शब्दार्त
चैतन्य प्रेम – response.lokprabha@expressindia.com

निशंक हो, निर्भय हो मना रे,
प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे!
अतक्र्य अवधूत हे स्मर्तृगामी,
अशक्यही शक्य करतील स्वामी!!

ram navami, shobha yatra, akola, vishwa hindu parishad, ram navami in akola, ram navami shobha yatra, ram navami vishwa hindu parishad, marathi news, ram navami news, akola news,
अकोला : रामनवमीनिमित्त राजराजेश्वरनगरी भगवामय; शोभायात्रेची ३८ वर्षांची परंपरा
replica of Ram temple, Ram campaign,
ठाण्यात ठाकरे गटाकडून रामाचा प्रचार, राजन विचारेंच्या चैत्र नवरात्रोत्सवात राम मंदिराची प्रतिकृती
kolhapur, kolhapur s Ambabai Devi Idol, Ambabai Devi Idol Conservation, Urgent Call for Conservation, Ambabai Devi Idol in Original Form, Snake symbol, ambabai mandir, mahalakshmi mandir,
कोल्हापूर : अंबाबाईचे मूर्ती संवर्धन डोक्यावरील नागप्रतिमेसह व्हावे; भाविकांची मागणी
Rajyog Lakshmi Narayan Rajyoga
मे महिन्यात निर्माण होईल लक्ष्मी नारायण राजयोग! या तीन राशींचा सुरु होईल सुवर्णकाळ, मिळेल बक्कळ पैसा

नागपूरचे विश्वनाथ दामोदर वऱ्हाडपांडे या स्वामिभक्तांनी लिहिलेल्या या स्तोत्राचा गेल्या पाच भागांपासून आपण मागोवा घेत आहोत. स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांची आळवणी करणारं हे स्तोत्र स्वामिभक्तांनी ‘तारकमंत्र’ म्हणूनच अतिशय प्रेमादरानं स्वीकारलेलं आहे. या स्तोत्राच्या पठणानं प्रतिकूल परिस्थितीने खचलेल्या मनाला उभारी येते, असा स्वामिभक्तांचा अनुभव आहे. स्वामिभक्तांना हे स्तोत्र म्हणजे तारकमंत्र का वाटतो? अशी या स्तोत्रात काय शक्ती आहे? काय वैशिष्टय़ आहे? थोडा विचार करू.

मनुष्याच्या जीवनातलं सर्वात मोठं संकट किंवा सर्वात मोठी हानी कोणती आहे? तर ही मोठी हानी किंवा मोठं संकट म्हणजे ना पशाचं नुकसान आहे, ना रोगानं ग्रासणं आहे, ना जवळच्या माणसांकडून विश्वासघात होणं आहे. माणसाच्या जीवनातलं सर्वात मोठं संकट म्हणजे त्यानं मनानं खचणं, हेच आहे! परिस्थिती कितीही प्रतिकूल का असेना, माणसाचं मन खचलं नसेल, तर तो त्या संकटातूनही धर्यानं वाट काढतो, सहनशक्तीच्या जोरावर परिस्थितीला सामोरं जातो. पण तेच, परिस्थिती कितीही अनुकूल असतानादेखील माणूस मनानं खचला असेल, तर निराशेनं, नकारात्मक विचारानं तो कुढत राहतो. नसलेलं संकट निर्माण करतो. तेव्हा कोणत्याही परिस्थितीत भक्तीच्या जोरावर मनाला हे स्तोत्र तारून नेतं आणि म्हणूनच त्याला तारकमंत्राचा मान अगदी सहज स्वाभाविकपणे लाभला आहे.

या तारकमंत्रातील नि:शंक-निर्भय, अतक्र्य आणि अवधूत या विशेषणांचा आतापर्यंत आपण तीन लेखांतून मागोवा घेतला. आता आज ‘स्मर्तृगामी’ या विशेषणाचा विचार आपण करणार आहोत.

‘स्मर्तृगामी’ म्हणजे स्मरणगामी, जो नुसत्या स्मरणानं प्रकट होतो, जो स्मरणानं सहजसाध्य असतो तो! श्रीवासुदेवानंद सरस्वती ऊर्फ टेंबेस्वामी महाराज यांनी भगवान दत्तात्रेयांवर लिहिलेल्या स्तोत्राच्या सुरुवातीच्या श्लोकांतच म्हटलं आहे की :

दत्तात्रेयं महात्मानं वरदं भक्तवत्सलम्।
प्रपन्नाíतहरं वन्दे स्मर्तृगामी समाऽवतु॥
दीनबन्धुं कृपासिन्धुं सर्वकारणकारणम्।
सर्वरक्षाकरं वन्दे स्मर्तृगामी समाऽवतु॥

