१. एका पुस्तकाची पाने चाळताना राहुलच्या लक्षात आले की या पुस्तकाच्या पानांमध्ये २ व ३ हे अंक एककस्थानी असलेली पानेच उरलेली नाहीत. जर मूळ पुस्तकातील पानांची एकूण संख्या २०० असेल तर पुस्तकातील सध्या उरलेल्या पानांची संख्या किती?

२. एका घडय़ाळात दुपारचे १२ वाजले आहेत. मात्र त्यानंतर प्रत्येक तासाला ते दोन मिनिटे मागे पडत चालले आहे. या गतीने जेव्हा घडय़ाळात उत्तररात्रीचे अडीच वाजतील तेव्हा खरे किती वाजलेले असतील?

३. तीन सलग विषम संख्यांची बेरीज २४९ आहे. यातील दोन मोठय़ा संख्यांची बेरीज १६८ असेल तर त्या संख्यांपकी मधली संख्या कोणती?

४. १० गुलाबांची खरेदी छोटय़ाशा रमाने १५ रुपयांना केली. मात्र हिशेबात कच्ची असल्याने तिने पहिले पाच गुलाब प्रत्येकी १ रुपया दराने, तर उर्वरित पाच गुलाब प्रत्येकी ३ रुपये दराने विकले. तर या व्यवहारातून तिला शेकडा किती नफा झाला?

५. एका रांगेत काही मुले व मुली बसल्या आहेत. मुलांमध्ये शशांकचा क्रमांक डावीकडून १७ वा असून त्याच्यापुढे तीन मुले बसली आहेत. त्यांच्यापुढे सगळ्या मुली सलग बसल्या आहेत. मुलींची एकूण संख्या २३ असेल, तर शशांकचा त्या रांगेतील उजवीकडून क्रमांक कितवा?

उत्तरे :
१) उरलेल्या पानांची संख्या १६० (४० पाने कमी)
२) पहाटेचे तीन
३) मधली संख्या ८३
४) शेकडा ३३.३३ इतका नफा.र्
५) शशांकचा क्रमांक २७ वा.