अप्पा निवृत्त होताना सहकाऱ्यांना म्हणाले, लाखात एक आहे माझा शिशिर. फूटपट्टीसारखा सरळ स्वभाव.. सुपारीच्या खांडेचे व्यसन नाही त्याला. हां.. आता त्याला पैशात फार रस आहे ही गोष्ट वेगळी…

अप्पांनी शेवटचे एकदा त्या अवाढव्य .. लांब-रुंद पसरलेल्या पांढऱ्याफेक बििल्डगकडे पाहिले. खरे तर तीच त्यांची कर्मभूमी होती. गेली पस्तीस वर्षे त्यांनी आपले श्रम तिथे समर्पित केलेले होते. समोरच त्यांचे पंधरा-वीस सहकारी त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी आले होते. सर्वाचे चेहरे गंभीर.. उदास होते. अप्पांच्या मनात तर विचारांच्या भावनेचे तुफान उठले होते. उद्यापासून सारे काही संपले. सहकारी दुरावणार.. जीवनात एक पोकळी निर्माण होणार – हे कधी ना कधी होणार होतेच, ते आज घडत आहे एवढेच. पाहता.. पाहता अप्पांचे डोळे भरून आले. त्यांनी भरल्या डोळय़ांनीच आपल्या सहकाऱ्यांकडे पाहात दोन्ही हात जोडले. भारावलेल्या आवाजात ते म्हणाले,
‘‘बराय. मित्रांनो भेटत चला’’
‘‘हो. हो भेटूच आपण’’ कोरसमध्ये सर्वजण.
मान फिरवून ते चालायला लागले तेव्हा एका सहकाऱ्याने विचारले,
‘‘हे काय अप्पा. कोणी घ्यायला नाही आले?’’
‘‘अरे कोण येणार.. चिरंजीवाला र्अजट मीटिंग होती. सूनबाईला सुट्टी नव्हती.. म्हणून नाहीतर आले असते ते मला घ्यायला.’’ अप्पांनी खुलासा केला. तसा तो सहकारी म्हणाला,
‘‘थांबा. मी येतो सोडायला.’’
‘‘अरे.. कशाला.. कशाला?’’ पण तोपर्यंत तो सहकारी आपल्या साहेबांची परवानगी घेऊन पाìकगकडे गाडी आणण्यासाठी गेलासुद्धा होता.
गाडी येताच अप्पा गाडीत बसले. गाडी सुरू होताच सहकाऱ्याने विचारले,
‘‘अप्पा घरीच सोडू ना?’’
‘घरीच जायचे आहे.. पण मध्ये कुठेतरी आपण कडक चहा घेऊ.. आणि घरी जाऊ.’’
‘‘हरकत नाही अप्पा.’’ सहकारी म्हणाला.
मधली वेळ शांततेत गेली. पुन्हा सहकाऱ्यानेच प्रश्न केला.
‘‘अप्पा आता काही प्रॉब्लेम नाही ना..!’’
अप्पा म्हणाले,
‘‘छे.. छे प्रॉब्लेम बिब्लेम आपल्याला अजिबात नाही. माझे चहू बाजूने चांगले आहे. बघ, एकुलता एक मुलगा आहे. त्याला सुपारीच्या खांडेचा शौक नाही. चांगली नोकरी आहे. सूनबाई पण जॉब करते. माझ्या सोबतीला कुणी नाही एवढेच एक दु:ख आहे. कंपनीत वेळ निघून जात होता. आता मात्र वेळ खायला उठणार बहुतेक.
‘‘अप्पा चांगली पुस्तके वाचायची. संगीत ऐकायचे.. सकाळ-संध्याकाळ फिरायला जायचे.. जात जाईल वेळ.’’ सहकारी.
‘‘हो तसेच करू या.’’ अप्पा म्हणाले. सहकाऱ्याने एका हॉटेलपाशी गाडी थांबवली. ते चहा घेण्यासाठी हॉटेलात गेले.
