15 August 2020

News Flash

तिळाची स्निग्धता

थंडीच्या दिवसांमध्ये आहारात कराव्या लागणाऱ्या बदलांमध्ये तिळाला मोठं महत्त्व आहे.

शरीरामधली स्निग्धता टिकवून ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या तिळाच्या फक्त वडय़ाच होत नाही तर त्यांचा अनेक प्रकारे उपयोग करता येऊ शकतो.

अलका फडणीस – response.lokprabha@expressindia.com
हिवाळा विशेष

थंडीच्या दिवसांमध्ये आहारात कराव्या लागणाऱ्या बदलांमध्ये तिळाला मोठं महत्त्व आहे. शरीरामधली स्निग्धता टिकवून ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या तिळाच्या फक्त वडय़ाच होत नाही तर त्यांचा अनेक प्रकारे उपयोग करता येऊ शकतो.

मुठिया

साहित्य :

दुधी भोपळा – १ लहान (साल काढून किसलेला)

गव्हाचे पीठ – १ कप

तीळ भाजून भरड केलेले- पाव कप

ज्वारीचे पीठ – पाव कप

बाजरीचे पीठ – पाव कप

दही – ३ टेबल स्पून

तेल – २ चमचे आणि शिवाय ग्रीजिंगसाठी

मोहरी – अर्धा चमचा

िहग – चिमूटभर

तीळ – १ चमचा

वाळवलेल्या लाल मिरच्या – दोन देठ काढून मोडलेल्या

एका कांद्याची हिरवी पात – बारीक चिरलेली

आले-लसूण पेस्ट – १ टेबल स्पून

हिरव्या मिरचीचे वाटण – १ टेबल स्पून

साखर – अर्धा चमचा

मीठ – चवीप्रमाणे

हळद – पाव चमचा

धण्याची पूड – १ चमचा

लाल तिखट – १/३ चमचा

बेकिंग सोडा – चिमूटभर

तेल – फोडणीसाठी

कृती :

दुधी भोपळा, गव्हाचे पीठ, भाजलेल्या तिळाची भरड, ज्वारीचे पीठ, बाजरीचे पीठ, कांद्याची पात, आले-लसूण पेस्ट, हिरव्या मिरचीचे वाटण, साखर, मीठ, हळद, धण्याची पूड, लाल तिखट, बेकिंग सोडा, दही, तेल एकत्र करून नीट मळून घ्या.

हाताला थोडे तेल लावून ते नीट मळून त्याचे तीन किंवा चार लोंढे बनवून घ्या.

आधीच गरम केलेल्या स्टीमरमध्ये तेल लावलेल्या ताटलीवर ठेवून १५ – २० मिनिटे स्टीम करून घ्या. त्या थंड झाल्यावर त्याच्या नीट वडय़ा पाडून घ्या.

फोडणीसाठी तेल तापवून मोहरी, िहग, तीळ, लाल मिरच्या नीट तडतडवून घ्या.

सìवग प्लेटमध्ये वडय़ा काढून त्यावर फोडणी घालून गरम गरम सव्‍‌र्ह करा.

तिळाचा भरला बटाटा

साहित्य :

बटाटे – ४ मध्यम उकडून सोललेले आणि मधे कापून पोकळी केलेले.

पांढरे तीळ – १ कप

पनीर -अर्धा कप

आले – १ चमचा किसलेले

लाल तिखट – चवीप्रमाणे

आमचूर पावडर – १ चमचा

जिरे पूड – ३/४ चमचा

कोिथबीर – १ चमचा बारीक चिरलेली (गाíनश साठी)

पुदिना – बारीक चिरलेला १ टेबल स्पून

काजू – १ टेबल स्पून तुकडे केलेले

मीठ – चवीप्रमाणे

तेल – श्ॉलोफ्रायसाठी

कृती :

एका भांडय़ामध्ये पनीर, पोकळी करताना काढलेल्या बटाटय़ाचा थोडासा भाग, कोिथबीर, पुदिना, काजु, आल, लाल तिखट, आमचूर पावडर, जिरे पूड आणि मीठ नीट एकत्र करून घ्या.

हे मिश्रण बटाटय़ामध्ये भरून घ्या. दुसऱ्या एका भांडय़ामध्ये तीळ आणि मीठ एकत्र करा. बटाटय़ाचे तुकडे या मिश्रणाने नीट कोट करा. एका पॅनमध्ये हे तुकडे चांगले गोल्डन ब्राऊन होईपर्यंत श्ॉलो फ्राय करून घ्या.

वर कोिथबीर घालून लगेच सव्‍‌र्ह करा.

सॅलड

डीपसाठी साहित्य :

िलबाचा रस – १ टेबलस्पून

मीठ – १/४ चमचा

मीरपूड – १/४ चमचा

साखर – अर्धा चमचा

हे सर्व एका बाटलीमध्ये भरून नीट हलवा.

