02 March 2021

News Flash

तहलका लैंगिकतेचा

<span style="color: #ff0000;">कव्हरस्टोरी</span><br />'तहलका'चे तरुण तेजपाल यांनी आपल्याच एका महिला सहकाऱ्याचा विनयभंग केल्याच्या बातम्या आल्यापासून गदारोळ सुरू झाला आहे. इतरांचे गैरप्रकार उजेडात आणणाऱ्याने स्वत:च गैरप्रकार

| November 29, 2013 01:03 am

कव्हरस्टोरी
‘तहलका’चे तरुण तेजपाल यांनी आपल्याच एका महिला सहकाऱ्याचा विनयभंग केल्याच्या बातम्या आल्यापासून गदारोळ सुरू झाला आहे. इतरांचे गैरप्रकार उजेडात आणणाऱ्याने स्वत:च गैरप्रकार करावेत याचा अनेकांना धक्का बसला. खरंतर कामाच्या ठिकाणी होणारे स्त्रियांचे शोषण ही काही आजची नवीन बाब नाही. त्याबाबत विशाखा गाइडलाइन्स तत्त्वांची निर्मिती करूनही परिस्थिती फारशी बदललेली नाही. लैंगिक शोषणाला बळी पडणाऱ्या स्त्रियांची संख्या त्याला विरोध करणाऱ्या स्त्रियांपेक्षा जास्तच आहे. पण दुसरीकडे गेल्या काही वर्षांत करियरसाठी स्वत:च्या लैंगिकतेचा वापर करून द्यायला तयार असलेल्या स्त्रियांची संख्याही वाढते आहे. याबाबत कायदा आणि सुव्यवस्था या क्षेत्रांमध्ये काम करणारे अनुभवी लोक काय सांगतात, महिला कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे अशा वेगवेगळ्या अंगांनी या विभागात वेध घेतला आहे. यानिमित्ताने लैंगिक शोषण फक्त स्त्रियांचंच होतं या समजुतीबाबतही चर्चा करायची गरज आहे.  

काय घडले?

१८ नोव्हेंबर
तहलकामधील एका तरुण महिला पत्रकाराने तहलकाच्या मॅनेजिंग एडिटर शोमा चौधरी यांना ई-मेल लिहून गोव्यात सुरू असलेल्या तहलकाच्या थिंकफेस्ट २०१३ च्या परिषदेदरम्यान ७ नोव्हेंबर तसेच ८ नोव्हेंबर रोजी फाइव्ह स्टार हॉटेलच्या लिफ्टमध्ये तहलकाचे मुख्य संपादक तरुण तेजपाल यांनी आपला विनयभंग तसेच लैंगिक शोषण केले असा आरोप केला. त्याशिवाय तिने सर्वोच्च न्यायालयाने निर्देशित केलेल्या विशाखा गाइडलाइन्सनुसार या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. तसेच तरुण तेजपाल यांनी आपली माफी मागावी, अशीही तिने मागणी केली.

२० नोव्हेंबर
तेजपाल यांनी तहलकाच्या मॅनेजिंग एडिटर शोमा चौधरी यांना एक ई-मेल पाठवून परिस्थितीचे चुकीचे आकलन झाल्यामुळे आपल्याकडून चूक झाल्याची कबुली दिली आणि त्याचे प्रायश्चित्त म्हणून आपण सहा महिन्यांसाठी तहलकाच्या संपादक पदावरून बाजूला होत असल्याचे स्पष्ट केले.
शोमा चौधरी यांनी तेजपाल यांचा हा ई-मेल तहलकाच्या सर्व कर्मचाऱ्यांना पाठवला.
तेजपाल यांचा ई-मेल आणि शोमा चौधरी यांनी तहलकाच्या कर्मचाऱ्यांना पाठवलेला ई-मेल बाहेर फुटला आणि एका वेबसाइटवरून प्रसिद्ध झाला. सोशल नेटवर्किंग साइट्सवरून ही बातमी वेगाने पसरली.
तहलकामधील त्या तरुण महिला पत्रकाराचा आपला विनयभंग कसा झाला त्याचे तपशील सांगणारा ई-मेलही बाहेर फुटला आणि तोही सोशल नेटवर्किंग साइट्सवरून वेगाने सर्वत्र पसरला.