हॉटेलमध्ये चहा पिता पिता अप्पा सहकाऱ्याला बोलले, ‘‘मला एकच समाधान आहे बाबा.. माझा शिशिर लाखात एक आहे. अरे चहू बाजूला पाहतो मी तरुण पिढी दारूने झिंगलेली असते. त्यात चहू बाजूला दारूचे बार उघडलेले.. पण माझा शिशिर चुकूनही तिकडे फिरकला नाही. उलट मलाच तो झापत असतो. एकदम फूटपट्टीसारखा सरळ स्वभाव त्याचा. साध्या सुपारीच्या खांडेचे त्याला व्यसन नाही. चहा, कॉफी हे तर फार दूरची गोष्ट. स्पष्टवक्ता आहे. नाही म्हणायला त्याला पैशात फार इंटरेस्ट. पैशावर पैसा कसा कमवायचा.. त्या फायद्यावर फायदा कसा कमवायचा हाच त्याचा कायम विचार असतो बाबा. बाकी त्याला कसलीही आवड नाही.’’
‘‘चांगले आहे ना अप्पा मग. पैशाची आवड कुणाला नसते. त्यात काहीच वावगे नाही अप्पा.’’ सहकारी म्हणाला.
सहकारी अप्पांना घरी सोडून निघून गेला. अप्पांच्या मनात सहकाऱ्याचे वाक्य घुमत होते.
‘‘पैशाची आवड कुणाला नसते.. त्यात काहीच गैर नाही.’’
पण अप्पांचे मत वेगळे होते. पैसा पाहिजे पण त्या पैशाचा उपभोग नको घ्यायला. मणभर कमवल्यानंतर कणभर खर्च करायला काय हरकत आहे. पण त्याचे म्हणणे होते पैसा सतत वाढत राहिला पाहिजे. तो एकदा टाकला की आपला जीव गेला तरी काढायचा नाही.
अप्पांना ते पटत नव्हते. उलट उधार उसनवारी करा.. कर्ज काढा आणि मजा करा.. कारण हा क्षण पुन्हा येणार नाही. जीवनात आनंद घ्यायचा असेल तर मनात येईल ते करा. ज्या गोष्टीची इच्छा झाली त्या गोष्टीसाठी पैसा खर्चायची वेळ आली तर खर्च करा. कारण पैसा खर्च करून आनंद मिळविण्यासाठीच असतो. त्यामुळे अप्पांनी आपल्या जीवनात सर्वच गोष्टींचा मनमुराद आनंद घेतला होता, घेत होते आणि त्यांना घ्यायचा होता. जे करायचे ते मोकळेपणाने करायचे. तृप्त व्हायचे.. असेच ते जगले होते.. जगत होते. आणि तसेच त्यांना जगायचे होते. पण.. मध्ये त्यांना त्रास व्हायला लागला. चालताना एकदम धाप लागायची. अंधारी यायची. हात-पाय गळून जायचे.. त्यांनी चेक केले. डॉक्टरांनी सांगितले,
‘‘बायपास करावी लागेल.. तीही ताबडतोब.’’

chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
narendra modi, PM Narendra Modi,
हुकमी ‘नॅरेटिव्ह’ने यंदा मोदींना हुलकावणी दिली आहे का?
नात्यातील ताण्याबाण्यांची गंमत
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र

अप्पांचे मत वेगळे होते. पैसा पाहिजे पण त्या पैशाचा उपभोग नको घ्यायला? मणभर कमवल्यानंतर कणभर खर्च करायला काय हरकत आहे? पण शिशिरचे म्हणणे होते पैसा सतत वाढत राहिला पाहिजे.

तेव्हा ते कंपनीत कामाला असल्याने सर्व सहकाऱ्यांनी धीर दिला. बायपास झाली. तेव्हापासून बऱ्याच गोष्टींवर नियंत्रणे आलीत. पथ्ये आली.
संध्याकाळ व्हायला सुरुवात झाली. अप्पा अंगणात आले. अप्पांनी आपले सर्वस्व पणाला लावून हा बंगला बांधला होता. चांगला ऐसपैस सात खोल्या. सर्व सोईयुक्त. आजचे त्याचे बाजारी मूल्यच पन्नास-पंचावन्न लाखांच्या घरात होते. त्या वेळी होऊन गेले. आता मात्र कठीण काम झालेले होते.
अंधार पडायला सुरुवात झाली. आकाश अनेक रंगांनी रंगून गेलेले होते. अप्पाही आपल्या विचारात गुंतून गेले होते. उद्यापासून धावपळ बंद. पहाटे उठणे नाही. थंडी गारठय़ात कंपनीत जाणे नाही. कुणी येऊन आता काही सांगणार नाही.. कुणाविषयी खडे फोडणे नाही की कुणाच्या समाधानासाठी खोटे बोलणे नाही. सारे काही संपले आता. आपण रिते झालो. ते एकदम स्थिर आहेत. कितीतरी वेळ ते तसेच बसून होते.
