सौरभ कुलश्रेष्ठ – response.lokprabha@expressindia.com

करोनाच्या साथीमुळे लागू झालेल्या टाळेबंदीने जगाला कधी नव्हे ते जखडून ठेवले. भारतात टाळेबंदी लागू होऊन आता पाच महिने उलटले. या कालावधीत करोना रुग्णांची संख्या काही नियंत्रणात आली नाही, पण त्यामुळे जीवनव्यवहारांवर लागू झालेल्या र्निबधांमुळे आता लोकांचा संयम मात्र संपत चालला आहे. राज्यात आतापर्यंत करोनाबाधित झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७ लाख ३३ हजार असून सध्या १ लाख ७८ हजार रुग्ण उपचाराधीन आहेत, तर आजवर २३ हजार ४४४ जणांना करोनामुळे जीव गमवावा लागला. मात्र आता या आकडय़ांची जनमानसावरील दहशत संपली असून आणखी शिथिलता द्यावी अशी मागणी सुरू झाली आहे. त्यातूनच आता प्रार्थनास्थळे सुरू करण्याच्या मागणीवरून राज्य सरकार व विरोधी पक्ष व त्यासह धार्मिक संघटना यांच्यात संघर्ष होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

‘पुनश्च हरी ओम’ म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक जूनपासून राज्यात शिथिलतेचे पर्व सुरू के ले खरे, पण त्या काळात मुंबई महानगर परिसर, औरंगाबाद, पुणे येथे रुग्णसंख्या वाढल्याने जून अखेरीस टाळेबंदीचे नवे पर्व सुरू करण्याची वेळ आली. जुलै महिन्यात राज्यभर विविध महानगरांत टाळेबंदी कठोर झाली. आता ऑगस्टमध्ये जनजीवन थोडे सुरळीत होऊ लागले आहे. पण त्याचबरोबर करोनाचे रुग्ण सापडण्याचे प्रमाणही वाढते आहे. राज्यात गुरुवारी २४ तासात १४,७१८ नव्या रुग्णांचे निदान झाले व ३५५ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. राज्यात सध्या १ लाख ७८ हजार रुग्णांवर उपचार सुरू असून त्यापैकी सर्वाधिक ४६ हजार १२४ रुग्ण हे पुणे जिल्ह्य़ातील आहेत. ठाणे जिल्ह्य़ात २०,२३३, मुंबईत १९,४६३, नाशिकमध्ये १०,५२४, नागपूरमध्ये १०,३१५ रुग्ण उपचार घेत आहेत. दिवसभरात सापडलेल्या रुग्णसंखेत मुंबई १३५० रुग्णांसह अद्याप पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र आता चिंता आहे ती ग्रामीण भागात वाढत असलेल्या रुग्णांची. जळगाव ६०३, सातारा ५३२, नगर जिल्हा ६०० रुग्ण आढळले आहेत. सोलापुरातही शहरातील रुग्णवाढीचा वेग कमी झाला, पण ग्रामीण भागात वाढला आहे.

ऑगस्ट महिन्यात टाळेबंदी शिथिल करताना मॉल्स, व्यापारी संकु ल, खासगी दुकाने, सरकारी, खासगी कार्यालये सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे आता बाजारपेठा खुल्या झाल्या, व्यवसाय सुरू झाले. मग आता १ सप्टेंबरला शिथिलीकरणाच्या पुढील टप्प्यात सर्व धर्मीयांची धार्मिक स्थळे खुली करावीत, जिल्हाबंदी उठवा, जिम-व्यायामशाळांवरील र्निबध दूर करा अशा मागण्या सुरू झाल्या आहेत.  के ंद्र सरकारनेही ई-पास बंद करण्याबाबत राज्यांना सूचना दिल्या आहेत.

