शिल्पा शिरवडेकर response.lokprabha@expressindia.com

आजच्या सदरात आपण गाजराच्या रेसिपीज पाहणार आहोत. सध्या बाजारात लालबुंद गाजरं मिळत आहेत आणि आत्ताच ही गाजरं खाण्यात खरी मजा आहे. ही गाजरं चवीला गोड असतात आणि कुठल्याही पदार्थाला रंगही छान येतो. अगदी लहान मुलांना जरी विचारलं तरी ती सांगतील की, गजरात अ जीवनसत्त्व असतं आणि त्यामुळे गाजर आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतं.

Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
How useful was the Green Revolution really
हरितक्रांती खरंच कितपत उपयुक्त ठरली?
World idli day 2024 how to make healthy oats idli
World idli day : पौष्टिक अन् झटपट नाश्त्यासाठी बनवा ‘ओट्स’ इडली; पाहा रेसिपी, प्रमाण
environment issue in election manifestos environmental issues in lok sabha election 2024
या रणधुमाळीत पर्यावरणाबद्दल प्रश्न विचारा..

गाजराचे अन्य गुणधर्मही जाणून घेऊ या..

* अ जीवनसत्त्व मुबलक प्रमाणात असल्यामुळे डोळय़ांच्या आरोग्यासाठी उत्तम

* त्वचेच्या आरोग्यासाठी उत्तम

* मूत्राशयाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी उपयुक्त

* पचनक्रिया सुधारते

* यकृताचे आरोग्य चांगले राहते

* केस व दातांसाठी उत्तम

* गाजर हे कर्करोगरोधक आहे.

* गाजराच्या नियमित सेवनामुळे कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित राहते आणि हृदयाचे आरोग्य उत्तम राहते.

* गाजर हे एक पौष्टिक कंदमूळ आहे ज्यात पाण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. १०० ग्रॅम गजरात फक्त ४१ कॅलरीज असल्यामुळे वजन नियंत्रणात राहते. आणि म्हणूनच आहारात जाणीवपूर्वक गाजराचा वापर केला पाहिजे. पाहू या गाजराचे काही पदार्थ..

गाजर हलवा

प्रथम आपण गाजर हलवा करणार आहोत. आता हा पदार्थ आपण नेहमीच करतो, पण इथे अगदी मोजके आणि घरात सहज उपलब्ध असलेले जिन्नस वापरणार आहोत.

मावा किंवा कन्डेन्स्ड मिल्कची आवश्यकता नाही. फक्त दूध आणि साखर वापरून अवघ्या १५ ते २० मिनिटांत गाजर हलवा तयार होईल.

साहित्य :

* २ कप किसलेले गाजर

* अर्धा कप साखर, अर्धा कप दूध

* २ टेबलस्पून मिल्क पावडर किंवा २ टेबलस्पून दुधाची साय

* अर्धा टीस्पून वेलची पावडर

* १ टेबलस्पून साजूक तूप

आवडीप्रमाणे सुक्या मेव्याचे तुकडे (गाजर हलव्यात मनुका आणि काजूचे कप छान लागतात)

कृती :

* एका भांडय़ात तूप घालावे. तूप गरम झाल्यावर त्यात गाजराचा कीस घालून गाजर मऊ होईपर्यंत परतावे.

* आता साखर घालावी. मध्यम गॅसवर शिजवून घ्यावे.

* साखरेला सुटलेले पाणी अर्धे आटल्यावर दूध आणि ड्रायफ्रूटचे तुकडे घालावेत.

* सर्व मिश्रण सुकत आले की साय किंवा मिल्क पावडर आणि वेलची पावडर घालून हलवा सुकेपर्यंत शिजवावा.

* गाजर हलवा गरम किंवा थंड आपल्या आवडीप्रमाणे वाढावा.

गाजराचे मोदक

साहित्य :

* मोदकाची पारी

* अर्धा कप गाजराचे तुकडे

* १ कप पाणी

* १ कप मोदकाचे (तांदळाचे) पीठ

* १ टीस्पून तूप

* १ टीस्पून साखर

* १ चिमूट मीठ

मोदकाचे सारण

* याआधी दिलेल्या गाजर हलव्याच्या कृतीप्रमाणे हलवा तयार करून घ्यावा.

