तुमच्या समस्या किंवा तुमचे भवितव्य तुम्ही टॅरोवर अवलंबून ठेवू शकता. अनेक टॅरो कार्ड वाचक टॅरो कार्ड कसे काम करते, हे विविध पद्धतीने सांगतात.

पूर्वीच्या काळी माणसे रात्री आकाशाने भरलेल्या तारे व ग्रहांकडे पाहत. सतत जागा बदलणारे तारे आणि ग्रह यांचा मानवी जीवनाशी संबंध आहे, याचा त्यांना उलगडा झाला. हे तारे व ग्रह कोणत्या तरी बाबतीत महत्त्वाचे आहे, असे त्यांना वाटले. मानवी जीवनातील काही घटनांवर (उदा. ऋतूबदल, युद्ध, आर्थिक अडचणी, हवामान) आकाशातील तारे व ग्रह परिणाम करतात, हे समजल्यावर त्यांनी धर्मशास्त्र आणि विज्ञान यांच्या साहाय्याने या ग्रह व ताऱ्यांशी सांगड घातली आणि या घटना उलगडण्याचा प्रयत्न केला. त्यातूनच फलज्योतिषशास्त्राचा जन्म झाला.
१२ राशींची माहिती
प्रत्येक चिन्हाचे असे एक वैशिष्टय़ आहे. मात्र प्रत्येक चिन्हाचे विविध प्रकारे वर्गिकरण करण्यात आलेले आहे. ते विविध गटांमध्ये समाविष्ट केलेले आहे.
अग्नी : (मेष, सिंह, धनू) हे चिन्ह क ृती, उत्साह आणि नेतृत्व दाखवते. बदल करण्याचा मोकळेपणाही हे चिन्ह दर्शविते.
जल : (कर्क, वृच्छिक, मीन) भावना, संवेदनशीलता आणि कारुण्य याचा भाव या चिन्हातून दिसून येतो.
वायू : (वृषभ, कन्या, मकर) हे बुद्धिमत्तेचे चिन्ह आहे.
राशिचक्रातील प्रत्येक चिन्ह हे पुरुष किंवा स्त्री यांचे प्रतीक दर्शविते. येथे लिंगभेद अपेक्षित नाही, तर त्याची अशी पूरक संकल्पना आहे.
प्रत्येक राशीचे महत्त्व
मेष : मेंढा, २१ मार्च- २० एप्रिल. मुख्य, तत्त्व: अग्नी, पुरुषराशी, गुण- अभिमानी, तरुण, शूर, स्पर्धात्मक, गर्विष्ठ, हिंसाचारी.
वृषभ : बैल, २१ एप्रिल – २१ मे. स्थिर, तत्त्व: पृथ्वी, स्त्रीराशी, गुण : पुराणमतवादी, निष्ठावंत, हट्टी, जडवादविषयक, विषयसक्त.
मिथुन : जुळे, २२ मे – २१ जून. चंचल, तत्त्व: वायू, पुरुषराशी, गुण- मन वळविणारा, इत्थंभूत माहिती असणारा, उच्चशिक्षित, उत्सुक, जुळवून घेणारा, शून्य मनाचा, प्रवासाची आवड.
कर्क : खेकडा, २२ जून – २२ जुलै. मुख्य, तत्त्व: जल, स्त्रीराशी, गुण- कुटुंबवत्सल, रोमँटिक, प्रपंचात रमणारा, लाजाळू, भूतकाळ आणि परंपरा यात रमणारा.
सिंह : सिंह, २३ जुलै – २१ ऑगस्ट. स्थिर, तत्त्व: अग्नी, पुरुषराशी, गुण- अभिमानी, धाडसी, हट्टी, बहिर्मुख, महत्त्वाकांक्षी, आशावादी, खुल्या मनाचा, राजघराण्याशी संबंधित.
कन्या : कुमारिका, २२ ऑगस्ट- २३ सप्टेंबर. चंचल, तत्त्व: पृथ्वी, स्त्रीराशी, गुण- पुराणमतवादी, लाजाळू, ढोंगी, दयाळू, सतत तणावात असलेला, संशयी वृत्तीचा, उदास, आरोग्यविषयक कुरबुर.
तूळ : हाती तराजू घेतलेला पुरुष. २४ सप्टेंबर- २३ ऑक्टोबर. मुख्य, तत्त्व: वायू, पुरुषराशी,
गुण- बहिर्मुख, विश्लेषणात्मक, नि:पक्षपाती, गुपित बाळगणारा, व्यवहारचतुर, सुसंवादी. संघर्षांच्या प्रसंगी मात्र तोंडावर आपटणारा.
