मी ‘लोकप्रभा’चा खूप जुना वाचक, चाहता आहे. तरीदेखील खरंच सांगतो, संपूर्ण ‘लोकप्रभा’ मी या वेळीस (१५ ऑगस्ट २०१४) प्रथमच वाचला. संपादकीयासह प्रत्येक लेख!
पर्यटनाच्या सर्व पैलूंना स्पर्श करून फक्त ज्ञानात भर घातली असे नाही, तर दृष्टिकोनात बदल घडवून आणण्यात संपूर्ण ‘लोकप्रभा’ शंभर टक्के यशस्वी झाला आहे.
सामान्यत: पर्यटन विशेषांक म्हणजे विविध स्थळांची जुजबी माहिती, महत्त्वाचे ठिकाणांपासून जाण्या-येण्याचे सोयीस्कर मार्ग, अंदाजे अंतर, उपलब्ध सुविधा, पर्यटनासाठी योग्य कालावधी असे माहितीचे स्वरूप असते. परंतु सहली दरम्यान ‘काय पाहायचं?’, ‘कसं पाहायचं?’, हे सांगतानाच ‘भेट देणे आणि पाहणे यात बराच फरक आहे. दिसतील ती फक्त पर्यटनाची दुकानं.
नजाकतीने पाहायचे असेल तर वेळ काढून जा असा परफेक्ट सल्ला अरुंधती जोशी सिक्कीम दर्शन घडविताना द्यायला विसरत नाहीत. लाजवाब! हे फक्त एक उदाहरण झाले. प्रत्येक लेखात असेच मौलिक सल्ले, समर्पक शब्दात, लेखकांनी, पेरले आहेत. त्यामुळे वाचनप्रवासही सुखद झाला.
या सगळ्यावर कडी केली आहे ती ‘मथितार्थ’ सांगताना विनायक परब यांनी. पर्यटनाचे महत्त्व (सध्याची काळाची गरज) वाचकांच्या मनावर बिंबविताना, ‘त्याला लक्षात आले की, गेल्या कित्येक वर्षांत तो निरुद्देश बाहेरच पडला नव्हता.’, ‘पट्टीचे वाचन करणाऱ्या त्याने गेल्या कित्येक वर्षांत नोटा मोजताना पुस्तकाची पाने उलटायची राहूनच गेली होती,’ अशी सुभाषितवजा वाक्य पेरून अग्रलेखाची खुमारी वाढविली की पर्यटनाची ‘चव’ कळण्यासाठी नवा दृष्टिकोन दिला हेच समजत नाही.
– अनिल ओढेकर, नाशिक.
ई-मेलवरून.

