01 June 2020

News Flash

नातं हृदयाशी : तणाव कसा ओळखावा?

हृदयविकार नियंत्रणात ठेवण्यामध्ये तणाव नियोजनाचा मोठा वाटा आहे. म्हणूनच आपण तणाव म्हणजे काय, तो कसा निर्माण होतो आणि तो नियंत्रणात ठेवण्यासाठी काय करायला पाहिजे, ते

| April 10, 2015 01:23 am

हृदयविकार नियंत्रणात ठेवण्यामध्ये तणाव नियोजनाचा मोठा वाटा आहे. म्हणूनच आपण तणाव म्हणजे काय, तो कसा निर्माण होतो आणि तो नियंत्रणात ठेवण्यासाठी काय करायला पाहिजे, ते समजून घेणं 00gajananआवश्यक आहे.

बऱ्याच लोकांना ते ‘तणावग्रस्त’ आहेत हे कळत नाही; किंबहुना ते मानायला तयार नसतात, तणावाची काही लक्षणे खाली देत आहोत..
शारीरिक लक्षणे :
तळहातांना घाम येणे, खूप घाम येणे, तोंड कोरडे पडणे, अनियमित श्वासोच्छवास, मध्येच दीर्घ श्वास घेणे, ताणले गेलेले स्नायू, मांसपेशी, हात-पाय थंड पडणे, पोटात गोळा उठणे, थरथर वाटणे, वारंवार लघवी होणे, हातापायांची जलद जलद हालचाल करणे इत्यादी.
भावनात्मक लक्षणे :
चिडचिडेपणा, लवकर राग येणे, थकवा, उदासीनतेची भावना, भय, असुरक्षित भावना, झोप न येणे, वाईट स्वप्न पडणे, द्वेष, ईर्षां वाटणे, फारसे हसू न येणे, लक्ष न लागणे, विपरीत विचार येणे, स्मरणशक्तीचा ऱ्हास होणे, अनावश्यकरीत्या आक्रमक होणे इत्यादी..
व्यावहारिक लक्षणे :
व्यसनाच्या अधीन होणे, धूम्रपान, तंबाखू, दारूच्या आहारी जाणे, वारंवार उत्तेजक पेय (चहा, कॉफी) घेणे, सतत खाणे-पिणे, नखे खाणे, गुडघे हलवणे, केस ओढणे, अलिप्तपणे वागणे इत्यादी.
तणावाची उत्पत्ती आणि लक्षणे हे मनुष्याच्या स्वभावावर आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रकारावर अवलंबून असते. सर्वसाधारणपणे मनुष्याचे व्यक्तिमत्त्व दोन वर्गामध्ये विभाजित केले आहे. ‘अ’ प्रकारची व्यक्ती ‘ब’ प्रकारची व्यक्ती-
(ळ८स्र्ी अ ंल्ल िळ८स्र्ी इ ढी१२ल्लं’्र३८)
‘अ’ प्रकारचे व्यक्तिमत्त्व (ळ८स्र्ी अ स्र्ी१२ल्लं’्र३८)
अशा व्यक्ती या असमाधानी, उत्तेजित, अशांत असतात. कमी काळात अधिकाधिक यश मिळावे, सर्व क्षेत्रांमध्ये आपले बस्तान बसावे, सर्व अधिकार आपल्या जवळच असावेत, यश फक्त आपल्यालाच मिळावे, ‘सर्व’ मी आणि मलाच!. या वृत्तीच्या मनुष्याला ‘अ’ प्रकारचे व्यक्तिमत्त्व असलेली व्यक्ती म्हणू शकतो.
त्या उलट आपल्याला कशात काही नको. आपण जसे आहोत तसेच सुखी आहोत. लोकांचे नेतृत्व स्वीकारण्यात धन्यता मानणे, परिस्थितीला शरण जाणे, संघर्ष करण्याची आणि स्पर्धा करण्याची इच्छा नसलेल्या व्यक्तिमत्त्वाला ‘ब’ प्रकारचे व्यक्तिमत्त्व म्हणतात.
दोनही व्यक्तिमत्त्वांचे समन्वय साधणारा मनुष्य हा खरा संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा व्यक्ती असतो. आपण आपले व्यक्तिमत्त्व योगा, ध्यान, आध्यात्मिक वैचारिकता यामुळे बदलू शकतो.
तणावामुळे शरीरावर होणारे परिणाम आणि आजार
तणावामुळे अउळऌ व उडफळकरडछ हे हॉर्मोन्स आणि त्यांच्यामुळे अ१िील्लं’्रल्ली, ठ१- ं१िील्लं’्रल्ली हे हॉर्मोन्स निर्माण होतात. जेव्हा यांचे प्रमाण विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त होते तेव्हा त्याचे विपरीत परिणाम शरीरावर दिसून येतात. त्यामध्ये हृदयाचे ठोके वाढणे, रक्तदाब वाढणे, श्वसनाचा वेग वाढणे, स्नायूंवरील ताण वाढणे, रक्तातील साखरेचे प्रमाण, चरबीचे प्रमाण वाढणे, पोटातील आम्ल (अ्रू)ि वाढणे, रक्तातील पेशींचे एकत्रीकरण (उ’३) होणे, लाळ कमी येऊन तोंडाला कोरड पडणे, पोटाच्या आतडय़ांच्या आणि मूत्राशयाच्या स्नायूंचे आकुंचन पावणे.. त्यामुळे पोट दुखणे.. सतत लघवीला जावेसे वाटणे असे परिणाम शरीरावर होतात.
