साहित्य :
चार-पाच मोठी संत्री, २०० मि.ली. दूध, २०० ग्रॅम खवा, २०० ग्रॅम साखर, थोडी वेलची पावडर.

कृती :
संत्री सोलून बिया काढून संत्र्याचे बारीक तुकडे करून घ्या. ते तुपात चांगले परता. त्यावर दूध घाला. दूध आटलं की साखर घाला. साखर विरघळल्यावर खवा घाला. सगळे जिन्नस एकत्र झाले की त्यांनी बाजूने कढई सोडायला सुरुवात केली की त्यात वेलची पावडर टाका आणि गार झाले की सव्‍‌र्ह करा.

मकाई नो धंडवो (मक्याचे दणगिले)

साहित्य :
मक्याचे दाणे १ किलो, अर्धा किलो बटाटे, २०० ग्राम फरसबी ल्ल    १०० ग्राम गाजर, १०० ग्राम वाटाणे, १०० ग्राम दही, ५० ग्राम भात (एक कप शिजविलेला), ५० ग्राम काजू व द्राक्षे, चवीप्रमाणे आले, मिरची, कोथिंबीर,  मीठ व साखर, लिंबू, हिरवी चटणी व फोडणी (तयार करून ठेवणे)

कृती :
अमेरिकन किंवा देशी मक्याचे कणीस चालेल. मक्याचे अर्धे दाणे क्रश व अर्धे दाणे अख्खे ठेवणे. बटाटे उकडून स्मॅश करणे. सर्व भाज्या बारीक चिरून वाफवून घेणे. तयार भातामध्ये मक्याचे दाणे, सर्व भाज्या, आलं, मिरच्या, मीठ, साखर, लिंबाचा रस सर्व एकत्र करणे. बेक डिशमध्ये तळाला तेल लावून पसरवणे. त्यावर हिरवी चटणी पसरवणे. परत उरलेले मक्याचे साहित्य पसरवणे. आता फोडणी पसरवणे. प्री-हॉट ओवनमध्ये १८० अंश सेल्सियसमध्ये १५-२० मिनिटे बेक करणे.

चिक्कू लाडू

साहित्य :
एक किलो खवा, अर्धा किलो चिक्कू, २०० ग्रॅम पिठीसाखर,  ५० ग्रॅम काजू,   २ टेबल स्पून तूप,  २ टीस्पून रोझ वॉटर.

कृती :
एका कढईत खवा भाजून घ्या. थोडा हलका रंग आला की त्यात चिक्कूचा पल्प तयार करून घाला. दोन्ही चांगलं हलवून एकत्र करून घ्या. चिक्कूमधील पाणी सुकेपर्यंत परतून घ्या. गार झाल्यावर त्यात पिठीसाखर घाला. आणि एकत्र करून घ्या. या मिश्रणाचे लाडू करून काजूने सजावट करा. (रोझ वॉटर पिठीसाखरेबरोबर मिसळून घ्या.)

बिस्किट पुडिंग

साहित्य :
२०० ग्रॅम मारी बिस्किटे, मिल्क चॉकलेट,  २०० ग्रॅम क्रीम, मिल्कमेडचा एक डबा,  १५० ग्रॅम अक्रोड (अक्रोड आधी भाजून घेणे)

कृती :
सर्वप्रथम मिल्कमेडचा डबा गरम पाण्यात ठेवा. त्यामुळे मिल्कमेडचा घट्टपणा जाईल. मिल्कमेड पातळ झाले की एका बाउलमध्ये काढून घ्या. त्यात एक एक करून सर्व बिस्किटे बुडवून एका काचेच्या ट्रेमध्ये रचून ठेवा. त्यावर अक्रोड पसरा. त्यावर क्रीम पसरा. नंतर चॉकलेट किसून पसरा. पुन्हा बिस्किटे, मिल्कमेड, क्रीम, अक्रोड, चॉकलेटचा लेअर रिपीट करा. फ्रिजमध्ये ठेवून सेट झाले की कापून सव्‍‌र्ह करा.

फज रोल

साहित्य :

एक डबा मिल्कमेड, एक लिटर दूध, १०० ग्रॅम साखर, २०० ग्रॅम बटर (लोणी),  ५० ग्रॅम बारीक केलेले अक्रोड,  ५० ग्रॅम कोको पावडर. २ ते ३ टे. स्पून डेसिकेटेड कोकोनट.

कृती :
एका कढईत मिल्कमेड, दूध, साखर, बटर एकत्र शिजवून घ्या. ते कढईची बाजू सोडायला लागले की त्यात कोको पावडर मिसळून घ्या. त्याचा हळूहळू गोळा तयार होईल. गॅस बंद करा. थंड झाल्यावर या गोळ्याची पोळी लाटून त्यावर अक्रोड डेसिकेटेड कोकोनट पसरा आणि त्याचा रोल करा. फ्रिजमध्ये ठेवून मग त्याचे स्लाइस कापा.
टीप – पोळी लाटताना गोळा बटर पेपरवर ठेवून मग लाटा किंवा लाटले जात नसेल तर बटर पेपरवर थापा.