मात्र, ग्रामीण भागातील करोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता विरोधकांच्या मागण्या-विविध संघटनांच्या मागण्यांनुसार आणखी सूट दिल्यास प्रश्न गंभीर होईल व त्यामुळे सरसकट शिथिलता नको, असाच मतप्रवाह राज्य सरकारच्या धुरिणांमध्ये आहे. त्यामुळे सप्टेंबरअखेपर्यंत तरी ई-पास आणि आंतर जिल्हा प्रवासावरील र्निबध कायम राहण्याची चिन्हे आहेत. धार्मिक स्थळांबाबतही सावध भूमिका घेतली जाईल. पण आता त्यावरून राजकीय-सामाजिक संघर्ष होतो की काय अशी चिन्हे असून त्यांना तोंड देण्याचे आव्हान ठाकरे सरकारसमोर असणार आहे. आता गणशोत्सव संपेल, पण त्यानंतर मोहरम, नवरात्र, दसरा असे सण येत आहेत. त्यातून जिल्हाबंदी सरसकट उठली व लोकांना गाडय़ा काढून वाट्टेल तिथे जायची परवानगी मिळाली तर करोनाचा उद्रेक वाढेल अशी प्रशासनाला भीती आहे. टाळेबंदी शिथिलीकरण्याबाबत के ंद्र सरकार नेहमीप्रमाणे महिन्याच्या शेवटी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करेल. त्यानंतरच महाराष्ट्रातील परिस्थितीनुरूप निर्णय घेण्यावर महाविकास आघाडीत सहमती झाली आहे. आतापर्यंत कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे नेते हे शिथिलीकरणाबाबत आग्रही असायचे. मात्र आता ग्रामीण भागात करोनाने हातपाय पसरल्यावर त्यांचा सूरही थोडा नरमल्याचे चित्र आहे.

वैयक्तिक खेळ, हॉटेलला मुभा हवी
टाळेबंदीतून शिथिलता देण्यास जूनपासून सुरुवात झाली. आता एक सप्टेंबरपासून जनजीवन आणि अर्थचक्र  सुरू करण्यासाठी आणखी गती द्यायला हवी. सायकल चालवणे, चालण्याचा व्यायाम यांना सध्या परवानगी आहे. पण आता वैयक्तिक खेळांनाही परवानगी द्यायला हवी. अ‍ॅथलेटिक्समधील धावणे, गोळाफे क, भालाफे कसारखे खेळ नेमबाजी, तिरंदाजी अशा एकटय़ाने सराव करण्याच्या खेळांना परवानगी द्यावी, असे भाजपचे नेते आशीष शेलार यांना वाटते. एकटय़ाच्या खेळांना परवानगी दिल्यास गर्दी होण्याचा प्रश्नच येत नाही. त्याचबरोबर बागा, समुद्रकिनाऱ्यांवर सरसकट नको, पण मास्क, सुरक्षित अंतर ठेवणे अशा सर्व र्निबधांसह मर्यादित लोकांना प्रवेश देता येईल का याचा विचार व्हावा. त्यामुळे ज्येष्ठ मंडळी व इतरांना मोकळ्या हवेत श्वास घेता येईल व त्यांच्या मनावरील ताण कमी होण्यास मदत होईल. अर्थचक्रोला गती देण्यासाठी निवासी क्षेत्राबाहेरील हॉटेलांना प्रायोगिक तत्त्वावर परवानगी द्यायला हवी. संख्येची मर्यादा घालून व इतर नियमांचे पालन करून लोकांना तेथे जाऊन खानपानाचा आनंद लुटता येईल व अर्थचक्रालाही गती येईल. त्यात अडचण आल्यास पुन्हा बंद करण्याचा मार्ग आहेच, असेही शेलार यांनी नमूद के ले. याचबरोबर छोटय़ा चित्रपटगृहांनाही अशा प्रकारे परवानगी देण्याचा विचार व्हायला हवा. तो अनुभव लक्षात घेऊन पुढील निर्णय घेता येतील, असेही त्यांनी स्पष्ट के ले.
-आशीष शेलार