सॅडलसाठी साहित्य :

कोबी – १ वाटी उभा चिरलेला

गाजर – अर्धी वाटी जाडसर किसलेले

कांद्याची पात-   बारीक चिरलेली अर्धी वाटी. कांदे गोल चिरून.

तीळ – १/४ वाटी भाजून बारीक केलेले

मीठ – चवीप्रमाणे

वरील सर्व जिन्नस एकत्र करून त्यावर डीप घालून सव्‍‌र्ह करा.

तिळाचे चिकन

साहित्य :

भाग – १

अंडे – १ मोठे

कॉर्नफ्लोर – २ टेबलस्पून

मीठ आणि मिरपूड – चिमूटभर

भाग – २

चिकन – अर्धा किलो किलो (बोनलेस)

तेल – तळण्यासाठी

सॉससाठी

सोया सॉस – २ टेबलस्पून

पाणी – १ टेबलस्पून

तिळाचे तेल – अर्धा  टेबलस्पून

ब्राउन शुगर – दीड टेबलस्पून

राइस व्हिनेगर – दीड टेबलस्पून

आले – १ इंच (किसलेले)

लसूण – १ पाकळी बारीक चिरलेली

तीळ – २ टेबलस्पून

कॉर्नस्टार्च – १ टेबलस्पून

सìव्हगसाठी :

शिजवलेला बासमती तांदूळ –    ४ कप

पातीचे कांदे झ्र् २

कृती :

एका मोठय़ा भांडय़ात अंडी, दोन टेबलस्पून कॉर्नफ्लोर, चिमूटभर मीठ आणि मिरपूड नीट फेटून घ्या.

चिकनला जास्तीची चरबी असल्यास ती काढून टाका.

चिकनचे साधारण एक इंचाचे तुकडे करा आणि अंडय़ाच्या मिश्रणात घालून नीट एकत्र करा.

एका कढईमधे दोन टेबलस्पून तेल चांगले गरम करा आणि त्यामध्ये चिकन आणि अंडय़ाचे मिश्रण घालून चिकन शिजेपर्यंत (सात ते दहा मिनिटे) आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्या.

चिकन शिजेपर्यंत एका भांडय़ामध्ये सॉससाठीचे सर्व साहित्य एकत्र करा.

चिकन शिजल्यावर सॉस ओता आणि चिकन टॉस करून सॉस नीट पसरवा. पॅनमध्ये टाकल्यावर सॉस घट्ट हईल. ते थोडे घट्ट झाल्यावर गॅस बंद करा.

चिकन भातावर घालून सव्‍‌र्ह करा. वर बारीक चिरलेली कांद्याची पात पसरा.

तीळ -पनीर सॅलाड

साहित्य :

पनीर – १५० ग्रॅम

पांढरे तीळ – ३ चमचे

काळे तीळ – २ चमचे

धणे – २ चमचे

कांद्याची पात – ३ कांदे बारीक चिरलेली

सुकी लाल मिरची  – १ ते दीड चमचा बिया काढून कुसकरलेली

सॅलाड लीव्हज – ५ ते ६ पाने

मोड आलेली कडधान्ये – अर्धा कप

मीठ – चवीप्रमाणे

चक्का – ४ चमचे

ऑलिव्ह ऑइल – १ चमचा

मिरपूड – चवीप्रमाणे

िलबाचा रस – अर्धा टेबल स्पून

मीठ – चवीप्रमाणे

कृती :

धणे, २ चमचे, पांढरे तीळ, १ चमचा काळे तीळ आणि अर्धा चमचा मीठ एका पॅनमध्ये चांगला वास येईपर्यंत भाजून घ्या आणि गार करून ठेवा.

पनीर किसून एका पॅनमध्ये घाला. हाताने कुस्करून घ्या. त्यामधे चक्का, एक टेबलस्पून ऑलिव्ह ऑइल, मीठ आणि मिरपूड घाला. हे मिश्रण नीट एकत्र करून फ्रीजमध्ये ठेवून द्या.

आधी भाजून ठेवलेले मसाले खलबत्त्यामध्ये कुटून घ्या. त्यापैकी कुटलेल्या दोन चमचे मसाल्यामध्ये उरलेले काळे, पांढरे तीळ, लाल मिरच्या आणि कांद्याची पात घालून एका भांडय़ामध्ये नीट एकत्र करून ठेवा.

सॅलाडची पाने तोडून एका पॅनमध्ये ठेवा. त्यामध्ये मोड आलेली कडधान्ये घालून सìवग डिशमध्ये ठेवा.