२१ नोव्हेंबर
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी गोवा पोलीस या प्रकरणाची चौकशी करतील, असे विधान केले.
राष्ट्रीय महिला आयोगानेही गोवा पोलिसांना या प्रकरणी कारवाई करण्याचे निर्देश दिले.

२२ नोव्हेंबर
राष्ट्रीय महिला आयोगाच्या निर्देशानुसार गोवा पोलिसांनी तेजपाल यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
तरुण तेजपाल आणि संबंधित तरुण महिला पत्रकारादरम्यान ई-मेलवरून संभाषण. त्यात तेजपाल यांनी संबंधित तरुणी उदासीनता दाखवत असतानाही तिच्याशी दोनदा लैंगिक दुर्वर्तन केल्याचेच कबूल केले.
तेजपाल यांच्याच ई-मेल उत्तराचा आधार घेऊन संबंधित तरुण महिला पत्रकाराने २१ नोव्हेंबर रोजी शोमा चौधरी यांना ई-मेल लिहिला आणि तरुण तेजपाल यांनी आपला विनयभंग केला, तसेच आपले लैंगिक शोषण केले हे त्यांच्यापर्यंत पोहोचवले.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शोमा चौधरी यांनी, ‘तेजपाल यांनी आपल्याला हा सारा प्रकार सहमतीने झाल्याचे सांगितले,’ असे विधान केले. आपण पोलिसांत जाणार नसल्याचेही त्यांनी एका वर्तमानपत्राशी बोलताना सांगितले. पोलिसांत तक्रार करायची की नाही, हा त्या संबंधित तरुणीचा प्रश्न आहे, असेही त्या पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या.
तरुण तेजपाल यांनी एक पत्रक प्रसिद्ध केले. आपण कोणतीही चूक केलेली नाही, पण तरीही शोमा चौधरी यांच्या सांगण्यावरून आपण बिनशर्त माफी मागितली असून, पोलिसांना सर्व प्रकारचे सहकार्य करण्यास आपण तयार आहोत, असे त्यांनी त्या पत्रकात स्पष्ट केले.
तरुण तेजपाल यांच्या विरोधात कारवाई करावी, अशी भाजपची मागणी.

२३ नोव्हेंबर
तेजपाल यांची चौकशी करण्यासाठी गोवा पोलीस दिल्लीला गेले. त्यांनी तेजपाल यांच्या गोव्यातील सहकाऱ्यांचे जबाब नोंदवून घेतले. तहलकाचे सव्‍‌र्हर सील केले तसंच  कार्यालयातील संगणक तपासासाठी ताब्यात घेतले. संबंधित प्रकरण जिथे घडले त्या हॉटेलमधील लिफ्टमधे सीसीटीव्ही नसल्यामुळे या संबंधित प्रकरणाचे लिफ्टमधील सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसल्याचे स्पष्ट.

२५ नोव्हेंबर
तरुण तेजपाल यांच्यावर विनयभंग तसेच लैंगिक शोषणाचा आरोप करणाऱ्या महिला पत्रकाराचा आपल्या नोकरीचा राजीनामा. आपल्यावरील अत्याचाराविरोधात उभे राहण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचा तिचा व्यवस्थापनावर आरोप.
तेजपाल यांचा अटकपूर्व जामिनासाठी दिल्ली उच्च न्यायालयात अर्ज.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2013 1:03 am

Web Title: tahalka sexual assault case
Next Stories
1 दहशतीच्या चिरेबंदीला भगदाड
2 प्रश्न करियरचा.. आणि काम्प्रोमाइजचा..
3 महासत्तेच्या स्वप्नाला, डेंग्यूचा डंख!
Just Now!
X