अठरा विश्वे नव्हे, विशे दारिद्रय़!
दि. २२ ऑगस्टच्या ‘लोकप्रभा’त ‘मराठी तितुकी मेळवावी’ या प्रशांत दांडेकर यांच्या सदरात ‘अठरा विश्वे दारिद्रय़’ या म्हणीचा ओझरता उल्लेख आहे. त्या म्हणीच्या पोटात नक्की काय दडलंय याची माहिती देणारा हा माझा छोटासा प्रयत्न. अठरा विश्वे नव्हे, विशे. ‘अठरा विश्वे दारिद्रय़’ ही म्हण आपण लहानपणापासून ऐकत आला असाल. काय आहे याचा अर्थ? अठरा ही संख्या, विश्व आणि दारिद्रय़ यांचा काय संबंध, असा प्रश्न आपल्याला कधी पडला आहे का?
आपला सूर्य, त्याभोवती फिरणारे आठ ग्रह, चंद्र हा उपग्रह इथपर्यंत आपले विश्व आज तरी मर्यादित आहे. अशा अनेक सूर्यमाला अवकाशात आहेत, अशी शंका वैज्ञानिकांना आहे; परंतु त्यांचा शोध लावण्यात अजून यश आलेले नाही. असे असताना ही म्हण कशी तयार झाली? हिचा नेमका अर्थ काय?
तर मित्रांनो, ‘अठरा विश्वे दारिद्रय़’ ही म्हण बरोबर आहे; परंतु त्यातील ‘विश्वे’ या शब्द उच्चारताना पूर्वी कधी तरी चुकीचा उच्चारला, लिहिला गेला. मुळात हा शब्द ‘विश्व’ असा नसून ‘विशे’ असा आहे. ही मूळ म्हण ‘अठरा विशे दारिद्रय़’ अशी आहे.
माणूस प्रथम संख्या मोजायला शिकला तो दोन हातांच्या बोटांवरून. दोन्ही हातांची मिळून बोटे दहा होतात. तो जसजसा प्रगत होत गेला तसा त्याला दहाच्या पुढे संख्या मोजता येणे गरजेचे वाटले व त्याने हातांप्रमाणे पायांची बोटेही मोजण्यासाठी उपयोगात आणायला सुरुवात केली. आता त्याच्याकडे एकूण २० पर्यंत आकडे मोजण्याची सोय झाली होती. तरीही प्रश्न उरतोच की, मग अठरा आणि वीस यांचा नक्की संबंध काय?
अठरा आणि वीस यांचा गुणाकार केला, की संख्या मिळते ती ३६० आणि हे म्हणजे वर्षांचे एकूण अंदाजे दिवस (जे ग्रेगरीयन कॅलेंडरच्या स्वीकृतीनंतर ३६५ मानले गेले).
‘अठरा विशे दारिद्रय़’ या म्हणीचा सरळ सरळ अर्थ असा आहे की, एखाद्या घरात ३६० दिवस म्हणजे वर्षभर दारिद्रय़ असणे!
जाता जाता –
आजही ग्रामीण भागात आपण गेलात तर वीसच्या पटीत हिशोब करणारे वृद्ध गावकरी आपल्याला आढळतील. ते शंभर रुपये दे असे न म्हणता ‘पांच विशे’ दे असेच म्हणतील.

model code of conduct, code of conduct,
आचारसंहिता समजून घेताना…
Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
What Prakash Mahajan Said About Raj Thackeray?
“राज ठाकरे आधुनिक युगातले कर्ण, हिंदुत्वाची शाल पांघरुन..”, प्रकाश महाजन यांचं वक्तव्य चर्चेत
Shukra Gochar In Mesh
२४ एप्रिलपासून ‘या’ राशी होणार प्रचंड श्रीमंत?सुख-समृद्धीचा कारक ग्रह राशी बदल करताच मिळू शकते चांगला पैसा

गणेश साळुंखे

विचारांना चालना देणारा विशेषांक
स्वातंत्र्य दिन विशेषांक हा विचारांना चालना देणारा होता. ‘लोकप्रभा’मध्ये आपण कायमच अनेक संवेदनशील विषय सामान्य माणसांना कळतील अशा सोप्या पद्धतीने मांडत असता. स्वातंत्र्य दिन विशेषांक हा आपल्या संपूर्ण टीमने घेतलेल्या मेहनतीचे फळ असून, त्यातून एक चांगला सामाजिक संदेश देत असता. आपण स्वतंत्र आहोत हे प्रत्येकाला माहीत असले तरी देशाच्या स्वातंत्र्याबाबत खूपच कमी लोक विचार करतात. आपल्या अंकातून हाच संदेश योग्य प्रकारे आला आहे. त्यातूनच प्रत्येकजण विचार करेल आणि देशाच्या सक्षम जडणघडणीत योगदान देईल. अर्थात देश घडविण्याची ही चळवळ तेव्हाच सुरू होऊ शकते, जेव्हा तुम्हाला देशाबद्दल आदर असेल, आदर्शाची जाणीव असेल. आपण या अंकातून हाच संदेश सर्वाना दिला आहे. विनायक परब यांचे ‘मथितार्थ’ हे कायम नव्या विचारांना चालना देणारे असतात. स्वातंत्र्य दिन विशेषांकातील हृषीकेश जोशी यांची ‘माझा देश’ ही कविता अत्यंत संवेदनशील आहे. एक अमूल्य असा विशेषांक दिल्याबद्दल धन्यवाद.
– जमीर मुल्ला, कोल्हापूर, ई-मेलवरून.

