lp66
कधी कधी एखाद्या वास्तूची भव्यता इतकी अफाट असते की वर्णनासाठी शब्द कमी पडतात. अशीच एक कलाकृती म्हणजे कंबोडियातील अंकोरवाट मंदिर समूह. आपल्या पर्यटनाच्या व्याख्येत निसर्गरम्य प्रदेश lp67आणि सारं काही छान छान हवं असतं. पण कधी कधी वाट वाकडी करून पर्यटनाचा वेगळाच आनंददेखील मिळू शकतो. मंदिर वगैरे म्हटलं की त्याला धार्मिक पर्यटनाची झालर चढवली की संपलं. त्यातही आपल्या धार्मिक पर्यटनात काशी विश्वेश्वर, चारधाम यात्रा, अमरनाथ आणि कैलास मानसरोवर यात्रा ही परिसीमा असते. परंपरेचा पगडाच इतका असतो की या यात्रांमधून केवळ पुण्य जमा करायचे आणि मोक्ष मिळवायचा हेच काय ते ईप्सित राहते. त्यामुळेच कलाकौशल्यांनी नटलेली प्राचीन स्थापत्यकलेचा अजोड नमुना असणारी मंदिरं ही केवळ अभ्यासकांनीच पाहायची असाच पायंडा पडलेला असतो. अशा वेळी आपल्यापासून हजारो मैलांवर परदेशात जगातील सर्वात मोठा असा प्राचीन हिंदू मंदिर समूह आहे हेदेखील माहीत नसते. पूर्व आशियातील घनदाट जंगलांनी, डोंगरांनी वेढलेल्या कंबोडियाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन असाच राहिला आहे. पण याच कंबोडियात तब्बल तीन चौरस किलोमीटर क्षेत्रावर १२ व्या शतकातील हिंदू मंदिरांचा प्रचंड असा समूह बांधण्यात आला आहे. वास्तुकलेच्या अफाट कौशल्याने डोळे दिपवून टाकणारी अंकोरवाट, अंकोर थॉम, ता फ्रोम अशी ही मंदिरं एकदा तरी आवर्जून पाहण्यासारखी आहेत.
lp68
१२ व्या शतकाच्या सुरुवातीस राजा सूर्यवर्मन(दुसरा)याने अंकोरवाट हे विष्णूचं भव्य मंदिर उभारलं. त्या काळातील हिंदू धर्माचा विस्तार आणि पगडा त्यातून जाणवतो. समुद्रमंथनाची भव्य दृश्यं जागोजागी दिसून येतात. तर मंदिर आवाराच्या बाजूने असणाऱ्या पडव्यांमधून कित्येक मीटर लांब अशा भिंतींवर महाभारतादी कथा कोरल्या आहेत. अंकोरवाटच्या मुख्य मंदिरात तलावावर बांधलेल्या पुलावरून प्रवेश करावा लागतो. मंदिराच्या भोवती अशा तळ्यांचे जाळेच आहे. (ही तळी खंदकासारखी नाहीत हे विशेष.) त्याचबरोबर एक-दीड किलोमीटर इतकी लांब तटबंदीदेखील आहे. अंकोरवाट हे मुख्य मंदिर जवळपास एक चौरस किलोमीटरवर विस्तारलं आहे. तर अंकोर थॉम हे साधारण त्यापेक्षा निम्म्या क्षेत्रावर वसलं आहे. तिसरं ता फ्रोम मंदिर याच परिसरात आहे. राजा जयवर्मन (सातवा) याने या मंदिर परिसरात स्वत:ची प्रतिमादेखील जागोजागी भव्य पुतळ्यांच्या आधारे कोरलेली दिसून येते.
lp69
चौथं मंदिर हे जंगलात मातीखालीच गाडलं गेलं होतं. पोर्तुगीजांनी हे शोधून काढलं. आज या वास्तू उद्ध्वस्त स्वरूपातच आढळतात. ते रौलसचे अवशेष म्हणून ओळखलं जातं. येथे आजही उत्खनन सुरू आहे. साधारण १४ व्या शतकात बुद्ध धर्माचा पगडा वाढला तशा या चारही मंदिरांत बुद्धाच्या मूर्तीदेखील दिसू लागल्या.
अंकोरवाट हे कंबोडियाचं मानाचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं. अर्थात आज या मंदिर समूहाच्या संवर्धनासाठी कंबोडियन पुरातत्त्व खातं सक्रिय आहे, त्यांना भारताचं पुरातत्त्व खातंदेखील सहकार्य करत असतं. हा मंदिरसमूह व्यवस्थित पाहण्यासाठी कंबोडियातील सिएमरीप या शहरात किमान तीन रात्रींचा मुक्काम करावा लागेल. सिएमरीप शहरात जाण्यासाठी जगभरातून विमानसेवा उपलब्ध आहे. मंदिर पाहण्यासाठी गाइडेड टूर्स उपलब्ध आहेत. जगभरातून लाखो पर्यटक येथे भेट देतात. पण आश्चर्याची बाब म्हणजे या पर्यटकांमध्ये भारतीयांचं प्रमाण केवळ पाच टक्के इतकं आहे.
आत्माराम परब

survival of marine species in danger due to ocean warming
विश्लेषण : महासागर तापल्याने प्रवाळ पडू लागलेत पांढरेफटक… जलसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात?
GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
Why are total solar eclipses rare Why is April 8 solar eclipse special
विश्लेषण : ८ एप्रिलचे सूर्यग्रहण वैशिष्ट्यपूर्ण का ठरते? खग्रास सूर्यग्रहण दुर्मीळ का असते?
Loksatta kutuhal Scope of computer vision
कुतूहल: संगणकीय दृष्टीची व्याप्ती