खालील आजारांमध्ये ‘तणाव’ हा एक महत्त्वाचा कारक घटक म्हणून पाहायला मिळतो.
उच्च रक्तदाब, हार्ट अ‍ॅटॅक, अंजायना (हृदयविकार) इरीटेबल बॉवेल सिंड्रोम, पेप्टिक अल्सर (ढीस्र्३्रू ४’२ं१) ळील्ल२्रल्ल ऌीिंूँी, अर्धशिशी, स्पॉडिलॉसीस, ळ१ीे१२ शरीर कंप, दमा, कमालीचा थकवा, सुस्ती, निद्रानाश, निराशा, डिप्रेशन, मधुमेह, अ‍ॅलर्जी इत्यादी.
तणाव नियंत्रण
तणाव कमी करण्यासाठी प्रथम तणावाची कारणे शोधणे महत्त्वाचे आहे. त्यात बातणाव देणारे घटक (ए७३ी१ल्लं’ र३१ी२२१२) आणि आंतरिक घटक. परिस्थिती (कल्ल३ी१ल्लं’ र३१ी२२१- कल्ल३ी१ल्लं’ ूल्ल्िर३्रल्ल्रल्लॠ) याचा समावेश होतो.
बातणाव देणारे घटक यांना जर आपण योग्य प्रतिक्रिया दिली तर तणाव घटल्याचे लक्षात येईल. बातणाव देणाऱ्या घटना या आपल्या नियंत्रणाच्या बाहेर आहेत. जर त्या बदलू शकत नसतील तर आपण आपल्या प्रतिक्रिया मात्र बदलू शकतो.
बातणाव देणारी कारणे ही.. सामाजिक, पारिवारिक असो, व्यावसायिक, राजकीय असो किंवा शारीरिक किंवा मानसिक असो पर्यावरणाच्या किंवा सामाजिक परिवर्तनाच्या असो आर्थिक किंवा नैतिक मूल्याच्या असो.. यांची व्यवस्थित ओळख करून घेणे. त्यात सुधारणेचा वाव असेल तर तो करण्याचा प्रयत्न करणे. जर तणावाचे घटक टाळता येत असतील तर टाळावे. त्यापासून दूर रहावे.
पण जर का टाळणे शक्य नसेल तर त्याला स्वीकारावे आणि त्याला कमीत कमी प्रतिक्रिया द्यायची. जर लढणे हाच उपाय असेल तर लढण्याचे सामथ्र्य दाखवावे. जेव्हा आपल्याला कळते की, समोरच्या व्यक्तीला किंवा परिस्थितीला आपण बदलू शकत नाही तेव्हा आपण आपल्याला बदलण्याचा प्रयत्न करावा. जेणेकरून त्याचा आपल्याला कमीत कमी त्रास होईल. कमीत कमी तणाव होईल.
परिस्थितीनुसार बदलणे हा पराभव नसून परिस्थितीवर मात करण्याचा एक उपाय आहे. तसेही म्हटले जाते की, जर जग बदलावयाचे असेल तर सुरुवात ही स्वत:पासूनच करावी लागते.
तणावाचे आरोग्यावरील परिणाम हे आपल्या शारीरिक, वैचारिक, आध्यात्मिक, मानसिक रचनेवर अवलंबून असते आणि या सर्व घटकांसाठी आपले संस्कार आई-वडील, घरातील वातावरण, आपला धर्म, आध्यात्मिक वातावरण, शिक्षण, संगत, अनुभव इत्यादी घटक जबाबदार असतात.
शैक्षणिक, वैचारिक, आध्यात्मिक प्रगल्भता तणावावर मात करण्यास मदत करते.
परिस्थितीप्रमाणे-समाजाप्रमाणे.. वयानुसार बदलणे हे तणाव कमी करू शकते. पण जर का आपण परिस्थितीप्रमाणे बदललो नाही तर तणाव निर्माण होऊ शकतो. ॅील्ली१ं३्रल्ल ॅंस्र् ही असतेच, ती मान्य करून थोडी तडजोड ही अपेक्षित आहे. फ्रॠ्र िस्वभावाच्या लोकांना,ो’ी७्रु’ी स्वभावाच्या लोकांपेक्षा जास्त तणाव असतो.
शांत डोक्याने विचार करून निर्णय घेणे, हे तणावाला कमी करते.
वेळेचे योग्य व्यवस्थापन करणे म्हणजे कामाच्या वेळातील तणाव कमी होतो. सर्व कामांना वेळेच्या चौकटीत व्यवस्थित बसवल्याने आपण आपले कर्तव्ये चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकतो. अपूर्ण राहिलेल्या कामाचा तणाव आपण अशाप्रमाणे कमी करू शकतो. आपली प्राथमिकता निश्चित करणे. वेळेचे विभाजन करणे. कामाचे विभाजन करणे. कामाचे विकेंद्रीकरण करणे, उगाचच वेळ वाया न घालवणे या साध्या सोप्या गोष्टीचा विचार.. उपयोग करून तणाव कमी करू शकतो.