संस्कृत भाषेवर निरतिशय प्रेम असलेल्या एक अभ्यासू साधक आहेत. त्यांना या श्लोकातील ‘समाऽवतु’ची फोड विचारली. त्यांच्या सांगण्याचं जे सार होतं ते असं की, ‘‘स हा स च्या विसर्गाचा लोप आहे. अहंचे द्वितीया एकवचन ‘मां’ आणि ‘मा’ असे दोन्हीही आहे. ‘मा+अवतु’ याचा संधी ’माऽवतु’. ‘आ’+‘अ’ याचा ‘आ’ आणि अवग्रह होतो. म्हणून ‘माऽवतु’. ‘अवतु’ म्हणजे अमुक होवो, असं आशीर्वचन द्यावं, ही प्रार्थना. तर हा श्लोक दत्तात्रेयांना आळवतो की, ‘हे परमात्मन दत्तात्रेया, तू भक्तांना वरदायक अशी वात्सल्यमूर्तीच आहेस. आपत्तीत आर्तपणे स्मरण करताच प्रकटणाऱ्या हे दत्ता तुझ्या आशीर्वादाचं पाठबळ मला दे, तुला वंदन असो. तू दीनांचा सखा आणि करुणेचा सागर आहेस. सर्व कारणांचं कारण आहेस. सर्वाच्या रक्षणाचं ब्रीद असलेल्या आणि स्मरण करताच प्रकटणाऱ्या हे दत्ता, तुझ्या आशीर्वादाचं पाठबळ मला दे, तुला वंदन असो!

थोडक्यात भगवान दत्तात्रेय हे भक्ताला नुसत्या स्मरणानं साध्य होणारे आहेत. स्वामी समर्थाना दत्तात्रेयाचा अवतार मानतात. त्यामुळे त्यांचंही हे वैशिष्टय़ आहेच. इथं ‘दत्तात्रेय’ या शब्दाची जाणवलेली अर्थछटाही विलक्षणच आहे बरं! जो उत्तम, मध्यम आणि निम्नतम अशा तीनही स्तरावरील भक्तांच्या भूत, वर्तमान आणि भविष्य या तीनही काळातील अनुकूल, प्रतिकूल आणि सहज अशा तीनही स्थितीत दत्त म्हणजे हजर असतो आणि सत, रज आणि तम या तीनही गुणांच्या पकडीतून भक्ताला सोडवतो तो ‘दत्तात्रेय’!

पण दत्तावतारी स्वामी समर्थ महाराजच नव्हेत, तर सर्वच सदगुरू स्वरूपांचं हे वैशिष्टय़ आहे की, ते स्मरणानंच अंतर्मनात व्याप्त होऊ शकतात! स्वामी विवेकानंद यांच्या एका अतिशय समर्पक वचनाची इथं आठवण होते. ते म्हणत, ‘भगवंत भक्ताच्या हाकेला नि:संशय धावून जातो, पण हाक मारणारा खरा भक्त मात्र असला पाहिजे!’ आणि इथंच सगळं अडतं! खरी भक्ती करीत नसताना आणि खरी भक्ती साधावी, अशी प्रामाणिक ओढही नसताना संकटात आपण भगवंताचा धावा करतो आणि आपल्या संकटाच्या निवारणावर देवाच्या अस्तित्वाचा खरे-खोटेपणा तपासतो! याच वचनाच्या प्रकाशात स्वामींसारख्या अवतारी सत्पुरुषांचं हे ब्रीद न्याहाळलं की जाणवतं, स्वामी समर्थ नि:संशय नुसत्या स्मरणानंही प्रकट होणारे आहेत, पण ते स्मरण मात्र खरं आणि प्रामाणिक हवं!

एखादं संकट उद्भवण्याची भीती जरी वाटली, तरी आपण लगेच स्वामींचा वा सत्पुरुषाचा धावा सुरू करतो. पण त्यात स्वामींचं स्मरण कमी आणि संकटाचं स्मरण सर्वाधिक असतं. स्वामी समर्थानी अवतार समाप्तीच्या दिवशी ‘गीते’तला एक श्लोक म्हटला होता. तो असा : अनन्यािश्चतयंतो मां ये जना: पर्युपासते।

तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्॥

म्हणजे, ‘‘जो अनन्य भावानं माझं चिंतन करतो त्याच्या योगक्षेमाची काळजी मी सदैव वाहतो.’’

थोडक्यात, चिंतेच्या चिंतनापेक्षा स्वामीचं चिंतन, मनन, स्मरण आवश्यक आहे. आणि जो मनानं पूर्णपणे केवळ त्यांच्याच आधारावर अवलंबून आहे, त्याच्या संकटात ते धावून गेल्याचे दाखले त्यांच्या लीलाचरित्रातही आहेत.

