१. एका चौकोनाच्या चार बाजूंपैकी तीन बाजूंची एकूण लांबी ४३ सेंटीमीटर आहे. जर त्या चौकोनाची परिमिती ६० सेंटीमीटर असेल तर चौकोनाच्या उर्वरित बाजूची लांबी किती असेल?

२. एका काटकोन त्रिकोणाच्या तीन बाजूंपैकी दोन बाजूंची लांबी अनुक्रमे १५ सेंटीमीटर आणि २० सेंटीमीटर असेल तर त्याच्या उर्वरित बाजूची लांबी किती असेल?

३. एका वर्तुळाचा परीघ ८८ सेंटीमीटर आहे. तर त्याच्या व्यासाची लांबी किती असेल?

४. सुरेशने राजेशला १००० रुपये द.सा.द.शे. ७ टक्के व्याजाने दिले. राजेशने ते पैसे दोन वर्षांसाठी गुंतवले. तेव्हा त्याला २४० रुपये व्याज मिळाले. तर राजेशला मिळणाऱ्या व्याजाचा द.सा.द.शे. दर किती असावा?

एका वर्गामध्ये काही मुलगे आणि काही मुली आहेत. मुलांच्या संख्येला ३ ने असा नि:शेष भाग जातो की, तो भागाकार हा मुलींच्या एकूण संख्येला ३ या संख्येनेच भागले असता येणाऱ्या भागाकारापेक्षा एकने कमी असतो. जर वर्गातील एकूण मुले ४५ असतील तर मुलगे किती?

उत्तरे :
१) उत्तर – १७ सेंटीमीटर
२) उत्तर – २५ सेंटीमीटर
३) उत्तर – २८ सेंटीमीटर
४) उत्तर – १२ टक्के
५) २१ मुलगे आणि २४ मुली