प्रवासावरील र्निबध दूर करा
करोना विषाणूचा प्रसार थांबण्यासाठी अनेक उपाययोजना राबवण्यात आल्या. त्याअंतर्गतच राज्यांतर्गत प्रवासावरही बंदी घातली होती. मात्र या काळात संपूर्ण अर्थचक्र थांबल्याने समाजातील सर्वच वर्गाला आर्थिक फटका बसला. आता परिस्थिती हळूहळू सावरत असून केंद्र सरकारने आर्थिक व्यवहार पूर्वपदावर येण्यासाठी राज्यांतर्गत प्रवासावरील बंदी हटवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानंतरही महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने त्यावर अंमलबजावणी अजूनही केलेली नाही. राज्यांतर्गत प्रवास बंदी, ई-पास या अटीमुळे जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. राज्यांतर्गत प्रवासावरील र्निबध हटवण्याची मागणी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
-माधव भांडारी

प्रार्थनास्थळांसाठी घंटानाद
राज्यातील मंदिरे सुरू करा या मागणीसाठी महाराष्ट्रातील विविध धार्मिक संस्था आणि प्रमुख देवस्थानांच्या वतीने राज्यात २९ ऑगस्ट रोजी पुकारण्यात आलेल्या घंटानाद आंदोलनालाही भाजपने पाठिंबा दिला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंदिरे सुरू करण्याच्या मागणीचा पुनरुच्चार करत पक्ष कार्यकर्त्यांनाही घंटानाद आंदोलनात सामील होण्यास सांगितले. केंद्र शासनाने देवस्थाने सुरू करण्याबाबत यापूर्वीच परिपत्रक प्रसिद्ध के ले. देशभरातील प्रमुख देवस्थाने त्यानुसार उघडण्यात आली. महाराष्ट्रातही देवस्थाने सुरू करण्याची मागणी अनेक व्यक्ती तसेच संघटनांनी राज्य सरकारकडे खूप वेळा केली. मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे आदी सर्व नियम मान्य करून देवस्थाने आणि भजन, पूजन, कीर्तन सुरू करावे ही मागणी आहे. तीर्थक्षेत्र आणि प्रमुख देवस्थांनांच्या परिसरातील असंख्य लोकांची उपजीविका केवळ देवस्थानांवर अवलंबून आहे. त्याचाही राज्य सरकारने सहानुभूतीने विचार करण्याची गरज आहे, अशी भूमिका चंद्रकांत पाटील यांनी घेतली आहे.

१ सप्टेंबरपासून मंदिरे व २ सप्टेंबरपासून मशिदी सुरू करा
आता १ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी असून त्यानिमित्त राज्यातील मंदिरे सुरू करावीत आणि २ सप्टेंबरपासून मशीद सुरू करण्याची परवानगी राज्य सरकारने द्यावी, अशी मागणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी के ली आहे. गेल्या पाच महिन्यांपासून सर्व धर्मीयांची प्रार्थनास्थळे बंद आहेत. सर्वानी नियम पाळून आपापले मोठे सण घरातच साजरे के ले. आता गेल्या दोन महिन्यांपासून बाजारपेठा, उद्योगधंदे सुरू झाले आहेत. मग के वळ प्रार्थनास्थळे बंद ठेवण्याचा आग्रह का, असा सवाल जलील यांनी के ला आहे. २ सप्टेंबरपासून मशीद सुरू करण्याची परवानगी नाही मिळाली तर मशिदीबाहेर नमाज पठण करून आंदोलन करू, असा इशाराही जलील यांनी दिला आहे. के वळ मशीद सुरू करा अशी आमची मागणी नाही तर सर्वच धर्माची प्रार्थनास्थळे खुली करावीत, अशी आपली मागणी असल्याचेही जलील यांनी स्पष्ट के ले आहे.
-इम्तियाज जलील