02 July 2020

News Flash

व्यंगातील सौंदर्य

कृष्णाचा मामा कंस. त्याची एक कुब्जा नावाची दासी होती अशी एक पुराणकथा आहे. व्यंग असल्याने ती अत्यंत कुरूप होती असे सांगितले जाते. व्यंग या शब्दाबरोबर

| April 10, 2015 01:19 am

कृष्णाचा मामा कंस. त्याची एक कुब्जा नावाची दासी होती अशी एक पुराणकथा आहे. व्यंग असल्याने ती अत्यंत कुरूप होती असे सांगितले जाते. व्यंग या शब्दाबरोबर आपल्या डोळ्यांसमोर काहीतरी कुरूप किंवा हिडीस असे दृश्य उभे राहते. परंतु, व्यंगातही अलौकिक सौंदर्य असते असे सांगितल्यास आपला त्यावर विश्वास बसेल काय?

काही वनस्पतींमध्ये काही कारणाने एखादे व्यंग उत्पन्न होते. अशा वनस्पती एक तर दुर्मीळ असतात आणि अशा व्यंग असलेल्या वनस्पती त्यांच्या व्यंगविरहित वनस्पतींपेक्षा खूपच सुंदर दिसतात. त्यांच्या दुर्मीळतेमुळे आणि सौंदर्यामुळेही अशा वनस्पती बऱ्याच प्रमाणात महागडय़ा असतात. कॅक्टस व इतर सक्युलंट (निवडुंगासारख्या वनस्पती) या वनस्पतींमध्ये व्यंगांचे प्रमाण इतर वनस्पतींपेक्षा बऱ्याच जास्त प्रमाणात आढळते. इतरही वनस्पतीमधून व्यंगयुक्त झाडे सापडतात.
वनस्पतींमधील व्यंगांचे दोन प्रकार आढळतात. पहिल्या प्रकाराला इंग्रजीत ू१्र२३ं३ी’ किंवा ू१ी२३ीष्टिद्धr(३९) असे नाव आहे. दुसऱ्या प्रकारच्या व्यंगाला इंग्रजीमध्ये ेल्ल२३१२४२’ किंवा ेल्ल२३१४२’ असे म्हणतात. क्रिस्टेट व्यंगामध्ये झाडाचा/ फुलाचा नेहमीचा आकार बदलून ते कोंबडय़ाच्या तुऱ्यासारखे किंवा उघड-झाप होणाऱ्या जपानी िवझण पंख्यासारखे वाढू लागते. मन्स्ट्रोसस व्यंग उत्पन्न झाल्यास त्या वनस्पतीची अनेक तोंडे फुटल्यासारखी (दैत्यसमान) वाढ होऊ लागते. अशा व्यंगयुक्त वनस्पती आपल्या व्यंगविरहित वनस्पतींपेक्षा साधारणपणे लहानखुऱ्या असतात. त्यांचे रूपही इतके बदलते की त्या दोघांमध्ये काहीही साम्य राहत नाही. आपण ‘कोंबडा’ नावाची जी कोंबडय़ाच्या तुऱ्यासारखी दिसणारी फुले पाहतो, ती खरेतर व्यंगयुक्त फुलेच असतात.
असली व्यंग असलेली झाडे का व कशी बनतात ते मात्र अजून समजलेले नाही. जसे एखाद्या साधारणपणे वाढणाऱ्या झाडात व्यंग उत्पन्न होते, तसेच कधी कधी व्यंग असलेल्या झाडाला अचानक त्याच्या मूळ रूपातील, व्यंगविरहित फांदी फुटते. असे झाल्यास ती व्यंगविरहित फांदी कापून काढावी. असे न केल्यास कालांतराने व्यंगविरहित फांदीच जोमाने वाढत राहते आणि व्यंग असलेला भाग खुरटाच राहून पूर्ण झाड परत मूळ रूपातच बदलून जाते. असे झाल्यास आपण त्या दुर्मीळ रूपाला खचितच मुकणार.
सोबतच्या छायाचित्रांत एक आकडय़ात दर्शविलेली झाडे/ फुले त्यांच्या साधारण रूपातील आहेत; आणि दोन आकडय़ातील व्यंगयुक्त आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2015 1:19 am

Web Title: plantation 2
टॅग Hirvai
Next Stories
1 भारत विरुद्ध पाकिस्तान
2 विठोबाची माय!
3 संस्कार
Just Now!
X