हाताला थोडेसे तेल लावून पनीरचे छोटे छोटे गोळे करा. काही गोळे कुटलेल्या मसाल्यामध्ये घोळून घ्या. काही तसेच ठेवा.

सलाडची पाने ठेवलेल्या सìव्हग बोलमध्ये हे गोळे ठेवा.

एका बाटलीमध्ये िलबाचा रस, मीठ आणि तीन चमचे ऑलिव्ह ऑइल घालून नीट एकत्र करून ठेवा.

सॅलड सव्‍‌र्ह करताना त्यावर हे मिश्रण िस्प्रकल करा.

तळलेले मोदक

कणीक – १ वाटी

बारीक रवा – १ टेबलस्पून

तेल – १ टेबलस्पून

मीठ – १/४ चमचा

वरील सर्व साहित्य एकत्र करून पीठ मळा.

सारण :

ओले खोबरे – १ वाटी

गूळ – ३/४ वाटी बारीक चिरलेला

तीळ – अर्धी वाटी भाजून बारीक केलेले

वेलची पावडर – अर्धा चमचा

कढईत गूळ खोबरे एकत्र करून सारण (चव) तयार करा. त्यामध्ये वेलची पावडर आणि तिळाची पावडर नीट मिसळून ठेवा.

कृती :

कणकेची पोळी लाटा. त्यामध्ये सारण भरून त्याचा मोदक तयार करा आणि डीपफ्राय करून गरम गरम सव्‍‌र्ह करा.

तीळ फ्राइड राइस

साहित्य :

शिजवलेला मोकळा भात –

२ वाटय़ा

कांदा – १ उभा चिरलेला

बटाटा – १ चौकोनी कापून तळलेला

तीळ – १/४ वाटी भाजलेले

मीठ – चवीप्रमाणे

मिरपूड – १/२ चमचा

तेल – १/४  वाटी

कृती :

कढईमध्ये तेल गरम करा. त्यावर कांदा घालून परता. त्यावर तळलेले बटाटे, मीठ आणि मिरपूड घालून परता. त्यावर तयार भात घालून एकत्र करा. शेवटी भाजलेले तीळ घालून एकत्र करा आणि गरम गरम सव्‍‌र्ह करा.

आवडत असल्यास वरून थोडी कोिथबीर घाला.

सिसेमडीप

साहित्य :

तीळ-   २ टेबलस्पून

तिळाचे तेल-   अर्धा टेबलस्पून

मीठ-   पाव चमचा

पाणी-   अर्धा कप कोमट

कृती :

तीळ ब्लेंडरमध्ये घालून फिरवा. नंतर त्यावर तिळाचे तेल आणि मीठ घालून परत फिरवा आणि फिरवत असतानाच त्यात हळू हळू पाणी घालून पेस्ट तयार करा.

क्रॅकर्स, ब्रेड स्टिक्स वगरे यामध्ये बुडवून खायला खूप मजा येते.

पनीर मूग टोस्ट

साहित्य :

पनीर – १ ते दीड कप किसलेले

मोड आलेले मूग – अर्धा कप ब्लांच करून घ्या

पावाचे स्लाइस – ८

ताजी कोिथबीर – २ टेबल स्पून बारीक चिरलेली

ताज्या लाल मिरच्या – १ ते २ बारीक चिरल्या

चिली किंवा टॉमॅटो सॉस-पाव कप

गाíनिशगसाठी कांद्याची पात – बारीक चिरलेली.

मीठ – चवीप्रमाणे

तीळ -अर्धा कप

कृती :

ओव्हन १८० डी. से. ला गरम करून ठेवा. बेकिंग ट्रेला थोडेसे तेल लावून ठेवा.

एका भांडय़ामधे पनीर, मूग, ताजी कोिथबीर, ताज्या लाल मिरच्या, मीठ आणि सॉस नीट एकत्र करून घ्या.

पावाच्या स्लाइसचे गोल किंवा निरनिराळ्या आकाराचे तुकडे कापून घ्या. त्यावर वरील थोडे मिश्रण पसरून त्याच्यावर तीळ पसरून आधी गरम केलेल्या बेकिंग ट्रेमध्ये ठेवा. पाच ते दहा मिनिटे बेक करून घ्या.

प्लेटमध्ये ठेवून त्याच्यावर कांद्याची पात पसरून गरम सव्‍‌र्ह करा.

टीप :

ब्रेडऐवजी क्रीम क्रॅकर बिस्किटे वापरली तरी चालतील.

कप केक

साहित्य :

बारीक रवा-    १ कप

साखर-   अर्धा कप

लोणी-   अर्धा कप

बेकिंग पावडर-   १ चमचा

तिळाची पूड-     अर्धा कप

बदामाची पूड-   अर्धा कप

व्हॅनिला इसेन्स-   १ चमचा

अंडी-   २

कृती :

ओव्हन २२० अंश सेल्सिअसला गरम करून घ्या.