वृश्चिक : विंचू. २४ ऑक्टोबर- २२ नोव्हेंबर. स्थिर, तत्त्व: जल, स्त्रीराशी, गुण- खूनशी, तिरसट, शूर, चिकाटी असणारा, स्वत:चे संरक्षण करू शकणारा.
धनू : धनुर्धारी पुरुष. २३ नोव्हेंबर- २२ डिसेंबर. चंचल, तत्त्व: अग्नी, पुरुषराशी, गुण- अभिमानी, धाडसी, अधीर, द्विस्वभावी (शुद्ध आणि बुद्धिमानी तसेच क्रूर आणि तापट), बहिर्मुख, पुरोगामी.
मकर : मगर. २३ डिसेंबर- २२ जानेवारी. मुख्य, तत्त्व: पृथ्वी, स्त्रीराशी, गुण- हळुवार मनाचा, आत्मनिरीक्षक, पुराणमतवादी, टापटीप राहणारा, व्यावहारिक, योग्य नियोजन करणारा.
कुंभ : पाण्याचा घट घेऊन उभा असलेला पुरुष. २१ जानेवारी- १९ फेब्रुवारी. स्थिर, तत्त्व: वायू, पुरुषराशी, गुण- बुद्धिमान, सुसंस्क ृत. व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कर्ता, विज्ञानवादी.
मीन : मासा. २० फेब्रुवारी- २० मार्च. चंचल, तत्त्व: जल, स्त्रीराशी, गुण- भावनिक, स्वत:मध्येच रमणारी, दुसऱ्याच्या भावना समजणारी, धार्मिक, विविध गुणांनी संपन्न, बडबडय़ा स्वभावाची, सर्जनशील, आचरण करणारी, अव्यवहार्य.
एखादे टॅरो कार्ड सहजरीत्या काढले, तर एखाद्याचे आयुष्य कसे प्रासंगिक आहे आणि त्याच्या आयुष्यात काय आहे, हे कसे समजते? टॅरो कार्डसंबंध जाणून घ्यायला आलेले बरेच जण विचारतात, टॅरो कार्ड अधिकाधिक माहिती देते. कारण त्याच्याजवळ पर्याय असतात. तुमच्या भविष्यात काय होणार आहे, याची माहिती टॅरो कार्ड देत नाही. तुम्ही ज्या मार्गावर आहात, तेथील सैद्धांतिक शक्यता टॅरो पडताळून पाहते.
टॅरोच्या रचनेत काय दडवले आहे, हे शोधण्याचा आमचा प्रयत्न असतो. अर्थाचे किती स्तर असतात हे कुणीही सांगू शकत नाही. काही जण सांगतात, तुमचे संकुचित मनाखाली काय चालले आहे, ते ओळखते. ज्यांचा टॅरोवर विश्वास आहे, त्यांच्या सुप्त मनाचे आकलन केले जाईल. तुमच्या सुप्त मनात काय चालले आहे, हे आम्ही टॅरोच्या साहाय्याने ओळखू शकतो. एखादी व्यक्ती टॅरोकार्डचा आधार घेईल, त्याच्या जीवनाला एक आकार येऊ शकतो.
तुमच्या आयुष्यात अनेक प्रश्न असतात. टॅरोकार्डद्वारे मदत मागण्याचे हेच कारण असते. हेच प्रश्न चित्राद्वारे मांडले जातात, तुम्ही काय पाहिले, त्याद्वारे तुम्हाला त्याची दैवी उत्तरे मिळतात. आपल्या मनातील सुप्त इच्छा पूर्ण करण्यास टॅरो नेहमीच मदत करते. टॅरो कार्डमध्ये अद्भुत शक्ती आहे, यावर तुम्ही विश्वास ठेवा. आपल्या जीवनावर प्रकाश पाडण्याची क्षमता टॅरोमध्ये आहे. तुमच्या समस्या किंवा तुमचे भवितव्य तुम्ही टॅरोवर अवलंबून ठेवू शकता. अनेक टॅरो कार्ड वाचक टॅरो कार्ड कसे काम करते, हे विविध पद्धतीने सांगतात. टॅरो सांगण्यासाठी विविध कल्पना अमलात आणतात. मात्र आम्ही आमच्या ‘आतील मार्गदर्शका’शी संपर्क करतो आणि टॅरोच्या साहाय्याने तुम्हाला मदत करतो.
अनुवाद- संदीप नलावडे