ क्षेत्राची पायाभरणी
mutual funds
SEBI ने म्युच्युअल फंडांना विदेशी ETF मध्ये गुंतवणूक करण्यापासून रोखले, आता नवे पर्याय काय?

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ऑगस्ट महिन्यात दरवर्षी मोठय़ा प्रमाणावर वेबसाइट आणि पोर्टल्स सेल आयोजित करतात. यामध्ये सगळ्याच ऑनलाइन पोर्टल्सकडून ऑफर्सची खैरात केली जाते. ऑफर वेगवेगळ्या असल्या तरीही कोणतीही वस्तू विकत घेत असताना त्याची बाजारामध्ये किंमत काय आहे, त्याला मागणी किती आहे त्याचबरोबर ग्राहकांचे अभिप्राय कसे आहेत याचा अभ्यास करण्याची गरज आहे. अनेकदा ग्राहक ऑनलाइन वेबसाइटवरील अभिप्राय आणि किंमत बघून चटकन खरेदी करतात. मात्र त्याच्याच बरोबरीने प्रत्यक्ष बाजारपेठेचा अभ्यास करण्याची गरज आहे. सेलमध्ये मोठी ऑफर दिसली म्हणून खरेदी करण्यापेक्षा अभ्यास करून मग ती केल्यास फसवणूक टाळता येईल.

जाहिराती मोठय़ा, वस्तू थोडय़ाच…

कोणताही मोठय़ा कंपनीचा ऑनलाइन सेल असेल तर त्यासाठी मोठय़ा प्रमाणावर जाहिराती केल्या जातात. त्यामध्ये अनेक वस्तू दाखवल्या जातात पण प्रत्यक्षात मात्र त्यानुसार त्या मिळतातच असे नाही. हव्या असलेल्या वस्तू या सेलमध्ये उपलब्धच नसल्याचा अनुभव ग्राहकांना येतो. ब्रॅण्डेड वस्तूंच्या खरेदीवरील ऑफर्स मर्यादित असतानाच ऑफर असलेल्या उत्पादनांचे वितरणच होत नाही.

त्यातच सर्व कंपन्यांच्या अटी आणि रिफंड पॉलिसी वेगवेगळ्या असतात. त्यामुळे उत्पादन न आवडल्यास ते परत करण्याची सोयसुद्धा मर्यादित असते. त्यामुळे अनेकदा ग्राहकांचे पैसेसुद्धा वाया जातात. त्याचबरोबर सेलमध्ये एक उत्पादन मागविल्यानंतर वेगळ्याच रंगाचे किवा कंपनीचे उत्पादन ग्राहकांना मिळते, असेही होते.

गुणवत्तेत फरक

ऑनलाइन वेबसाइट्सवर दाखवलेली उत्पादने आणि प्रत्यक्ष आलेली उत्पादने यामध्ये कधी कधी प्रचंड तफावत असते. बऱ्याचदा सेलमध्ये कपडय़ांच्या बाबतीत हा अनुभव अनेक ग्राहकांना येतो. रंग किंवा कपडय़ांचा दर्जा यामध्ये तफावत असल्याचे अनेकदा दिसते. त्याचबरोबर अशा वस्तूंसाठी रिफंड देण्याऐवजी रिटर्नचा पर्याय असतो, त्यामुळे नाइलाजाने त्या ऑनलाइन स्टोअरमधूनच त्याच रकमेची खरेदी करावी लागते. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या बाबतीतसुद्धा ग्राहकांच्या पदरी निराशा होताना दिसते. अनेकदा वापरलेल्या वस्तू नीटनेटक्या करून सेलमध्ये विक्री केल्या जातात आणि त्याबद्दलची माहिती गोपनीय ठेवली जाते. ग्राहकांना या गोष्टी उशिराने लक्षात येतात. त्यामुळेच कपडे किंवा कोणत्याही ब्रॅण्डेड वस्तू विकत घेताना ऑनलाइन अधिकृत वेबसाइटवर माहिती तपासून घेणे आवश्यक असते. वेबसाइटवर अधिकृत विक्रेते तसेच विक्री करणाऱ्या वेबसाइट यांची माहिती असते. त्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता कमी असते.