कृती :

* गाजराचे तुकडे आणि पाणी मिक्सरमध्ये बारीक वाटून गाजराचा रस तयार करावा. हे मिश्रण गाळून घ्यावे.

* एक कप गाळलेला रस असेल, तर एक कप मोदकाचे पीठ मोजून घ्यावे.

* गाजराचा रस एका भांडय़ात गरम करण्यासाठी ठेवावा.

* त्यात एक चमचा तूप, साखर व मीठ घालून उकळी येऊ द्यावी. उकळी आल्यावर त्यात मोदकाचे पीठ घालून नीट ढवळून घ्यावे व गॅस बंद करून झाकण ठेवावे. (जशी मोदकाची उकड करतो तशीच उकड करावी.)

* १५ ते २० मिनिटांनी झाकण काढून तेलाचा हात लावून उकड छान मळून घ्यावी.

* गाजराच्या हलव्याचे सारण भरून मोदक वळावेत.

* १० मिनिटे कुकर किंवा मोदक पात्रात वाफवून घ्यावेत.

टीप :

* मोदकाच्या उकडीत साखर घातल्यामुळे मोदक उकडल्यावर त्याला छान चकाकी ( २ँ्रल्ल्रल्लॠ) येते.

* जर मोदकाचे पीठ उपलब्ध नसेल तर सध्या तांदळाच्या पिठात १ कप पिठाला १ टीस्पून मैदा घालवा. मोदक फुटत नाहीत.

रसातल्या गाजर शेवया

साहित्य :

* मोदकासाठी काढली तशीच गाजराचा रस घालून १ कप तांदळाच्या पिठाची उकड

* एका नारळाचे दूध

* साखर किंवा गूळ

* आवडीप्रमाणे सुक्या मेव्याचे काप

* अर्धा टीस्पून वेलची पूड

कृती :

* नारळ खवून त्यात पाणी घालून मिक्सरमध्ये वाटून नारळाचे दूध काढावे. दूध साधारण जाडसर असावे. फार पातळ किंवा फार घट्ट असू नये.

* नारळाच्या दुधात साखर घालावी किंवा गूळ घालावा. चांगले ढवळून साखर विरघळून घ्यावी. त्यात वेलची पूड घालावी.

* उकड छान मळून घ्यावी आणि चकलीच्या सोऱ्याला शेवेची चकती लावून गोल शेवेची चके पडून घ्यावीत.

* कुकरची शिट्टी काढावी. शेवेची चाके १० मिनिटे उकडून घावीत.

* एका खोलगट भांडय़ात शेवेचे चाक ठेवावे. शेव बुडेल एवढे नारळाचे दूध त्यावर घालून सुक्या मेव्याचे काप घालून वाढावेत.

* एक कप पिठात साधारण शेवेची ४ ते ५ चके होतात.

* आवडत असल्यास नारळाचे दूध थंड करून घातले तरी चालेल.

* साखर किंवा गुळाचे प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करावे.

गाजराची बर्फी

साहित्य :

* १ कप किसलेले गाजर

* १ कप साखर

* १ कप खवलेला नारळ

* १ टेबलस्पून तूप

* १ कप दुधाची पावडर (आवडत असल्यास)

सजावटीसाठी सुका मेवा

कृती :

* साखर, खोबरे आणि किसलेले गाजर एकत्र करून १० ते १५ मिनिटे ठेवून द्यावे.

* एका भांडय़ात तूप गरम करून त्यात हे मिश्रण घालावे व मध्यम गॅसवर सतत ढवळत राहावे.

* मिश्रण सुकत आले की दुधाची पावडर घालून परत २ मिनिटे परतावे.

* मिश्रणाचा गोळा होत आला की तुपाने ग्रीस केलेल्या ट्रेमध्ये थापावे.

* वरून सुका मेवा घालून सजवावे.

* १५ मिनिटांनी आवडीच्या आकाराच्या वडय़ा पाडाव्यात. * दुधाची पावडर घातल्यामुळे मिश्रण लवकर सुकते आणि वडय़ा थोडय़ा घट्ट होतात.