बाघटकांना ओळखून त्यांच्या योग्य निवारणांमधून तणाव कमी होतो, पण प्रत्येक वेळी हे शक्य नसते. अशा वेळी या बाघटकांना आपली योग्य प्रतिक्रिया देऊन तणाव टाळता येतो. ही प्रतिक्रिया योगधारणा.. योग चिकित्साच्या मार्गाने अधिक चांगल्या तऱ्हेने परिणामकारक करता.
योगासने आणि अष्टांगयोग साधना यांचा मानसिक ताण निर्मूलनासाठी खूप उपयोग होतो. अष्टांगयोगामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्यहार, धारणा, ध्यान, समाधी ही आठ अंगे येतात. चित्ताची एकाग्रता आणि मन:शांती यासाठी या अंगाचा उपयोग होतो.
खोल आणि दीर्घ श्वासोच्छवास करताना श्वास किंवा उच्छवासावर चित्त एकाग्र करणे, मनाला प्रसन्नता देणाऱ्या ध्वनीवर चित्त एकाग्र करणे, संगीत एकचित्ताने ऐकणे, प्रसन्न वातावरणाच्या ठिकाणी फेरफटका मारणे, एकटेपणा टाकून इतरांजवळ योग्य व्यक्तीजवळ, मित्रांजवळ किंवा कोणाही व्यक्ती न मिळाल्यास निसर्गाच्या सान्निध्यात निर्गुण निराकार शक्तीकडे स्वत:चे मन मोकळे करणे, मनाचा कोंडमारा न करता आपल्या दु:खाला वाट करून देणे, सातत्याने निराशा, दु:ख वाटणीस येत असल्यास त्याचा बाऊ न करता प्रतिकूल परिस्थितीचा स्वीकार करून परिस्थितीस सामोरे जाणे आणि त्यासाठी इतरांची मदत किंवा सल्ला घेण्यास संकोच न करणे थोडक्यात मानसिक ताण-तणावापासून दूर न पळता त्याला जाणून घेऊन तो कमी करण्याचा मनापासून प्रयत्न करणे. त्यासाठी योग्य आचार, विचार, आहार व विहार यांचे पालक करून जीवन शिस्तबद्ध आणि लयबद्ध करता येईल.
मनावरील ताण कमी करण्यासाठी वस्तुरूपी.. व्यक्तीरूपी, शब्दरूपी माध्यम मनात घ्यावे.. त्यावर चित्त एकाग्र करावे. आवडते फूल, आवडती व्यक्ती, आवडता शब्द यावर चित्त एकाग्र केले असता ताण कमी होण्यास मदत होते. ‘ॐ’ म्हणजे ओंकाराचा जप मनातल्या मनात करणे, आवडत्या देव, देवतेची मूर्ती मन:चक्षूसमोर आणून त्यावर मन एकाग्र करणे अशा चित्ताच्या एकाग्रतेमुळे मनात आंनद निर्माण होईल, चित्त प्रसन्न होईल, मन प्रसन्न होईल आणि मानसिक ताण कमी होण्यास मदत होईल.
योगप्रशिक्षणासारख्या शिबिराद्वारे किंवा राजयोग.. इतर योगांच्या शिबिरांद्वारे शिस्तबद्ध पद्धतीने या संकल्पनेचा वापर केलात तर आपण तणावमुक्त होऊ शकतो.
शारीरिक व्यायामसुद्धा तणाव कमी करण्याचे साधन होऊ शकते. व्यायामाद्वारे शरीरात एल्ल१िस्र्ँ्रल्ल२ नावाच्या ऌ१ेल्ली२ (हार्मोन्स्)ची निर्मिती होते. त्यामुळे शरीरात चैतन्य उत्पन्न होते. २ील्ल२ी ऋ ६ी’’ ुी्रल्लॠची भावना निर्माण होते, नकारात्मक भावनांवर सकारात्मक विचारांचा विजय होतो.
थोडक्यात २४ल्ल ि्रेल्ल ्रिल्ल २४ल्ल िु८ि’ उक्तीप्रमाणे जर आपण आपले शारीरिक, मानसिक. आणि आध्यात्मिक आरोग्य नीट ठेवले, नीट जोपासले तर तणावाला शरीरात घुसण्यास वाव मिळणार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2015 1:23 am

Web Title: tension
टॅग Lifestyle
Next Stories
1 दखल : आंबा-पोफळीच्या बागेत रबर!
2 दखल : ज्युनिअर चार्ली
3 फळभाज्यांचे गुणधर्म
Just Now!
X