01vbआलू टिक्की बर्गर

साहित्य :
८ बर्गर बन्स
८ बर्गर पॅटीज
८ चीज स्लाइसेस
२-३ मध्यम टॉमेटो
२ मध्यम कांदे

४ लेटय़ूसची पाने (अर्धी करून)
मेयोनीज गरजेनुसार
lp33मीठ आणि मिरपूड चवीप्रमाणे
२ चमचे बटर

कृती:
१) टॉमेटो आणि कांदे कापून गोल पातळ चकत्या कराव्यात.
२) चीज स्लाइसेस प्रत्येक पॅटीजवर ठेवावे. जर तुमच्याकडे ग्रील असेल किंवा मायक्रोवेव्हमध्ये ग्रीलचा पर्याय असेल तर चीज वितळेस्तोवर ग्रील करावे.
ग्रील नसल्यास नॉनस्टिक पॅनमध्ये थोडे तेल किंवा बटर घालावे. त्यात चीज ठेवलेले पॅटीज ठेवून वर झाकण ठेवावे. मंद आचेवर चीज मेल्ट होऊ द्यावे.
३) आता बर्गर असेंबल करावे. बनचा खालचा अर्धा भाग सवर्ि्हग प्लेटमध्ये ठेवावा. आता चीज वितळलेली पॅटीज ठेवावी. त्यावर लेटय़ूस, कांदा, आणि टॉमेटो ठेवावा. थोडे मीठ मिरपूड पेरावे. बर्गर बनच्या उरलेल्या अध्र्या भागावर थोडे मेयॉनीज लावावे व तो वर ठेवून बर्गर तयार करावे. बर्गर सव्‍‌र्ह करावे.
बर्गर बटाटा चिप्स किंवा फ्राइजबरोबर सव्‍‌र्ह करावे.

पोटॅटो चीज सँडविच

lp34साहित्य :
८ ब्रेड स्लाइसेस
२ ते ३ मोठे बटाटे, उकडून सोलून चकत्या कराव्यात
दीड वाटी किसलेले चीज
४ चमचे बटर
मीठ आणि चाट मसाला गरजेनुसार

कृती:
सर्व ब्रेड स्लाइसेसना बटर लावून घ्यावे. ४ स्लाइसेस ताटात ठेवावे. त्यावर बटाटय़ाच्या पातळ चकत्या लावाव्यात. वरून चीज, थोडेसे मिठ आणि चाट मसाला भुरभुरावा. वरून उरलेले ४ स्लाइसेस ठेवावे. त्रिकोणी आकारात कापून सव्‍‌र्ह करावे.

lp32आलू बर्गर पॅटीज

साहित्य:
३ मोठे बटाटे (उकडून सोलून मॅश केलेले)
३/४ वाटी मटार, वाफवलेले
१ मध्यम गाजर, किसलेले
१ चमचा लसूण पेस्ट
१ चमचा हिरवी मिरची पेस्ट
१/२ चमचा आलं (ऐच्छिक)
१/२ चमचा गरम मसाला
१/४ वाटी ब्रेड क्रम्ज
२ चमचे तेल
चवीपुरते मीठ
अजून थोडे तेल / बटर पॅटीज रोस्ट करण्यासाठी

कृती :

१) कढईत तेल गरम करावे. आले-लसूण पेस्ट आणि मिरची पेस्ट घालावी. काही सेकंद परतावे.
२) मटार आणि गाजर घालून १-२ मिनिटे मंद आचेवर वाफ काढावी. बटाटे, ब्रेड क्रम्ज आणि मीठ घालून मिक्स करावे. झाकण ठेवून २-३ मिनिटे वाफवावे. शेवटी गरममसाला घालून मिक्स करावे.
३) मिश्रण थंड होऊ द्यावे. मिश्रणाचे ८ समान भाग करावे. त्याच्या चपटय़ा पॅटीज् बनवाव्यात. नॉनस्टीक तव्यावर थोडे तेल घालून कमी आचेवर भाजाव्यात. आच मंद असावी. दोन्ही बाजू लालसर आणि थोडय़ा कुरकुरीत करून घ्याव्यात.
या पॅटीज वापरून बर्गर बनवू शकतो. तसेच या पॅटीज् नुसत्या खायलाही छान लागतात. त्यांबरोबर टॉमेटो केचप किंवा हिरवी चटणी सव्‍‌र्ह करावी.

टिपा:
१) ब्रेड क्रम्ज खूप जास्त घालू नये. त्यामुळे पॅटीज् हलके न होता घट्ट होतात. फक्त बाइंड करण्यापुरतेच ब्रेड क्रम्ज वापरावे.
२) यामध्ये जिरेपूड, चाट मसाला वगैरे घालून आवडीनुसार फ्लेवर द्यावेत.
वैदेही भावे – response.lokprabha@expressindia.com