प्रथम लोणी फेटून घ्या. मग त्यामध्ये साखर घालून फेटा. मग अंडे घालून फेटा, नंतर रवा घालून कट फोल्ड पद्धतीने एकत्र करा. नंतर त्यात बदाम आणि तिळाची पूड एकत्र करा.

पेपर कपमध्ये भरून १८० अंश सेल्सिअसला २०-२५ मिनिटे बेक करा.

थंड झाल्यावर त्यावर घट्ट चॉकलेट सॉस लावून वर हंड्रेड थाउझंड बॉल्स आणि तीळ पसरवा.

भरली वांगी

साहित्य :

छोटी वांगी – २५० ग्रॅम

कांदे -४ मध्यम, चार तुकडे करून

धणे – १ ते दीड चमचे

तीळ – १ ते दीड चमचे

मेथी दाणा – अर्धा चमचा

शेंगदाणे – २ टेबलस्पून

खसखस – ३/४ चमचा

जिरे – अर्धा चमचा

सुके खोबरे – १ टेबल स्पून किसलेले

आले – १ इंच बारीक चिरलेले

लसूण – ६ ते ८ पाकळ्या बारीक चिरलेला

हळद – चिमूटभर

तिखट – अर्धा चमचा

गूळ – अर्धा चमचा किसलेला

चिंच – कोळ २ टेबलस्पून

मीठ – चवीप्रमाणे

तेल – २ टेबलस्पून

कढीपत्ता – थोडासा

कोिथबीर – गाíनशसाठी

कृती :

सर्व वांग्यांचे देठ काढून त्यांना मध्ये एक चीर करून घ्या. फक्त वांग्याचे दोन तुकडे होणार नाहीत याची काळजी घ्या.

नॉन स्टिक पॅनमध्ये कांदे चांगले गुलाबी होईपर्यंत भाजून एका थाळीमध्ये काढून घ्या.

धणे, तीळ, मेथी दाणे, खसखस, जिरे एकत्र करून खमंग वास येईपर्यंत भाजा. कांद्याच्या थाळीमध्ये काढून ठेवा.

त्यामध्ये आले, लसूण, हळद, तिखट आणि गूळ घालून नीट एकत्र करा.

हे मिश्रण मिक्सरमध्ये घेऊन जरुरीप्रमाणे पाणी घालून नीट पेस्ट करून घ्या. एका भांडय़ात काढून त्यामध्ये चिंचेचा कोळ मिक्स करा.

हा मसाला वांग्यामध्ये केलेल्या चीरेमध्ये नीट भरून घ्या.

एका पॅनमध्ये तेल गरम करून कढीपत्ता आणि उरलेला मसाला परतून घ्या. त्यामध्ये वांगी घालून एक दोन मिनिटे परतून घ्या. नंतर मंद आंचेवर झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत वांगी शिजवून घ्या.

वर कोिथबीर घालून गरम गरम सव्‍‌र्ह करा

तिळातली वांगी

साहित्य :

तीळ – १ टेबलस्पून

वांगे – १ मोठे  साधारण अर्धा इंचाचे गोल काप कापलेले

ऑलिव्ह ऑइल – २ टेबलस्पून

आले – १ टेबलस्पून किसलेले

तिळाचे तेल – १ टेबलस्पून

मध – १ टेबलस्पून

पाणी – १ टेबलस्पून

व्हिनेगर (राइस) – १ चमचा

भाजलेल्या लाल मिरचीची पेस्ट – १ चमचा

पातीचा कांदा – १/३ कप

कृती :

एका पॅनमध्ये मध्यम आचेवर तीळ चांगला खमंग वास येईपर्यंत भाजा.

ओव्हन २५० से. ला तापवून घ्या. एका बेकिंग ट्रेमध्ये कागद घालून त्यावर वांग्याचे काप दोन्ही बाजूंना ब्रशने ऑलिव्ह ऑइल लावून मऊ होईपर्यंत उलटसुलट करून बेक करा.

व्हिनेगर, तिळाचे तेल, आले, मध, पाणी आणि मिरचीची पेस्ट एका भांडय़ात घेऊन व्हिस्कच्या मदतीने नीट एकत्र करा.

ओव्हनचे तपमान थोडे वाढवून साधारण दोन चमचे वरील मिश्रण एका कापाला चोळून साधारण चार मिनिटे बेक करा. वर भाजलेले तीळ आणि पातीच्या कांद्याचे तुकडे घालून सव्‍‌र्ह करा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 20, 2019 1:06 am

Web Title: sesame recipes
Next Stories
1 गुळाचा गोडवा
2 बाजरीतले उष्मांक
3 असा असावा हिवाळी आहार
Just Now!
X