ठरावीक उत्पादनांनाच सवलत

एकीकडे सेलच्या निमित्ताने मोठय़ा प्रमाणावर ५० ते ८० टक्के सवलत असल्याची जाहिरात करण्यात येत असली, तरीही प्रत्यक्षात मात्र ज्या ब्रॅण्डची मागणी कमी आहे त्यांच्यावरच सवलत असल्याचा अनुभव ग्राहकांना येतो. याचबरोबर अनेक इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेसची किंमत वाढवून त्यावर ५० टक्के सवलत असं काही वेबसाइट दाखवत होत्या. प्रत्यक्ष बाजारात मात्र त्याच वस्तू कोणत्याही सवलतीशिवायसुद्धा त्याच दरात उपलब्ध असतात. त्यामुळे केवळ आकर्षित करण्यासाठी अशा ऑफर्स ग्राहकांना दिल्या जात असल्याचे स्पष्ट होते.

तर तक्रार करा :

ऑनलाइन शॉपिंगसंबंधित वेबसाइट्समधील फसवणुकीसंदर्भातील बऱ्याच गोष्टी पुढे येतात. त्याबद्दल रीतसर तक्रारीची नोंदणी केल्यास त्याची छाननी करून कारवाई होऊ शकते. मोठय़ा प्रमाणावरील जाहिरातबाजी, प्रसिद्धी करून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केल्यानंतर संबंधित कंपन्यांना ग्राहकांना वेळेवर सेवा पुरवणे अनेकदा शक्य होत नाही. यातूनच चुकीची डिलिव्हरी, उशिराने ऑर्डर्स मिळणे, डिफेक्टिव्ह ऑर्डर्स मिळणे यांसारख्या गोष्टी घडतात. याची ग्राहक मंचाकडे तक्रार करता येते. प्रत्येक ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटची डिजिटल टीम असते. त्यांच्याकडे समाजमाध्यमांच्या मदतीने तक्रार नोंदविल्यास त्याची कंपनीच्या वतीने दखल त्वरित घेतली जाते.

फेसबुक, इन्स्टावरही खबरदारी आवश्यक

फेसबुक मार्केटप्लेस आणि इन्स्टाग्राम बिझनेसमधूनसुद्धा सेलच्या नावाखाली फसवणूक होत असल्याचे अनुभव हल्ली ऐकायला मिळतात. फेसबुक मार्केटप्लेस तसेच इन्स्टाग्रामद्वारे ग्राहकांना फोटो दाखवून वस्तूंची विक्री केली जाते. मात्र काहीवेळा पेमेंट झाल्यावर ग्राहकांना ब्लॉक केल्याच्या घटना घडतात. डिजिटल स्टोअर्समध्येही अशी फसवणूक होते. त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊनच या माध्यमांमधून खरेदी केली पाहिजे. शक्यतो  अधिकृत विक्रेत्यांच्या माध्यमातूनच खरेदी करावी.

ऑनलाइन खरेदी करताना…

  • योग्य ब्रॅण्ड बघून आणि त्या वस्तूची दुकानातील खरी किंमत बघूनच खरेदी करा.
  • कंपनीच्या रिफंड पॉलिसीची माहिती घ्या.
  • एक्स्टेंडेड वॉरंटी इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट असेल तर नक्की घ्या.
  • तक्रार असल्यास कंपनीच्या हेल्प आणि सपोर्टकडे ती नोंदवा.
  • सेलमधील गोष्टींचा नीट अभ्यास करून, त्यासंदर्भातील प्रतिक्रिया वाचून मगच मागणी नोंदवा.