ज्याच्या हातात संगीन आहे तो संगदिल.. म्हणजे कठोरच असतो का? युद्धभूमीवर संगिनी चालविणारे सैनिक निवृत्तीनंतर घरी परतात, आपल्या माणसात येतात तेव्हा त्यांची मनेसुद्धा कुसुमदीप मृदु असल्याचा प्रत्यय येतो. फौजी भाईसुद्धा रसिक असतात; नाहीतर वर्षांनुवर्षे विविध भारती रोज फौजीभाईना रिझविण्यासाठी खास चित्रपट-गीते का ऐकविते? फौजीभाई चांगल्या वाङ्मयाचेही रसिक असतात का? या प्रश्नाचे उत्तरही होकारार्थी येते. आणि एक पुस्ती अशी जोडता येते की ते नुसते रसिकच का? थोडेसे टीकाकारही असतात. स्टीव्हनसन या निबंधकाराच्या ‘बेगर’ या निबंधातला फौजी असेच एक रसिक आणि भावनाप्रधान पात्र आहे. वैश्विक लौकिकपात्र झालेल्या अर्थात् शिखराच्या गौरीसारखे हे सर्वमान्य लेखक. पण स्टीव्हनसनच्या बेगर या निबंधातले एक पात्र इतके भावनाप्रधान आहे की ते कादंबरीकार असो की नाटककार, कवी असो की निबंधकार सर्व साहित्यशोंडावर थाड थाड् शब्दांच्या गोळ्या घालते नि वाचणारा असो की ऐकणारा सर्वाना घायाळ करते. निवृत्त झालेल्या सैनिकांचे, त्यांच्या सेवाकालाचे समीक्षणही हे पात्र आपल्याच पद्धतीने करते. ते करतांना पायथ्याचे भगत होणे त्याला मुळीच मान्य नसते. फौजी असो की खेळाडू, चुका सर्वाच्या हातून घडतात म्हणून…तर मैदानात सशाच्या आक्रमणाने सिंहाचा पराभव होतो.

याबाबत नेपोलियनचा संदर्भ दिला, नि त्याच्याकडून सल्ला घेतला तर तो काय म्हणाला?

नुसता म्हणाला नाही तर, अनुभवाचे बोलला-

‘प्रहार न करता

शत्रूला प्रतिकार करत राहा.

मुबलक काळ

नुसता प्रतिकार करूनही-

शत्रूला नमविता येते.’

तुम्हाला पटते का बघा.
राम देशमुख