25 May 2020

News Flash

आवाज की दुनिया : गुड मॉर्निऽऽऽऽग इंडिया!

दिवाळी २०१४ सकाळी सकाळी ऑफिसला जाण्याच्या तयारीत मग्न असणाऱ्यांची एकापाठोपाठ एक कामं सुरू असतात. बरेच जण अध्र्या झोपेतच चपला, बूट घालून बाहेर पडतात.

| November 26, 2014 01:20 am

01youthlp10दिवाळी २०१४
सकाळी सकाळी ऑफिसला जाण्याच्या तयारीत मग्न असणाऱ्यांची एकापाठोपाठ एक कामं सुरू असतात. बरेच जण अध्र्या झोपेतच चपला, बूट घालून बाहेर पडतात. मग शोध सुरू होतो तो रिक्षा, बसचा.. नेमकं घाईच्या वेळेत यापैकी काहीच मिळालं नाही, तर चिडचिड, वैतागाला आमंत्रण. ‘सकाळ खराब झाली’, ‘ट्रेन मिस होणार’, ‘रोजची बस जाणार आज’, असं चरफडत मिळेल त्या मार्गाने स्टेशन गाठायचं. धावत-पळत कशीबशी ती ट्रेन किंवा बस मिळते. ओरडत, भांडत एका जागी स्थिर व्हायचं. ते झालं की, बॅगेतला मोबाइल काढायचा. इअरफोन कानात लटकवायचे आणि सुरू करायचा प्रवास.. पाचेक मिनिटांनी ‘गुड मॉर्निऽऽऽऽग एव्हरीवन…!’ असा आवाज इअरफोन्समधून येतो आणि सगळा वैताग एका क्षणात दूर पळतो. त्यात जर कोणी चालत ऑफिस गाठत असेल, पाऊस असेल आणि रेडिओवर ‘रिमझिम गिरे’, ‘भिगी भिगी रातोंमें’, ‘भागे रे मन कहीं’ अशी गाणी लागली असतील तर अहा, तिथेच मूड येतो.. पण या गाण्यांच्या जोडीला आपल्या गोड गप्पांनी श्रोत्यांना पावसातल्या रोमँटिक, मजेशीर आठवणी सांगायला भाग पाडून त्यांचा मूड हलकाफुलका करतो तो रेडिओ जॉकी..! अर्थात आपले ‘आरजे’ं. मधल्या काळात टीव्हीमुळे रेडिओ ऐकणं कमी झालं होतं; पण एफएमच्या नव्या रूपात रेडिओ आला आणि आपली आवाज की दुनिया एकदम सुंदर झाली. त्यातच एफएमही फ्री! फोन, घर, दुकान, हॉटेल, ऑफिस सर्वत्र एफएम ऐकू येतं. तिथे चालू घडामोडीही समजतात आणि मनोरंजनही होतं. गाण्यांमुळे मनोरंजन तर होतंच; पण या आरजे मंडळींमुळे ताजंतवानं वाटतं. ते स्वत: कितीही दु:खी, निराश, उदास असले तरी आपल्या मूडचा विचार करतात, आपल्या एकटेपणात आपले मित्र होतात. या ‘एफएम’ इंडस्ट्रीचा पसारा गेल्या दशकापासून वाढत गेला. गावागावांत ही चॅनल्स पोहोचली. त्यामुळे गावागावांकडच्या हरहुन्नरी कलाकारांना आपलं कौशल्य दाखवायची संधीही मिळाली.
‘पिक्चर्र्र्र्र्र पांडे’ असं म्हणणारा हा अनुराग पांडे आहे तरी कोण? संध्याकाळी ऑफिसहून घरी जाणाऱ्या लोकांचा स्ट्रेस पळवण्यासाठी ‘मुंबईची लोकल’ घेऊन येणारा रिषी कपूर कोण? ‘मी बाबूराव बोलतोय’ या नावाने लोकांचा बकरा करणाऱ्या कोल्हापूरच्या यशवंत कुलकर्णीची ओळख काय? आपल्या मनमोकळ्या गप्पांनी श्रोत्यांची मैत्रीण होणारी पुण्याची श्रुती दिसते तरी कशी यासह ते आरजे झाले कसे? त्याच वेळी एखादं वाक्य बोलायचं सुचतं कसं? असे अनेक प्रश्न श्रोत्यांच्या मनात डोकावत असतात. आजच्या धावपळीच्या जगात आपला एकटेपणा, नैराश्य, दु:खं दूर करण्याच्या या आपल्या आरजे मित्रांना शोधण्याचा, जाणून घेण्याचा हा प्रयत्न..!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2014 1:20 am

Web Title: radio jockey
टॅग Diwali
Next Stories
1 आवाज की दुनिया : लोकांचं मनोरंजन ही माझी सामाजिक जबाबदारी – डॉ. रिषी कपूर
2 आवाज की दुनिया : हॅलोऽऽऽ मी बाबूराव बोलतोय! – यशवंत कुलकर्णी
3 आवाज की दुनिया : आरजेंनी भडकपणा टाळायला हवा – डॉ. लव्हगुरू
Just Now!
X