‘कांदाभजी तुला’ हा लेख पु. ल. देशपांडे यांच्या लेखनाची आठवण करून देणारा आहे. प्रमोद तळेकरांना धन्यवाद.
सुनील जोशी, ई-मेलवरून.

‘भाषाविवेका’बद्दल थोडंसं
‘लोकप्रभा’ ११ जुलै २०१४ च्या अंकातील नलिनी दर्शने यांचा लेख वाचण्यात आला, त्यासंबंधी थोडंसं.
श्री पासूनच सुरुवात करायची तर ‘श्र’ हे दोन अक्षरांचे मिश्रण आहे. ते जोडाक्षर आहे; पण त्यातील ‘o’ हा वेगळा आहे. शब्दकोशात ‘श’ व ‘ष’ यांच्यामध्ये याचे विवेचन येते. ‘श’, ‘o’, ‘ष’ अशा क्रमाने. या मधल्या ‘o’ला रकार जोडून ‘श्र’ हे अक्षर तयार होईल. श्रंगाट म्हणजे चवाठा किंवा िशगाडा या अर्थी हा ‘o’ वापरलेला दिसतो. ‘o’ काढून त्याला ऋकार जोडून हा दिला आहे. कोशात हा एकच शब्द अशा तऱ्हेने आलेला दिसतो.
आता शंृगार शब्दाबद्दल बोलायचे झाल्यास श्रुंगार प्रचलित नाही म्हणण्यापेक्षा त्यात ‘श’ अधिक रकार नाही. त्या त्या शब्दातून तो तो अर्थ प्रतीत व्हायला हवा. श्वास, श्वेत इ. शब्द बरोबर आहे. आता श्रुति शब्द शृति असा लिहिला तर ते बरोबर होणार नाही. श्रवणपासून होणारा शब्द येथे ‘श’ला ‘ऋ’ हा स्वर जोडायला नको आहे, तर ‘श्र’ ला ‘उ’कार हवा.
कोणता ‘श’, ‘o’, ‘ष’ वापरायचा हे ठरविणे हे त्या शब्दाच्या उच्चाराशी, अर्थाशी निगडित असावे असे वाटते. शब्दाच्या उच्चारणासाठी ओष्ठय़, कण्ठय़ तालव्य इत्यादी मुखप्रयत्नांचा विचार केलेला आहे. उदा. ईश्वर शब्द लिहिताना ईश म्हणजे सत्ता असणे, ताब्यात ठेवणे या अर्थी धातूला वर लागल्यानंतर कोशात ईश्वर, ऐश्वर्य असे शब्द येतात. तुमच्याजवळ हा पूर्ण ‘o’ असताना ईश्वरातील ‘श’चा पाय मोडण्याचे काही कारण नाही. सर्व सत्ताधीश या अर्थी ईश्वरमधील ‘श’चा पाय मोडणे उचित नाही. शब्दांचा आकार, उच्चार आणि अर्थ हे एकमेकांशी घनिष्ठ संबंध सांगतात.
आपल्या मुळाक्षरात येणारे ‘क्ष’, ‘ज्ञ’ हे स्वयंपूर्ण आहेत. ती काही दोन-तीन अक्षरे जोडून झालेली जोडाक्षरे नव्हेत. तेव्हा ती मुळाक्षरे असताना ती फोडण्याचे किंवा जोडण्याचे काही कारण नाही. ‘क’ला ‘श’ जोडण्याचे काम कशाला, ‘क्ष’ हे मुळाक्षर हजर आहे ना. कोशात ‘क्ष’चे शब्द ‘क’नंतर येतात, तर ‘ज्ञ’चे शब्द ‘ज’नंतर येतात.
‘च’, ‘ज’, ‘झ’ हे मात्र मराठी प्राकृतात येताना दोन तऱ्हेने येतात. जसे चमचा, जहाज, झबले इत्यादी. तसे अक्षर आणि ध्वनीबाबत प्रत्येकच भाषेचे स्वत:चे काही व्याकरण निकष आहेत.
शेवटी भाषा ही व्यवहारहेतु म्हणजे व्यवहाराचे साधन आहे. काळाबरोबर भाषेत बदल होणारच. तसा तो व्हायलाच हवा. भाषा ही प्रवाही आहे. आपल्यासमवेत येणाऱ्यांना बरोबर घेऊन जाणारी आहे. मात्र तसे करताना ती दूषित होता कामा नये. ती समृद्ध होत गेली पाहिजे.
शब्दांचे आकार, उच्चार, अर्थ या दृष्टीने आपली भाषा ही परिपूर्ण आहे. या भाषेच्या आधाराने आपण व्यक्त होत असतो. आपले विचार, भावना व्यक्त करीत असतो.
आपण हल्ली अनेक चुकीचे शब्द पाहात- वाचत असतो. खास करून आपल्याचसाठी लावलेल्या पाटय़ा. पाटी करायला देणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यायला हवी. रंगकर्मी चितारी याला आपल्याला हवे असलेले नेमके शब्द तपासून द्यायला हवेत.
नवीन नियमांप्रमाणे व्याकरण थोडे शिथिल केले आहे. हे ग्राह्य़ धरले तरी मुळात काय आहे हे आपल्याला माहीत असायला हरकत नाही. आपल्या तर प्रत्येक अक्षराला मंत्रसामथ्र्य आहे.
अमन्मं अक्षरं नास्ति नास्ति मूलमनौषधम्।
अयुक्त: पुरूषो नास्ति योजकस्तत्र दुर्लभ:॥
मालती भाटे, सांगली.