बाहेर हालचाल झाली तशी मुलगा आणि सून आल्याची त्यांना जाणीव झाली. ते भानावर आले. आल्या आल्या मुलाने त्यांचे अभिनंदन केले. म्हणाला,
‘‘दादा आता आराम करायचा. बाकी काही नाही.’’
‘‘होय बाबा.’’
‘‘किती मिळाले दादा पैसे मग?’’
‘‘सगळे मिळून मिळतील अकरा लाख रुपये.’’
‘‘फक्त अकरा लाख?’’.. जोशी काकांना अठरा लाख मिळाले ना!’’
‘‘मिळाले असतील.. पण आपण कितीतरी वेळा फंड काढला. त्याने कधी फंडाला हात लावला नाही म्हणून.’’ अप्पांनी खुलासा केला.
‘‘आता कशात टाकणार पैसे?’’
‘‘बघू.. मी बँकेत, सोसायटीत. पोस्टात चौकशी केली. जिथे दोन पैसे जास्त मिळतील तिथे ठेवू. काय वाटते तुला?’’
शिशिर म्हणाला.
‘‘मला वाटते कोणत्याही बँकेत, पोस्टात अथवा सोसायटीत अडकविण्याऐवजी दुसऱ्या स्कीममध्ये पैसे अडकवले तर बँकेपेक्षा तुम्हाला भरघोस फायदा होईल.’’
‘‘सांग मला. अशा काही स्कीम असतील तर आपण विचार करू.’’
दुसऱ्याच दिवशी शिशिर अप्पांना घेऊन ‘ऑनेस्टी इन्व्हेस्टमेंटस्’ नावाच्या एका ऑफिसमध्ये आला. त्यांना पाहताच ऑफिसमधील ऑफिसर दोघांच्या पुढय़ात आला. तो सुटाबुटात एकदम जन्टलमेन वाटत होता. त्याच्या जिभेवर अगदी साखर होती. अप्पांना तो म्हणाला,
‘‘या. या.. काका बसा.
थंड पाणी घ्या.’’
अप्पा आणि शिशिर सोफ्यात बसले. त्या गुबगुबीत सोफ्यात ते अर्धेअधिक रुतूनच बसले होते. तोपर्यंत त्यांच्यासमोर थंडगार थम्सअपची बाटली टेबलावर आली. अप्पा ए.सी.ने आणि थंडगार थम्सअपने सुखावले. मॅनेजरने त्यांना बरीच माहिती पुरविली. दामदुप्पट योजना. वार्षिक व्याज.. तर मंथली व्याज अशा अनेक योजना स्कीम्स सांगितल्या. अप्पांचे तर डोके चालेनासे झाले. पण शिशिर म्हणाला,
‘‘दादा. महिन्याच्या महिन्याला व्याज घेण्यापेक्षा दामदुप्पट योजनेत पैसे अडकवू म्हणजे आपल्याला चांगला रिटर्न मिळेल.’’
‘‘अन् माझे काय.. मला लागले तर मी काय करायचे.’’
‘‘अहो आम्ही. मी म्हणजे. मी आहेच. सून आहे तुमची.. आम्ही देतच जाऊ.. अजून लागले तर मागून घेत जा.’’
अप्पा म्हणाले,
‘‘विचार करतो, मग सांगतो.’’
‘काही हरकत नाही.. तुमचा फायदा व्हावा.. तुम्हाला दोन पैसे जास्त मिळावेत म्हणून मी जीव काढतोय.. बाकी काही नाही,’
शिशिर अप्पांना म्हणाला.
मॅनेजर म्हणाले, ‘काका, तुम्ही आमच्या समृद्धी स्कीममध्ये पैसे गुंतवा. झटपट दुप्पट होतील. तुम्हाला चांगला रिटर्न मिळेल. विचार करा.’
अप्पा म्हणाले खरे, पण त्यांनी विचार केलाच नाही. ते खोलात शिरले नाहीत. शिशिर आणि मॅनेजरने सांगितल्यामुळे झटपट दुप्पट होणाऱ्या स्कीममध्ये पैसे अडकविलेच. फॉर्मवर त्यांनी सह्य केल्या.. शिशिरनेही सह्य केल्या. अप्पांनी दहा लाखांचा चेक मॅनेजरच्या ताब्यात दिला. थोडाफार पैसा अप्पांनी जवळ ठेवला होताच.
(पूर्वार्ध)