लक्ष्मण नावाचा समर्थाचा एक भक्त होता. तो गलबताचा व्यापार करीत असे. एकदा मोठय़ा गलबतानं तो जात असता समुद्रात वादळ आलं आणि गलबत बुडू लागलं. सर्वचजण पुरते घाबरले. काय करावं काही सुचेना. लक्ष्मणानं मात्र मनापासून स्वामींचाच धावा सुरू केला. त्यावेळी स्वामी समर्थ अक्कलकोटी चोळाप्पाच्या घरी होते. त्यांच्या आनंदलीला सुरू होत्या आणि त्या पाहण्यात भक्तही देहभान विसरून दंग होते. तोच स्वामी समर्थ अचानक उठून उभे राहिले आणि उजव्या हाताचा पंजा खालून वर असा आणू लागले की एखादी अवजड वस्तू उचलत आहेत. काही ठिकाणी असा उल्लेख आहे की, समर्थाच्या हातातून समुद्राचं खारट पाणी पडू लागलं. इकडे बुडत्या जहाजातून लक्ष्मणदेखील आश्चर्यकारकरीत्या वाचला. आपण केवळ स्वामीकृपेनंच तरलो आहोत, हा त्याचा भाव दृढ होता. समर्थाच्या दर्शनाला तो आल्यानंतर त्या दिवशी समर्थानी केलेल्या अतक्र्य लीलेचा उलगडा झाला आणि स्मरणाच्या सामर्थ्यांचा प्रत्ययही आला. पण असं आहे पाहा, आपल्या जीवनाची नौकाही भवसागरात खरं तर बुडतच आहे. पण त्याची जाणीव आपल्याला नाही. आजवर अनंत जन्म सरले. याचाच अर्थ भवसागरातून आम्ही पार झालेलो नाही. या भवसागरातच प्रत्येक जन्मी आमची नौका बुडाली आहे आणि पुन्हा नव्यानं आम्ही जन्मलो आहोत. ‘भवसागर’ म्हणजे तरी काय? तर ‘अमुक व्हावं’ आणि ‘अमुक होऊ नये’ या आमच्या आंतरिक ओढींचा समुद्र! या ओढींना अंत नाही आणि वासनांच्या खवळणाऱ्या लाटांप्रमाणे नवनव्या इच्छांच्या लाटाही भवसागरात बुडवू पाहात आहेत. अशा वेळी स्वामींसारख्या अवतारी सदगुरूंचं स्मरण हाच मोठा उपाय आहे. कारण त्यांच्या स्मरणातच ते व्याप्त आहेत. ते आणि त्यांची परम शक्ती सदा अभिन्न असल्यानं जिथं ते व्याप्त आहेत तिथं त्यांची शक्तीही व्याप्त आहेच! भगवंतांनी अर्जुनाला आणि उद्धवाला सांगितलं आहे की, ‘मी वैकुंठातही वसत नाही, क्षीरसागरीही वसत नाही, योग्यांच्या मनाच्या पकडीतदेखील न येणारा मी जिथं माझं कीर्तन चालतं तिथं आनंदानं डोलत असतो!’ स्मरणाचं हे सामथ्र्य आहे आणि आधीच सांगितल्याप्रमाणे हे स्मरण अनन्य असावं, संकट दूर व्हावं एवढय़ापुरतं नसावं.

एकदा आम्ही काही साधक मंडळी जमलो होतो. तेव्हा हा विषय निघाला की, माणूस संकटात असताना सदगुरूचं निखळ स्मरण शक्य आहे का? आणि ते साधलं तरी संकटाचं काय?

त्या चच्रेत मग स्मरणाचं जे रहस्य आहे ते समोर आलं! या रहस्याकडे सहसा लक्षच जात नाही. आता संकटात सदगुरूंचं निखळ स्मरण म्हणजे काय? एक खरं की, माणूस संकट विसरू शकत नाही, पण निदान हे संकट सोसण्याची शक्ती दे, एवढं मागणं तरी त्या स्मरणात मागू शकतो! आणि असं पाहा, स्मरण, चिंतनानं जेव्हा सदगुरू व्याप्त होतात, प्रकटतात तेव्हा त्या संकटालाही ते पाहात नाहीत का? तर निश्चितच पाहतात. समजा अनेक लोक एखाद्या समारंभासाठी एकत्र जमले आहेत. त्या लोकांमध्ये एक डॉक्टरही आहे आणि अचानक तिथं एखाद्याची प्रकृती बिघडली. तर त्या माणसाला अस्वस्थ होत खाली कोसळताना पाहूनही तो डॉक्टर शांत बसेल का? तो काहीतरी उपाय तातडीनं करीलच ना? तसे स्मरणानं सदगुरू सहजसाध्य असताना आपण चिंतांचं, दुखांचं स्मरण करण्याऐवजी त्यांचंच स्मरण का करू नये? त्यांच्या चरित्राचं, बोधाचं स्मरण का करू नये?

त्या बोधाला शाश्वताचंच अधिष्ठान असतं. शाश्वत समाधानाचा मार्गच त्या बोधात उलगडला असतो. तो बोध वाचणं, त्याचं मनन आणि चिंतन करणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यानुसार जगण्याचा प्रयत्न करणं, हे जेव्हा जीवनाभ्यास बनेल ना, तेव्हा जगताना पदोपदी सदगुरूंचंच स्मरण होऊ लागेल. त्या स्मरणापाठोपाठ ते सदैव हजर असतील आणि मग ‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती,’ या शब्दांचा अनुभवही येऊ लागेल. इतकं स्मरणाचं सामथ्र्य आहे! वासरामागे गाय यावी, तसं स्मरणामागे सद्गुरूही व्याप्त असतात!!