scorecardresearch

चिकन बिर्याणी

राइस शिजलेला नसला तरी दोन ते तीन मिनिटे वाढवावीत.

साहित्य :
एक वाटी बासमती तांदूळ, पाव किलो चिकन, तीन ते चार ग्रीन चिली बारीक केलेला, एक वाटी कांदा बारीक चिरलेला, अर्धा वाटी दही, तीन ते चार चमचे आलं-लसूण पेस्ट, अर्धी जुडी कोथिंबीर बारीक चिरलेली, मीठ चवीनुसार, दोन चमचे तूप, दोन ते तीन हिरवी वेलची, एक कांडी दालचिनी, अर्धा चमचा शाही जीरा, तेजपत्ता, दोन ते तीन लवंग.

कृती :

एका भांडय़ात चिकन, दही, मीठ, कोथिंबीर, आलं-लसूण पेस्ट, सर्व साहित्य टाकून चिकनला दोन ते तीन तास मॅरीनेट करून ठेवावे, बासमती तांदळामध्ये एक वाटी पाणी टाकून भिजत ठेवावा.

एका काचेच्या बाऊलमध्ये तूप टाकून वेलची, दालचिनी, जिरा, तेजपत्ता, लवंग, ग्रीन चिली, कांदा टाकून मायक्रो हायवर चार ते पाच मिनिटे ठेवावे. त्यावरती बासमती तांदूळ टाकून त्यावर तीन वाटय़ा पाणी टाकून झाकण लावून मायक्रो हायवरती दहा मिनिटे व त्यानंतर मायक्रो मिडिअमवर पाच मिनिटे ठेवावे. राइस शिजलेला नसला तरी दोन ते तीन मिनिटे वाढवावीत.

प्रॉन्स विथ बेजील गार्लिक

साहित्य :

पाव किलो कोलंबी सोललेली, चार ते पाच चमचे तेल, दहा ते बारा तुळशीची पाने (बेजील), चार ते पाच लसून बारीक चिरलेला, एक जुडी स्प्रिंग ऑनीयन बारीक केलेले (कांद्याची पात), पाव वाटी कोथिंबीर चिरलेली, मीठ चवीनुसार, अर्धा चमचा काळीमिरी पावडर.

कृती :

एका भांडय़ात साफ केलेली कोलंबी, तेल बेजील, लसून, कांद्याची पात, मीठ, टाकून अर्धा तास तरी मॅरीनेट करून ठेवावे.

काचेच्या बाऊलमध्ये हे सर्व साहित्य टाकून मायक्रो हायवर चार ते पाच मिनिटे ठेवावे. त्यावर कोथिंबीर व काळीमिरी टाकून स्टार्टर म्हणून सव्‍‌र्ह करावे.

कासूंडी मटण किंवा कासूंडी पनीर 

साहित्य :

शंभर ते दीडशे ग्रॅम बोनलेस मटण किंवा पनीर छोटे मध्यम आकाराचे तुकडे केलेले, दीड वाटी कांदा, एक चमचा दही, अर्धा चमचा मोहरी, एक चमचा तिळाचे तेल, एक चमचा मिरची पावडर, एक चमचा आलं पेस्ट, एक चमचा हिरवी मिरची पेस्ट, दोन ते तीन चमचे तिळाचे तेल,  मीठ चवीनुसार.

कृती :

एका भांडय़ात कांदा, दही, मोहरी, तिळाचे तेल (एक चमचा), मिरची पाडवर, आलं पेस्ट, हिरवी पेस्ट, मीठ हे सर्व एकत्रित मिक्स करून घ्यावेत.

एका काचेच्या बाऊलमध्ये साफ केलेले मटणाचे किंवा पनीरचे मध्यम आकाराचे तुकडे व दोन ते तीन चमचे तेल टाकून झाकण लावून मायक्रो हायवर पाच मिनिटे ठेवावे. त्यात तयार केलेले मॅरीनेशन टाकून हळूवारपणे मिक्स करून मायक्रो मिडिअमवर पाच मिनिटे ठेवावे व स्टार्टर म्हणून सव्‍‌र्ह करावे.

व्हेज थाय रेड करी

साहित्य :

दोन वाटी नारळाचे दूध, दोन चमचे थाय रेड करी पेस्ट, चार ते पाच बेबी कॉर्न, पाव किलो फ्लोअर (छोटे तुकडे), १० ते १२ मशरूम, सहा ते सात लिंबूची पाने, तीन ते चार तुळशीची पाने, तीन ते चार मिरची बारीक तुकडे, एक चमचा साखर, मीठ चवीनुसार.

कृती :

एका भांडय़ात नारळाचे दूध व करी पेस्ट टाकून मायक्रो मिडिअमवर चार ते पाच मिनिटे ठेवावे. त्यामध्ये मशरूम, बेबी कॉर्न फ्लॉवर (कोबी) मायक्रो मिडिअमवर तीन मिनिटे ठेवावे. सर्व भाज्या गाळून घ्याव्यात. उरलेल्या ग्रेव्हीमध्ये शुगर, मीठ, लिंबाची पाने, तुळशीची पाने टाकून मायक्रो मिडिअमवर तीन मिनिटे ठेवावे. त्यात गाळून घेतलेल्या भाज्या टाकून मायक्रो मिडिअमवर तीन मिनिटे ठेवावे. स्टीम राइसबरोबर सव्‍‌र्ह करा.

कॅरेट अ‍ॅण्ड वॉलनट पुडिंग

साहित्य :

दोन-तीन लाल गाजर, अर्धा अक्रोड, अर्धी वाटी बेदाणे, अर्धा वाटी साखर, अर्धा वाटी दूध, अर्धा चमचा बेकिंग पावडर, अर्धा वाटी गव्हाचे पीठ,  अर्धा चमचा जायफळ पावडर, दोन अंडी फेटून घेतलेली

कृती :

गाजर किसून घ्यावे आणि अक्रोडचे बारीक तुकडे करावे. एका बाऊलमध्ये अक्रोड, बेदाणे, साखर, दूध, गाजर एकत्र करून मायक्रो हायवर तीन ते चार मिनिटे ठेवावे. बाहेर काढून एकजीव करून घ्यावे. त्या गव्हाचे पीठ, बेकिंग पावडर, जायफळ पावडर, अंडी टाकून दुसऱ्या एका मोठय़ा व उंचीच्या बाऊलमध्ये हे मिश्रण घालून मायक्रो हायवर पाच मिनिटे ठेवावे. (झाकण लावून ठेवावे.) थंड  झाल्यावर गरम सव्‍‌र्ह करावे.
विवेक ताम्हाणे – response.lokprabha@expressindia.com

मराठीतील सर्व स्मार्ट कुकिंग ( Smart-cooking ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Smart cooking chicken biryani

ताज्या बातम्या