पाऊस विशेषांक
हृषीकेश जोशी यांचा कोलाहल, रंगावरील लेख, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, चित्र, क्लिक, जनकवी पी. सावळाराम यांच्यावरील लेख, असिफ अली पठाण यांचा परछाईयाँतून संगीतकार रशीद अत्रे यांचा परिचय संगीताच्या सुवर्णकाळाच्या आधी घेऊन जातो. मानसी काणे यांचा बर्फानुभव काश्मीर सफर घडवून आणतो. वैद्य खडीवाले यांचा अरुणाचल प्रदेशातील तेजु येथील अनुभव खूपच बोलका वाटला. औरंगाबाद, पुणे, नागपूर, कोल्हापूर, नाशिक तसेच कोकणातील पाऊस वाचून आठवणीनी डोळय़ांतून पाऊसधारा आल्यात. पाऊस-कांदाभजी-मिरची व वाफाळता चहा यांची लज्जत काही औरच. वैशाली चिटणीस यांचा लेख लज्जतदार होता. भाजलेले उडीद पापड-चहा, बटाटावडा-चहा, शेगाव कचोरी-मिरची-चहा व कांदाभजी-चहा या पावसाळी भटकंतीतील अस्सल खवय्येगिरीच्या खास डिश आहेत. – रवींद्र मधुकर उपासनी, कल्याण</strong>

दि. २५ जुलैच्या ‘लोकप्रभा’तील ‘कंडक्टर जेव्हा बोलू लागतो’ हा लेख वसंत धुपकर यांनी इतका विनोदी लिहिला होता की, हसून हसून पोट दुखायला लागले. लेखकाचे हार्दिक अभिनंदन करतो. – सुधाकर आपटे, चंद्रपूर

‘लोकप्रभा’चा पावसाळा विशेष अंक फारच आवडला. यातील सगळेच लेख-कविता पावसासारखेच ओलेचिंब भिजलेले होते.
– सुरेंद्रनाथ नारायण मोरे, कोळेगाव, डोंबिवली