वन्यजीव चित्रणामध्ये संयमाची परीक्षा तर असतेच; पण त्याचबरोबर प्राणी किंवा पक्षी यांना नेमके हुम्डकून काढणे, शोधणे हाही तेवढाच महत्त्वाचा भाग असतो. सर्वसाधारणपणे प्राणी— पक्षी हे निसर्गासोबत दृश्यरूपामध्ये एकरूप झाल्याप्रमाणेच वावरत असतात. त्यांच्या शरीराचा भाग त्यांच्या अधिवासाशी मिळताजुळता (कॅमोफ्लाज) असतो. त्यामुळेच हे छायाचित्र सोपे वाटेलही कदाचित, पण छायाचित्रकाराच्या संयमपूर्ण शोधाची परिणती असते. विनय परळकर यांचे प्रस्तुतचे छायाचित्र हे अधिवासासोबत असलेले बिबळ्याचे साधम्र्य पुरते स्पष्ट करणारे आहे.